Halloween Costume ideas 2015

6609 बॅगांचे रक्तसंकलन

युथ विंग जमाअते इस्लामी हिंदचा ईद-ए-मिलादुन्नबीनिमित्त उपक्रम


मुंबई (मजहर फारूख) :
युथ विंग जमाअते इस्लामी हिंद महाराष्ट्रातर्फे ईद ए मिलादुन्नबी (सल्ल.) निमित्त महाराष्ट्र राजत्यातील 40 ठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या महारक्तदान शिबिरात 6 हजार 609 जणांनी रक्तदान करून आपले प्रेषित सल्ल. यांच्या प्रती प्रेम व्यक्त केले.   

कुरआनमध्ये म्हटले आहे की, ’’जर कोणी एका व्यक्तीचा जीव वाचविला तर ते असे आहे जसे की त्याने पूर्ण मानवजातीचा जीव वाचविला.’’ प्रेषित मुहम्मद सल्ल. हे समस्त मानवकल्याणासाठी रहेमत बनवून पाठविले. हेच मानवकल्याणाचे हित समोर ठेवून युथ विंग जमाअते इस्लामी हिंद महाराष्ट्राने ईद ए मिलादुन्नबीनिमित्त महारक्तदानाचे आयोजन केले होते. या माध्यमातून हजारो लोकांचे जीव वाचतील. रक्तसंकलनासाठी राज्य रक्तसंकलन परिषद महाराष्ट्र राज्याचे संपूर्ण सहकार्य लाभले. युथविंगसोबत काही ठिकाणी जमियते उलेमानेही आपला सहभाग या रक्तदानात नोंदविला. नागरिकांनी रक्तदान शिबिरात भरभरून सहभाग नोंदवित रक्तदान केल्यामुळे 6 हजार 609 रक्तबॅगांचे संकलन करता आले. राज्याच्या शासकीय दवाखाने व शासकीस वैद्यकीय महाविद्यालयांत रक्ताचा तुटवडा जानवत आहे. या रक्तदान शिबिरामुळे हजारो गोरगरीब रूग्णांना याचा फायदा होईल. आणि ज्या- ज्या नागरिकांनी या रक्तदान शिबिरात रक्तदान केले त्यांना त्याचे पुण्य ऐहिक आणि पारलौकिक जीवनातही मिळेल हे निश्चित. कारण जे कार्य स्वार्थापलिकडचे असते त्या कार्याची दखल घेतली जाते. ईश्वर अशा सत्कर्माचा फायदा आम्हाला निश्चित देत असतो. राज्यातील खालील ठिकाणी केलेले रक्तदान शिबिर - औरंगाबाद - 1105 रक्तबॅग, नागपूर शहर 1064, चिखली जि. बुलढाणा 522, मुंबई जि. ठाणे 502, अकोला 242, जाफ्राबाद जि. जालना 200, अंजनगाव जि. अमरावती 155, यवतमाळ 153, नांदुरा जि. बुलढाणा 151, वाणी जि. यवतमाळ 150, रिसोड जि. वाशमी 148, महेकर जि बुलढाणा 139, अमरावती 133, उमरखेड जि. यवतमाळ 131, परभणी 130, बार्शी टाकळी जि. अकोला 125, सेलू जि. परभणी 107, उदगीर जि. लातूर 104, लातूर 103, पाथरी जि. परभणी 100, पुणे 99, जालना 90, कुर्ला (मुंबई) 89, पाचोरा जि. जळगांव 89, मालवणी, मुंबई 88, रावेर जि. जळगांव 88, आकोट जि. अकोला 86, आचलपूर जि. अमरावती 61, चंदपूर 60, हिंगोली 54, नांदेड 53, राजुरा जि. चंद्रपूर 50, कापूसतडीन जि. अमरावती 50, बीड 48, देवलघाट जि. बुलढाणा 45, अंबाजोगाई जि. बीड 25, सोलापूर 22, सांगली 18, मिरज जि. सांगली 15, कोल्हापूर 15 असे एकूण 40 ठिकाणी 6 हजार 609 रक्तबॅगांचे संकलन करण्यात आले. या महारक्तदान शिबिराचे सर्वत्र कौतुक होत आहे. 


Labels:

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget