- एम आय. शेख
अनेक लोक हे जाणून घेण्यास इच्छुक आहेत की मुस्लिम देशांत लोकशाही का रूजू शकत नाही? या आठवड्यात आपण याच विषयावर चर्चा करूया. मुस्लिमांसंबंधी एक समज असा रूजलेला आहे की मुस्लिम
देश मागास आहेत म्हणून त्यांच्याकडे लोकशाही रूजत नाही. मात्र वस्तुस्थिती तशी नाही. जगात अस्तित्वात असलेल्या मुस्लिम देशांपैकी बहुसंख्य देशात लोकशाहीच आहे. उदा. इंडोनेशिया, मलेशिया, बांग्लादेश, पाकिस्तान, अफगानिस्तान, उझबेकिस्तान, कझाकिस्तान, किरगीझस्तान, अझरबैजान, इरान, तुर्की, नायजेरिया, अल्जेरिया, युगांडा, अल्बानिया, बेनिन, चॅड, टॅगो, टयुनेशिया, अल्जेरिया, दिनीबुटी, सेनेगाल, सुडान, सुरीनाम, सियेरालियोन, सोमालिया, गॅबोन, गोम्बीया, गुयेना, गुईनीया, बिस्साऊ, पॅलेस्टिन, कोमोरस, कॅमेरून कोट डिव्हीयर, लेबनान, मालदीव्ह, माले, मोरेटिनीया, मोंझा, नाईगर, नाईजेरिया, यमन, बोस्नीया या सर्व मुस्लिम देशांत लोकशाही आहे.
मात्र चर्चा फक्त खाडीच्या त्याच अरब देशांची होत असते ज्या ठिकाणी लोकशाही नाही. वर नमूद केलेल्या देशांपैकी अनेक देश असे आहेत की त्यांचे नावही अनेकांना माहित नसतील. ते देश कधीच चर्चेमध्ये येत नाहीत. अनेक देशांची नावेसुद्धा इंग्रजी धाटणीची असल्याकारणानं ते मुस्लिम देश आहेत याचा सुद्धा अंदाज येत नाही. मात्र हे मुस्लिम देश आहेत व या देशांमध्ये लोकशाही आहे.पण कोणती लोकशाही? अमेरिकेला अभिप्रेत असलेली लोकशाही या देशात आहे. इस्लामला अभिप्रेत असलेली खरी लोकशाही जगातील कुठल्याच देशात अस्तित्वात नाही. मात्र ईरानची लोकशाही थोडीफार इस्लामी लोकशाही आहे असे म्हणता येईल. म्हणूनच अमेरिका आणि युरोप ईरानचा सतत विरोध करतात. कारण त्यांना जगात कुठेही इस्लामी लोकशाही नको आहे.

Post a Comment