सांगली (शोधन सेवा) - गोरक्षेच्या नावाखाली कथित गोरक्षकांकडून दलित, मुस्लिम समाजातील लोकांवर जीवघेणे हल्ले केले जात आहेत. या घटनांच्या निषेधार्थ आणि गोरक्षकांच्या बंदोबस्तासाठी सांगली येथे जिल्ह्यातील विविध सामाजिक संघटनांकडून स्टेशन चौकात नुकतीच मानवी साखळी केली. तसेच दिवसभर आंदोलन करून जिल्हाधिकाऱ्यांकडे मागण्यांचे निवेदन दिले. या आंदोलनात जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष माजी आ.प्रा.शरद पाटील, ॲड. के.डी.शिंदे, प्रा.डॉ. बाबुराव गुरव, प्रा. नामदेवराव करगणे, ॲड. अमित शिंदे, भानुदास पाटील, विनोद मोरे, प्रविण कोकरे, हिम्मतराव देशमुख, मुनीर मुल्ला, जैलाब शेख, साजीद मुजावर सहीत हजारोंच्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती.
Post a Comment