- सय्यद सालार पटेल
अल्लाहने मानवाला आपल्या निर्मितीमध्ये सर्वश्रेष्ठ दर्जा बहाल केला आहे़ कुरआनमध्ये फरमाविले आहे कि, ’ही तर आमची मेहरबानी आहे की आम्ही मानवजातीला मोठेपण दिले आणि त्यांना खुष्की व जल मार्गावर वाहने दिली आणि त्यांना निर्मल पदार्थाचे अन्न दिले वापल्या बऱ्याचश्या निर्मितींवर श्रेष्ठत्व प्रदान केले’ (कुरआन : १७:१०)
मनुष्याला ईश्वराच्या इतर निर्मितीवर जे श्रेष्ठत्व प्राप्त झाले आहे त्याचे विविध पैलू कुरआनने स्पष्ट केले आहे. ’आम्ही मानवाला सर्वोत्तम संरचनेत निर्माण केले’. (कुरआन 95:14) मानव उत्तम निर्मितीला (संरचनेला) निर्माण केले जाण्याचा अर्थ त्याला ते उत्तम शरीर प्रदान करण्यात आले, जे इतर दुसऱ्या सजीव निर्मितीला देण्यात आलेले नाही़ मानवाला चिंतन, ज्ञान, समज व बुद्धी कौशल्य उच्च श्रेणीचे प्रदान केले आहे़ जे इतर निर्मितींना दिले गेले नाही़. ’कोठे मानवाला जमिनीत खलिफा (प्रतिनिधी) बनविले आहे आणि फरिश्त्यांना त्यांच्या समोर सज्दा (नतमस्तक) करण्याचा आदेश दिला आहे़ ’ (कुरआन 2:30 ते 34) कुरआनात एका ठिकाणी सांगण्यात आले की, ’मानव त्या इशदेणगीचा धारणकर्ता बनला आहे़ ज्यास उचलण्याची शक्ती जमीन, आकाश व पर्वतामध्ये सुद्धा नव्हती़ ’ (कुरआन 33:72) एक ठिकाणी तर म्हंटले आहे कि, ’मी माती पासून एक मानव बनविणार आहे़. मग त्याला पूर्णपणे बनवीन आणि त्यात माझा आत्मा फुंकीन तेंव्हा तुम्ही त्याच्या समोर नतमस्तक व्हा़ (कुरआन 38:71,72) याचा अर्थ मनुष्यात जो आत्मा फुंकला गेला आहे तो खरे तर ईश्वरी गुणाचा एक प्रतिबिंब किंवा छाया आहे़ जीवन, ज्ञान, सामर्थ्य, निश्चय, अधिकार आणि इतर सर्व वैशिष्ट्ये मनुष्यात सापडतात त्याचा सर्वांचा मिळून आत्मा बनतो़ मनुष्यरूपी आत्म्याचा सम्मान व्हावा़. त्यास इजा पोहचू नये, त्याचे रक्षण व्हावे तो नष्ट होता कामा नये म्हणून अल्लाहने मानवाच्या मार्गदर्शनासाठी आदम ते मुहम्मद (सल्ल.) पर्यंत प्रेषितांची व्यवस्था केली़ त्यांना मार्गदर्शनपर ग्रंथ प्रदान केले़ त्यात मनुष्याची धारणा कोणती असावी़ त्याने अल्लाहची उपासना कशी करावी, समाज निर्मितीबाबत कोणते आदेश व कायदे असावे ते कसे सुरक्षित राहतील याची उपाययोजना आखलेली आहे. ही अल्लाहची एक महान देणगी आहे़
Post a Comment