Halloween Costume ideas 2015

विलक्षण वळण


राष्ट्रांच्या संस्कृती सभ्यतांच्या जीवनातील प्रवासात अनेक वळणे येत असतात. प्रामुख्याने जेव्हा राष्ट्रासमोर कोणती आव्हाने उभी असतात किंवा एखाद्या राष्ट्राला स्वातंत्र्याच्या चळवळीतून प्रवास करावा लागतो, तेव्हा कोणते वळण किती महत्त्वाचे आणि कोणते किती धोक्याचे हे माणसाला कळत नाही. सामान्य माणसांविषयी असे म्हटले गेले तर यात काही चूक नाही. सामान्य माणसांना विचारांची मर्यादा सीमित असते. त्याच्याजवळ आजचा दिवस कसा जगायचा आणि उद्याचा दवस कोणत्या समस्या घेऊन येणार याकडेच लक्ष असते. कारण तो एखाद्या ऐतिहासिक प्रक्रियेत सहभागी नसतो.पण जी सजग माणसे असतात किंवा ज्यांना त्यांच्या समोर घडत असणाऱ्या घटनांच्या परिणामांची जाणीव असते त्यांना याचे भान असते की या घटना पुढे जाऊन इतिहास रचणार आहेत. तरीदेखील ते अशा घटनांपासून वेगळेच राहातात. कोणत्याही प्रकारे सहभागी न होण्याचे एक तर त्यांनी ठरवलेले असते किंवा त्या घटनांमागील आव्हानांना सामोरे जाण्याची त्यांच्याकडे क्षमता नसते. त्यांना समोर येणाऱ्या भविष्यात घडणाऱ्या इतिहासाची चाहूल समजू लागते. दूरदृष्टी असल्यास ते पाहू शकतात. या ऐतिहासिक वळणाद्वारे कोणत्या टप्प्यावर या घटनांचा समारोप होणार आहे, कोणती क्रांती घडून येणार आहे हे त्यांना कळत नाही किंवा त्याच्याकडे दुर्लक्ष करतात! जे लोक जाणूनबुजून किंवा अजाणतेपणाने इतिहासाची मांडणी होत असताना त्यापासून अलिप्त राहातात त्याची दोन मुख्य कारणे असू शकतात. पहिले असे की जी काही चळवळ चालली आहे ती एक तर निकामी ठरणार आहे किंवा ती महत्त्वहीन आहे. दुसरे असे की त्यांची क्रांती जर घडूनच आली तर त्या क्रांतीपलीकडे त्यांना काय करायचे आहे हेदेखील स्पष्ट नसते. याचे कारण असे की त्यांच्याकडे आकलन क्षमता तर नसतेच त्याचबरोबर या प्रक्रियेतील धोके सहन करण्याची त्यांची शारीरिक शक्ती नसते की मनोबलदेखील नसते. स्वतःच्या इतिहासाची मांडणी करायला माणसांकडे एक विचारधारा असावी लागते, ती विचारधारा एखाद्या जातीसमूह- भौगोलिक क्षेत्रापुरती मर्यादित नसावी. तशीच ती विचारधारा सर्वसमावेशक असायला हवी. साऱ्या मानवजातीच्या कल्याणाची, हिताची असावी लागते. एखाद्या विशिष्ट संप्रदायाच्या कल्याणाशी सीमित नसावी. जरी त्यांचे कार्यक्षेत्र भौगोलिक सीमेंतर्गत असले तरी त्यांची विचारधारेच्या, मूल्याच्या विस्तृत भौगोलिक सीमांना ओलांडून जगभर पसरते, अशीच माणसे जगाचे नेतृत्व करण्यास पात्र असतात. इतिहास रचत असताना त्यात सहभागी असोत की त्या प्रक्रियेपासून दूर राहिलेले असोत, हे दोन्ही गट घडलेल्या इतिहासाची मांडणी करू शकत नाहीत. हे कार्य त्यांच्यानंतर येणाऱ्या पिढ्या करत असतात. आणि त्या पिढ्यांसमोर मागील कोणत्या काळात कोणकोणत्या घटना घडल्या, त्यांचे नेतृत्व कुणी केले होते, त्यांची विचारधारा किती विस्तारित होती, ह्या सर्व बाबींचा विचार करूनच ते मांडणी करतात. जेव्हा हा इतिहास लोकांच्या समोर येतो तेव्हा ज्या लोकांनी झालेल्या क्रांतीपासून स्वतःला अलग ठेवले होते. त्यांना निराशा होते. आणि म्हणून त्यांना सधी मिळाल्यास ते मागील इतिहास पुसून टाकण्याचा प्रयत्न करतात. आपण जे केले नाही, जो पराक्रम गाठला नाही, तो आपल्या पदरात घालून घेण्याचा प्रयत्न करतात. पण यामुळे ते स्वतःदेखील समाधानी नसतात आणि इतर लोकसुद्धा त्यांच्यावर विश्वास करत नाहीत. ही दयनीय परिस्थिती त्यांनी स्वतः निर्माण केलेली असते.

- सय्यद इफ्तिखार अहमद

संपादक, 

मो.: ९८२०१२१२०७


Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget