Halloween Costume ideas 2015

अश्लील आणि व्यभिचारी विचार : प्रेषितवाणी (हदीस)

मा. अबु हुरेरा (रजी.) यांचे कथन आहे की, प्रेषित ह. मुहम्मद (स.) यांनी फर्माविले आहे की, ‘‘आदमच्या संततीकरता त्याचा वाटा व्यभिचाराचा आहे, ज्याचा अवश्य अंगीकार होईल.’’
व्यभिचारिक दृष्टीने पाहणे हा डोळ्यांचा व्यभिचार आहे, अश्लील हितगुज करणे हे कानाचा व्यभिचार आहे, या विषयावर चर्चा करणे हे मौखीक व्यभिचार आहे, अश्लील उद्देश्याने स्पर्श करणे हे हाताचा व्यभिचार आहे, व्यभिचाराकरीता चालणे हे पायाचा व्यभिचार आहे, याची इच्छा व कामना करणे मनाचा व्यभिचार आहे.

स्पष्टीकरण :
ही हदीस खूप महत्वाची आहे. यामध्ये मौलिकरित्या जो विषय स्पष्ट करण्यात आला आहे तो हा की माणसाने अश्लील विचार आपल्या अंत:करणात निर्माण होऊ देऊ नये. कारण की, अंत:करण हेच मानवीय शरीराचा शासक आहे. अशा विचारांना थारा दिल्यास माणूस या पातकाकडे वळणार व त्यास कोणीही या पातकापासून रोखू शकणार नाही. तेव्हा हे आवश्यक  आहे की जर मनामध्ये अश्लील विचार येत असतील तर त्यांना दृढतापूर्वक रोखावे.
या हदीसचा हेतू नाही की, प्रत्येक माणसाच्या नशीबातच व्यभिचाराचा एक निश्चित वाटा असून, नशीबाला कोण टाळू शकतो? अर्थात व्यभिचार घडणारच!!! या उलट याचा अर्थ असा  आहे की, माणसाने जर आपली आत्मीक प्रगती केली नाही व श्रद्धेची शिकण अंत:करणाला दिली नाही तर व्यभिचार व इतर अपरांधापासून वाचविणे शक्य होणार नाही.’’
महत्वाची गोष्ट अशी की, व्यभिचाराची प्रस्ताविका सुद्धा व्यभिचाराच्याच व्याखेत बसते. म्हणूनच एखाद्या स्त्रीवर वाईट वा अश्लील हेतूने नजर टाकणे, अश्लील गप्पा मारणे, ऐकणे, वगैरेंना प्रेषितांनी प्रतिबंध केला आहे. जर या प्राथमिक अवस्थेतच माणसाने स्वत:स वाचविले तर पुढील अपराध घडणार नाहीत. येथे ही गोष्टपण उल्लेखनीय आहे की, अश्लील विचार
करण्याचापण परिणाम भोगावा लागतो.
ह. इब्ने उमर (रजी.) कथन करतात, प्रेषित ह. मुहम्मद (स.) यांनी सांगितले की, ‘‘लज्जा आणि श्रद्धा एकाच ठिकाणी ठेवलेली असते. पैकी एकाचा स्विकार केल्यास, दुसराचाही स्विकार होतो.’’
हजरत इब्ने अब्बास (रजी.) यांचा कथनानुसार, ‘‘या दोन्हीपैकी एक संपुष्टात आली तर दुसरीही त्याच्याबरोबरच संपुष्टात येते.’’
श्रद्धा आणि नैतीकता यांचा किती दाट संबंध आहे, हे यावरून स्पष्ट होते. म्हणूनच इस्लामचे अंतीम प्रेषित ह. मुहम्मद (स.) यांनी फर्माविले आहे की, ‘‘प्रत्येक धर्माचा एक शील  असतो. (स्वभाव, नेचर) इस्लामचा शील लज्जा आहे.’’
(संदर्भ : मुवत्ता इमाम मालिक)

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget