Halloween Costume ideas 2015

आलिइमरान : ईशवाणी (सुबोध कुरआन)

(७०) हे ग्रंथधारकांनो, का अल्लाहचे संकेत नाकारता, वास्तविक पाहता तुम्ही स्वत: त्यांचे निरीक्षण करीत आहात?६०
(७१) हे ग्रंधारकांनो, सत्यावर असत्याचा रंग चढवून त्याला का शंकास्पद बनविता? जाणूनबुजून सत्याला का लपविता?
(७२) ग्रंथधारकांपैकी एक गट म्हणतो की या पैगंबराला मानणाNया लोकांवर जे काही अवतरले आहे, त्यावर सकाळी श्रद्धा ठेवा व  संध्याकाळी ते नाकारा. कदाचित या युक्तीने हे लोक आपल्या ईमानपासून परावृत्त होतील.६१
(७३) तसेच हे लोक आपापसात म्हणतात की स्वधर्मीयांशिवाय कोणाचेही ऐकू नका. हे पैगंबर (स.)! यांना सांगा, ‘‘वास्तविक  मार्गदर्शन तर अल्लाहचेच मार्गदर्शन होय. आणि ही त्याचीच देणगी आहे की एखाद्याला तेच काही दिले जावे जे कधी तुम्हाला दिले  गेले होते किंवा असे की इतरांना तुमच्या पालनकत्र्यापुढे रुजू करण्यासाठी तुमच्याविरूद्ध भक्कम प्रमाण मिळावे.’’ हे पैगंबर (स.)!  यांना सांगा, ‘‘प्रतिष्ठा आणि सन्मान अल्लाहच्या अखत्यारित आहे. हवे त्याला प्रदान करावे. तो उदार दृष्टीचा आहे.६२ व तो सर्वज्ञ  आहे.६३
(७४) आपल्या कृपेसाठी हवे त्याला निवडतो आणि त्याची उदारता व कृपा अतिमहान आहे.’’
(७५) ग्रंथधारकांमध्ये कुणी असा आहे की तुम्ही त्याच्या विश्वासावर गडगंज संपत्ती दिली तरी तो तुमची संपत्ती तुम्हाला अदा करील, आणि कुणाची अवस्था अशी आहे की तुम्ही एका  दीनारच्या बाबतीत जरी त्याच्यावर विश्वास ठेवला तरी तो याशिवाय अदा करणार नाही की तुम्ही त्याच्या मानगुटीवर बसाल. त्यांच्या या नैतिक अवस्थेचे कारण असे आहे की ते  सांगतात, ‘‘उम्मी (यहुदी-ज्यूखेरीज इतर लोक) लोकांच्या बाबतीत आमची काही विचारणा होणार नाही.’’६४ आणि ही गोष्ट ते केवळ खोटी रचून तिचा संबंध अल्लाहशी जोडतात. खरे  पाहता त्यांना माहीत आहे की अल्लाहने अशी कोणतीही गोष्ट फर्माविली नाही.
(७६) बरे त्यांची विचारणा का होणार नाही? जो कोणी आपले वचन पूर्ण करील व वाईट गोष्टींपासून दूर राहील तो अल्लाहचा प्रिय बनेल. कारण ईशपरायण लोक अल्लाहला प्रिय आहेत.


६०) दुसरा अनुवाद याचा हासुद्धा होतो, ``तुम्ही स्वत: ग्वाही देत आहात.'' दोन्ही स्थितीत अर्थात काहीच फरक पडत नाही. वास्तविकपणे पैगंबर मुहम्मद (स.) यांचे पवित्र जीवन आणि  सहाबा (रजि.) यांच्या जीवनांवर यांच्या शिकवणीचा आश्चर्यकारक प्रभाव आणि कुरआनातील उच्च् शिकवण, हे सर्व अल्लाहच्या स्पष्ट निशाण्या आहेत. जो कोणी पैगंबरांचे इतिहास  आणि ईशग्रंथांच्या शैलीला जाणतो, त्याच्यासाठी या निशाण्या पाहून आदरणीय पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या पैगंबरत्वावर संशय घेणे कठीण होते. परंतु हे सत्य आहे की अनेक  ग्रंथधारक विद्वानमंडळींना कळून चुकले होते की मुहम्मद (स.) तेच पैगंबर आहे ज्यांच्याविषयी पूर्वीच्या पैगंबरांनी भाकित केले होते. येथपावेतो की कधीकधी सत्याच्या प्रबळ शक्तीने  विवश होऊन पैगंबर मुहम्मद (स.) आणि त्यांचा संदेश सत्य असल्याचे ते मान्यही करत असत. म्हणून कुरआन अशा लोकांना पुन्हा पुन्हा आरोपित करतो की अल्लाहच्या ज्या  निशाण्या तुम्ही डोळयांनी पाहता व ज्यांच्या सत्य होण्यावर तुम्ही ग्वाही देता; तेव्हा तुम्ही जाणून उमजून आपल्या मनातील विकारामुळे सत्य स्वीकारण्यास नकार देत आहात.
६१) ही त्या चालींपैकी एक चाल होती जी मदीना शहरालगतचे यहुदी (ज्यू) लीडर आणि धर्मगुरू इस्लामच्या आवाहनाला कमजोर करण्यासाठी खेळत होते. त्यांनी मुस्लिमांना संभ्रमित  करण्यासाठी आणि पैगंबर मुहम्मद (स.) यांच्याविषयी जनसामान्यांत गैरसमज पसरविण्यासाठी गुप्तरीत्या लोकांना प्रशिक्षित करून कामाला लावले. जेणेकरून प्रथम जाहिररित्या इस्लामचा स्वीकार करावा नंतर त्याचा त्याग करावा, ठिकठिकाणी लोकांमध्ये अपप्रचार करीत फिरावे की आम्ही इस्लाम आणि मुस्लिमांमध्ये आणि त्यांच्या पैगंबर मुहम्मद (स.)  यांच्यात अमुक अमुक अवगुण पाहिले; म्हणून तर आम्ही त्यांच्यापासून विलग झालो आहोत.
६२) मूळ अरबी शब्द `वासि़अ' आला आहे. हा शब्द सर्वसाधारणपणे कुरआनमध्ये तीन प्रसंगी उपयोगात आणला जातो. एक तो प्रसंग जिथे मनुष्याच्या एखाद्या समुहाच्या संकुचित  विचार आणि संकुचित दृष्टिकोनाचा उल्लेख होतो आणि त्या समुदायाला वास्तविकतेपासून सचेत करण्याची आवश्यकता भासते की अल्लाह तुमच्यासारखा संकुचित दृष्टिकोनाचा नाही.  दुसरा प्रसंग जिथे एखाद्याची कृपणता आणि कंजूषी वृत्तीची भर्त्सना करताना उल्लेखित करायचे असते की अल्लाह सढळ हाताचा आहे तुमच्यासारखा कंजूष नाही. तिसरा प्रसंग जिथे  लोक आपल्या संकुचित आस्थांमुळे अल्लाहसाठी काही प्रकारच्या मर्यादा लावतात अशा वेळी दाखविणे आवश्यक ठरते की अल्लाह असीम आहे.
(पाहा, सूरह - २ (अल्बकरा) टीप नं. ११६)
६३) म्हणजे अल्लाहला माहीत आहे की कोण प्रतिष्ठा आणि सन्मानप्राप्त् आहे.
६४) हा केवळ सर्वसामान्य यहुदी (ज्यू) लोकांचाच अज्ञानतापूर्ण विचार नव्हता तर त्यांची धार्मिक शिकवणसुद्धा हीच होती आणि त्यांच्या थोर धार्मिक पंडितांचे आदेशसुद्धा असेच होते.  बायबल कर्ज आणि व्याजाच्या आदेशांत इस्राईल आणि इस्राईलेतर यांच्यात स्पष्ट फरक करतो. (व्यवस्था विवरण १५ : १-३, २३ : २०) तलमूदमध्ये उल्लेख आहे की जर इस्राईलचा  बैल एखाद्या गैरइस्राईलच्या बैलाला जखमी करतो तर त्याच्यासाठी काही दंड नाही. परंतु इस्राईलेतरच्या बैलाने जर इस्राईलच्या बैलाला जखमी केले तर त्याच्यासाठी दंड व शिक्षा आहे.  एखाद्याला खाली पडलेली वस्तू सापडली तर त्याने आजूबाजूला कोणाची वस्ती आहे, हे पाहून घ्यावे. इस्राईली (ज्यू) लोकांची वस्ती असल्यास दवंडी दिली पाहिजे आणि इतरांची असेल  तर ती वस्तू स्वत:जवळ ठेवली पाहिजे. रिब्बी शमुएल म्हणतो की जर इस्राईली आणि गैरइस्राईलीचा दावा न्यायाधीशाकडे आला तर न्यायाधीशाने आपल्या इस्राईली कायद्यानुसार आपल्या इस्राईली बंधुला वाचविले पाहिजे आणि गैरइस्राईली कायद्याने विजयी करू शकतो तर करावे आणि म्हणावे की हा इस्राईलेतरांचा कायदा आहे. दोन्ही कायदे उपयोगी पडत  नसतील तर कोणतीही चाल खेळून इस्राईली भावाला वाचविले पाहिजे. रिब्बी शमुएल म्हणतो की गैरइस्राईलच्या प्रत्येक चुकींद्वारे फायदा उठविला जावा (तालमुदिक मस्सलेनी, पॉल आयझेक हरशो, लंडन १८८० इ. पृ. ३७, २१०,२२१)

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget