Halloween Costume ideas 2015

फेसबुक व धार्मिक भावना

हल्ली सोशल मिडीया हा आपल्या  वैयक्तीक जीवनाचा अविभाज्य अंग बनले आहे. त्यातल्या त्यात फेसबुक, व्हाटसअ‍ॅप, ट्वीटर या सारखे अ‍ॅप्लीकेशन जास्तीत जास्त बहुतांश लोकांकडून वापरले जात असल्याने आपल्या सर्वांना ऑनलाईन राहण्याचे जणू व्यसनच जडलेलं आहे.
    सोशल मीडियाच्या जादुई जाळ्यात आपण नकळतपणे गुंतत चाललेलो आहे आणी यात गुरफटल्यामुळे प्रत्यक्ष गाठीभेटी घेऊन वैयक्तीक संवाद साधण्याची पद्धत जणू विरळ होत चालल्याने मानवी संवेदना,नात्यातील घट्टपणा विरळ होत चाललेला दिसतोय. त्यामुळे एखादी बातमी,पोस्ट व्हायरल करताना आपण त्यामागचा खरेखुरपणा,सत्यता पडताळणी ह्या गोष्टीकडे गांभिर्याने न घेता,एखादी पोस्ट व्हायरल करण्याची घाई, आततायीपणा आपल्याला एखाद्या वेळेस गंभीर गुन्ह्यात नकळतपणे ओढू शकतो, या गोष्टीचा विसर आपल्याला पडतो. एखाद्या धर्माविषयी धार्मिक भावना दुखावणारा, महापुरुषाविषयी बदनामीकारक मजकुर पोस्ट करण्यापुर्वी त्याचा उद्देश  व परिणाम जाणुन न घेतल्याने त्यामुळे सामाजिक जीवनात माजणारी अशांतता, दोन जातीधर्मात दुफळी माजविण्यासाठी, सार्वजनिक सलोखा, शांतता भंग करण्यासाठी समाजमाध्यम आहे का? आपले व इतरांची माथे भडकावून देशातील तरुणांमध्ये एखाद्या विषयी रोष,विष पेरण्याचा,अनर्थ घडविण्याचा हेतू तर नाही ना याबाबत आपण सर्वांनी गांभिर्याने , सदसदविवेकबुद्धीने विचार करण्याची गरज आहे.
    एखादी पोस्ट लाईक,पोस्ट करण्याच्या विळख्यात अडकण्यापूर्वी त्याची सत्यता, गरज, उद्देश तपासुन पाहणे आवश्यक आहे. मानवी जीवनात दहशत,गैरसमज पसरविणे याकरिता रचलेले बनावट आय टी सेल्स चे विषारी,दुषित उद्देश ओळखण्याचे कौशल्य आत्मसात करणे काळाची गरज बनली आहे. सायबर क्राईम, फिशींग, क्रेडीट कार्ड फ्रॉड, सायबर स्टॉकिंग, सायबर बुलिंग, रॅन्समवेअर, सायबर दहशतवाद ,बीटकॉइन फ्रॉड,मालवेअर ,सिम स्वॅप फ्रॉड, ओएलएक्स चे धोके, ऑनलाईन फ्रॉड याविषयी आपल्या सर्व भारतीय लोकांनी सजग राहुन ऑनलाईन जगात वावरण ही काळाची गरज बनली आहे. अन्यथा ऑनलाईन व्यव्हार करताना क्रेडीट कार्डची माहितीविषयी गोपनियता पाळणे,सेफ लॉग इन सेफ लॉग आऊट स्टॅट्रजी,नियमितपणे पासवर्डमध्ये बदल करण्याची सवय,अनोळखी लिंक,इनसिक्युअर लिंकवर क्लीक करण्यापुर्वी त्याचे संभाव्य धोके ओळखण्याचे कौशल्य, फेसबुक वरील खोटे बनावट अकांऊट काढण्यापुर्वी त्याचा माहीती तंत्रज्ञान कायदा 2000 अन्वये गुन्हे करत  असल्याबाबतचा दृष्टीकोन वृद्धीगंत न झाल्याने, हॅकिंग तसेच व्हाटसअ‍ॅपवर एखाद्या व्देष पसरण्याच्या संदेश,माहीती व्हायरल करण्याची धडपड प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे आपणसुद्धा सायबर क्राईमचा बळी बनू शकतो याची दक्षता घेणे अनिवार्य बनले आहे.सायबर क्राईम केल्यास पोलीस तपास करुन आपल्या पर्यंत पोहचू शकतात याचा विसर पडता कामा नये. डिजीटल, ऑनलाईन गुन्हेगारी कमी करण्यासाठी आपण सर्वांनी सजग राहुन,सक्रिय योगदान दिल्यास आपण ’सायबर सेफ’ सोयायटी निर्माण करु शकतो अशी प्रार्थना जागतीक सायबर सेक्युरिटी महिन्याच्या निमीत्ताने मी करु इच्छितो.

- आवेज काजी
लातूर

Labels:

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget