औरंगाबाद (प्रतिनिधी)
ईश्वराने दिलेल्या मार्गदर्शनानुसार जगल्यास जीवन प्रकाशमय होईल. हे मानवजातीने स्विकारावे असे आवाहन मौलाना कलिम सिद्दीकी यांनी केले.
जमाअते इस्लामी हिंद औरंगाबाद तर्फे तापडिया नाट्यमंदिरात आयोजित ’अंधारातून प्रकाशाकडे’ या अभियानातील प्रारंभिक कार्यक्रमात ते बोलत होते. मंचावर जमाअते इस्लामी हिंदचे प्रदेशाध्यक्ष रिजवानुर्रहेमान खान, सत्यपाल महाराज, औरंगाबादचे शहराध्यक्ष इंजि. वाजेद कादरी, नौशाद उस्मान, मौलाना महेफुजूर्रहेमान आदी उपस्थित होते.
प्रदेशाध्यक्ष रिजवानुर्रहेमान खान म्हणाले, अंधारातून प्रकाशाकडे जी मोहीम सुरू केली आहे याच्या माध्यमातून इस्लाम धर्माने मानव जातीसाठी जी शिकवण दिली त्यानुसार नवीन सकारात्मक उर्जा निर्माण करायची आहे. जीवन अमुल्य आहे. मृत्यूची वेळही अनिश्चित आहे. जीवनानंतर एक परलोक जीवन आहे. ज्यात आपल्याला आपल्या स्वामीपुढे जाब द्यायचा असल्याचे ते म्हणाले. शहराध्यक्ष इंजि.वाजेद कादरी म्हणाले स्वतंत्रता, समता, बंधुत्व, सामाजिक न्यायावर आधारित आदर्श समाज निर्माण करण्याचा प्रकाशमय मार्ग इस्लामने दिला आहे. अकोटचे सत्यपाल महाराज यांनी आपल्या खास शैलीत म्हणाले मला इथे येवून इश्वर भेटला. माणसाला माणूस म्हणून जीवन जगण्यासाठी ज्या नैतिक मुल्यांची गरज होती तो इस्लाम आहे. हा माणसाचा जन्मजात स्वभाव आहे. धर्माला घेवून भांडण्यापेक्षा प्रत्येकाने धर्मानुसार आचरण केले पाहिजे तर आपले जीवन प्रज्वलित होईल असे निवृत्ती महाराज घोडके यांनी मार्गदर्शन करताना सांगितले.
कार्यक्रमाची सुरुवात मौलाना महेफुजुर्रहमान यांनी केलेल्या कुरआन पठणाने झाली. नौशाद उस्मानिया यांनी प्रस्ताविक भाषण केले. उस्मानपुरा गुरुद्वाराचे प्रमुख ग्रंथी खडकसिंग महाराज, संत तुकाराम महाराज आश्रमचे निवृत्ती महाराज, आकोटचे सत्यपाल महाराज, भन्ते अभयपुत्र, अमन कांबळे, मराठा सेवा संघाचे डॉ. रमेश पवार, मोहंमद समी यांनी मार्गदर्शन केले. प्रमुख उपस्थिती डॉ. शादाब मुसा, डॉ. हसीब अहमद, डॉ. सलमान मुकर्रम, फैजान काजी, फहीमुन्निसा बाजी उपस्थित होते. सुत्रसंचालन डॉ. इमरान अहेमद यांनी केले. कार्यक्रमात महिला व युवकांची उपस्थिती लक्षणीय होती.
Post a Comment