Halloween Costume ideas 2015
September 2022


महान अमेरिका राष्ट्र स्त्रीयांच्या लैंंगिक शोषणाच्या बाबतीत पहिल्या क्रमांकावर आहे. लैंगिक अत्याचारास बळी पडणाऱ्यांमध्ये 91 टक्के महिला आणि 9 टक्के पुरूष आहेत. पण लैंगिक अत्याचार करणारे 99 टक्के पुरूष आहेत. प्रत्येक दहापैकी एका स्त्रीला आपल्या जीवनात कधी न कधी लैंगिक अत्याचारास बळी पडावे लागते. भारतात बळी पडलेल्यांपैकी 71 टक्के कुठे तक्रार करत नाहीत. तसेच जगातील 89 टक्के बळी पडलेल्या स्त्रीया कुठेही तक्रार नोंदवत नाहीत. अशा परिस्थितीत महिलांना जास्तीच्या सुरक्षेची गरज भासते.

इस्लाम धर्मात अल्लाहने आदेश दिले आहेत की, ’’हे प्रेषित मुहम्मद (सल्ल.) मुस्लिम पुरूषांना सांगा की, त्यांनी आपल्या नजरा खाली ठेवाव्या आणि आपल्या लज्जास्थानांचे रक्षण करावे . ही गोष्ट त्यांना पावित्र्य संपन्न करते आणि जे काही लोक करत आहेत अल्लाह त्याची माहिती ठेवतो.’’ ही गोष्ट महिलांच्या शीलांचे रक्षण करण्यासाठी रास्त प्रयोजन आहे. ह्या आयातीवर पुरूषांच्या आचरण करण्यानेे महिलांना कोणतीही भीती निर्माण होत नाही. पण समाजात सगळेच पुरूषया आदेशाचे पालन करणारे नसतात या उलट आचरण करणारे अनेक पुरूष आहेत. म्हणूनच महिलांनी स्वतः देखील आपल्या शीलांचे रक्षण करण्याची काळजी घ्यावी म्हणून त्यांनी ’हिजाब’ची पद्धत लागू केली आहे. ज्या प्रकारे मुस्लिम पुरूषांना आदेश देण्यात आले आहेत त्या प्रकारे मुस्लिम स्त्रियांना उद्देशून पवित्र कुरआनमध्ये म्हटले आहे की, ’’ हे प्रेषित सल्ल. श्रद्धावान महिलांना सांगा की, त्यांनी आपल्या नजरा खाली ठेवाव्या आणि आपल्या लज्जास्थानांचे रक्षण करावे आणि आपला साजशृंगार लोकांना दाखवू नये आणि आपल्या छातीवर चादरीचे पदर ठेवावे आपल्या सौंदर्याचे प्रदर्शन करू नयेत. ह्याच हिजाबच्या पद्धतीवर सध्या भारताच्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी चालू आहे. 

आधुनिक काळातील स्त्री स्वातंत्र्याचे समर्थक हिजाबला प्रगत स्त्रीयांसाठी अनादर समजतात. त्यांचा प्रथम पुरावा असा असतो की, काळ बदललेला आहे जग फार सुसंस्कृत झालेले आहे त्यांना कोणता धोका नाही आणि म्हणूनच हिजाबची गरज नाही. त्यांच्याकडून दूसरा युक्तीवाद असा असतो की, पूर्वीच्या पेक्षा सध्याच्या महिला फार सशक्त झालेल्या आहेत म्हणून त्यांना जास्तीच्या संरक्षणाची गरज नाही. पण जर आपण आकडेवारी पाहिली तर महिलांसंबंधीचे हे दोन्ही दावे फोल ठरतात.

जगातल्या सर्वात मोठा लोकशाही देश आपल्या भारतामध्ये 2021 सालाच्या आकडेवारीनुसार 31677 महिलांवर लैंगिक अत्याचार झाले म्हणजे दररोज 87 महिलांवर अत्याचार झाले. शासकीय संस्था एनसीआरबीनुसार गेल्या वर्षीच्या आकडेवारीच्या तुलनेत यात 19.34 टक्क्यांची वृद्धी झाली होती. इतर अत्याचारांचा आकडा 428278 इतका आहे. यात सुद्धा 13.2 ट्नक्याची भर पडली आहे आणि म्हणूनच काळानुसार महिला अधिक सुरक्षित झाल्या आहेत हे खोटे ठरते. लैंगिक अत्याचाराच्या बाबतीत दिल्लीचा क्रमांक पहिला आहे. तर सर्व प्रकारच्या महिला विरोधी अत्याचारांमध्ये उत्तर प्रदेश देशात सर्वप्रथम आहे.

सभ्य-सुसंस्कृत असल्याचा दावा करणाऱ्या पाश्चात्य देशांविषयी सांगायचे झाल्यास भारत, दक्षिण आफ्रिका आणि झिम्बॉम्बे नंतर सर्व युरोपीय आणि अमेरिकी देश आहेत. महान अमेरिका राष्ट्र स्त्रीयांच्या लैंंगिक शोषणाच्या बाबतीत पहिल्या क्रमांकावर आहे. लैंगिक अत्याचारास बळी पडणाऱ्यांमध्ये 91 टक्के महिला आणि 9 टक्के पुरूष आहेत. पण लैंगिक अत्याचार करणारे 99 टक्के पुरूष आहेत. प्रत्येक दहापैकी एका स्त्रीला आपल्या जीवनात कधी न कधी लैंगिक अत्याचारास बळी पडावे लागते. भारतात बळी पडलेल्यांपैकी 71 टक्के कुठे तक्रार करत नाहीत. तसेच जगातील 89 टक्के बळी पडलेल्या स्त्रीया कुठेही तक्रार नोंदवत नाहीत. अशा परिस्थितीत जास्तीच्या सुरक्षेची गरज भासते. सीमेवरील सैन्य सामान्य माणसापेक्षा जास्त बलवान असतो तरीही त्याच्या सुरक्षेची काळजी घेतली जाते. म्हणूनच हिजाबची पद्धत खऱ्या अर्थार्ने बुद्धीला पटणारी आहे. जर एखादा सैनिक चिलखत घालत नसेल तर त्याला बहाद्दर म्हणता येत नाही तर मूर्ख समजले जाते आणि म्हणूनच त्याला कायद्याची अवज्ञा करण्यासाठी शिक्षा दिली जाते.

सध्याच्या काळात महिला शिक्षण घेऊन नोकरी करू लागल्या आहेत. जेणेकरून संसाराची आर्थिक स्थिती बळकट व्हावी. त्या स्वखुशीने का बळजबरीने हा पर्याय निवडत असतील पण त्यांच्या लज्जेच्या रक्षणाचा प्रश्न तर उभा राहतोच.  त्याच बरोबर अश्लीलता आणि नग्नता या काळात उफाळून आलेल्या आहेत. सौंदर्य प्रसाधनांचा व्यापार झपाट्याने वाढला आणि वाढत जात आहे. त्याकरिता मोठ्या प्रमाणात जाहिरातीसाठी महिलांचा वापर केला जातो. यामुळे स्त्रीयांसमोर आणखीनच समस्या उभारल्या आहेत ज्यांना तोंड द्यावे लागते.

पाश्चात देशात कौटुंबिक जीवन पद्धती नष्ट झालेली असल्याने याचा परिणाम अविवाहित जोडप्यांपासून जन्माला येणाऱ्या मुला-मुलींची संख्या दिवसेंदिवस वाढू लागलेली आहे. तसेच घटस्फोटाच्या दरातही झपाट्याने वाढ होत आहे. लैंगिक आणि मानसिक आजारांनी ग्रस्त झालेल्या समाजात आत्महत्येत वाढ होत आहे. कोरोना काळात सुरक्षित राहण्यासाठी मास्क आणि एकमेकांपासून सुरक्षित अंतर पाळले जात होते. तसे सद्यस्थितीत अश्लीलता आणि व्याभिचारापासून बचाव करण्यासाठी हिजाबची गरज पूर्वीपेक्षा अधिक आहे.

अल्लाहचे म्हणणे आहे की, ‘‘सैतानाच्या वाटेला जाऊ नका तो तुमचा उघड शत्रू आहे. तुम्हाला दुष्कृत्यांचा आदेश देतो’’ आणि म्हणून शहामृगासारखे वाळूत तोंड लपवण्यापेक्षा वास्तव परिस्थितीला मान्य करून व्यवहारिक उपाय करण्याची गरज आहे. महिलांवर होणाऱ्या अत्याचाराविरूद्ध हिजाब हेच सक्षम उपाय आहे.

- डॉ. सलीम खान



’’माणसाने सतत आत्मपरिक्षण करत रहावे. कुरआन आणि हदीसमध्ये बराच वेळा समाज किंवा समाजगटांना सामुहिकरित्या संबोधित केले गेलेले आहे. म्हणून आपल्याला वाटते की, ते संबोधन आपल्याला व्यक्तिगतरित्या थोडेच केलेले आहे. म्हणून नियमितपणे आपले आत्मपरिक्षण करत राहणे गरजेचे होवून जाते. ज्यामुळे सामुहिक संबोधनातूनही आपल्यावर येणाऱ्या जबाबदारीची जाणीव आपल्याला होत राहील.’’

कोरोना काळात अनेक लोक आपल्याला सोडून गेले. आता जो अवधी आपणास मिळालेला आहे त्याबद्दल ईश्वराचे आभार मानावे तितके कमीच आहेत. या अवधीचा दुसरा अर्थ असा आहे की, ईश्वर आपल्याकडून अधिक काम घेऊ इच्छितो. आता जेव्हा ही संधी आपल्याला मिळालेलीच आहे तर आपली जबाबदारी वाढलेली आहे हे लक्षात घेऊन आपल्याला काम करावे लागेल. प्रेषित मुहम्मद सल्ल. यांचे निर्देश आहेत की, ‘‘अंतिम निवाड्याच्या दिवशी कोणालाही एक पाऊलसुद्धा पुढे टाकता येणार नाही, जोपर्यंत तो या तीन प्रश्नांची उत्तरे देणार नाही. 1. आयुष्य कुठे व्यतीत केले? 2. तुला मिळालेल्या ज्ञानावर किती अंमलबजावणी केली? 3. संपत्ती कोठून मिळविली आणि कोठे खर्च केली?’’

प्रेषित मुहम्मद सल्ल. यांच्या वरील निर्देशाचे बारकाईने अवलोकन केल्यास आपल्या लक्षात येईल की, आपल्याला मिळालेल्या आयुष्यातील प्रत्येक क्षणाचा हिशोब द्यावा लागणार आहे. कल्पना करा की तो हिशोब किती कठोर असणार आहे. ईश्वराकडे प्रार्थना करतो की, आमच्याकडून सोपा हिशोब घ्यावा. 

:पहिला उपदेश :

ईश्वराची पुन्हा संपर्क स्थापित करा

समाजाला कठीण काळामध्ये अनेक उपाययोजना कराव्या लागतात. त्यापैकी एक उपाय म्हणजे ईश्वराशी नव्याने संपर्क प्रस्थापित करणे होय. सब्रहे संयम आणि शौर्याचे नाव आहे. व्यवस्था परिवर्तनाच्या मार्गात ज्या अडचणी आणि चाचण्या (आजमाईशें) येतात त्यांना तोंड देतांना परिस्थितीपुढे दृढतेने पाय रोऊन उभे राहणे गरजेचे असते. जेव्हा जो समाज धैर्याचा परिचय देतो तेव्हा त्या समाजाला ईश्वरीय मदत मिळते आणि ज्या समाजाला ईश्वरीय मदत मिळते त्या समाजाला कोणीही परास्त करू शकत नाही. ईश्वराने आपल्या ग्रंथात स्पष्टपणे म्हटलेले आहे की, 

‘‘अल्लाह तुमच्या मदतीला असेल तर कोणतीही शक्ती तुम्हावर वर्चस्व प्राप्त करणार नाही, आणि जर त्याने तुम्हाला सोडून दिले, तर त्यानंतर असा कोण आहे जो तुम्हाला मदत करू शकेल? तर मग जे खरे श्रद्धावंत आहेत त्यांनी अल्लाहवरच विश्वास ठेवला पाहिजे.’’  (सुरे आलेइमरान 3: आयत नं. 160)

आयुष्याच्या नाजुक प्रसंगी सब्र अर्थात धैर्याने उभे राहणे सोपे नाही. पण नमाजमधून हे धैर्य अदृश्य स्वरूपात आपल्याला मिळते. नमाजसंबंधी कुरआनमध्ये खालील निर्देश आलेले आहेत. 

‘‘संयम व नमाजाचे सहाय्य घ्या. निःसंशय नमाज हे अत्यंत कठीण कर्म आहे. परंतु त्या सेवकांसाठी कठीण नाही (सुरे बकरा क्र. 2: आयत नं. 45) जे जाणतात की सरतेशेवटी आपल्या पालनकर्त्याला भेटावयाचे आहे. आणि त्याच्याचकडे परत जावयाचे आहे.’’ (सुरे बकरा (2) : आयत नं. 46)

या ठिकाणी औपचारिक नमाजचा उल्लेख नसून खऱ्या नमाजचा उल्लेख आहे जिला आयुष्यात कायम स्थान देणे सोपे नाही. मात्र हे त्यांच्यासाठी सहज शक्य आहे. ज्यांच्यामध्ये खुशू (अंतःकरणाची शांती) व खुजू (गात्रांची शांती) असते आणि जे ईश्वराची मनापासून भक्ती करतात. खरे तर नमाजच त्या वैशिष्ट्यांनी भरलेली आहे जी वैशिष्ट्ये नमाज धारण करणाऱ्या समाजाला पतनाच्या खाईतून खेचून उत्कर्षाच्या शिर्ष बिंदूवर प्रस्थापित करू शकतात. आपल्या समाजाचे कल्याण आणि भरभराट ही सुद्धा नमाजशीच संबंधित आहे. संयमाचे मूळ नमाज आहे. ईश्वराच्या विशेष भक्तांचे हे वैशिष्ट्ये मानले गेले आहे की ते आपले आयुष्य नमाजच्या अवतीभवतीच केंद्रित करतात. ईश्वराने आपल्या ग्रंथात म्हटले आहे की,  ‘‘जे आपल्या नमाजात नेहमी नियमितपणा ठेवतात (सुरे अलमारिज 70 : आयत नं.23) आणि जे आपल्या नमाजचे रक्षण करतात,(सुरे अलमारिज 70 : 34)

हदीसमध्ये नमाजला मुस्लिमांचा उत्कर्षबिंदू म्हटलेले आहे. जी माणसाला चारित्र्याच्या आभाळाएवढ्या उंचीवर पोहोचविते. नमाज म्हणजे ईश्वराचे नामस्मरण ही आहे. नमाजमुळे माणूस ईश्वराच्या जवळ जातो. दुर्दैवाने आपल्या जीवनात आपण नमाजला ते स्थान देऊ शकलेलो नाही जे की द्यायला हवे होते. ते दिले असते तर आज आपल्या जीवनाची दिशा वेगळी असती. आपले जीवन अध्यात्मिक राहिले असते. त्यामुळे माणुसकीचा विकास झाला असता. 

उपदेश क्रमांक 2 : आत्मपरिक्षण करा

मौलाना सय्यद जलालुद्दीन उमरींचा दुसरा उपदेश असा की, ’’माणसाने सतत आत्मपरिक्षण करत रहावे. कुरआन आणि हदीसमध्ये बराच वेळा समाज किंवा समाजगटांना सामुहिकरित्या संबोधित केले गेलेले आहे. म्हणून आपल्याला वाटते की, ते संबोधन आपल्याला व्यक्तिगतरित्या थोडेच केलेले आहे. म्हणून नियमितपणे आपले आत्मपरिक्षण करत राहणे गरजेचे होवून जाते. ज्यामुळे सामुहिक संबोधनातूनही आपल्यावर येणाऱ्या जबाबदारीची जाणीव आपल्याला होत राहील. या संबंधी कुरआनचा स्पष्ट आदेश आहे की, ‘‘हे लोकहो ज्यांनी श्रद्धा ठेवली आहे, अल्लाहच्या प्रकोपाचे भय बाळगा आणि प्रत्येक इसमाने हे पाहावे की त्याने उद्यासाठी काय सरंजाम केला आहे. अल्लाहच्या प्रकोपाचे भय बाळगत रहा. अल्लाह खचितच तुमच्या त्या सर्व कृत्यांची खबर राखणारा आहे जी तुम्ही करता.’’  (सुरे अलहश्र 59: आत नं. 18)

वरील आयातीत नमूद भय आपल्यात आहे का? आहे तर कितपत आहे? याचे नियमित आत्मपरिक्षण करत राहिल्यास माणसाचा पाय घसरत नाही. तो गुन्हेगारीकडे वळत नाही. अनैतिक कृत्य सुद्धा करत नाही. या आयातीमध्ये समस्त मुस्लिमांना संबोधित करून म्हटले आहे की, प्रत्येक ईमानधारकाने अल्लाहची भीती बाळगावी. ईश्वरीय आदेशाचे पालन करावे. वाईट कृत्यापासून दूर रहावे. नमाज एक असा आरसा आहे ज्यात माणूस आपल्या चारित्र्याचे प्रतिबिंब पाहू शकतो. याच आयातीमध्ये प्रत्येक ईमानधारकाला आत्मपरीक्षण करण्याची सूचना दिलेली आहे. असे करणे चारित्र्य संवर्धनाच्या दिशेने उचललेले पहिले आणि महत्वपूर्ण पाऊल आहे. यानंतरच चारित्र्य संवर्धनाचा पुढचा टप्पा सुरू होतो. हीच पायरी ओलांडली नाही तर पुढच्या पायऱ्यांवर पोहोचणे अशक्य होऊन जाते. 

ईश्वरीय संदेश सर्वांपर्यंत पोहोचवा

ईश्वराचे प्रेषित सर्वांपर्यंत - ईश्वरीय संदेश पोहोचविण्यासाठी कायम प्रयत्नशील राहत होते. त्यांना समाजाची काळजी वाटत असे. त्यांना वाटे की लोकांनी ईश्वराचा संदेश स्वीकारावा आणि त्याच्या कोपापासून दूर रहावे. प्रेषित मुहम्मद सल्ल. याबाबतीत एवढे चिंतीत राहत की, त्यांना उद्देशून ईश्वराने स्वतः म्हटलेले आहे की, ‘‘बरे तर हे पैगंबर (स.)! तुम्ही यांच्या मागे दुःखापायी आपले प्राण गमावणार आहात, जर यांनी या शिकवणुकीवर श्रद्धा ठेवली नाही?’’  (सुरे अलकहफ 18: आयत नं. 6)

’’हे पैगंबर (स.), कदाचित तुम्ही या दुःखाने आपले प्राण गमावून बसाल की हे लोक श्रद्धा ठेवत नाहीत. ’’ (सुरे अश्शुअरा 26: आयत नं. 3)

बुखारीच्या हदीस संग्रहामध्ये प्रेषित सल्ल. यांच्यासंबंधीचा एक प्रसंग नमूद केलेला आहे. ज्यात प्रेषित सल्ल. म्हणतात की, ’’माझे उदाहरण त्या व्यक्तीसारखे आहे जो पाहतो की, एक मोठा वणवा पेटविला गेला आहे आणि किटक ज्याप्रमाणे अग्नीकडे आकर्षित होतात तसे लोक त्या वणव्याकडे आकर्षित होवून पळत सुटलेले आहेत आणि मी एकेकाच्या कमरेला धरून मागे खेचून त्यांना वाचविण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र माझ्या या प्रयत्नांती सुद्धा अनेक लोक त्या वणव्यात जळून भस्म होत आहेत.’’ 

ईश्वराचा संदेश लोकांपर्यंत पोहोचविण्याच्या संबंधाने आपण प्रयत्नशील जरूर असतो परंतु प्रेषित सल्ल. यांच्यामध्ये जी तडप होती ती आपल्यामध्ये नाही. आपल्याला याकडे लक्ष दिले पाहिजे. यामुळे आपला पुढचा मार्ग सोपा होईल. 

प्रामाणिकपणा धर्माचा आत्मा आहे. यासंदर्भात ईश्वराने सुरे जुमर च्या पहिल्या तीन आयातीमधून आपले लक्ष वेधले आहे.

1. ’’या ग्रंथाचे अवतरण महान व बुद्धिमान अल्लाहकडून आहे.’’

2. ‘‘(हे पैगंबर (स.)) हा ग्रंथ आम्ही तुमच्याकडे सत्याधिष्ठित अवतरला आहे. म्हणून तुम्ही अल्लाहचीच भक्ती करा, धर्माला त्याच्यासाठी निर्भेळ करताना.’’

3. ‘‘सावधान, विशुद्ध धर्म हा अल्लाहचा अधिकार आहे. उरले ते लोक ज्यांनी त्याच्याशिवाय इतरांना वाली बनवून ठेवले आहे (आणि आपल्या या कृतीचे समर्थन असे करतात की) आम्ही तर त्यांची उपासना केवळ एवढ्यासाठीच करतो की आम्हाला अल्लाहचे सान्निध्य लाभावे. अल्लाह निश्चितच त्यांच्यादरम्यान त्या सर्व गोष्टींचा निर्णय लावील ज्यात ते मतभेद दर्शवीत आहेत. अल्लाह अशा कोणत्याही इसमाला मार्गदर्शन करीत नसतो जो खोटा आणि सत्याचा इन्कार करणारा असतो.  (सुरे अज्जुमर क्र. 39 : आयत नं. 1 ते 3)

या आयातींमध्ये म्हटलेले आहे की, ’’ हा ग्रंथ ईश्वराकडून अवतरित करण्यात आलेला आहे. तो जबदरस्त आणि शक्तीशाली आहे. त्यामुळे हा ग्रंथ आपले वर्चस्व कायम राखील. याच्या अवतरणाचा उद्देश पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. तो शासक आहे. हा ग्रंथ तर्कांनी सजविलेला आहे. हे प्रेषित मुहम्मद सल्ल. लक्षात ठेवा हा ग्रंथ सत्य आहे आणि याचा आग्रह आहे की, सर्वांनी ईश्वराची भक्ती प्रामाणिकपणे करावी. भक्ती ईश्वरासमोर नमण करणे आणि त्याच्या आदेशांवर कुठलीही हरकत न घेता पालन करणे याचे नाव आहे. दीन या शब्दात भक्ती आणि आज्ञापालन दोन्ही गोष्टी सामील आहेत. या दोन्हींमध्ये प्रामाणिकपणा जरूरी आहे. आणि या दोन्ही गोष्टी भक्ती आणि आज्ञापालन या ग्रंथांच्या मार्गदर्शनाप्रमाणेच व्हावे मनाप्रमाणे नाही. अन्यथा जीवनाची दिशाच दुसरीकडे जाईल. देखावा किंवा प्रसिद्धी या दोन गोष्टी प्रामाणिकपणाच्या एकदम विरूद्ध आहेत. जेथे या दोन गोष्टी आल्या तेथे प्रामाणिकपणा संपतो. त्यानंतर मोठ्यात मोठे काम केले तरी ईश्वराच्या नजरेमध्ये त्याला काही मूल्य राहत नाही. 

एक प्रसिद्ध हदीस आहे ज्यात म्हटलेले आहे की, ’’सर्वात अगोदर तीन माणसं हिशोबासाठी ईश्वराच्या समोर उभे केले जातील. त्यातील एक क़ारी (कुरआनच्या आयाती सुरेल पद्धतीने आळवणारा) दूसरा शहीद आणि तीसरा सखी (दानशूर) या तिघांनाही ईश्वराने जी कृपा केली होती त्याची त्यांना आठवण करून दिली जाईल आणि मग विचारले जाईल की या कृपेचा तुम्ही कसा वापर केला? ते आपली कामगिरी नमूद करतील तेव्हा ईश्वर त्यांना म्हणेल, ’’हा सर्व देखावा होता तुम्ही त्याद्वारे लोकांकडून दाद मिळण्याची अपेक्षा करत होतात. ते केवळ माझ्यासाठी नव्हते. त्यामुळे तुमची ही कामगिरी रद्द करण्यात येत आहे.‘‘ ईश्वरीय आदेश होईल की यांना नरकात टाकून द्या. अल्लाह आपल्या सर्वांचे अशा कृत्यापासून रक्षण करो. एकदा प्रेषित सल्ल. यांनी सांगितले की, ’’मी शिर्क (ईश्वरामध्ये दुसऱ्याला भागीदार ठरविणे) पासून सर्वात जास्त अलिप्त आहे. ज्या व्यक्तीने शिर्कची कृती केली आणि त्यात मला सामील केले तर मी त्याचा आणि त्याच्या कृती दोहोंचा त्याग करेन.’’ 

ईश्वराने फर्माविले आहे की, ’’हे पैगंबर (स.)! सांगा, मी तर एक मनुष्य आहे तुम्हासारखाच, माझ्याकडे ’दिव्यबोध’ पाठविला जातो की तुमचा परमेश्वर केवळ एकच परमेश्वर आहे. म्हणून जे कोणी आपल्या पालनकर्त्याच्या भेटीची आशा करील त्याने सत्कृत्ये करावीत आणि भक्तीमध्ये आपल्या पालनकर्त्यासमवेत इतर कोणाला भागीदार करू नये.’’  (सुरे अलकहफ 18: आयत नं. 110).

अर्थात हे की, ज्या व्यक्तीला या गोष्टीचा विश्वास असेल की, त्याची ईश्वराशी निश्चितपणे भेट होणार आहे त्याची कृती स्पष्ट असावी. शिर्क आणि दिखाव्यापासून दूर असावी. द्वितीय खलीफा हजरत उमर रजि. दुआ करत की, ‘‘ऐ अल्लाह ! माझ्या प्रत्येक कृतीला चांगली बनव आणि तिचा स्वीकार कर आणि त्यात दुसऱ्याचा कोणाचा हिस्सा नसावा.’’ आपल्याला सुद्धा ही दुआ पुन्हा-पुन्हा करणे गरजेचे आहे. आपली कृती प्रामाणिक ठेवण्यासाठी असे करणे गरजेचे आहे. 

जमाअते इस्लामी हिंदच्या वरीष्ठ कार्यकर्त्यांच्या तीन दिवसीय शिबिरात जे की, 27 ते 29 मे 2022 मध्ये नवी दिल्ली येथे झाले होते. त्यात वरील तीन उपदेश मौलाना जलालुद्दीन उमरी यांनी केले होते.

भावार्थ : एम. आय. शेख



महाराष्ट्रातील शेतकरी सध्या अनंत अडचणीवर मात करीत मार्गक्रमण करीत आहे. सातत्याने संततधार राहिल्याने यंदाचा खरीप हंगाम वाया जाण्याच्या मार्गावर आहे. सोयाबीन पीक तर धोक्यात आले आहे. पिकाला पाऊस लागल्याने पीके पिवळी पडली असून, सोयाबीनमध्ये दाने भरले नाहीत. जिथे भरले आहेत ते वजनदार नाहीत. अशात ज्या शेतकऱ्यांनी सोयाबीन ऐवजी अन्य पिके घेतली आहेत त्यालाही पावसाचा फटका बसला आहे. अशात रानडुकरांचे कळप पिकांची मोठ्या प्रमाणात नासधूस करत असल्याने ते ही हातची जात आहेत. मराठवाड्यात याचा अधिक सुळसुळाट आहे. 

भुईमुगाची शेतीतर रानडुकरांमुळे पूर्णतः धोक्यात आल्याने शेतकऱ्यांची भुईमुगाकडे पाठ आहे. याकडे प्रशासनाचे सर्रास दुर्लक्ष होत आहे. रानडुकरांच्या हल्ल्यात अनेक शेतकरी जखमी होत आहेत. मात्र वनप्रशासनाकडून याची कसलीही दखल घेतली जात नाही. शासनाने नुकसानीसाठी तुटपुंजी मदत जाहीर केली आहे मात्र तीही खात्यावर पडली नाही. याचा शेतकऱ्यांच्या मानसिकतेवर परिणाम होत आहे. अशात शेतीकडे वाढणारा कल दिवसेंदिवस कमी होत आहे. शासनाने भरीव मदत द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे. 



लातूर :
मनुष्याला ऐहिक आणि पारलौकिक जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर त्यानेे आत्मशुद्धीसाठी सातत्याने प्रयत्न केले पाहिजेत. ज्यामुळे त्याचे जीवन हे सुखी, समृद्ध आणि स्वतःच्या व समाजाच्या जडणघडणीसाठी उपयुक्त ठरते. शिवाय, अंतःकरणाच्या शुद्धीकरणामुळे मनुष्याचे व्यक्तीमत्व उजळत असते. ही सातत्याने चालत राहणारी प्रक्रिया असून, यासाठी कुरआन आणि हदीसमध्ये योग्य मार्ग दाखविला आहे, असे जमाअते इस्लामी हिंद महाराष्ट्राचे पूर्व उपाध्यक्ष मौलाना इलियास फलाही म्हणाले.

मर्कज-ए-इस्लामी खोरी गल्ली, लातूर  येथे जमाअते इस्लामी हिंद द्वारा आयोजित एक दिवसीय जिल्हास्तरीय ’ततहरी-ए-कल्ब’ (अंतःकरणाचे शुद्धीकरण) या एक दिवसीय शिबिरात रविवारी ते बोलत होते. मंचावर लातूरचे जिल्हाध्यक्ष मिसबाहुद्दीन हाश्मी, उपाध्यक्ष मुहम्मद आरीफ, शहराध्यक्ष अशफाक अहमद, सचिव अब्दुल वाजीद उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरूवात कुरआन पठणाने डॉ. असगर उदगीरकर यांनी केेले. 

कुरआनमध्ये ’कल्ब का तसव्वुर और कैफियते कल्ब’ या विषयावर बोलताना मौलाना इलियास फलाही यांनी कुरआन व हदीसचे दाखले देत  म्हणाले की, आत्मशुद्धीसाठी जो व्यक्ती प्रयत्न करत नाही तो व्यक्ती सर्वात अधिक कठोर असतो. ईश्वराने आपल्याला जे अंतःकरण दिलेले आहे ते आजारी पडू नये म्हणून आपणास त्याच्या शुद्धीकरणासाठी सातत्याने प्रयत्न केले पाहिजेत. आज व्यक्ती छोट्या-छोट्या मोहापाई मोठमोठे नुकसान करून बसतो. ज्यामुळे त्याच्या आयुष्यात दुःखाचे डोंगर उभे राहतात. मग तो स्वतःला सोडून इतरांना दोष देण्यात मग्न असतो. त्यामुळे योग्यवेळी आपल्यात होणारे बदल ओळखून त्यामध्ये सुधारणा घडवून आणली पाहिजे. जे अंतःकरण ईश्वराच्या नामस्मरणापासून गाफिल राहते ते कधी  चुकीच्या मार्गावर चालले आहे त्याचे त्यालाच कळत नाही. कुरआनच्या मार्गदर्शनाचा प्रकाश आपल्या अंतःकरणात पाडण्यासाठी त्याचे नियमितपणे वाचन करून ते समजण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले पाहिजेत. यामध्ये मनुष्याच्या जीवनाशी निगडीत समस्यांच्या निपटाऱ्याची चावी सापडते. ईश्वराने आमच्यासमोर एवढे मोठे ब्रह्मांड उभे केले आहे आणि त्याला समजून घेण्यासाठी आम्हाला मन, मस्तिष्क आणि अंतःकरण दिलेले आहे. जसं शरीर आजारी पडते तसं अंतःकरणही आजारी पडते. या अंतःकरणाला सरळ मार्ग हा कुरआनच्या प्रकाशातूनच मिळतो. मग ते प्रश्न ऐहिक असोत की पारलौकिक. कुठल्याही कामाला छोटे समजून ते करण्यासाठी चलबिचल होऊ नका. मनुष्याचा अहंमपणा त्याला मोठ्या सन्मार्गापासून वंचित ठेवतो. शरीराची स्वच्छता मनाच्या स्वच्छतेसाठीही आवश्यक आहे. चांगली सोबत पाळत जा. ज्यामुळे आपल्यातील गुण, दोष समजायला मदत होते.  

यावेळी ‘मनाचे आजार आणि त्यावर उपाय’ यावर चर्चासत्रही झाले. ज्यामध्ये साजीद आझाद, मुहम्मद इसहाक, सय्यद वाजीब, मुहम्मद अशफाक अहमद, दायमी अब्दुर्रहीम यानी विचार व्यक्त केले. यावर मौलाना इलियास फलाही यांनी विवेचन केले. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष मुहम्मद आरीफ यांनी तजकिया-ए-नफ्स का आगाज या विषयावर मार्गदर्शन केले. ’आओ अपनी उन खामीयों का इजाला करें’ (या आपल्या त्या दुर्गूनांना दूर करूया) हे खुले चर्चासत्र झाले. ज्यामध्ये विषय होते, उद्धटपणा, अहंभाव, राग, चहाडी, चुगली, सुस्ती, नजरअंदाजी, मनघडंत विचार यावर उपस्थितांनी भरभरून प्रतिसाद देत आपली मते व्यक्त केली. याचे संचलन अबरार मोहसीन यांनी केले. पहिल्या चर्चासत्राचे सूत्रसंचलन सय्यद आसेफ यांनी केले. 

दुसऱ्या चर्चासत्रात ’आपल्या मनाचा हिशेब घेऊया’ यावर डॉ. मुजाहीद शरीफ यांनी हदीसद्वारे प्रकाश टाकला. आपल्या ईश्वराशी भेट आणि त्याची तैयारी यावर प्रा. अब्दुल वाजीद यांनी विचार व्यक्त केले. जिल्हाध्यक्ष मिसबाहुद्दीन हाश्मी यांनी ’आओ अपना एहतेसाब करें’यावर विचार व्यक्त करताना आपले दैनंदिन नियोजनाची उकल सांगितली. अध्यक्षीय भाषणात मौलाना इलियास फलाही यांनी ’अंतःकरण आणि यशस्वी जीवनाची गुरूकिल्ली’ यावर विचार व्यक्त केले. शेवटी प्रार्थनेने कार्यक्रमाचा शेवट झाला.  



जर कोणी स्वारी इफ आय हर्ट यू अर्थात मला क्षमा करा, जर मी तुम्हाला दुखवले असेल तर. हे वाक्य आपण दैनंदिन जीवनात ऐकत, वाचत आणि बोलत असतो. हे वाक्य आपल्याला आपल्या जवळच्या व्यक्तीकडून ऐकायला मिळते. कारण ज्यांची पोहोच आपल्या मनापर्यंत असते. तेच आपल्या मनाला दुखवू शकतात आणि दुखवून गप्पही बसत नाहीत तर ही अपेक्षाही करतात की, आपण पटकन त्यांना माफ करावे. ही अपेक्षा यासाठी असते की, त्यांनी जाणून बुजून नाही तर सहज काहीतरी विधान केलेले असते जे समोरच्या व्यक्तीला वाईट वाटत असते. दुःख होते व आत्म्याला जखम देऊन जाते. आणि जोपर्यंत ही जखम भरत नाही तोपर्यंत माफी मागूनही आपण माफ करत नाही. मनाने माफ करायला वेळ लागतो. ’माफ केले’ हे चटकन बोलले तरीही मन या माफीला हिरवे कंदील लवकर दाखवित नाही.

असे का होते?

प्रत्येक माणसाची स्वतःबद्दल एक कल्पना असते. मी असा आणि असाच आहे. स्वतःला प्रत्येकजण चांगलाच समजत असतो. मग कोणी आपल्याबद्दल नकारात्मक बोलले तर ते आपल्याला मान्य होत नाही. कारण आपण आपल्याबद्दल जी सकारात्मक चौकट बनविलेली असते त्याच्या बाहेर बोललेलं आपल्याला पटत नाही. मग सुरू होतो विचारांचा पूर. त्यांनी असं बोलायला नको होतं! ती अशी का बोलली? मी का असा आहे का? माझ्याबद्दल असे विचार त्यांचे कसे काय होऊ शकतात? असे एक ना अनेक प्रश्न मनात निर्माण होतात आणि आपल्या डोक्यात ट्राफिक जाम करून ठेवतात. मग प्रश्न असा निर्माण होतो की, समोरच्या व्यक्तीला माफ करायचे की नाही? मी का माफ करू? मी काय चूक केली होती?  माझ्यासोबत इतकं वाईट केलंय तरी मी माफ करावे का? मग बोलणं बंद, भेटणं बंद, समोरच्या व्यक्तीचं नाव जरी काढलं तर त्रास होतो पण हे सगळं बरोबर आहे का? 

पती-पत्नी, कुटुंबाचे सदस्य, सहकारी किंवा मित्रांसोबत लांब काळापासून चाललेला राग, संघर्ष हा शारीरिक स्वास्थ्याला प्रभावित करतो.

जॉन हाफकिन हॉस्पिटलमध्ये मूड डिसऑर्डर अडल्ट कन्सलटेशन्निलनिकचे डॉ. केरेन स्वॉरट्झ (एम.डी.) म्हणतात की, ’’ जखम होणे, निराशा व राग येणे हे एकसारखेच असते. हे शरीराला एक मोठ्या ओझ्यासारखे असते. माणसाला फाईट मोडमध्ये घालते. जेणेकरून शरीरात कोलेस्ट्रॉल वाढते, हार्ट अटॅकचा धोका वाढतो. पण यात एक चांगली बाब ही की, अभ्यासाअंती असे माहित झाले आहेकी, क्षमा केल्याने आरोग्याला खूप चांगला पुरस्कार प्राप्त होतो. जेणेकरून हृदयाचा आजार होत नाही. कोलेस्ट्रॉलचा स्तर कमी होतो. हृदय घाताचा धोकाही कमी होतो, मधुमेह होण्याची शक्यताही कमी होते, अनिद्रेचे संकट टळते. मग कोणी सॉरी म्हणते तर काय करायचे? सॉरी म्हणणारा व्यक्ती चांगला असतो कारण त्याला आपण चुकलो याची जाणीव होते. तो महानही असतो. कारण त्याने आपला इगो बाजूला ठेवण तुम्हाला स्वॉरी म्हटलेले असते. मग जेव्हाही कोणी आपली चूक मान्य करून सॉरी म्हणत असेल तर त्याला माफ करा. कारण दूसरा पर्यायच नाही. माफ केल्याने तुमच्या शरीरावर चांगले परिणाम होतील. सर्वप्रथम तुमच्य चेहऱ्यावर स्मित हास्य फुले, हालकं वाटेल व आपण आपल्या जीवनात महत्त्वाचा व्यक्ती गमावणार नाही, याची स्वतःलाच खात्री मिळेल.  खूप काळापासून साठवून ठेवलेला राग आपल्याला हळूहळू मधुमेह आणि हृदयरोगाकडे घेऊन जातो. मूड स्वींग्ज् होतात. विनाकारण उदासीनता राग व अनिद्रा होऊ शकते. म्हणून माफ करण्याची चांगली सवय लावून घेतल्यास बरे. ती माफीही वरून नाही तर मनातून माफ करा. 

आज आपण समाजात घटस्फोटाच्या जेवढ्या घटना बघतो ’त्यात माफ न करणे’, हे एक मोठे कारण आहे. पती किंवा पत्नी एकमेकांच्या लहान सहान चुका माफ करत नाहीत. केले म्हणूनही माफ करत नाहीत. आई- वडिल मुलांच्या चुका माफ करायला तयार नाहीत. सासू सासरे सुनेच्या चुका माफ करायला तयार नाहीत. परिणाम स्वरूप भांडणे होतात आणि आपली सामाजिक व्यवस्था सुरळीत चालत नाही. माफ करण्याचे आदेश कुरआन व हदीसमध्येही आहेत. सुरे आले इमरान आयत नं. 159 मध्ये म्हटलेले आहे की, हे पैगंबर (स.), ही अल्लाहची मोठी कृपा आहे की तुम्ही या लोकांसाठी फार कोमल स्वभावी ठरला आहात. एरवी जर तुम्ही एखादे वेळी शीघ्रकोपी स्वभावी व निष्ठूर असता तर हे सर्वजण तुमच्यापासून विभक्त -(उर्वरित आतील पान 2वर)

झाले असते. यांचे अपराध माफ करा, यांच्यासाठी क्षमेची प्रार्थना करा, आणि धर्म-कार्यात यांनासुद्धा सल्लामसलतीत सहभागी ठेवा, मग जेव्हा एखाद्या मतावर तुमचा निश्चय दृढ होईल तेव्हा अल्लाहवर भरोसा करा, अल्लाहला ते लोक प्रिय आहेत जे त्याच्या भरवशावर काम करतात.  (3:159)

आम्ही जमीन आणि आकाशांना आणि त्यांच्यात अस्तित्वात असलेल्या सर्वांना सत्याशिवाय इतर कोणत्याही आधारावर निर्माण केले नाही. आणि निर्णयाची घटका निश्चितच येणार आहे, मग हे पैगंबर (स.)! तुम्ही (या लोकांच्या अशिष्टतेवर) सभ्यतेने दुर्लक्ष करीत रहा.  (सुरे अलहिज्र 15 : आयत नं. 85)

याशिवाय, हदीसमध्येही आपल्यालाल क्षमा करण्याच्या महत्त्वावर एक पूर्ण चॅप्टर आढळून येतो. एक दुआ जी मला खूप आवडते. तिचे रमजानच्या शब-ए-कद्र मध्ये जास्तीत जास्त पठण करण्याचे आदेश आहेत. ती खालीलप्रमाणे, हे अल्लाह ! तू साक्षात क्षमा आहेस, तू क्षमा करणाऱ्यांना पसंत करतोस,मला क्षमा कर. दुसऱ्या एका हदीसचा अर्थ असा आहे की, प्रत्येक माणूस गुन्हेगार आहे. पण सर्वात चांगला गुन्हेगार तो आहे जो सर्वात लवकर क्षमा मागतो. आणखीन एका हदीसचा अर्थ आहे की, तुम्ही लोकांना माफ करत जा, जर तुम्हाला हे पसंत असेल की, अल्लाहनी तुम्हाला माफ करावे. 

सैतान मानवाच्या मनात नकारात्मक विचार टाकत असतो. त्याचे सर्वात प्रिय काम पती, पत्नींमध्ये भांडण लावणे आहे. माणसात आपआपसात भांडण लावणे हे सैतानला प्रिय आहे. जेव्हा नकारात्मक विचार मनात येतात तेव्हा आऊजुबिल्लाही मिनशैतॉनी रजीमचे पठण  करावे. त्यामुळे नकारात्मक विचारांवर विजय प्राप्त करता येतो. जीवन हे क्षणभंगूर आहे म्हणून ते आनंदाने व्यतीत करायचे असेल तर आपणाला एकमेकांना माफ करावे लागेल. काहीजण स्वतःलाही माफ करत नाहीत आणि आत्महत्या करून घेतात. अल्लाहचा आदेश आहे की, तो आपल्या भक्तांचे गुन्हे जे समुद्राच्या पाण्याच्या फेसाएवढे प्रचंड जरी असले तरी तो माफ करतो. मग माझी आणि तुमची काय बिसात. अल्लाह, एकमेका व्यक्तीला माफ करण्याची सद्बुद्धी देओ. आमीन.

- डॉ. सिमीन शहापुरे

8788327935



हजरत अबू जर गफ्फारी (र.) म्हणतात, मला प्रेषित मुहम्मद (स.) यांनी काही गोष्टींची शिकवण दिली.

१) ज्या लोकांना श्रीमंती आणि प्रतिष्ठा लाभली आहे, मी त्यांच्याकडे न पाहता अशा लोकांकडे पाहावे ज्यांना माझ्यापेक्षा कमी लाभले आहे.

२) मला शिकवण दिली की मि निराधारांशी प्रेमाचा व्यवहार करावा आणि त्यांच्या सान्निध्यात जावे.

३) मला ताकीद दिली आहे की जरी माझे नातलग माझ्याशी नाराज असले आणि माझे अधिकार देत नसतील तरीही मी त्यांच्याशी संबंध स्थापित करावेत आणि त्यांचे हक्काधिकार त्यांना द्यावेत.

(तरगीब व तरहीब, संदर्भ- तबरानी)

ह. अबू हुरैरा (र.) म्हणतात की एके दिवशी प्रेषित मुहम्मद (स.) म्हणाले,

"माझ्या या गोष्टी कोण घेईल, त्यावर आचरण करील आणि आचरण करणाऱ्यांना सुद्धा सांगेल?"

मी म्हणलो, 'हे प्रेषिता, मी त्यासाठी तयार आहे.' तेव्हा त्यांनी माझा हात धरला आणि खालील गोष्टी सांगितल्या.

(१) अल्लाहय्या अवज्ञेपासून स्वतःला वाचवा, तुम्ही सर्वांत जास्त उपासक व्हाल.

(२) अल्लाहने जितकी उपजीविका तुमच्यासाठी निश्चित केलेली आहे त्यावर समाधान व्यक्त करा आणि राजी व्हा, तुम्ही सर्वांत जास्त श्रीमंत व्हाल.

(३) आपल्या शेजाऱ्यांशी चांगले व्यवहार करा, तुम्ही अधिक श्रद्धावंत व्हाल.

(४) तुम्ही स्वतःसाठी जे पसंत करता तेच इतरावसाठीही पसंत केले तर तुम्ही मुस्लिम व्हाल.

(५) जास्त हसू नका, कारण जास्त हसण्यामुळे हृदयावर परिणाम होतो.

(संदर्भ- मिश्कात)

एके दिवशी एक खेडूत मुस्लिम प्रेषित मुहम्मद (स.) यांच्याकडे आला आणि म्हणाला, 'हे अल्लाहचे प्रेषित, मिला अशा काही गोष्टी सांगा ज्यांच्यावर आचरण करुन मी स्वर्गात जाईन.'

प्रेषित (स.) म्हणाले, "तुम्ही फार थोडक्यात विचारलं, परंतु फार चांगलं विचारलं आले. जर स्वर्गात जाण्याची इच्छा असेल तर एखाद्या माणसाला मुक्त करा आणि काहींना गुलामीतून मुक्त करा."

तो खेडूत म्हणाला, 'ह्या दोन्ही गोष्टी एकच आहेत.'

प्रेषित (स.) म्हणाले, "ह्या दोन्ही गोष्टींचा अर्थ एकच नाही. एखाद्या माणसाला किंवा महिलेला मुक्त करण्याचा अर्थ असा की तुम्ही स्वतःचे पैसे खर्च करुन त्या व्यक्तीला मुक्त करणे आणि गुलामाला मुक्त करण्याचा अर्थ असा की अनेक माणसांनी मळून एखाद्या गुलामाला मुक्त करणे. दुसरे काम असे की तुम्ही आपली उंटीण दूध पिण्यासाठी दुसऱ्या कुणाला तरी देऊन टाका. तिसरी गोष्ट ही की ज्या नातेवाईकांनी तुमच्याशी संबंध तोडले असलीत त्यांच्य़ाशी तुम्ही संबंध जोडा. जर ही सगळी स्वर्गात जाण्याची कामे करणे शक्य नसेल तर भुकेलेल्यांना जेवण द्या, तहानलेल्यांना पाणी पाजा, लोकांना भल्या गोष्टी सांगत जा आणि वाईट गोष्टींपासून रोखा. जर हेदेखील करणे तुम्लाहा जमत नसेल तर आपल्या जिभेचे रक्षण करा. केवळ भल्या गोष्टीच जिभेने उच्चारा."

(तरगीब व तरहीब, संदर्भ- अहमद)

संकलन : सय्यद इफ्तिखार अहमद



(६०) जर तुम्ही त्याला आणले नाही तर माझ्याजवळ तुमच्यासाठी अजिबात धान्य नाही. इतकेच नव्हे तर तुम्ही माझ्या जवळपासदेखील फिरकू नका.’’५२ 

(६१) त्यांनी सांगितले, ‘‘आम्ही प्रयत्न करू की वडील त्याला पाठविण्यास तयार व्हावेत, आणि आम्ही असे जरूर करू.’’ 

(६२) यूसुफ (अ.) ने आपल्या गुलामांना इशारा केला की, ‘‘या लोकांनी धान्याच्या मोबदल्यात जो माल दिलेला आहे तो गुपचुप त्यांच्या सामानांतच ठेऊन द्या.’’ यूसुफ (अ.) ने असे या आशेने केले की घरी पोहचल्यावर आपला परत मिळालेला माल ते ओळखतील (अथवा या औदार्यावर कृतज्ञ होतील) आणि आश्चर्य नव्हे की पुन्हा ते परततील.

(६३) जेव्हा ते आपल्या वडिलांजवळ गेले तेव्हा म्हणाले, ‘‘हे पिता, यापुढे आम्हाला धान्य देण्यास नकार देण्यात आला आहे म्हणून आपण आमच्या भावाला आमच्याबरोबर पाठवून द्यावे जेणेकरून आम्ही धान्य घेऊन येऊ. आणि त्याच्या रक्षणाचे आम्ही जबाबदार आहोत.’’

(६४) वडिलांनी उत्तर दिले, ‘‘मी त्याच्याही मामल्यात तुमच्यावर तसाच विश्वास ठेवू काय जसा यापूर्वी त्याच्या भावासंबंधी ठेवला होता? अल्लाह उत्तम रक्षक आहे व तो सर्वांपेक्षा जास्त दया करणारा आहे.’’ 

(६५) मग जेव्हा त्यांनी आपले सामान उघडले तेव्हा पाहिले की त्यांचा मालसुद्धा त्यांना परत केलेला आहे. हे पाहून ते पुकारून उठले, ‘‘हे पिता आम्हाला आणखी काय हवे, पाहा, हा आमचा मालसुद्धा आम्हाला परत केला गेला आहे. परत आता आम्ही जाऊ आणि आमच्या मुलाबाळांसाठी रसद घेऊन येऊ. आपल्या भावाचे रक्षणही करू आणि एका उंटाचा भार आणखी जास्तही आणू. इतक्या धान्याची वाढ सहज होईल.’’ 

(६६) त्यांच्या पित्याने सांगितले, ‘‘मी त्याला कदापि तुमच्याबरोबर पाठविणार नाही जोपर्यंत तुम्ही अल्लाहच्या नावाने मला पक्के वचन देत नाही की त्याला माझ्याजवळ जरूर परत आणाल याव्यतिरिक्त की तुम्ही वेढलेच जाल.’’ जेव्हा त्यांनी त्यांच्यासमोर आपापल्या प्रतिज्ञा घेतल्या तेव्हा तो म्हणाला, ‘‘पाहा, आमच्या या वचनावर अल्लाह पाहात आहे.’’



५२) संक्षेपामुळे शक्य आहे की एखाद्यास समजणे कठीण जाईल की पैगंबर यूसुफ (अ.) त्यांना आपली ओळख देऊ इच्छित नव्हते तर येथे सावत्र भावांचा उल्लेख कसा आला आहे. यामुळे तर भेद उघडले असते. परंतु थोडा  विचार  केल्याने  स्पष्ट  खुलासा  होतो. दुष्काळामुळे  तिथे  धान्यावर  नियंत्रण होते  (कंट्रोलचे धान्य) आणि प्रत्येकाला विशिष्ट मात्रेतच धान्य दिले जात होते. धान्य घ्यावयास हे दहा भाऊ आले होते परंतु ते आपल्या पित्याचा आणि आपल्या अकराव्या भावाचा हिस्सासुद्धा मागत असतील. यावर पैगंबर यूसुफ (अ.) यांनी सांगितले असेल की तुमचे वडील स्वत: येथे न येण्याचे कारण त्यांचे म्हातारपण व नेत्रहीनता मी समजू शकतो. परंतु भाऊ का आला नाही? त्यांनी उत्तरात सांगितले असेल की तो सावत्रभाऊ आहे आणि काही कारणांमुळे आमचे वडील त्याला आमच्याबरोबर पाठवित नाहीत. तेव्हा पैगंबर यूसुफ (अ.) यांनी सांगितले असेल की ठीक यावेळेस आम्ही तुमच्यावर विश्वास ठेवून तुम्हाला धान्य देतो. परंतु पुढे भविष्यात त्या भावाला तुम्ही बरोबर आणले नाही तर तुमचा भरोसा आम्ही करणार नाही आणि तुम्हाला येथून धान्य मिळणार नाही. या शासकीय धमकीबरोबर त्यांच्यावर त्यांनी उपकार केले, कारण घराचे हाल जाणून घेण्यास व लहान भावास पाहण्यासाठी त्यांचे मन व्यावूâळ झाले असेल. ही एक साधी सरळ स्थिती आहे याला थोडा विचार केल्याने समजून येते. या स्थितीत बायबलच्या त्या अतिशयोक्तीपूर्ण वर्णनावर भरोसा करणे योग्य नाही ज्याला उत्पत्ति अध्याय ४२-४३ मध्ये सांगितले गेले आहे.



पर्यावरण कार्यप्रदर्शन निर्देशांक (ईपीआई) २०२२ नुसार, भारत १८० देशांमध्ये १८० व्या क्रमांकावर आहे. ईपीआई प्रमाणे, शासकीय कायदे, भ्रष्टाचार नियंत्रण आणि सरकारी कामगिरीच्या बाबतीतही भारत खराब आहे, यासंदर्भात भारताने टीका केली आहे. स्विस फर्म आईक्यूएयर ने प्रसिद्ध केलेल्या जागतिक वायु गुणवत्ता अहवाल २०२१ नुसार, ६३ भारतीय शहरे पृथ्वीवरील १०० सर्वाधिक प्रदूषित ठिकाणांमध्ये आहेत. वायू प्रदूषणामुळे भारतीयांचे सरासरी आयुर्मान ६.३  वर्षे कमी होते. स्टेट ऑफ ग्लोबल एअर २०२० च्या अहवालानुसार, २०१९ मध्ये जन्माच्या एका महिन्याच्या आत भारतात वायू प्रदूषणामुळे ११६,००० पेक्षा जास्त बाळांचा जीव दगावला. भारतातील जवळजवळ संपूर्ण लोकसंख्या जागतिक आरोग्य संघटनेने ठरवलेल्या गुणवत्तेच्या दर्जापेक्षा कमी असलेल्या हवेत श्वास घेते.


पर्यावरणीय आरोग्य हे सभोवतालच्या पर्यावरणाचे मानवी शरीरावर होणारे परिणाम दर्शवितो. पर्यावरणीय आरोग्याचा समतोल बिघडवणाऱ्या समस्यांमध्ये पर्यावरणीय स्रोत आणि घातक घटक ओळखून त्यांचे मूल्यांकन करून घातक भौतिक, रासायनिक आणि जैविक घटक, प्रदूषण, हवामान बदल, रोग निर्माण करणारे जंतू, आरोग्य सुविधांचा अभाव, निकृष्ट पायाभूत सुविधा यात सामील आहेत. स्वच्छ हवा आणि पाणी, संतुलित हवामान, आवश्यक स्वच्छता, मर्यादित यांत्रिक संसाधने आणि रसायनांचा मर्यादित वापर, ओझोन संरक्षण, सुरक्षित कामाची ठिकाणे आणि निवासस्थान, निरोगी कृषी पद्धती, संरक्षित निसर्ग हे सर्व पृथ्वीवरील प्रत्येक मानवाचा चांगल्या आरोग्यासाठी खूप आवश्यक आहे. जगभरातील मानवी आरोग्यावर सतत वाढत असलेल्या पर्यावरणीय प्रभावांबद्दल जनजागृती करण्यासाठी दरवर्षी २६ सप्टेंबर रोजी “जागतिक पर्यावरण आरोग्य दिन” साजरा करण्यात जातो. या विशेष दिवसानिमित्त यावर्षीची थीम "शाश्वत विकास लक्ष्यांच्या अंमलबजावणीसाठी पर्यावरणीय आरोग्य प्रणाली मजबूत करणे" आहे. "पर्यावरण आरोग्य" लोकांचे संरक्षण आणि समुदायांना निरोगी वातावरण प्रदान करण्याच्या उद्देशाने हवा, पाणी, माती आणि अन्न यांचे रासायनिक आणि इतर पर्यावरणीय संपर्क कमी करण्यासाठी धोरणे आणि कार्यक्रम प्रगत करण्यासाठी कार्य करते.

जगातील  एकूण मृत्यूंच्या ४ पैकी १ पर्यावरणीय जोखीम घटक, जसे की हवा, पाणी आणि माती प्रदूषण, रासायनिक धोका, हवामान बदल आणि अतिनील किरणे, १०० हून अधिक रोग आणि जखमांना कारणीभूत ठरतात, जे अकाली मृत्यूचे कारण आहे. स्ट्रोकमुळे दरवर्षी २.५ दशलक्ष मृत्यू, इस्केमिक हृदयरोगामुळे दरवर्षी २.३ दशलक्ष मृत्यू, अनावधानाने झालेल्या दुखापती (जसे की रस्ते वाहतूक मृत्यू) - दरवर्षी १.७ दशलक्ष मृत्यू, कर्करोगामुळे दरवर्षी १.७ दशलक्ष मृत्यू, तीव्र श्वसन रोगांमुळे दरवर्षी १.४ दशलक्ष मृत्यू, अतिसाराच्या आजारांमुळे दरवर्षी ८४६,००० मृत्यू, श्वसन संक्रमणामुळे दरवर्षी ५६७,००० मृत्यू, मलेरियामुळे दरवर्षी २५९,००० मृत्यू, दरवर्षी २७०,००० नवजातांचा मृत्यू होतो. २०३० ते २०५० दरम्यान, कुपोषण, मलेरिया, अतिसार, हवामान बदलामुळे आणि उष्णतेमुळे दरवर्षी अतिरिक्त २५०,००० मृत्यू होण्याची शक्यता आहे.

पर्यावरण कार्यप्रदर्शन निर्देशांक (ईपीआई) २०२२ नुसार, भारत १८० देशांमध्ये १८० व्या क्रमांकावर आहे. पाकिस्तान, बांगलादेश, व्हिएतनाम आणि म्यानमारनंतर भारताचा क्रमांक १८.९ च्या माफक गुणांसह आला आहे. ईपीआई प्रमाणे, शासकीय कायदे, भ्रष्टाचार नियंत्रण आणि सरकारी कामगिरीच्या बाबतीतही भारत खराब आहे, यासंदर्भात भारताने टीका केली आहे. स्विस फर्म आईक्यूएयर ने प्रसिद्ध केलेल्या जागतिक वायु गुणवत्ता अहवाल २०२१ नुसार, ६३ भारतीय शहरे पृथ्वीवरील १०० सर्वाधिक प्रदूषित ठिकाणांमध्ये आहेत. वायू प्रदूषणामुळे भारतीयांचे सरासरी आयुर्मान ६.३ वर्षे कमी होते. स्टेट ऑफ ग्लोबल एअर २०२० च्या अहवालानुसार, २०१९ मध्ये जन्माच्या एका महिन्याच्या आत भारतात वायू प्रदूषणामुळे ११६,००० पेक्षा जास्त बाळांचा जीव दगावला. भारतातील जवळजवळ संपूर्ण लोकसंख्या जागतिक आरोग्य संघटनेने ठरवलेल्या गुणवत्तेच्या दर्जापेक्षा कमी असलेल्या हवेत श्वास घेते.

भारताच्या पर्यावरण अहवाल २०२१ नुसार, भारत १८० पैकी ११७ व्या क्रमांकावर आहे. भारतात होणाऱ्या मृत्यूंपैकी १२.५ टक्के मृत्यू वायू प्रदूषणामुळे होतात. अहवालानुसार, देशातील भूजल पातळी धोक्यात आहे, ८६ टक्के जलस्रोत गंभीरपणे प्रदूषित झाले आहेत . देशात २६१३ झोपडपट्टी असणारे शहर आहेत. २०१६-१७ दरम्यान भारताने घातक कचरा निर्माण करणाऱ्या उद्योगांच्या संख्येत ५६% वाढ नोंदवली आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या म्हणण्यानुसार, देशातील प्रमुख औद्योगिक क्लस्टर्सपैकी ३५ ने एकूणच पर्यावरणाचा ऱ्हास दर्शविला आहे, ३३ ने हवेची गुणवत्ता खालावत असल्याचे निदर्शनास आणले, ४५ मध्ये जास्त प्रदूषित पाणी होते आणि १७ मध्ये मातीचे प्रदूषण आणखीनच वाढले. कोविड-१९ ने जगातील गरीबांना आणखी गरीब केले आहे. कोविड-१९ महामारीमुळे, जागतिक स्तरावर ५०० दशलक्षाहून अधिक मुलांना शाळा सोडावी लागली आणि त्यापैकी निम्म्याहून अधिक मुले भारतातील होती.

पर्यावरणीय आरोग्य सुधारणा प्रत्येकाची जबाबदारी

आजचे खरे सत्य हे आहे की साधारणपणे १ टक्के लोक समाज, पर्यावरण, धोरण, शासकीय सुव्यवस्था, मानवता जगविण्यासाठी जागरुकतेने काम करतात, पण ९९ टक्के लोक चांगल्या कामांबद्दल बोलतात पण त्या गोष्टी अंमलात आणू इच्छित नाही. ज्याचा जिथे स्वार्थ किंवा फायदा आला, तिथं ते नियम मोडतात, याचा फटका संपूर्ण समाजाला सहन करावा लागत आहे. स्वार्थी लोक स्वतःच्या फायद्यासाठी कोणाचेही नुकसान करण्यास मागेपुढे पाहत नाहीत, म्हणून अगोदर सर्व लोकांना पर्यावरणाचे महत्त्व समजणे अत्यंत आवश्यक आहे. पर्यावरण वाचवायला प्रत्येक नागरिकाने जागरूक राहणे गरजेचे आहे. चिपको आंदोलन, सायलेंट व्हॅली बचाव आंदोलन, जंगल बचाओ आंदोलन, अप्पिको आंदोलन, नर्मदा बचाव आंदोलन, टिहरी धरण संघर्ष अशा अनेक चळवळी पर्यावरणाच्या रक्षणासाठी देशात केल्या गेल्या आहेत. आजही अनेकजण रक्षाबंधनाला झाडांना राखी बांधून त्यांच्या रक्षणाची शपथ घेतात. निसर्गाचे सौंदर्य जतन करण्यासाठी, थारू जमाती समुदाय स्वेच्छेने 60 तासांचा कडक लॉकडाऊन लावून एक अद्वितीय सण साजरा करतो. आज आपल्या समाजाला अशा उपक्रमांची नितांत गरज आहे. आपल्या दैनंदिन जीवनात पुनर्वापराच्या सवयी लागू करणे हा लँडफिल कचरा कमी करणे सोबतच नैसर्गिक संसाधनांचे संरक्षण करणे, प्रदूषण कमी करणे, ऊर्जेचा वापर कमी करणे हे सर्व ग्लोबल वॉर्मिंगची गती कमी करण्यात सहायक होऊ शकते. आपल्या समाजातील स्वच्छतेसाठी स्वयंसेवकाची भूमिका पाळा. जागरूक रहा, इतरांना आपल्या नैसर्गिक संसाधनांचे महत्त्व आणि मूल्य समजविण्यास मदत करा. पाणी अनमोल आहे, त्याचे महत्त्व समजून घ्या, पाण्याचे काटकसरीने वापर करा. खरेदी करताना टिकाऊ वस्तू निवडा, प्लॅस्टिकला नाही म्हणून शहाणपणा दाखवा. आंतरराष्ट्रीय मानकांद्वारे प्रमाणित साधने वापरा, यांत्रिक संसाधनांचा वापर कमी करा. वृक्ष लागवडीला चालना द्या, रेन वॉटर हार्वेस्टिंग राबवा. शक्यतो दररोज चालावें, सायकल चालवावे, सार्वजनिक वाहतूक वाहने वापरा. नेहमी जागरूक राहून शासकीय नियमांचे पालन करावे. विशेष प्रसंगी, लोकांना त्यांची आवडती झाडें भेट म्हणून द्यावी.

आपल्या समाजात वस्तूंच्या गरजेपेक्षा त्याला स्टेटस सिम्बॉल म्हणून जास्त महत्त्व दिले जाते. आजच्या आधुनिक काळात जास्ततर माणसांचे आयुष्य देखावा करण्यामध्येच संपते. स्वत:ची नासाडी करून अशी लोक समाजाची आणि पर्यावरणाची मोठी हानी करतात. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे देखावा थांबविणे गरजेचे आहे. जीवन खूप सोपे आणि सुंदर आहे, आपल्या मुख्य गरजा निसर्गाद्वारे सहजरित्या पूर्ण केल्या जातात, पण आपले असमाधानी मन इच्छा आकांक्षा वाढवत असतात, त्यामुळे समस्या सतत वाढत जातात. नैसर्गिक साधनसंपत्तीचे अतिशोषण, यांत्रिक उपकरणांचा अतिवापर, सर्वत्र घातक रसायनांचा वापर, जंगल आणि वन्यजीवांचे वाढते नुकसान, वाढता प्राणघातक कचरा यामुळे पर्यावरण चक्र विस्कळीत होत आहे. निसर्गाचे संरक्षण म्हणजे आपल्या जीवाचे रक्षण. ही पृथ्वी आपले घर आहे, निसर्ग आपल्याला जीवन देतो आणि जर आपण त्या निसर्गाचीच सतत हानी करत असू तर आपल्यापेक्षा स्वार्थी सैतान कोणीही नाही.

- डॉ. प्रितम भी. गेडाम

भ्रमणध्वनी क्र.- 82374 17041


रश्दींवरील हल्ला प्रकरणाच्या निमित्ताने


अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या अधिकारावर फार काळ पूर्वग्रह, द्वेष आणि दुटप्पीपणा करता येत नाही. सर्वप्रथम लेखन स्वातंत्र्याच्या मर्यादा निश्चित करणे आवश्यक आहे. भाषण स्वातंत्र्याचा वापर केवळ इस्लामची खिल्ली उडवण्यासाठी किंवा मुस्लिमविरोधी भावनांना खतपाणी घालण्यासाठी करता येणार नाही. जागतिक पातळीवर सहजीवन, खुल्या विचारांची आणि धार्मिक सहिष्णुता आणि एकमेकांबद्दल आदर बाळगण्याची गरज आहे.

कधी कधी आयुष्यातले काही मुद्दे, घटना किंवा समस्या अशा बनतात की, या नियमांखाली किंवा दबावाखाली आपल्या विवेकाला सामोरे जाण्याची आपली इच्छा नसते. आपल्या वैयक्तिक अस्मितेवर किंवा आपल्या व्यक्तिमत्त्वावर त्याचा खोलवर परिणाम होतो हे माहीत असले, तरी आपण ते बाजूला ठेवून आपले आयुष्य जगू लागतो.

उदा. घरचे काही विषय असोत वा नातेवाईकांशी वाद असोत किंवा व्यवसायात किंवा राजकारणात बेईमानी असो वा धर्माच्या नावाखाली गोष्टी दिशाभूल करणाऱ्या असोत. जणू काही प्रत्येक प्रकारे आपण अशा गोष्टी रोज ऐकत असतो, जे दाखवून देते की, काही जण तत्त्वांनी असहाय असतात तर कधी विवेकाचा सौदा करून आपण एकतर स्वत:ला विकतो किंवा संधीचा फायदा घेऊन प्रचंड पैसा आणि प्रसिद्धीसाठी सौदा करतो. ज्यानंतर ते एकतर विशिष्ट व्यक्ती, व्यक्तिमत्त्व, धर्म, राजकीय पक्ष इत्यादींच्या विरोधात किंवा समर्थनार्थ लिखाण करून किंवा बोलून प्रसिद्धी मिळवतात किंवा आपला जीव धोक्यात घालतात.

"अभिव्यक्ती स्वातंत्र्य" ही एक "शक्तिशाली" गोष्ट आहे जी जगभरातील लेखकांशी सहमत आणि असहमत आहे. मग तो लेखक पश्चिमेकडचा असो वा पूर्वेचा असो. पण भाषण स्वातंत्र्यामुळे लेखकांचा आत्मविश्वास खूप वाढला आहे, हे मात्र खरे, तर त्यावर दिवसेंदिवस आणखी एक वादंग सुरू आहे. कारण बोलण्याच्या स्वातंत्र्याला मर्यादा नसतात. ज्यामुळे रोज कोणत्या ना कोणत्या लेखकाच्या विरोधात आंदोलने होतात किंवा कधी कधी त्यांच्यावर जीवघेणा हल्ला होतो. 

अॅम्नेस्टी इंटरनॅशनल अंतर्गत अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे तुम्हाला हवे ते, हवे तेव्हा योग्य किंवा अयोग्य म्हणणे हा अधिकार आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्य हा सर्व प्रकारच्या माहितीचा आणि कल्पनांचा शोध घेण्याचा, प्राप्त करण्याचा आणि प्रदान करण्याचा अधिकार आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि त्याचा अधिकार सर्व प्रकारच्या विचारांना लागू होतो. मात्र, काही परिस्थितीत अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर बंधने येऊ शकतात.

'सॅटॅनिक व्हर्सेस' या वादाला सलमान रश्दी प्रकरण असेही म्हणतात. १९८८ साली सलमान रश्दी यांची 'द स्टॅनिक व्हर्सेस' ही कादंबरी ब्रिटनमध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर जगभरातील मुस्लिमांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. मुस्लिमांनी सलमान रश्दी यांच्यावर ईशनिंदा किंवा अश्रद्धेचा आरोप केला आणि १९८९ मध्ये इराणच्या अयातुल्ला खोमेनी यांनी रश्दींना ठार मारण्याचा फतवा काढला. १९९८ पर्यंत रश्दी यांच्या विरोधातील फतव्याला इराणच्या राजवटीने पाठिंबा दिला, पण जेव्हा इराणचे अध्यक्ष मोहम्मद खातमी यांच्या उत्तराधिकारी सरकारने सलमान रश्दी यांच्या हत्येला आता पाठिंबा दिला नसल्याचे सांगितले. मात्र, फतवा कायम आहे. इंग्रजी लेखक हनीफ कुरेशी यांनी या फतव्याचे वर्णन 'दुसऱ्या महायुद्धानंतरच्या वाङ्मयीन इतिहासातील सर्वांत महत्त्वाची घटना' असे केले. 

यानंतर पाश्चिमात्य देशांमध्ये वादंग माजला आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याची चर्चा दिवसेंदिवस होऊ लागली. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे एक मूलभूत पाश्चात्त्य मूल्य हे आहे की, कोणालाही ठार मारले जाऊ नये किंवा गंभीर स्वरूपाचा सामना करावा लागू नये. पण जर कोणी पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या विरोधात काही बोललं तर ते पूर्ण अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे असे वाटत नाही. त्याऐवजी अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर मर्यादा घालणेच उचित ठरेल, जेणेकरून अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली अशा गोष्टी कुणीही कोणत्याही धर्माला आणि त्याच्या पैगंबराला लिहू नयेत, ज्यामुळे त्याच्या अनुयायांच्या भावना वाईटरीत्या दुखावल्या जातील. 

१२ ऑगस्ट रोजी ७५ वर्षीय सलमान रश्दी यांची ओळख पश्चिम न्यूयॉर्कमधील एका इन्स्टिट्यूशनमध्ये करून कलात्मक स्वातंत्र्याच्या विषयावर शेकडो प्रेक्षकांशी चर्चा केली जात असताना एका व्यक्तीने रंगमंचावर येऊन वादग्रस्त कादंबरीकार सलमान रश्दी यांच्यावर हल्ला चढवला. हल्लेखोर वारंवार सलमान रश्दीच्या छातीवर आणि मानेवर वार करत असल्याचे पाहायला मिळाले. सभागृहातील श्रोते स्तब्ध होऊन मोठमोठ्याने ओरडत होते. लगेच प्रेक्षकांनी रश्दीपासून त्या माणसाला वेगळे करण्यासाठी मदत करण्यास सुरुवात केली. न्यूयॉर्क स्टेट पोलिसांच्या पथकाने हल्लेखोराला अटक केली.

सलमान रश्दी यांचा जन्म मुंबईतील एका मुस्लिम काश्मिरी कुटुंबात झाला. वयाच्या १४ व्या वर्षी सलाम रश्दी यांना उच्च व उत्तम शिक्षणासाठी ब्रिटनला पाठवण्यात आले. सलमान रश्दी यांना त्यांच्या सॅटॅनिक व्हर्सेस या चौथ्या कादंबरीसाठी जीवे मारण्याच्या धमक्यांना दीर्घकाळापासून तोंड द्यावे लागले आहे. मुस्लिमांचे म्हणणे आहे की, पुस्तकात अपमानास्पद मजकूर आहे. १९८८ साली प्रकाशित झाल्यानंतर अनेक देशांत त्यावर बंदी घालण्यात आली. पाकिस्ताननंतर सॅटॅनिक व्हर्सेस वर बंदी घालणारा भारत हा जगातील पहिला देश होता. यानंतर दक्षिण आफ्रिकेसह इतर विविध मुस्लिम देशांनीही सॅटॅनिक व्हर्सेस वर बंदी घातली.

पण सॅटनिक व्हर्सेस ग्रंथावरून सलमान रश्दी यांनाच धमकी देण्यात आली नव्हती. जुलै १९९१ मध्ये टोकियोच्या ईशान्येकडील एका विद्यापीठात सॅटॅनिक व्हर्सेस च्या एका जपानी भाषांतरकाराची हत्या करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तुलनात्मक संस्कृतीचे सहाय्यक प्राध्यापक म्हणून काम करणाऱ्या अनुवादक हितोशी इगाराशी यांच्यावर अनेक वेळा चाकूने वार करण्यात आले आणि त्यांना त्सुकुबा विद्यापीठातील त्यांच्या कार्यालयाबाहेरील हॉलमध्ये सोडण्यात आले. त्याचा मारेकरी कधीच सापडला नाही. या महिन्याच्या सुरुवातीला इटलीचा भाषांतरकार इटोर कॅप्रिओलो याला मिलानमधील त्याच्या अपार्टमेंटमध्ये चाकूने भोसकून ठार मारण्यात आले होते, तो या हल्ल्यातून बचावला होता. त्याचप्रमाणे नॉर्वेजियन भाषांतरकार विल्यम नेगार्ड यांच्यावर १९९३ मध्ये ओस्लो येथील त्यांच्या घराबाहेर गोळ्या झाडण्यात आल्या आणि ते बचावले. 

बऱ्याच युरोपियन देशांमध्ये ईशनिंदेचे उच्चाटन करण्यात आले जेथे त्यांच्या पूर्वजांना कालांतराने चर्चच्या वैभवासाठी कठोर शिक्षा भोगाव्या लागल्या. त्यांना हा शब्द का आवडत नाही हे समजण्यासारखे आहे. असे असले, तरी प्रेषित मुहम्मद (स.) हे केवळ पवित्रच नव्हे, तर सर्व मुसलमानांसाठी अत्यंत उच्च आणि महत्त्वाचे आहेत, हे पाहावे लागेल. मुस्लिमांचा अपमान करणे, त्यांच्या धार्मिक भावना दुखावणे आणि इस्लामची बदनामी करणे हे केवळ शब्द नाहीत. त्याऐवजी, ते अत्यंत नापसंती, द्वेष आणि भावना देखील निर्माण करतात ज्यामुळे शेवटी द्वेषाचे गुन्हे घडतात. 

फ्रान्सच्या अध्यक्ष मर्केल यांनी म्हटल्याप्रमाणे, "अभिव्यक्ती स्वातंत्र्याला काही मर्यादा आहेत. जिथे द्वेष पसरतो तिथे या सीमांची सुरुवात होते." पण दुदैर्वाने जेव्हा अभिव्यक्ती स्वातंत्र्य इस्लाम आणि त्याच्या संदेशवाहकावर चिखलफेक करते, तेव्हा पाश्चात्त्य राजकारणी आणि मर्केल यांच्यासारखे लोक अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या मर्यादा विसरतात आणि चिखलफेक करणाऱ्यांची पाठ थोपटून घेताना दिसतात. 

अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या अधिकारावर फार काळ पूर्वग्रह आणि द्वेष आणि दुटप्पीपणा करता येत नाही. सर्वप्रथम लेखन स्वातंत्र्याच्या मर्यादा निश्चित करणे आवश्यक आहे. भाषण स्वातंत्र्याचा वापर केवळ इस्लामची खिल्ली उडवण्यासाठी किंवा मुस्लिमविरोधी भावनांना खतपाणी घालण्यासाठी करता येणार नाही. जागतिक पातळीवर सहजीवन, खुल्या विचारांची आणि धार्मिक सहिष्णुता आणि एकमेकांबद्दल आदर बाळगण्याची गरज आहे.

- शाहजहान मगदुम

(कार्यकारी संपादक)

भ्रमणध्वनी : ८९७६५३३४०४


गेल्या दोन तीन वर्षांत कोरोना,डेल्टा, आणि ओमिक्राॅन  या विषाणूंमुळे जगभरात सर्वच थरात भय निर्माण झाले होते, माणूस माणसापासून दूर गेला होता.अनेकांचे जवळचे नातेवाईक, आप्त, मित्र, शेजारी यांच्यापैकी दुर्दैवाने या साथीत बळी पडले गेले. कोरोंनामुळे रुग्णशय्येवर कोरोन्टाईन झालेले रुग्ण आणि त्यांच्या हलाखीच्या बातम्या किंवा अफवा ऐकून सर्वसामान्य माणूस घाबरून व हडबडून गेला होता, त्यामुळे समाजात औदासिन्य आणि नैराश्यता यांचे प्रमाण प्रचंड वाढले होते. त्यातून मनोरुग्णांची संख्या ही कमालीची वाढली होती. वृत्तपत्रांतील तसेच दूरदर्शनवरील व समाज माध्यमातून कोरोनाच्या बातम्या आणि दृश्ये यामुळे  सर्वसामान्य माणसाचे मन सैरभर झाले होते. त्यामुळे समाजमनाची एकाग्रता भंग पावली होती. रूग्णालयात जाणे अनेकांना भितीदायक झाले होते. पूर्वीच्या काळी डॉक्टर म्हणजे देवदूत वाटायचा, पण अलिकडच्या काळात डॉक्टर म्हणजे पेशंटकडून वाट्टेल तसे आणि हवे तेवढे पैसे उखळणारा लुटारू वाटू लागला आहे. त्यामुळे दवाखान्यात दाखल होणे म्हणजे सर्वसामान्य जनतेला महाभयंकर संकट वाटत आहे. त्यातच हे मानवनिर्मित संकट असून जागतिक जैविक युद्घाची नांदी आहे की काय असा प्रश्न प्रत्येकाच्या मनात मोठ्या प्रमाणावर उभा राहिलेला होता. चीनने पुकारलेले हे जैविक युद्ध आहे, व चीन सर्व जगावर आपले अधिराज्य गाजवू पाहतोय,तो आपल्या देशाचा एक नंबरचा शत्रू आहे,असे माध्यमातून ऐ्कल्यापासून तर सर्वसामान्य माणूस मोठ्या प्रमाणावर घाबरून औदासिन्याच्या आणि नैराश्याच्या गर्तेत जावू लागला होता. 

खरं तर शरीराचे आरोग्य म्हणजेच संपत्ती आहे. ही संपत्ती मिळण्याकरिता प्रत्येक माणसाला एकाग्रता जरूरीची असते. स्वास्थ्य म्हणजे तरी काय ? ज्याचे चित्त 'स्व' मध्येच राहते तो स्वस्थ. आपले चित्त स्वभावतः 'स्व' कडून इतरत्र जात असते. कोठूनही आवाज आला की आपण तिकडे लक्ष देऊ लागतो. समाजात काही अघटीत घडले की एकाग्रता भंग पावते. एखादे आकर्षक दृश्य समोर आले की आपली नजर तिथे खिळते. अर्थात या झाल्या शरीराच्या बाहेरच्या गोष्टी. शरीरात कुठे दुखले-खुपले की आपले लक्ष शरीराच्या त्या-त्या भागाकडे जाते. मनाविरूद्ध काही घडले की, आपला अपमान झाला असे वाटते. मग त्याच विचाराने पुन्हा पुन्हा आपले मन त्रस्त होते. आपले आर्थिक नुकसान झाले, किंवा प्रिय व्यक्तीचा वियोग झाला, तर भावनेचे उमाळे वारंवार येऊ लागतात. तसेच, काही सामाजिक घटनांची स्मृती आपल्याला छळत राहते. या सर्वांमुळे आपले शारीरिक, मानसिक अथवा सामाजिक स्वास्थ्य बिघडते व आपण अस्वस्थ होतो. आपल्या मनाला नैराश्य येऊ लागते. गेल्या दीड दोन वर्षात कोरोनाच्या संकटांमुळे अनेकांचे स्वास्थ्य पूर्णपणे बिघडले आहे.

जागतिक आरोग्य संस्थेने स्वास्थ्याची व्याख्या केली आहे. स्वास्थ्य म्हणजे केवळ आजार अथवा अपंगत्व यांचा अभाव एवढेच नसून शारीरिक, मानसिक व सामाजिक सुस्थिती म्हणजेच स्वास्थ्य. अशी ही व्याख्या आहे. या पार्श्वभूमीवर स्थिर पद्धतीचे व्यायाम म्हणजे जीममध्ये जाऊन वेटलिफ्टींग, स्प्रिंग एक्झरसायझेसन,तर चल पद्धतीचे व्यायाम म्हणजे चालणे,धावणे, पोहणे, सायकल चालविणे, तसेच तोल सांभाळता येणे यासारखी विशिष्ट कवायती, लवचिकता येण्यासाठी योगासने व सूर्यनमस्कार यांची सवय करावी. यामुळे स्नायूंचा व सांध्यांचा कडकपणा कमी होऊ शकतो. अर्थातच प्रकृती स्वस्थ राहण्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे मनाची प्रसन्नता!

जागतिकीकरणाच्या रेट्यात जो तो ऐहिक सुखाच्या मागे लागला आहे.तो स्वहिताच्या पलिकडे काहीही बघायला तयार नाही. प्रत्येक जण ऐहिक सुखाच्या मागे पळतो आहे. "पळा पळा कोण पुढे पळे तो" अशी सध्याची प्रत्येक माणसाची अवस्था झाली आहे,जीवनातील अति धावपळीमुळे किंवा अतिप्रमाणांत असलेल्या - इच्छा,हाव किंवा वासनांमागे पळण्यांत माणसाची शक्ती मोठ्या प्रमाणात खर्च होते, अर्थात त्यामुळे मनुष्य आपले स्वास्थ्य हरवून बसला आहे,  शिवाय गेल्या दोन अडीच वर्षांपासून  कोरोनामुळे माणसाचे पळणेच बंद झाले आहे. सर्वच ठिकाणी मंदीचे व निराशेचे वातावरण आहे. त्यामुळे त्याला काही साध्य करता येत नाही. ज्या क्षेत्रात आपणास कर्तृत्व गाजवायचे आहे; त्याबद्दल स्वतःलाच जर प्रतिकूल परिस्थितीमुळे आत्मविश्वास वाटत नसेल तर माणसाला मोठ्या प्रमाणावर नैराश्य येते. तो स्वतःला कमी समजून पुरता खचला जातो. अर्थात काही करावेसे न वाटणे, म्हणजे चलनवलनांत आलेला अडथळा, बसल्या जागेवरून उठावेसे न वाटणे, डोळे मिटून पडावेसे वाटणे, कोणाशी बोलू नये असे वाटणे, माझी इच्छा नाही, मला काही नको- अशा तऱ्हेची प्रतिक्रिया देणे, कुठल्याही कामात लक्ष न लागणे, मनाला निरूत्साह वाटत रहाणे हे सर्व प्रकार किंवा लक्षणे ही नैराश्यातून औदासीन्य कडे नेणारे आहेत. अशी परिस्थिती लॉकडाऊनच्या काळात सर्वत्र सर्वांना अनुभवाला मिळाली. नकारात्मक असणारे सतत येणारे डोक्यातले विचार थांबतच नाहीत व डोके भणभणायला लागते व यांतून नैराश्यता वाढीला लागते. 

आपण कुठल्याही कामात रस न दाखवता नुसताच बसून वेळ वाया घालवतो आहे. या विचारांमुळे, बर्‍याच लोकांना औदासिन्य आले आहे, नेहमीच त्यांना उदास उदास वाटते, उत्साह,जोम,ताकद हरवले आहे की काय असे वाटू लागते. पण लक्षात घ्या की काहीही न करण्याची एक कला आहे. तीला समजून घेणे आवश्यक आहे.म्हणजे पहा मजा म्हणून, फन म्हणून काहीतरी मनाला आवडेल ते करायचे, कामात व्यग्र नाही म्हणून निराश होऊ नका. ‘क्या बडा तो दम बडा', ही म्हण लक्षात घ्या. नैराश्य किंवा औदासिन्य हे काही आज नवं नाही. अनेकदा अनेक जण या परिस्थितीतून गेलेले आहेत, त्यातून ते सही सलामत बाहेर पडले आहेत. यांचे अनुभव जाणून घ्यावेत. जीवनातील चढउतार सर्वांच्या परिचयाचे असतात. परिस्थितीनुसार, कधी आनंदित होणे, कधी दु:खी होणे, कधी चिंतित होणे स्वाभाविक होय. पण जगण्यांत स्वास्थ्य उरले नाही. स्वतःहून काही करण्याची इच्छाच नाही. जीवनांत रस उरला नाही असे सतत वाटू लागले आणि सर्वात महत्वाचे म्हणजे, ही भावना दीर्घ काळपर्यंत तशीच राहिली किंवा पुन्हा पुन्हा जाणवू लागली तर ते अधिक हानीकारक आहे, जणू तो एक प्रकारच्या रोगाची लागण झालेल्या आहे.असे पुन्हा पुन्हा वाटत राहते.त्यामुळे झोप कमी किंवा खूपच जास्त येणे, मन एकाग्र न होणे, जी गोष्ट सहज करता येत असे,ती आत्ता जमेनाशी होणे, छोट्या, छोट्या गोष्टींचा राग येणे, स्वत:वर नियंत्रण ठेवता न येणे, अन्नावरची वासना एकदम उडणे, जगण्याचा कंटाळा येणे, शारीरिक पातळीवर थकवा वाटत राहणे, मानसिक पातळीवर गोंधळ उडणे, निर्णय घेणे अवघड होणे, असुरक्षित वाटणे, धडाडीने काही करावे अशी इच्छाच न होणे आदी लक्षणे ही केवळ भीतीमुळे निर्माण झालेली समस्या आहे. एक प्रकारचा तो भयगंड आहे, हा भयगंड घालविण्यासाठी प्रत्येक माणसाला समुपदेशनाची मोठी गरज आहे. कुठे तरी आपल्या परिस्थितीला व्यक्त व्हायला देणे अत्यावश्यक असते.त्यासाठी स्वतः प्रयत्नशील होणे गरजेचे आहे. आपल्या जवळच्या व्यक्तीला आपल्या सर्व परिस्थितीची कल्पना द्यायला हवी. पूर्वी समाजातील जाणत्या नागरिकांकडून, नात्यातील ज्येष्ठांकडून अशा प्रतिकूल परिस्थितीत आधार दिला जायचा. मानसिक स्वास्थ्यासाठी जवळच्या माणसाचा आधार महत्त्वाचा असतो,अशा औदासिन्यतेच्या कठीण काळात समाजातील जाणत्या व्यक्ती कडून समुपदेशन यांची मुख्यतः गरज असते. अनेकदा अशा समुपदेशनाच्या पहिल्या फेरीतच त्या व्यक्तीला उत्साही वाटू लागते, अगदी पहिल्या भेटीतच अनेकांना बरं वाटून नैराश्यातून बाहेर पडले असल्याचे अनुभव आहेत, तेंव्हा कुठलाही न्युनगंड न ठेवता या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी आपली इच्छाशक्ती वापरून समुपदेशनाची मदत घ्यायला हरकत नसावी.


- सुनीलकुमार सरनाईक

कोल्हापूर 

संपर्क - 9420351352

(लेखक भारत सरकारतर्फे स्वामी विवेकानंद राष्ट्रीय पुरस्काराने तसेच आचार्य बाळशास्त्री जांभेकर दर्पण पत्रकार पुरस्काराने सन्मानित आहेत)



उत्तर प्रदेशच्या एका गावातीलशासकीय शाळेतील एका शिक्षकाने एका दलित मुलाला यासाठी मारहाण केली आणि नंतर त्याला शाळेत कोंडून घातले की त्या ११ वर्षीय विद्यार्थ्याने त्या शिक्षकाच्या दुचाकीला नुसता हात लावला होता. आजवर उच्चवर्णीय दलितांना शिवून घेत नसत. पशुंनादेखील एक वेळ मान दिला जातो, पण दलितांना पशुंसारखाही सन्मान दिला जात नाही. आता हे ऐकिवात येते की एका निर्जीव वस्तुला जरी दलिताने स्पर्श केला तर त्याचा राग त्या वस्तुच्या मालकाला अनावर होतो.

दुसरी घटना राजस्थानमधील एका शाळेतीलच आहे. तिथल्या एका ९ वर्षीय विद्यार्थ्याने शिक्षकासाठी पाणी पिण्याच्या माठातून स्वतः पाणी घेतले. याची शिक्षा त्या चिमुकल्या मुलाला इतकी गंभीर देण्यात आली की शेवटी त्या मुलाचा जीव गेला. हा अत्याचार कोणत्याही सहनशील माणसाने कसा सहन करावा, एवढे मोठे मन कोठून आणावे?

या दोन घटना तर उदाहरणादाखल दिल्या आहेत. अशा कितीतरी घटना वर्षातून नव्हे, महिन्यातून नव्हे, आठवड्यातून नव्हे तर दररोज घडत आहेत. दर तासाला घडत आहेत.

एनसीआरबीच्या अहवालानुसार देशात २०२१ मध्ये एक लाख ६४ हजार लोकांनी आत्महत्या केली. यात २५ टक्के कामगारवर्गातील लोक आहेत. ९ टक्के बेरोजगार युवक आहेत तर व्यावसायिकांच्या आत्महत्येची सुद्धा यात नोंद आहे. महिला तर आहेतच. म्हणजे समाजाचा एकही वर्ग असा नाही ज्यामधून लोक आत्महत्या करत आहेत. आत्महत्या करणे म्हणजे नैराश्याचा अंतिम टप्पा. एकदा माणसाने तो टप्पा गाठला तर त्याचा स्वतःवर कसलाही ताबा नसतो. नकारात्मक विचारांनी त्याच्या मानसिकतेवर ताबा मिळवलेला असतो. अशा अवस्थेत आपला जीव संपवणे हा एकच मार्ग त्याला सुचतो.

सध्या मानवतेच्या भावी पिढीवर आणखीन एक संकट आलेले आहे. देशाच्या विशेषकरून महाराष्ट्रातील अहमदनगर, ठाणे, पालघर जिल्ह्यात ९-१० वर्षांच्या मुलांची खरेदी-विक्री चालू आहे आणि किंमत किती ५००-१००० रुपये. लोकांना आपले स्वतःचे पोट भरण्यासाठी आपण जन्मलेल्या मुलांना ५०० रुपयांत विकण्याची पाळी येणे हे किती मोठे दुर्दैव मानवजातीवर कोसळलेली कसली ही आपत्ती. या मुलांना  विकत घेऊन मानवतेचे दलाल त्यांना वेठबिगार बनवण्यासाठी मेंढपाळांना विकत आहेत. आणि ते लोक त्यांचा छळ करू लागले आहेत.

ह्या काही समस्या आहेत, पण एवढ्याच समस्या आहेत असे नाही. समस्यांचा सागर आहे. व्याजपद्धतीवर कर्ज उचलून त्या कर्जाची परतफेड करू न शकणाऱ्यांची वेगळी व्यथा आहे. पुन्यप्रसून वाजपेयी यांनी आपल्या यू-ट्यूब चॅनलद्वारे दिलेल्या माहितीनुसार हजारीबाग येथील एका शेतकऱ्याने महिंद्राकडून कर्ज घेऊन ट्रॅक्टर घेतला होता. त्यात कोरोनाचे ल़ॉकडाऊन झाले. कर्ज परतफेडीचे हफ्ते खोळंबले. शेवटी कंपनीचे अधिकारी वसुलीसाठी शेतात पोहोचले. एक लाख दहा हजार देणे होते. शेतकऱ्याने दोन दिरवसांची वेळ ममागितली. अधिकारी ऐकायला तयार नव्हते. शेतकऱ्याची पत्नी त्यांची गाडी धरून विनंती करत होती. त्यांनी आपली कार तशीच चालवली. शेतकऱ्याची पत्नी त्या गाडीखाली चिरडून मरण पावली. आणखी एका कारखानदारीची व्यथा १५ कोटींचे कर्ज थकित होते. कर्ज देणाऱ्यांनी व्याज देण्याचा आग्रह धरला. व्याज फेडण्यासाठी चार कोटींची संपत्ती दोन कोटींत विकली. बाकीचे कर्ज पेडण्यासाठी १२ कोटींची मालमत्ता आठ कोटींत विकली. तरीही कर्ज जसेच्या तसेच राहिले. त्याचा मालक आता विनंती करतो की त्याला स्वेच्छा मरणाची अनुमती मिळावी.

व्याजावर आधारित अर्थकारणाचे हे रौद्ररुप म्हणूनच अल्लाहने व्याजपद्धतीला वर्ज्य केले आहे. एक माणूस नव्हे तर श्रीलंकासारखा देश बुडाला. त्याच वाटेवर जगातले कितीतरी देश असतील, ज्यांना जागतिक बँक आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधी संस्थांनी कर्ज पुरविलेले आहे. या सगळ्या देशांचे हाल श्रीलंकासारखे होतील का हा प्रश्न आहे.

ही सध्या देशाची स्थिती आहे. एका राजकीय पक्षाने भारत जोडो यात्रेचा कार्यक्रम हाती घेतला आहे. राजकीय पक्षाचा कोणताही कार्यक्रम राजकीय उद्दिष्टाशिवाय इतर कशासाठीही नसतो. आज गरज आहे माणसाला माणसाशी जोडण्याची. माणुसकीला माणुसकीशी. म्हणजेच माणसाला स्वतःशी जोडावे लागेल. यासाठी राजकीय कार्यक्रम उपयोगी नसतात. नैतिक अधःपतनाला आळा घालण्याची गरज आले. माणसांनी नैतिकता सोडली, मग तो माणसांच्या जंगलात पशु-प्राण्यांसारखा सैरावैरा भरकटत जातो. म्हणून माणसाला नैतिक बंधनांमध्ये जोडण्याची गरज आहे. धार्मक, सामाजिक, राजकीय, आर्थिक अशा सर्व क्षेत्रांमध्ये माणुसकी नांदेल. यासाठी जर सर्वांनी प्रयत्न केले तरच मानवी जीवन सुरक्षित राहील. नसता भविष्यात जे काही होईल त्याचा अंदाज प्रत्येक जण लावू शकतो.

- सय्यद इफ्तेखार अहमद

संपादक, 

मो.: ९८२०१२१२०७



224 वर्षांच्या निजाम शासन काळात त्यांच्या राज्यात एकही हिंदू-मुस्लिम दंगल झाली नाही. निजाम हे आपल्या हिंदू आणि मुस्लिम प्रजेला आपल्या दोन डोळ्याची उपमा देत. एवढे असतांनासुद्धा निजाम शाहीला जुल्मी निजाम असे संबोधण्याची आपल्याकडे पद्धत आहे. निजाम जर जुल्मी होते तर 224 वर्षे त्यांनी शासन कसे केले? याचा साधा विचारही कोणी करत नाही. ज्यांनी 224 वर्षे एवढ्या मोठ्या क्षेत्रफळाला जोडून ठेवले ते आधुनिक लोकशाहीला 70 वर्षे सुद्धा जोडून ठेवता आले नाही. शेवटी 2014 साली आंध्रापासून विलग करून स्वतंत्र तेलंगना राज्याची स्थापना करावी लागली.

खरे तर निजाम शाहीचा विलय शांतीपूर्ण व्हायला हवा होता. काँग्रेसला तसे करता आलेही असते. परंतु हैद्राबादच्या मुस्लिम शासक आणि जनतेला धडा शिकवायचा होता म्हणून काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मोठे अत्याचार केले. ते इतके भयानक होते की, त्या काळात उस्मानाबाद जिल्हा हा तर मुस्लिम विधवांचा जिल्हा म्हणून प्रसिद्ध झाला होता. पंडित सुंदर लाल कमीशन च्या अहवाला प्रमाणे त्यावेळी उस्मानाबाद शहरातील मुस्लिमांची संख्या 10 हजार होती ती या नरसंहारानंतर तीन हजार उरली होती. गुलबर्गा येथे 5 ते 8 हजार, नांदेड येथे 2 ते 4 हजार मुस्लिमांची हत्या झाली होती. यावरून या नरसंहाराच्या तीव्रतेचा अंदाज आल्याने गृहमंत्री पटेल यांनी तो अहवाल प्रसिद्धच होऊ दिला नाही.

ये जब्र भी देखा है तारीख की नजरों ने

लम्हों ने खता की थी सदियों ने सज़ा पायी

17  सप्टेंबर 2022 ला आसफजाही शासनाचे भारतात विलीनीकरण होऊन 74 वर्षे पूर्ण झाले. हे विलीनीकरण सोपे नव्हते. यामागे एक रक्तरंजित इतिहास दडलेला आहे, म्हणून त्याचा मागोवा घेणे अनुचित होणार नाही कारण अन्याय व अत्याचार यांची येथोचित प्रसिद्धी करावी लागते तसे केले गेले नसेल तर अत्याचार झालाच नाही असा सर्वांचा समज होतो. विशेष म्हणजे भूतकाळात ज्यांच्यावर अत्याचार झाला होता त्यांची पुढची पिढी ही सर्व विसरून जाते, याचे उत्कृष्ट उदाहरण ’13 ते 17 सप्टेम्बर 1948 दरम्यान झालेले हैदराबाद चे मिलिटरी ऍक्शन’ होय, पाच दिवसांत 224 वर्ष जुनी आसफिया राजवट खालसा केली गेली ज्यात 40000 हजार मुस्लिमांना ठार मारण्यात आले होते व कोट्यावधी ची त्यांची संपत्ती जाळण्यात आली होती, विशेष म्हणजे या मुस्लिमकुश नरसंहारादरम्यान पंडित जवाहरलाल नेहरू स्वतः मराठवाड्याच्या दौऱ्यावर आले होते. त्यांनी - (उर्वरित पान 7 वर)

स्वतः ही सगळी परिस्थिती पाहिली होती व व्यथित होऊन पंडित सुंदरलाल कमिशनचे गठन केले होते. या कमिशनचा अहवाल 65 वर्षानंतर म्हणजे 2013 साली जाहीर झाला, त्यात त्या काळात मुस्लिमांवर जे अनन्वित अत्याचार झाले होते त्याची कबुली खालील शब्दात देण्यात आलेली आहे. मात्र या नरसंहारामध्ये ही अनेक हिंदू बांधव असे होते त्यांनी अनेक मुस्लिम कुटुंबासाठी आपल्या जिवाची पर्वा न करता मदत केली, त्यांचे रक्षण केले

Almost everywhere in the effected (sic) areas communal frenzy did not exhaust itself in murder, alone in which at some places even women and children were not spared. Rape, abduction of women (sometimes out of the state to Indian towns such as Sholapur and Nagpur) loot, arson, desecretion (sic) of mosques, forcible conversions, seizure of houses and lands, followed or accompanied the killing.

The Sundar Lal Committee Report also compels us to add that we had absolutely unimpeachable evidence to the effect that there were instances in which men belonging to the Indian Army and also to the local police took part in looting and even other crimes. During our tour we gathered, at not a few places, that soldiers encouraged, persuaded and in a few cases even compelled the Hindu mob to loot Muslim shops and houses. At one district town the present Hindu head of the administration told us that there was a general loot of Muslim shops by the military. In another district a Munsif house, among others was looted by soldiers and a Tahsildar’s wife molested.

-The Sundar Lal Committee Report

या नरसंहाराचे काम त्या काळातील काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी केले होते. खरे तर निजामशाहीचा विलय शांतीपूर्ण व्हायला हवा होता. काँग्रेसला तसे करताही आले असते. परंतु हैद्राबादच्या मुस्लिम शासक आणि जनतेला धडा शिकवायचा होता म्हणून काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी हे अत्याचार केले होते. ते इतके तीव्र होते की त्या काळात उस्मानाबाद जिल्हा तर मुस्लिम विधवांचा जिल्हा म्हणून प्रसिद्ध झाला होता. त्यावेळा उस्मानाबाद शहराची मुस्लिमांची संख्या 10 हजार होती ती या नरसंहारानंतर तीन हजार उरली होती, गुलबर्गा येथे 5 ते 8 हजार, नांदेड येथे 2 ते 4 हजार मुस्लिमांच्या हत्या झाल्या होत्या असे कमिशनला  आढळून आले होते. यावरून या नरसंहाराच्या तीव्रतेचा अंदाज वाचकांना येईल. आजच्या पिढीला हा इतिहास जरासुद्धा माहीत नाही याची मला खात्री आहे. या रिपोर्टमध्ये ज्या हृदय पिळवटून टाकणाऱ्या घटनांचा उल्लेख केला होता तो पाहता मोठा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल म्हणून तत्कालीन गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी तो अहवालच सार्वजनिक केला नाही. 

निजामशाही

’निजाम’ म्हणजे व्यवस्था, ’शाही’ म्हणजे राज्य. हैद्राबाद राज्याला निजामशाही म्हणण्याचा प्रघात आहे मात्र या सल्तनतचे अधिकृत नाव ’आसफजाही सल्तनत’ आकार आणि श्रीमंतीच्या बाबतीत भारतातील सर्वात मोठ्या असलेल्या या सल्तनतीला ’हैद्राबाद स्टेट’ म्हणूनही ओळखले जायचे. निजामशाहीची स्थापना चिनकुलीखान मीर कमरूद्दीन सिद्दीकी यांनी केली. ते तातार म्हणजे मुगल वंशाचे व समरकंदचे राहणारे होते. 1773 मध्ये मोगलांनी त्यांना दक्कनचा सुभेदार नेमला होता. 1707 मध्ये औरंगजेब यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांनी 1724 मध्ये ’आसिफजाह’ या पदनामाने हैद्राबाद येथे आपली आसिफजाही सल्तनत कायम केली. ’आसिफ’ म्हणजे योग्य मंत्री आणि ’जाह’ म्हणजे सन्मान. म्हणजेच मोठ्या सन्मानाचा योग्य मंत्री असा आसिफजाह या शब्दाचा अर्थ होतो.

या सल्तनतचे क्षेत्रफळ 82 हजार 686 स्क्वेअर माईल्स एवढे प्रचंड म्हणजे ब्रिटन आणि आर्यलंड पेक्षाही मोठे होते. 1941 च्या जनगणनेप्रमाणे या सल्तनतमध्ये  1 कोटी 60 लाख 34 हजार लोक राहत होते. त्यातील 80 टक्के हिंदू तर बाकी 20 टक्क्यांमध्ये इतर धर्माचे लोक होते.

निजामच्या सात पिढ्यांनी हैद्राबादवर राज्य केले. त्यांची नावे खालीलप्रमाणे - मीर कमरूद्दीन सिद्दीकी, मीर निजाम अली खान, मीर अकबरअली खान, मीर नसिरूद्दौला फरकुंद अलीखान, मीर तहेनियत अली खान, मीर महेबूब अली खान आणि शेवटचे निजाम मीर उस्मानअली खान.

मीर उस्मानअली खान यांचे लकब म्हणजे पद खालील प्रमाणे होते. ’द मोस्ट एक्सीलंट - ऑर्डर ऑफ ब्रिटिश एम्पायर - रॉयल व्हिक्टोरियल चेन - ऑनरेबल जनरल ऑफ आर्मी - फेथफुल अलाय ऑफ ब्रिटिश गव्हर्नमेंट - हिज एक्झालटेड हायनेस - हिज मॅजेस्टी - जिल्ले इलाही- मीर उस्मानअली खान पाशा’. ते जेव्हा दरबारामध्ये येत तेव्हा एवढे मोठे नाव पुकारले जाई. ही रियासत लोकसंख्या आणि क्षेत्रफळाच्या बाबतीत त्या काळातील 562 रियासतींमध्ये सर्वात मोठी रियासत होती. जिचे चार महसुली विभाग होते. पहिला मराठवाडा ज्यात - औरंगाबाद बीड, परभणी, नांदेड. दूसरा गुलबर्गा ज्यात - बीदर, गुलबर्गा, उस्मानाबाद, रायचूर. तीसरा मेदक ज्यात - बलदाह, महेबूबनगर, मेदक, नलगोंडा आणि निजामाबाद. चौथा वरंगल  ज्यात - करीमनगर, आदिलाबाद आणि वरंगल जिल्हे येत. या राज्याच्या शासकीय भाषांमध्ये फारसी, उर्दू, तेलगू, मराठी आणि कन्नडचा उपयोग होत होता. 

विकास कामे

निजाम काळात सरकारी संपत्ती विकण्याचा किंवा गहाण ठेवण्याचा प्रघात नव्हता. उलट या सल्तनतीने त्या काळातील सर्वात मोठी विकासकामे केली होती. काही ठळक विकास कामांचा उल्लेख या ठिकाणी करणे उचित होईल. त्यांच्या काळात जामिया निजामिया, निजाम इन्स्टीट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस, उस्मानिया विद्यापीठ, उस्मानिया युनानी हॉस्पिटल, निजाम जनरल हॉस्पिटल, निजाम क्लब, निजाम चॅरिटेबल ट्रस्ट, चिरान पॅलेस, चौमहल्ला पॅलेस, किंग कोठी, फलकनुमा पॅलेस (आजचे ताज-कृष्णा हॉटेल), दिल्ली येथे हैद्राबाद हाऊस, मक्का येथे रूबात, कलकत्ता, ऑस्ट्रेलिया आणि फ्रान्सच्या नाईस शहरात कोठ्या. सिकंदराबाद कॅन्टोनमेंटचे बांधकाम, लकडीका पुलचे बांधकाम, रेल्वे, स्वतंत्र डाक-तारची व्यवस्था, स्वतःची मुद्रा, 1941 साली स्टेट बँक ऑफ हैद्राबादची स्थापना, हुसेन सागर, निजाम सागर धरण,स्टेट बँक ऑफ हैदराबाद ची स्थापना इत्यादी प्रमुख कामे होत.

याशिवाय, माहूरच्या रेणुकादेवी संस्थान, नांदेडचा गुरूद्वारा तसेच रियासतीमधील अनेक मंदिर, मस्जिद, दर्गाह इत्यादींना इनामी जमीनी, देशमुख, देशपांडे, माली पाटील, पोलीस पाटील इत्यादी पदांची निर्मिती व त्यांच्या मार्फतीने चोख महसुली व्यवस्था इत्यादी महत्त्वाची कामे निजामच्या काळात झाली. निजामचे स्वतःचे पोलीस दल, आर्मी, दोन विमाने, एक युद्ध पोत ज्याची निर्मिती ऑस्ट्रेलियामध्ये अर्धवट झाली होती वगैरे निजामच्या पदरी होती. 1930 साली निजामकडे 11 हजार कर्मचारी सेवेमध्ये होते. 

निजामचे वैभव

निजामचे वैभव प्रत्यक्ष पहावयाचे असल्यास हैद्राबादच्या सालार जंग वस्तू संग्रहालयाला एकदा जरूर भेट द्यावी तरच त्याचा अंदाज येईल. तीन वर्षापूर्वी या संग्रहालयातून निजामचा जेवणाचा डबा चोरी गेला होता. ज्याचा छडा तेलंगना पोलिसांनी लावला होता. त्यावेळी या संदर्भात ज्या बातम्या प्रकाशित झालेल्या आहेत त्या बातम्यांप्रमाणे हा डबा चार किलो सोन्याचा, हिरे आणि माणिक जडीत असा होता. सातवे निजाम मीर उस्मानअली हे त्या काळातील जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती होते. त्यामुळे त्यांचे चित्र व त्या काळातील क्रमांक एकच्या अमेरिकेतून प्रकाशित होणाऱ्या ’टाईम मॅग्झीन’च्या मुखपृष्ठावर प्रकाशित करण्यात आले होते. त्यांच्याकडे ऑलम्पिक आकाराच्या पोहण्याचा तलाव भरून जाईल एवढे मोती होते. त्या मोत्यांना ऊन दाखविण्यासाठी तीन माणसे चौमहाल्ला पॅलेसच्या छतावर तीन दिवस सतत मोती पसरवत होते. त्या मोत्यांनी पॅलेसचे छत भरून गेले होते.          39.90 कॅरेटचा व 184.5 ग्राम वजनाचा जॅकब नावाचा त्या काळातील जगातील पाचव्या क्रमांकाच्या हिर्याचा निजाम पेपरवेट म्हणून उपयोग करीत होते. त्यांच्या पदरी ब्रिटनमध्ये तयार झालेल्या व बोईंग विमानाचे इंजिन तयार करणाऱ्या रोल्स राईस या कंपनीच्या अनेक कार होत्या. मीर महेबूबअली पाशा यांचे कपडे मँचेस्टरहून तर सुगंध फ्रान्सच्या लुईस शहरातून येत असे. 38 लोकांची नेमणूक महलातील झूंबर आणि दिवे साफ करण्यासाठी करण्यात आलेली होती.

देशासाठी योगदान

मजलिसे इत्तेहादुल मुस्लिमीन व रजाकार संघटनेचे अध्यक्ष अ‍ॅड. कासीम रिझवी यांच्या सल्ल्यानुसार सुरूवातील भारतात विलीन होण्यास नकार देणार्या निजाम-उल-मुल्क मीर उस्मानअली पाशा यांनी जेव्हा भारतात विलीन होण्याचा निर्णय घेतला तेव्हा त्यांनी तो निर्णय तन, मन आणि धनासह घेतला.

1962 आणि 1965 च्या युद्धानंतर देशाची परिस्थिती हलाकीची झाल्यानंतर 1967 साली चीनने पुन्हा सिक्कीमवर हल्ला करून भारतीय प्रदेशात घुसण्याचा प्रयत्न चालविला होता. तेव्हा पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांनी रेडिओवरून श्रीमंत लोकांना भारतीय सेनेला मदत करण्याचे आवाहन केले होते. त्यासाठी विशेष अशा ’भारतीय रक्षा कोष’ची स्थापना करण्यात आली.      शास्त्रीजींच्या या आवाहनाला प्रतिसाद देत उस्मानअली पाशा यांनी आपले 5 टन सोने या कोषमध्ये दान दिले होते. आजपर्यंत सुद्धा एका हाती एवढे मोठे दान कोणीही कोणाला दिलेले नाही. हा भारताचा इतिहास आहे. तो किमान आजच्या पिढीने समजून घ्यावयास हवा. 

हिंदू-मुस्लिम एकता

224 वर्षांच्या त्यांच्या शासन काळात त्यांच्या राज्यात एकही हिंदू-मुस्लिम दंगल झाली नाही. निजाम हे आपल्या हिंदू आणि मुस्लिम प्रजेला आपल्या दोन डोळ्याची उपमा देत. एवढे असतांनासुद्धा निजाम शाहीला जुल्मी निजाम असे संबोधण्याची आपल्याकडे पद्धत आहे. निजाम जर जुल्मी होते तर 224 वर्षे त्यांनी शासन कसे केले? याचा साधा विचारही कोणी करत नाही. ज्यांनी 224 वर्षे एवढ्या मोठ्या क्षेत्रफळाला जोडून ठेवले ते आधुनिक लोकशाहीला 70 वर्षे सुद्धा जोडून ठेवता आले नाही. शेवटी 2014 साली आंध्रापासून विलग करून स्वतंत्र तेलंगना राज्याची स्थापना करावी लागली.

हैद्राबादला खालसा करण्याची कारणे

पहिले कारण - म्हणजे मुळात विसाव्या शतकात जगभरात लोकशाहीचे वारे वाहत होते. निजामांचे शासन कितीही चांगले असले तरी लोकांना लोकशाही हवी होती व स्वतःचे भविष्य स्वतः घडविण्याचे स्वातंत्र्य हवे होते. हैद्राबाद रियासतीमध्ये काँग्रेस आणि मुस्लिम लीग या दोन्ही पक्षांना प्रतिबंध असल्यामुळे काँग्रेसच्या विचारधारेच्या लोकांनी आर्य समाज आंदोलनाच्या मार्फतीने ’मराठवाडा मुक्ती संग्राम’ नावाची चळवळ सुरू केली. तर काही निजामशाही च्या समर्थक मुस्लिमांनी एमआयएमच्या माध्यमाने  निजामशाही वाचविण्याचा प्रयत्न केला होता.

दूसरे कारण - म्हणजे रोहिल्या पठाणांचा  व्याजाचा व्यवसाय. मुळात अफगानिस्तान मधून रोहिल्या पठाणांना रियासतीच्या संरक्षणासाठी खास पाचारण करण्यात आले होते मात्र त्यांनी येथे येताच व्याजाचा धंदा सुरू केला. जबरी वसुली करण्यामध्ये त्यांचा हतकंडा होता. त्यामुळे हिंदू आणि मुस्लिम अशी दोन्ही जनता त्यातून भरडून निघत होती. रोहिल्यांकडून  वसुलीसाठी केल्या जाणार्या अत्याचारामुळे सामान्य जनता अधिकच आक्रमक झाली होती. हे सुद्धा निजामशाहीच्या अंताचे एक कारण ठरले.

तीसरे कारण - म्हणजे साम्यवादी चळवळ. त्या काळात रशियाला जावून आलेले कट्टर कम्युनिस्ट कवि मक्दूम मोहियोद्दीन यांच्या नेतृत्वात निजाम यांची ’बुर्जूवा’ अर्थात सरंजामशाही सरकार उलथून टाकण्या साठी एक साम्यवादी आंदोलनही सुरू झाले होते. त्यात हिंदू, मुस्लिम, दलित सर्वांचाच समावेश होता. विशेषकरून शेतमजूरांचा याच्यात मोठा भरणा होता. हे ही कारण निजामशाहीच्या अस्तासाठी कारणीभूत ठरले.

रझाकार आंदोलन

चौथे कारण -  म्हणजे रझाकार आंदोलन. ’रझा’ म्हणजे संमती आणि ’कार’ म्हणजे काम. अर्थात स्वयंसमतीने जे लोक निजामशाही वाचविण्यासाठी प्रयत्नशील होते त्या स्वयंसेवकांना रझाकार असे संबोधले जात असे. यात मोठ्या प्रमाणात जरी मुस्लिम होते तरी अल्प प्रमाणात का होईना हिंदू आणि दलित बांधवसुद्धा होते. 

ही मिलीशिया निजामाचे शासन कायम ठेवण्यासाठी आग्रही होती. मुळात या रझाकार आंदोलनाचे वयच एक ते सव्वा वर्षाचे होते. त्यांच्या बाबतीत करण्यात येणारे अत्याचारांचे आरोप अतिरंजीत स्वरूपाचे असल्याचे आजही काही ज्येष्ठ मंडळीकडून सांगण्यात येते. रझाकारांचे प्रमुख मूळचे लातूर येथील राहणारे व हैद्राबाद येथे स्थायीक झालेले अ‍ॅड. कासीम रिजवी होते. त्यांच्याशिवाय, यामध्ये प्रामुख्याने अ‍ॅड. इक्रामुल्लाह, मुहम्मद इब्राहीम अरबी, अख्लाक हुसेन, अ‍ॅड. जुबैर, हसन मुहम्मद यावर, मीर कलीमुद्दीन अलीखान, अ‍ॅड. सय्यद अहेमद नहरी, अ‍ॅड. उमरदराज खान, अ‍ॅड. इसा खान, सेठ गाजी मोहियोद्दीन, सेठ अकबरभाई, हाफिज मुहम्मद, अनिसोद्दीन, मुहम्मद कमरूद्दीन, काजी हमीदोद्दीन, अ‍ॅड. मीर मेहरअली कामील व अ‍ॅड. अब्दुल गणी यांचा समावेश होता.  

मराठवाडा मुक्तीसंग्राम

मराठवाडा मुक्ती संग्रामचे नेतृत्व स्वामी रामानंद तीर्थकडे होते. या मुक्ती संग्रामामध्ये सामील असलेल्या इतर प्रमुख व्यक्ती म्हणजे गोविंदभाई श्राफ, अनंत भालेराव, शंकरराव चव्हाण, पी.व्ही. नरसिम्हाराव, विजयेंद्र काबरा, फुलचंद गांधी,  मुल्ला अब्दुल कय्युम खान, सय्यद अखील (संपादक दास्ताने हाजीर) हे होत. 

भारतात विलीन होण्यास का नकार दिला?

त्या काळी इम्पेरियल बँक ऑफ इंग्लंड जी की ब्रिटनची रिझर्व बँक होती. तिच्या भांडवलातील मोठा हिस्सा निजाम उस्मानअली पाशा यांचा होता. 1942 साली झालेल्या ’चलेजाव’ चळवळीनंतर मीर उस्मान अली पाशा यांच्या लक्षात आले की आता इंग्रज भारतावर फार काळ सत्ता गाजवू शकणार नाहीत. तेव्हा त्यांनी इंग्रजांवर दबाव आणण्यासाठी इम्पेरियल बँक ऑफ इंग्लंडला नोटिस देऊन आपले भांडवल परत देण्यास सांगितले. याची बातमी ब्रिटिश जनतेला कळाल्याबरोबर लोकांनी घाबरून आपापल्या ठेवी परत मागण्यास सुरूवात केली. तेव्हा बँक डबघाईला या भितीने इंग्लंडच्या राणीने स्वतः हैद्राबादला येवून त्यांची रियासत व त्यांचे भांडवल दोन्ही सुरक्षित राहतील याची हमी दिली. यातून मिळालेल्या आत्मविश्वासाने 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र होण्यापूर्वी म्हणजे जून 1947 मध्ये निजामने आपण भारतात विलीन होणार नसल्याची अधिकृत घोषणा केली. एवढेच नव्हे तर त्यांनी बॅ.जिन्नांकडे मदतीची याचना केली जी की त्यांनी नाकारली. निजामने पोर्तुगालशी संपर्क करून गोवा बंदरामधून युरोपातून हत्यार आणण्यासाठी आपला सेनापती सय्यद अहेमद हबीब अल् एद्रुस याला युरोपमध्ये पाठविले होते. परंतु हैद्राबाद रियासत स्वतंत्र राष्ट्र नसल्याने त्यांना शस्त्रास्त्र मिळविण्यात अपयश आले. शिवाय राष्ट्रकुल संघटनेचे सभासदत्व मिळविण्यासाठीही निजामने प्रयत्न केला. मात्र एटली सरकारने त्यासही नकार दिला. इतके होऊनही निजाम यांच्या हालचाली चालूच होत्या. त्यांनी इंग्लंडमधील हैद्राबाद राज्याचे प्रतिनिधी मीर नवाज जंग यांच्या मार्फतीने सीडनी कॉटन या हत्यार विक्रेत्याशी ऑस्ट्रेलियामध्ये संपर्क करून हत्यारांची मागणी केली. त्यात त्यांना होकार मिळाला. सिडनी कॉटन हा जहाजाने हैद्राबादला शस्त्रास्त्रे पाठविणार आहे, याची बातमी मिळाल्याने गृहमंत्री सरदार पटेलांनी ते जहाज भारतात पोहचणार नाही याची व्यवस्था केली. शेवटी कश्मीरसारखेच विदेश निती, रक्षा व संचार विभाग सोडून आपल्याला स्वायत्तता द्यावी, यासाठीही निजामने लॉर्ड माऊंटबेटन यांच्याकडे प्रयत्न केले. यात तडजोड होऊन काहीतरी मार्गही निघाला असता आणि हैद्राबाद रियासतीचे भारतात शांतीपूर्ण विलीनीकरणही झाले असते, पण यासाठी अ‍ॅड. कासीम रिझवी तयार झाले नाहीत. म्हणून ही शांती वार्ताही पूर्णत्वास येवू शकली नाही. एकंदरीत या घडामोडी 1947 ते 1948 या एका वर्षाच्या काळातच घडल्या. याच काळात रझाकारही निजामाचे शासन वाचविण्यासाठी आक्रमक झाले. त्यांनी अनेक ठिकाणी हिंसक कारवाया केल्या. गंगापूर रेल्वे स्टेशनवर ट्रेन जाळली आणि प्रवाशांना उतरवून मारहाण करण्यात आली. त्यामुळे जनतेमध्ये तीव्र संतापाची भावना निर्माण झाली आणि भारत सरकारवर दबाव वाढला. 

ऑपरेशन पोलो

यातूनच जनरल करीअप्पा यांना बोलावून सरदार पटेल यांनी हैद्राबाद खालसा करण्यासाठी योजना तयार करण्याचा आदेश दिला. त्याप्रमाणे ऑपरेशन ’पोलो’ची आखणी करण्यात आली. त्या काळात हैद्राबाद शहरामध्ये पोलो खेळण्याचे 8 मैदान होते. त्यावरून हे सांकेतिक नाव या ऑपरेशनला देण्यात आले.

13 सप्टेंबर 1948 साली सोलापूरहून भारतीय सेनेचे पथक मेजर जनरल जयंत नाथ चौधरी यांच्या नेतृत्वाखाली हैद्राबादकडे रवाना झाले व 17 सप्टेबरला सकाळी 9 वाजता बेगमपेठ विमानतळावर निजाम मीर उस्मानअली पाशा यांनी त्यांचे सेनाप्रमुख सय्यद हबीब इद्रुस यांच्यासह शरणागती पत्करली. येणेप्रमाणे 224 वर्षाच्या निजामशाहीचा अंत झाला.

या संदर्भात उल्लेखनीय गोष्ट अशी की, जमाअत-ए- इस्लामीचे संस्थापक मौलाना सय्यद अबुल आला मौदूदी यांनी लाहोरहून एक पत्र हैद्राबाद जमाअत-ए-इस्लामी हिंद चे स्थानिक अध्यक्ष युसूफ यांच्या मार्फतीने निजाम यांना देऊन वेळीच सावध केले होते. त्यांनी निजाम यांना काही अटी शर्तींवर युनियन ऑफ इंडियामध्ये सामिल होण्याचा दूरदर्शी सल्ला दिला होता. परंतु अ‍ॅड. कासिम रिझवी यांच्या आडमुठ्या धोरणामुळे केंद्र सरकारला मिलिट्री अ‍ॅक्शन करून हैद्राबाद राज्य खालसा करावे लागले आणि त्यात उस्मानाबाद, लातूर, नांदेड, बीड, परभणी, जालना तसेच आंध्र सिमेलगत राहणार्या लाखो मुस्लिमांना देशोधडीस लागावे लागले.

या सर्व घडामोडींची पंडित सुंदरलाल कमिटी मार्फत चौकशी करण्यात आली. 2014 साली समितीचा अहवाल क्विंट या संकेतस्थळावर पीडीएफ रूपाने उपलब्ध करण्यात आला. त्यात 40 हजाराहून अधिक लोक या आंदोलनात मरण पावल्याचा अंदाज व्यक्त केला गेला आहे. मात्र आजही त्याकाळातील जे काही जुने लोक जीवंत आहेत त्यांच्या म्हणण्याप्रमाणे या सर्व प्रकरणामध्ये किमान 2 लाख लोकांना आपला जीव गमवावा लागला. त्यात बहुसंख्येने मुस्लिम होते. हैद्राबाद राज्याचे भारतात शांतीपूर्ण विलीनीकरण झाले असते तर कदाचित ही मनुष्यहानी टळली असती.

मुळात मध्ययुगीन भारतामध्ये जेवढे काही मुस्लिम शासक झाले त्यांच्यापैकी बहुतकरून शासक हे साम्राज्यवादी मानसिकतेचे होते. त्यांचे शासन मुस्लिम शासन होते मात्र इस्लामी शासन नव्हते. हैद्राबाद रियासतीच्या सात निजामांचीही गणती याच श्रेणीमध्ये करता येईल. मदिनामध्ये सातव्या शतकात प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनी जी इस्लामी लोकशाही स्थापन करून जगाला कल्याणकारी लोकशाही कशी असते आणि त्यात अल्पसंख्यांकांना किती अधिकार दिलेले असतात याचे उदाहरण घालून दिलेले आहे. त्या नमुन्याची नक्कलजरी अक्कल न वापरता निजामांनी केली असती तरी जनतेतून एवढा मोठा विद्रोह झाला नसता. निजामांनी जे वैभव उपभोगले ते इस्लामी नितीशास्त्राच्या विरूद्ध होते. इस्लाममध्ये राज्यकर्ता म्हणजे खलीफा हा उपभोगशुन्य स्वामी असतो. म्हणजे सर्वकाही असतांनासुद्धा तो फकिरासारखे साधे जीवन व्यतीत करतो आणि अहोरात्र जनतेच्या कल्याणासाठी प्रयत्नशील असतो. निजामांनी केलेल्या शासनामध्ये अशा इस्लामिक नितीमत्तेचा लवलेशही नव्हता. म्हणून हिंदूच काय मुस्लिम प्रजेनेसुद्धा त्यांच्याविरूद्ध आंदोलन केले. यात नवल ते काय?

- एम. आय. शेख



"इस्लामकडे पाश्चिमात्यांचा शत्रू म्हणून, परकीय संस्कृती, समाज आणि श्रद्धेची व्यवस्था म्हणून पाहण्याकडे कल असल्यामुळे, आपल्या स्वत:च्या इतिहासाशी असलेल्या इस्लामच्या मोठ्या प्रासंगिकतेकडे आपण दुर्लक्ष केले आहे किंवा ती पुसून टाकण्याकडे आपला कल आहे."

पली आई महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या निधनानंतर गेल्या शनिवारी गादीवर विराजमान झाल्यापासून ब्रिटनचे नवे राजे चार्ल्स तृतीय यांच्याविषयीची रुची वाढली आहे. नवीन ब्रिटीश राजाने हवामान बदल, राजकारण आणि धर्म यासह अनेक सांस्कृतिक आणि सामाजिक विषयांवरील त्यांच्या मतांसाठी देखील लक्ष वेधून घेतले आहे.               

राजे तृतीय चार्ल्स यांचे इस्लाम व मुसलमानांविषयीचे आकर्षण सर्वश्रुत आहे; जेव्हा ते प्रिन्स ऑफ वेल्स होते तेव्हा त्यांनी समुदायाच्या समर्थनार्थ अनेक जाहीर भाषणे केली.

प्रसिद्ध लेखक रॉबर्ट जॉब्सन यांनी 'चार्ल्स अॅट सेवेन्टी : थॉट्स, होप्स अँड ड्रीम्स' या आपल्या २०१८ मध्ये प्रकाशित झालेल्या पुस्तकात असे नमूद केले आहे की, राजे इस्लामिक पवित्र ग्रंथ कुरआनचा अभ्यास करतात, ख्रिश्चन धर्म इस्लमाकडून काय शिकू शकतो आणि अरबी भाषेत मुस्लिम नेत्यांना लिहिलेल्या पत्रांवर स्वाक्षरी करतात. त्याचप्रमाणे राजकीय आघाडीवर या पुस्तकात म्हटले आहे की, त्यांना पॅलेस्टिनींबद्दल सहानुभूती आहे, इराकमधील युद्धाला विरोध आहे आणि युरोपमधील बुरख्यावरील बंदीशी ते असहमत आहेत.

माजी राजपुत्राने निरनिराळ्या धर्मांत लोकहित दाखविले आहे. 2015 मध्ये त्यांनी सांगितले होते की ते राजाची पारंपारिक पदवी "श्रद्धेचा रक्षक" म्हणून स्वीकारतील परंतु "सर्व श्रद्धांचा संरक्षक" म्हणून स्वतःला पाहायचे आहे.

यूकेत त्यांनी २००८ मध्ये 'मोझॅक' या संस्थेची स्थापना केली, जी मुस्लिम समाजातील तरुण आणि वंचितांसाठी आणि इतरांसाठी मार्गदर्शन पुरवते.

2017 मध्ये फिन्सबरी पार्क दहशतवादी हल्ल्यानंतर त्यांनी राणीकडून एकात्मतेचा वैयक्तिक संदेश दिला आणि "या देशातील मुस्लिम समुदायात नेहमीच खूप रस" कसा घेतला याचा उल्लेख केला.

१९८५ साली स्थापन झालेल्या 'ऑक्सफर्ड सेंटर फॉर इस्लामिक स्टडीज' या संस्थेचे ते आश्रयदाते असून इस्लामविषयक त्यांचे पहिले मोठे भाषण २७ ऑक्टोबर १९९३ रोजी 'शेल्डोनियन थिएटर फॉर द सेंटर फॉर इस्लामिक स्टडीज' येथे झाले. त्या प्रसिद्ध "इस्लाम आणि पाश्चिमात्य" भाषणातील काही कोट्स आणि गेल्या ३० वर्षांत त्यांनी इस्लाम आणि मुस्लिमांबद्दल केलेल्या इतर सार्वजनिक टिप्पण्या पुढीलप्रमाणे आहेत.

इस्लाम आणि पश्चिम

उपरोक्त भाषणात त्यांनी इस्लामविषयी पाश्चिमात्य देशांत निर्माण झालेल्या गैरसमजाबद्दल भाष्य केले आहे.

"इस्लामच्या स्वरूपाबद्दल पाश्चिमात्य देशांत जर खूप गैरसमज असतील, तर आपल्या स्वत:च्या संस्कृती आणि सभ्यतेचे इस्लामी जगतावर किती ऋण आहे, याबद्दलही बरेच अज्ञान आहे. हे एक अपयश आहे, जे मला वाटते की, आपल्याला वारशाने मिळालेल्या इतिहासाच्या पिंजऱ्यातून उद्भवते. मध्य आशियापासून अटलांटिकच्या किनाऱ्यापर्यंतचे मध्ययुगीन इस्लामी जग हे असे जग होते, जिथे विद्वान आणि ज्ञानी माणसे भरभराटीला आली. परंतु इस्लामकडे पाश्चिमात्यांचा शत्रू म्हणून, परकीय संस्कृती, समाज आणि श्रद्धेची व्यवस्था म्हणून पाहण्याकडे कल असल्यामुळे, आपल्या स्वत:च्या इतिहासाशी असलेल्या इस्लामच्या मोठ्या प्रासंगिकतेकडे आपण दुर्लक्ष केले आहे किंवा ती पुसून टाकण्याकडे आपला कल आहे."

ख्रिश्चन धर्म इस्लामपासून कसा शिकू शकतो याविषयी ते म्हणतात: "इस्लाम आज आपल्याला या जगात समजून घेण्याचा आणि जगण्याचा एक मार्ग शिकवू शकतो, जो ख्रिश्चन धर्मच नष्टतेबद्दल सर्वात गरीब आहे. इस्लामच्या केंद्रस्थानी विश्वाच्या अविभाज्य दृष्टिकोनाचे जतन करणे आहे."

ते पुढे म्हणाले की, इस्लामने "माणूस आणि निसर्ग, धर्म आणि विज्ञान, मन आणि पदार्थ यांना वेगळे करण्यास नकार दिला आहे. तसेच इस्लामने स्वत:कडे आणि आपल्या सभोवतालच्या जगाबद्दल एक तात्त्विक आणि एकात्म दृष्टीकोन जतन केला आहे."

पर्यावरण, निसर्ग आणि इस्लाम

२०१० मध्ये याच थिएटरमध्ये त्यांनी पर्यावरण वाचवण्यासाठी पाश्चिमात्य देश इस्लामी तत्त्वांपासून कसे शिकू शकतात, याविषयी भाष्य केले होते. 

"इस्लामी जग हे मानवजातीला उपलब्ध असलेल्या संचित शहाणपणाच्या आणि आध्यात्मिक ज्ञानाच्या सर्वांत मोठ्या कोषागारांपैकी एक आहे. हा इस्लामचा उदात्त वारसा आहे आणि उर्वरित जगाला एक अमूल्य देणगी आहे. आणि तरीही, बऱ्याचदा, ते शहाणपण आता पाश्चात्त्य भौतिकवादाकडे जाण्याच्या प्रबळ मोहिमेमुळे अस्पष्ट झाले आहे. 'आधुनिक' होण्यासाठी आपल्याला पाश्चिमात्य देशांचा तिरस्कार करावा लागेल."

ते पुढे म्हणाले: "गैरसोयीचे सत्य हे आहे की, आपण या ग्रहाला एका चांगल्या कारणासाठी उर्वरित सृष्टीशी सामायिक करतो - आणि ते म्हणजे आपल्या सभोवतालच्या गुंतागुंतीच्या संतुलित जीवनाच्या जाळ्याशिवाय आपण स्वतःच अस्तित्वात राहू शकत नाही. इस्लामने नेहमीच हे शिकवले आहे आणि त्या धड्याकडे दुर्लक्ष करणे म्हणजे निर्मितीशी झालेला आमचा करार मोडणे होय."

१९९६ साली 'अ सेन्स ऑफ द सेक्रेड : बिल्डिंग ब्रिजेस बिटविन इस्लाम अँड द वेस्ट' या शीर्षकाच्या भाषणात राजे चार्ल्स तृतीय यांनी इस्लामच्या 'नैसर्गिक व्यवस्थेबद्दल' असलेल्या आदराचा पुरस्कार केला. 

"मला असे वाटते की, इस्लामिक परंपरेला नैसर्गिक व्यवस्थेच्या कालातीत परंपरेबद्दल असलेल्या अगाध आदराची कदर करून पाश्चिमात्य देशांत आपल्या स्वत:च्या समजुतीची ती मुळे पुन्हा शोधून काढण्यास मदत करता येईल. माझा विश्वास आहे की ही प्रक्रिया आपल्या दोन धर्मांना एकत्र आणण्याच्या कार्यात मदत करू शकते. पाश्चिमात्य देशांमध्ये आरोग्य सेवा, नैसर्गिक वातावरण आणि शेती यांसारख्या क्षेत्रांमध्ये, तसेच स्थापत्यशास्त्र आणि शहरी नियोजन या क्षेत्रांमध्ये - माणूस आणि त्याच्या पर्यावरणाबद्दलच्या आपल्या व्यावहारिक कारभाराचा पुनर्विचार करण्यासही यामुळे आम्हाला मदत होऊ शकेल."

जगावर मुस्लिमांचा प्रभाव 

१९९३ मधील भाषणात त्यांनी इस्लामचा युरोप आणि व्यापक जगावर काय प्रभाव पडला, याविषयी भाष्य केले.

"इस्लामने शिकण्याच्या शोधाची जोपासना केली आणि ती जतन केली. परंपरेच्या शब्दांत सांगायचे तर 'विद्वानाची शाई ही हुतात्म्याच्या रक्तापेक्षा अधिक पवित्र असते'. १० व्या शतकातील कॉर्डोबा हे युरोपमधील आतापर्यंतचे सर्वात सुसंस्कृत शहर होते. आम्हाला माहीत आहे की ज्या वेळी राजा आल्फ्रेड या देशातील पाककलेच्या बाबतीत भयानक चुका करीत होता, त्या वेळी स्पेनमधील ग्रंथालयांना कर्ज दिले होते. त्याच्या प्रशासनाच्या ग्रंथालयातील ४,००,००० खंड हे उर्वरित युरोपातील सर्व ग्रंथालयांतील एकूण पुस्तकांपेक्षा अधिक होते. 

जगातील दुसरे सर्वात जुने विद्यापीठ असलेल्या अल-अझर विद्यापीठात २००६ साली 'युनिटी इन फेथ' या भाषणादरम्यान त्यांनी श्रोत्यांना सांगितले: "पाश्चिमात्य देशांत आपण इस्लामच्या अभ्यासकांचे ऋणी आहोत हे आपण लक्षात ठेवले पाहिजे; कारण त्यांच्यामुळेच युरोपातील अंधकारमय काळात शास्त्रीय शिक्षणाचा खजिना जिवंत ठेवण्यात आला होता." 

लीसेस्टर येथील 'मार्कफिल्ड इन्स्टिट्यूट ऑफ हायर एज्युकेशन'मध्ये ते म्हणाले: "युरोपियन रेनेसान्समध्ये इस्लाम आणि मुस्लिमांच्या योगदानाबद्दल ज्याला शंका आहे त्याने एक सराव म्हणून रोमन अंकांचा वापर करून काही सोपे अंकगणित करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. अरबी अंकांबद्दल चांगुलपणा आणि मुस्लिम गणितज्ञांनी युरोपियन विचारसरणीत सुरू केलेल्या शून्याच्या संकल्पनेबद्दल धन्यवाद!" 

"माझ्या स्वत:च्या कुटुंबालाही इस्लामी तत्त्ऱज्ञानाचा फायदा झाला - राणी व्हिक्टोरिया, माझी महान आजी, तिला तिच्या घरातील अनेक भारतीय कर्मचाऱ्यांपैकी एक हाफिज अब्दुल करीम यांनी पर्शियन लिपीचा वापर करून हिंदुस्थानी शिकवले होते."

यूके आणि युरोपमधील मुस्लिम एकीकरण 

२००४ मध्ये ईलिंग येथील मुस्लिम महाविद्यालयात भाषणादरम्यान  त्यांनी ब्रिटनमधील धार्मिक शिक्षणाचे महत्त्व सांगितले. 

"मुस्लिमांना त्यांची ओळख न गमावता ब्रिटीश आणि पाश्चात्य समाजात समाकलित होण्यास मदत करण्यासाठी मुस्लिम धार्मिक शिक्षण हा एक महत्त्वाचा घटक म्हणून मी पाहतो - आणि विशेषत: अफगाणिस्तान आणि मलेशियासारख्या भिन्न देशांमध्ये हा संदेश पोहोचविण्याची जबाबदारी असलेले यशस्वी इमाम तयार करण्यात महाविद्यालयाला मिळालेल्या यशामुळे मला विशेष प्रोत्साहन मिळाले आहे.

"इस्लाममधील समृद्ध गुंतागुंतीबद्दल, जीवनाच्या संपूर्ण चौकटीच्या सभोवतालच्या सूक्ष्म बारकाव्यांविषयी मला शक्य तितके शिकण्याची आणि समजून घेण्याची इच्छा होती; सर्वात महत्त्वाचे म्हणजे, देवाच्या प्रकटीकरणाच्या गहन गूढतेवर आधारित असलेल्या तीन महान अब्राहामी धर्मांपैकी एकाच्या उत्पत्तीविषयी व इतिहासाविषयी मला जाणून घ्यायचे होते." 

इस्लामी वित्तपुरवठा

तत्कालीन प्रिन्स ऑफ वेल्सने इस्लामी वित्तपुरवठ्याविषयी काही भाषणे केली आहेत आणि ती समाजातील काही वाईट गोष्टींचा सामना कसा करू शकते, हे लंडनमधील 'वर्ल्ड इस्लामिक इकॉनॉमिक फोरम'च्या २०१३ च्या भाषणात दिसून येते.

"आपल्या वित्तीय संस्थांनी निश्चितपणे हे ओळखण्याची वेळ आली आहे की पृथ्वी हे अमर्याद संसाधन नाही जे इच्छेनुसार लुटले जाऊ शकते आणि कारभाराचे ते तत्त्व आपल्या आर्थिक संरचनांमध्ये समाकलित केले पाहिजे. येथेच माझा विश्वास आहे की वर्ल्ड इस्लामिक इकॉनॉमिक फोरम आणि इस्लामिक किंवा "वैकल्पिक" फायनान्स महत्त्वपूर्ण योगदान देऊ शकतात. हे योगदान विविधतेतून एकता, समानता आणि करुणा यांच्या कल्पना, तसेच नैसर्गिक भांडवलाची योग्य प्रकारे दखल घेण्याची आवश्यकता या इस्लामच्या केंद्रस्थानी असलेल्या अत्यंत महत्त्वाच्या शिकवणुकींवर आधारित आहे." 

ते पुढे म्हणाले: "इस्लामिक फायनान्समध्ये वास्तविक अर्थव्यवस्थेवर देखील एक स्वागतार्ह भर देण्यात आला आहे आणि व्यापक नैतिक आणि नैतिक संहितांपासून वित्तपुरवठा खंडित केला जाऊ शकत नाही या कल्पनेवर देखील भर देण्यात आला आहे."

इस्लामी स्पेन

1993 मध्ये ऑक्सफर्ड सेंटर फॉर इस्लामिक स्टडीज येथे एका भाषणात, राजे चार्ल्स तृतीय अंदालुसियामधील मुस्लिमांच्या वारशातून पश्चिमेला कसे शिकता येईल आणि त्याचा फायदा कसा होईल याबद्दल बोलले.

"इस्लामिक स्पेनमध्ये हेलेनिस्टिक (ग्रीक इतिहास, भाषा आणि संस्कृतीशी संबंधित) ज्ञान उदयोन्मुख आधुनिक पाश्चात्य जगाद्वारे नंतरच्या वापरासाठी ठेवले गेले. मुस्लिम स्पेनने केवळ प्राचीन ग्रीक आणि रोमन सभ्यतेची बौद्धिक सामग्री गोळा केली आणि जतन केली नाही तर त्या सभ्यतेचा अर्थ लावला आणि त्याचा विस्तारही केला आणि मानवी प्रयत्नांच्या अनेक क्षेत्रात - विज्ञान, खगोलशास्त्र, गणित, बीजगणित (स्वत: एक अरबी शब्द), कायदा, इतिहास, औषध, औषधशास्त्र, ऑप्टिक्स, कृषी, वास्तुशास्त्र, धर्मशास्त्र, संगीत. अविसिना आणि अल राझी यांनी औषधाच्या संशोधनात दिलेल्या योगदानाचा युरोपला नंतरच्या शतकांपर्यंत फायदा झाला.”

डॅनिश कार्टून्स

इजिप्तमधील कैरो येथील अल-अझहर विद्यापीठाला २००६ साली दिलेल्या भेटीदरम्यान चार्ल्स तृतीय यांनी इस्लामचे प्रेषित मुहम्मद (स.) यांचा अवमान करणारी डॅनिश व्यंगचित्रे २००५ साली प्रसिद्ध झाल्याबद्दल टीका केली आणि प्रत्येकाला इतरांच्या श्रद्धेचा आदर करण्याचे आवाहन केले.

"सुसंस्कृत समाजाचे खरे लक्षण म्हणजे अल्पसंख्याकांना आणि अनोळखी लोकांना मिळणारा आदर... डॅनिश व्यंगचित्रांवर नुकताच झालेल्या भयंकर संघर्ष आणि रागामुळे 'जे मौल्यवान आणि पवित्र आहे ते ऐकण्यात आणि इतरांना जे मौल्यवान आणि पवित्र आहे त्याचा आदर करण्यात आपण अपयशी ठरलो आहोत,' हा धोका दर्शवितो," असे त्यांनी आपल्या भाषणात म्हटले होते.

या व्यंगचित्रांमुळे मुस्लिमविरोधी द्वेष आणि पश्चिमेकडील अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या मर्यादांविषयी चर्चा सुरू झाली.

रमजानच्या दिवशी

या वर्षी रमजानच्या संदेशात त्यांनी ब्रिटनमधील मुस्लिम समाजाच्या नि:स्वार्थीपणाबद्दल भाष्य केले.

"रमजानच्या भावनेतून आपण सर्वजण बरेच काही शिकू शकतो - केवळ औदार्यच नव्हे, तर प्रार्थनेत संयम, कृतज्ञता आणि एकात्मता देखील आहे ज्यामुळे या आशीर्वादित महिन्यात जगभरातील अनेकांना खूप सांत्वन मिळेल."

"मुस्लिमांच्या भावनेचे आणि दयाळू आदरातिथ्याचे औदार्य मला विस्मयचकित करणे थांबत नाही आणि मला खात्री आहे की जसजसे आपण अधिक अनिश्चित काळात प्रवेश करत आहोत तसतसे आता अनेक जण वाढत्या आव्हानांचा सामना करण्यासाठी झगडत आहेत, मुस्लिम समुदाय पुन्हा एकदा हा रमजान देण्यासाठी प्रचंड दानशूरपणाचा स्रोत बनेल.

(संदर्भ- Al Jazeera, The Cognate)

- शाहजहान मगदुम


statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget