Halloween Costume ideas 2015

संपत्ती ऐवजी सत्कर्मांची गोळाबेरीज करणे गरजेचे – डॉ. सय्यद रफीक

- बदनापूर
सध्याच्या शिक्षणपद्धतीतून मानवतावादी दृष्टिकोनाचा ऱ्हास होत आहे. मानवी जीवनाचा नेमका उद्देश काय? याबाबत शिकविले जात नाही. मानवाने संपत्तीऐवजी जीवनात किती सत्कर्मे केली याची गोळाबेरीज केल्यास निश्चितच समाजात चांगला बदल घडेल, असे प्रतिपादन संत साहित्यिक व सामाजिक कार्यकर्ते डॉ. सय्यद रफीक पारनेरकर यांनी येथे व्यक्त  केले.
जामा मस्जिदीत नुकत्याच पार पडलेल्या ईद मिलन कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमास कीर्तनकार निवृत्ती महाराज घोडके, नगराध्यक्ष प्रदीप साबळे, सुरेशकुमार तापडिया, व्यापारी  महासंघाचे तालुकाध्यक्ष अशोककुमार संचेती, निरंकारी ग्रुपचे परमेश्वर नाईकवाडे, मनसेचे जिल्हाध्यक्ष गजानन गिते, सत्यनारायण गेलडा, जालना येथील जमाअत ए इस्लामी हिंदचे  शहराध्यक्ष शेख अब्दुल मुजीब आदींची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ. सय्यद म्हणालो की आपल्या देशात विविध धर्म असले तरी सर्वांना माणुसकीच्या नात्याने एकत्र गुंफले आहे. प्रत्येकाने आपले जीवन चांगल्या कार्यासकाठी खर्ची केले पाहिजे.  प्रत्येकाने एकमेकांचा आदर करून आदर्श जीवन जगावे, अशी कुरआनची शिकवण आहे, असे ते म्हणाले.
निवृत्ती घोडके महाराज म्हणाले, की राजकारणात आता जातियवाद व धार्मिकवाद समाविष्ट झाला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यदलात असंख्य मुस्लिम बांधव होते, तसेच  सम्राट औरंगजेब यांच्या सैन्यदलातही असंख्य हिदू बांधवदेखील होते. त्यावेळी कोणताही जातियवाद नव्हता. मात्र आता राजकीय फायद्यासाठी एकमेकांमध्ये तेढ निर्माण करण्याचे  षङयंत्र रचले जात आहे. अशा षङ्यंत्रापासून हिंदू मुस्लिम बांधवांनी वेळीच सतर्क होत बंधुभावाने राहावे, असे मत व्यक्त केले.
सुरेशकुमार तापडिया, गजानन गिते, अशोककुमार संचेती, परमेश्वर नाईकवाडे व प्रदीब साबळे यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक प्रा. मुक्तार खान यांनी केले. शेख आजम यांनी  आभार मानले. कार्यक्रमासाठी मिर्झा हाजी बशीर बेग, मिर्झा हाजी यूसुफ बेग, हाजी शेख सरदार, हाजी अब्दुल मजिद खान, शेख खालेक, शेख अजहर, मिर्झा अफरोज, शेख नसीर,  मिर्झा आसेफ, शिकुर बेग मिर्झा आदींनी पुढाकार घेतला. या कार्यक्रमास सर्वधर्मिय बांधवांची उपस्थिती होती.
Labels:

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget