Halloween Costume ideas 2015

ग्रामीण युवकांचे भवितव्य

अहमदनगर जिल्ह्यातील अकोले व संगमनेर या तालुक्यांतील ३० ते ४० वर्षे वयोगटातील ४५ खेड्यांमधील तरुणांचे सर्वेक्षण केले असता ३०६८ पैकी सुमारे सत्तर टक्के तरुणांना जीवनसाथी तरुणी मिळत नसल्यामुळे अविवाहित राहण्याची नौबत आलेली आहे. याची अनेक कारणे जरी असली तरी सर्वांत मोठे कारण बहुसंख्य तरुण हे अल्पभूधारक आहेत विंâवा कुणाकडे शेतीही नाही. शैक्षणिक सोयी होत असल्यामुळे बरेचसे तरुण चांगले शिक्षित आहेत, पण बेरोजगार आहेत. नोकNया नाहीत. सन २०१२ ते २०१६ या चार वर्षांत लागोपाठ दुष्काळी परिस्थिती ओढावल्यामुळे त्याच्या हालात भर पडलेली आहे. सामाजिक कार्यकर्ते आणि शिक्षकवर्ग यांनी केलेल्या सर्वेक्षणात बहुसंख्य तरुण हे कर्जबाजारी असून उत्पन्नाचे साधन नसल्यामुळे, त्यातून बाहेर पडणे अशक्य झालेले आहे. स्वत:चेच पोट भरण्याचे वांधे त्यातून लग्न करून इतरांना कसे सांभाळायचे यांची भ्रांत आहे. काहीजण दहा एकर्सच्या जमिनीचे मालक असूनही नापिकीमुळे तेही भ्रांत आहेत.
लग्न जमविण्यासाठी सर्वांत मोठी अडचण वधुपित्याकडून होत असते. कोणीही मुलीचा बाप आपल्या मुलीचे भवितव्य सांभाळण्यासाठी मुलांच्या सांपत्त्यिक स्थितीची चौकशी करणे स्वाभाविक आहे. ग्रामीण भागात जमीनजुमला, घरदार, गुरेढोरे, शेतीबिगर व्यवसाय (असल्यास) आदिंची चौकशी हटवूâन केली जाते आणि त्याची खातरी करूनच मुलीला हळद लागते. अशी परिस्थिती अनुरूप नसल्यामुळे कित्येक विवाहेच्छुक तरुण परिस्थितीमुळे नाईलाजाने अविवाहित आहेत.
एकट्या अकोले, संगमनेर या तालुक्यामध्ये हे भीषण वास्तव नाही तर महाराष्ट्रातील बहुतेक ग्रामीण भागातील हे चित्र असण्याची शक्यता नाकारता येत नाही. गेल्या काही वर्षांपासून ग्रामीण भागात आत्महत्या घडण्यामागे ही एक वस्तुस्थिती असावी असे म्हटले जाते. ग्रामीण भागातील युवकांचे हे भवितव्य असेच चालू राहिले तर त्याचे सामाजिक परिणाम भयंकर होण्याची चिंता आहे.
- ज्ञानेश्वर भि. गावडे, फोर्ट, मुंबई.
Labels:

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget