Halloween Costume ideas 2015

उर्दू सा. दावत, न्यूज पोर्टल आणि मोबाईल अ‍ॅपचे विमोचन

नवी दिल्ली (शोधन सेवा)
खरे वर्तमानपत्र आणि खरी पत्रकारिता दुर्मिळ होत चाललेली असताना गेल्या चार दशकांपासून उर्दू वाचकांना खर्‍या बातम्या आणि विचार प्रवर्तक लेख देण्याचे काम ’दावत’ या वर्तमानपत्राने केलेले आहे. सदरचे वर्तमानपत्र तीन दिवसाला एकदा कृष्णधवलमध्ये प्रकाशित केले जात होते. आता या वर्तमानपत्राने कात टाकली असून, फोर कलरमध्ये साप्ताहिकाच्या स्वरूपात नव्याने वाचकांच्या भेटीला आलेले आहे. सोबत दावत न्यूज पोर्टल आणि मोबाईल अ‍ॅपसारख्या आधुनिक समाजमाध्यमांना मदतीला घेऊन वाचकांची भूक भागविण्यासाठी 28 ऑक्टोबर रोजी देशभरात दाखल झालेले आहे. जमाअते इस्लामी हिंदच्या केंद्रीय मुख्यालयात प्रकाशन आणि विमोचन सोहळा दिल्ली अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष डॉ. जफरूल इस्लाम, जमाअतचे पूर्व अध्यक्ष जलालुद्दीन उमरी व सध्याचे अध्यक्ष सय्यद सआदतुल्लाह हुसैनी, राष्ट्रीय महासचिव टी. आरीफली. उपाध्यक्ष इंजि. मुहम्मद सलीम, मुहम्मद जफर आणि एस. अमीनुल हसन, परवाज रहेमानी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.        याप्रसंगी बोलताना अमीरे जमाअत सय्यद सआदतुल्लाह हुसैनी म्हणाले की, पत्रकारिता ही कोणत्याही वाटसरूच्या हातात विजेरी असल्यासारखी असते. जिच्या प्रकाशामध्ये तो आपल्या मार्गातील चढ,उतार आणि इतर कठीण गोष्टी पाहतो आणि आपला बचाव करू शकतो. सध्याच्या काळात संपूर्ण जगामध्ये माध्यमही खर्‍या बातम्या लपवून खोट्या बातम्या देण्यामध्ये एकमेकाची स्पर्धा करीत आहेत. अशा वेळी दावतच्या माध्यमातून खर्‍या बातम्या आणि गोष्टी लोकांपर्यंत पोहोचविणे ही समाजाची खरी गरज आहे.
Labels:

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget