Halloween Costume ideas 2015

इंडिया - यू टू

महिलांवरील लैंगिक अत्याचार हा मुद्दा सध्या देशभर नव्हे तर जगभरात सर्वत्र गाजत आहे. मुद्दा आहे ‘हॅसटॅग मी टू’ नामक गाजत असलेली मोहीम. मानवनिर्मितीत नैसर्गिकरित्या  विरुद्धलिंगी आकर्षण असते हे कुणालाही नाकारता येत नाही. मात्र असे होत असताना भावनेच्या आहारी न जाण्याइतपत मानवाने स्वत:वर नियंत्रण ठेवणे हेही तितकेच महत्त्वाचे  असते. त्यासाठी मनुष्याला निसर्गाने नीतीमत्तेची देणगी देऊन ठेवली आहे. ज्या ज्या वेळी मानवी मनातून नैतिकतेचा ऱ्हास होतो त्या वेळी निश्चितच काही अनर्थ घडणे अनिवार्य ठरते.
विविध क्षेत्रांतील सेलेब्रिटी, पत्रकार, खेळाडू, साहित्यिक, इतकेच काय थेट केंद्रीय मंत्र्यांवर (एमजे) त्यांच्यासोबत काम केलेल्या महिलांद्वारे सध्या होत असलेले आरोप पाहात नक्कीच  त्यांच्यावर अन्याय झाला असावा आणि असे व्हायला नको होते हेही तितकेच समर्थनीय आहे. मात्र, हे करत असताना सहानुभूतीची जागा आंधळ्या अनुनयाची नसावी असेही वाटते.  अशा कथित आरोपांनंतर जर का प्रकरण कोर्टात गेले तर तिथे पुराव्याअभावी आरोपीची सुटका ही निश्चित असते. कारण त्यात तर्कबुद्धीला वाव नसतो. अशा वेळी आरोपांची राळ उडून  जमिनीवर आल्यावर, प्रसिद्धीचा झोत निघून गेल्यावर संबंधित पुरूषाने अब्रुनुकसानीचा दावा केल्यास त्या स्त्रीची स्थिती कशी होईल? जर का प्रसिद्धीसाठी एखाद्यावर अन्याय केल्याचा  आरोप केला तर त्याचा परिणाम विपरीतच होईल. एखाद्या आरोपी पुरुषाने संबंधित महिलेने केलेले आरोप मान्य केले तर तो नैतिकदृष्ट्या दोषीच ठरणार आहे. त्यामुळे असे पुरुष  कालांतराने केलेले आरोप अमान्यच करतील. पाश्चिमात्यांचे अनुकरणामुळे सध्याच्या अधिक खुल्या आणि व्यक्तिगत, व्यावसायिक नातेसंबंधांबाबत अधिक गुंतागुंतीमुळे नैतिकतेचा  ऱ्हास झाला आहे. आधुनिकतेच्या ओघात अनेकांना आपल्या संस्कृतीचा विसर पडलेला आहे. सोशल मीडिया लिंग-भानाच्या, भेदाच्या, विकृतीच्या व टिप्पणीच्या नियंत्रणापलीकडे गेला  आहे. संपूर्ण जगावर फॅसिजमने आपले फास आवळायला सुरुवात केली आहे. जर्मनीत, इटलीत किंवा कुठेही फॅसिजम कसा बोकाळला त्या वेळी तिथल्या लोकशाहीचा पाडाव करण्यासाठी 
ज्या तऱ्हेने जनतेच्या विचाराना वंâट्रोल केले गेले नेमक्या त्याच प्रकारच्या ठिणग्या सध्या ‘मी टू’च्या वादळातून बाहेर पडताना दिसतात. म्हणजेच लोकशाही मार्गाने प्रश्न सुटणार  नसतील तर तो सोशल मीडियाचा वापर करून लोकांच्या मनावर बिंबवण्यात यश संपादन करणे, लोकशाही असतानाही अशा मोहिमेद्वारे सामाजिक दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न  दिसतो.
समाज माध्यमांवर ‘मी टू’सारख्या पाश्चिमात्य मोहिमेचे अनुसरण करून हे मूलभूत प्रश्न सुटणार नाहीत. त्यासाठी महिलाविरोधी अत्याचार रोखण्यासाठी करण्यात आलेल्या कायद्यांची अंमलबजावणी योग्य रितीने होणे गरजेचे आहे. निसर्गाने घालून दिलेल्या मर्यादा न ओलांडता विविध क्षेत्रात अग्रगण्यस्थानी काम करणाऱ्या महिला आजही जागतिक पातळीवर  आपणास आढळून येतात. ‘नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो’च्या २०१६च्या आकडेवारीनुसार ३५४ कलमान्वये जे लैंगिक सतवणुकीचे खटले चालवले जातात. त्यातील जवळपास १०टक्के  केससमध्ये काही तथ्य नसल्याचे म्हणजेच खोट्या केसस असल्याचे न्यायालयाने ठरवले. जेव्हा पुरावे द्यायला लागतील, हे माहिती असूनही जिथे १०टक्के खोट्या केस टाकल्या जातात तिथे समाज माध्यमांवर असे काही बंधन नसल्याने तर विचारायलाच नको. अनेकदा लैंगिक अत्याचाराला बळी न पडण्यासाठी महिलांनी स्वत:वर नैतिक बंधने लावून घेणे हेच योग्य  ठरते. समर्थ पुरुषांच्या बेबंद वागणुकीला वेळीच आळा घातला असता तर सध्या होत असलेल्या नकारात्मक (तात्पुरत्या) ‘वाहवे’ला पाश्चिमात्य स्त्रियांनी सुरू केलेल्या ‘मी टू’च्या  आगीला बळी पडावे लागले नसते. मुळात पुरुषांच्या हाती अशी सत्ता का एकवटते? आणि अशा पुरुषांपुढे महिला नमते का घेतात? जर महिलांना आपल्या खांद्यावर परंपरागत कृतिहीन बिचारेपण वाहायचे असेल आणि पुरुषांना परंपरागत सत्तेचे, पुरुषी, उच्चवर्णीय, उच्चपदाचे फायदे स्त्रियांच्या शोषणाच्या स्वरूपात उठवायचे असतील, तर परंपरांना नैतिकतेच्या  शस्त्राद्वारे शह द्यायला हवा. ही चळवळ, सुमारे वर्षभर जगभरात सुरू आहे आणि देशोदेशी तिला जसा उदंड प्रतिसाद मिळाला आहे तसाच काही ठिकाणी तीव्र विरोधही नोंदवला  गेला आहे.
परस्त्री व परपुरुष एकत्रित वावरण्यामुळे लैंगिक अत्याचाराला आळा बसणे कठीण झाले आहे. परस्पर आदर व स्त्रीजातीचा सन्मान न करता मैत्री, त्यानंतर होणाऱ्या चुका आणि प्रसंगी  निर्माण होऊ शकणाऱ्या आकर्षणाला नियंत्रणात ठेवण्यासाठीच इस्लाम धर्माने परपुरुषांपासून दूर राहण्याचा आदेश महिलांना दिलेला आहे. याला अनेकजण पुरुषप्रधान व्यवस्था अथवा  पुरुषसत्ता म्हणतात. मात्र नीतीमत्तेच्या चौकटीत राहून सर्व क्षेत्रांमध्ये आपल्या कर्तृत्वाचा ठसा जागतिक पटलावर उमटविता येतो. स्पर्धात्मक पद्धती, महत्त्वाकांक्षा, यशाचा अतिरेकी  पाठपुरावा त्याला जोडून भांडवलशाहीच्या हातातील बाहुले बनलेल्या मानसिकतेतूनच ‘मी टू’सारख्या चळवळी उदयास येतात. पूर्वीसारखी नैतिकतेचा धाक असणारी विचारसरणी सध्या  राहिलेली नाही. अशी विचारधारा असती तर शोषणाच्या शक्यता कमीदेखील झाल्या असत्या. ‘इंडिया यू टू’ पाश्चिमात्यांच्या षङ्यंत्राला बळी पडतो आहेस.

-शाहजहान मगदुम
( मो.:८९७६५३३४०४, Email: magdumshah@eshodhan.com)

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget