Halloween Costume ideas 2015

तबलिगी जमाअतवरील प्रतिबंधांची सत्यता


सब अपने बनाये हुए ज़िंदां में हैं महेबूस

खावर के सवाबत हों के अफरंग के सय्यार

पीरान-ए-कलिसा हों के शेखा-ने-हरम हों

ने जिद्दते गुफ्तार है ने जिद्दते किरदार

दुनिया को है उस महदि-ए-बरहक की ज़रूरत हो जिसकी निगाह जलजला-ए-आलमे अफकार

आम्ही राजकारणामध्ये रस घेत नाही म्हणून राजकारण तुमच्यात रस घेणार नाही असे नाही.’’ प्रसिद्ध युनानी सैनिक कमांडर परसेल्सचे हे वाक्य तब्लीगी जमाअतबद्दल तंतोतंत लागू पडते. कारण तब्लिगी जमाअत भारतात जन्म घेऊन जागतिक पातळीवर जवळ-जवळ 190 देशांमध्ये जरी काम करत असली आणि या देशांपैकी एकाही देशाच्या राजकारणात रस घेत नसली, म्हणून तिच्यात राजकारणी  घेणार नाहीत असे नाही. 2020 मधील कोरोना काळामध्ये तब्लिगी जमाअतच्या दिल्ली मर्कजमधून कोरोना पसरला म्हणून जे राजकारण सुरू झाले ते जरी संपले असले तरी 2021 मध्ये मागच्या आठवड्यात सऊदी अरब या देशातील राजकारणाने तिच्यात रस घेतला आहे.  एव्हाना ही बाब सर्व जगाला कळालेली आहे. मात्र 2019 मध्येही या जमाअतने आपल्यावरील आरोपांचे उत्तर दिले नव्हते आणि आताही तिने उत्तर दिलेले नाही. 

त्याचे झाले असे की मागच्या शुक्रवारी म्हणजे 11 डिसेंबरला सऊदी अरबच्या सर्व मस्जिदीमधून तब्लिगी जमाअतवर नव्याने प्रतिबंधाची घोषणा करण्यात आली. नव्याने यासाठी की 1980 पासूनच तब्लिगी जमाअतवर त्या देशामध्ये प्रतिबंध आहे. पण ते जरा सैल होते ते आता कडक झालेले आहेत. या पार्श्वभूमीवर हा सारा काय प्रकार आहे? हे कसले राजकारण काय आहे? यासंबंधी सत्य समजून घेणे अनाठायी होणार नाही म्हणून हा लेखन प्रपंच. 

18 डिसेंबर रोजी देण्यात आलेला संदेश

’’हे भक्तानों अल्लाहकडे लोकांना बोलावणे मुस्लिमांचे आद्य कर्तव्य आहे. त्यात एका ईश्वराची उपासना करण्याबाबत आणि शिर्क (अल्लाहशिवाय इतरांना ईश्वर मानने) पासून रोखण्याबाबत तसेच प्रेषित मुहम्मद सल्ल. यांचे अनुसरण करण्याचे संदेश देणे. एवढेच आपले कर्तव्य आहे. यात नवीन प्रकार सुरू करणे चुकीचे आहे. अल्लाहची परमकृपा आहे की, आपल्या देशामध्ये शाह अब्दुल अजीज यांच्या काळापासूनच तौहिद (एकेश्वरत्व)चे समर्थन करणे आणि त्याचा फैलाव करणे आणि शहाणपणाने या संदेशाकडे बोलाविण्याचे काम आमचे लोक दृढपणे करत आहेत. परंतु अलिकडे बाहेरून आलेले काही लोक याच कामाच्या नावाखाली चुकीच्या शिकवणीकडे लोकांना बोलावत आहेत. त्या लोकांपैकी काही लोक ते आहेत ज्यांचे नाव तबलिगी जमाअत आहे. या लोकांच्या श्रद्धा शुद्ध नाहीत. हे लोक प्रेषितांच्या शिकवणीपासून अनभिज्ञ आहेत. यांच्याकडे फालतू गोष्टी, बकवास आणि खोट्या कथा सांगितल्या जातात. तरी त्यांना गर्व असतो की, ते इतरांपेक्षा जास्त इस्लामकडे लोकांना बोलाविणारे आहेत. या जमाअतची उत्पत्ती भारतात झाली. मग हे लोक आमच्या इलाख्यात आले. यांच्या कामाची पद्धत पाहून त्या काळातील ग्रँड मुफ्ती मुहम्मद बिन शेख इब्राहीम यांनी यांच्या विरूद्ध फतवा देऊन म्हटले होते की, ’’या लोकांमध्ये कुठलीही चांगली गोष्ट नाही. हे लोक पथभ्रष्ट, इस्लामच्या मूळ शिकवणीपासून   -(उर्वरित पान 7 वर)

लांब गेलेले आहेत. यांच्या पुस्तकातून मला असे आढळले आहे की, यांचा पायाच बिगर इस्लामी आहे. यांच्या पुस्तकांमध्ये शिर्क, कबरपरस्ती सामील आहे. म्हणून आम्ही गप्प बसू शकत नाही.’’ यानंतर पुन्हा दूसरे मुफ्ती शेख बिन बआज यांनी यांच्याबद्दल सांगितले की ही, ’’तब्लीगी जमाअत ही प्रसिद्ध भारतीय जमाअत आहे. त्यांच्यामध्ये अनेक गोष्टी इस्लामी श्रद्धेच्या विरूद्ध आहेत. म्हणून त्यांच्यासोबत जाणे, त्यांना वेळ देणे, त्यांची साथ देणे चुकीचे आहे. मी आवाहन करतो की, ज्यांना शरियतची माहिती आहे त्यांनी पुढे यावे आणि यांना विरोध करावा. यांच्या श्रद्धा दुरूस्त कराव्यात, यांना कल्याणकारी मार्गाकडे बोलवावे. इथपर्यंत की हे लोक आपल्या चुकीच्या धारणा सोडून खऱ्या इस्लामकडे परत येतील. ही एक अशी जमाअत आहे ज्यांच्या अनुयायांची श्रद्धा भ्रष्ट झालेली आहे. यांच्यात आणि इ्नवानुल मुस्लिमीन (इस्लामी ब्रदरहुड) अन्सारे सुन्ना मध्ये काही फरक नाही. यांचे सर्वांचे विचार एकसारखे आहेत. म्हणून यांची कोणी साथ देऊ नये’’

शेख मुहम्मद बिन उस्मैन यांनी तब्लिगी जमाअतबद्दल म्हटलेले आहे की, ’’मला कळाले आहे की, तब्लिगी जमाअतच्या श्रद्धेमध्ये अशुद्धता आहे. त्यामुळे या जमाअतपासून लांब राहणे गरजेचे आहे.’’ एक अन्य आलीम शेख हामूद तुवैजरी यांच्याबद्दल म्हणतात की, ’’लोकहो ! तब्लिग जमाअतसोबत फिरू नका. मग ते सऊदी अरबच्या भूमीवर असो का बाहेरच्या भूमीवर. कारण हे लोक पथभ्रष्ट झालेले आहेत. यांच्या श्रद्धा बिघडलेल्या आहेत.’’ शेख सालेह अफवजान यांनी यांच्याबद्दल म्हटलेले आहे की, ’’तबलिगी जमाअत एक अशी जमाअत आहे जिच्यामुळे अनेक लोक भ्रमित झालेले आहेत. या जमाअतचा दावा आहे की, या जमाअतने अनेक गुन्हेगारांना गुन्हे करण्यापासून रोखलेले आहे. हे जरी खरी असले तरी ही जमाअत त्यांना गुन्ह्यांपासून वाचवून त्यांना बिदआतमध्ये फसवून टाकते आहे. हे सुद्धा चुकीचे आहे. बिदअती व्यक्तीपेक्षा गुन्हेगार व्यक्ती बरी असते. म्हणून यांच्यापासून लांब रहायला हवे.’’ आपल्याच देशातील इस्लामी विद्वानांनी यांचा विरोध केलेला आहे असे नाही तर दुसऱ्या देशाच्या इस्लामी विद्वानांनीही या जमाअतचा विरोध केलेला आहे ज्यात प्रसिद्ध इस्लामी विद्वान शेख अलबानी प्रमुख आहेत. ते म्हणतात, ’’तबलिगी जमाअत ही कुरआन आणि प्रेषितांच्या शिकवणीवर दृढ नाही. ना ही ही जमाअत आमच्या नेक पूर्वजांच्या पद्धतीवर आहे. म्हणून यांना सहकार्य करणे निषिद्ध आहे.’’ (संदर्भ : अरबी भाषेमधून भाषांतर, मुफ्ती अबुल फजल कास्मी, यू ट्यूब) 

मुळात या संबोधनामध्ये जे फतवे सऊदी धार्मिक विद्वानांचे देण्यात आलेले आहेत ते समोर आल्यानंतर 1980 पासून तबलिगी जमाअतचे काम करणाऱ्यांवर सऊदी अरबमध्ये प्रतिबंध लावण्यात आला होता. तरी परंतु हे प्रतिबंध सैल असल्यामुळे तबलिगी जमाअतचे साथी हॉटेलमध्ये, मोठ्या लोकांच्या दिवानखाण्यामध्ये आणि हजला गेल्यानंतर हाजींच्या राहुट्यांमध्ये आपले काम करत होते. एवढेच नव्हे तर टुरिस्ट विजा घेऊन सऊदी अरबचे ते नागरिक जे या जमाअतशी संलग्न होते भारतात सुद्धा येत होते.

तबलिगी जमाअतवर सऊदी सरकारचे आक्षेप

सऊदी अरबचे धार्मिक कार्यमंत्री डॉ. शेख अब्दुल लतीफ बिन अब्दुल अजीज अल शेख यांनी सर्वप्रथम आपल्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरून ट्विट करून तबलिगी जमाअतविरूद्ध आपली भूमीका मांडली, जी की सऊदी सरकारची अधिकृत भूमीका मानली जाते. मंत्रालयाकडून ज्या गोष्टी प्रसिद्ध करण्यात आल्या त्याचा खुलासा खालीलप्रमाणे.

’’ही जमाअत मुळात भारतीय जमाअत आहे. ही इस्लामचे प्रेषित मुहम्मद सल्ल. यांच्या शिकवणीविरूद्ध चालते. ही जमाअत इस्लामी ज्ञान नसतांना लोकांमध्ये उपदेश करण्यासाठी निघते. या जमाअतच्या प्रभावामुळे आतंकवादी समुहही उत्पन्न झालेले आहेत. ही जमाअत आतंकवादाचे प्रवेशद्वार आहे. सऊदी अरबच्या तुरूंगात बंद असलेल्या अनेक कैद्यांची जेव्हा चौकशी केली गेली तेव्हा लक्षात आले की त्यांच्यापैकी अनेकजण तबलिगी जमाअतमध्ये सामील होते. हे लोक त्यावेळेस सामील झालेले आहेत ज्यावेळेस सऊदी अरबच्या फतवा कमेटिने फतवा दिलेला आहे की या जमाअतमध्ये कोणीही सऊदी नागरिकाने सामील होवू नये. अशा परिस्थितीत आमच्यासाठी अनिवार्य आहे की, अशा जमाअतीचे निमंत्रण आमच्या नागरिकांनी स्वीकार करून ये. ही जमाअत आणि अशा अन्य जमाअतींमुळे आमच्या राष्ट्रीय एकतेचे तुकडे तुकडे करून टाकतील.’’

तबलिगी जमाअतचे समर्थन करावे का विरोध?

वरील प्रमाणे सऊदी अरबच्या मस्जिदीमध्ये वाचला गेलेला खुत्बा आणि सऊदी सरकारची भूमीका पुढे आल्यानंतर जागतिक पातळीवर या संदर्भात साहजिकच प्रतिक्रिया उमटल्या. त्यातल्या काही निवडक प्रतिक्रिया खालीलप्रमाणे - 

जमियते उलेमा-ए-हिंदचे अध्यक्ष मौलाना महेमूद असद मदनी यांनी एक लिखित पत्रक जारी करून म्हटलेले आहे की, तबलिगी जमाअत ही जगातील सर्वात मोठी जमाअत असून शांतीपूर्वक काम करते. ते एक धार्मिक सुधार आणि चारित्र्यनिर्मितीचे अभियान आहे. या जमाअतने आपल्या शंभर वर्षाच्या इतिहासात अनेक मुस्लिम युवकांना दारूच्या गुत्त्यांमधून बाहेर काढून मस्जिदींमध्ये आणले. अनेकांना वाम मार्गापासून दूर करून सन्मार्गावर आणले. सर्व विश्व जाणून आहे ही एक अत्यंत कल्याणकारी जमाअत आहे. जे लोक आणि सरकारे हिचा विरोध करीत आहेत, वास्तविकपणे ते या जमाअतशी अपरिचित आहेत आणि दुष्प्रचाराने प्रभावित झालेले आहेत. या जमाअतीचे संरक्षण आणि समर्थन करणे प्रत्येक मुस्लिमांवर वाजीब (अनिवार्य) आहे. म्हणून जमियते उलेमा-ए- हिंद आपल्या सर्व सदस्य, पदाधिकारी आणि संबंधितांशी अपील करत आहे की, 1. प्रत्येक मस्जिदीमध्ये शुक्रवारच्या संबोधनामध्ये उलेमा आणि इमाम लोकांनी तबलिगी जमाअतच्या कार्यांचा जनतेला परिचय करून द्यावा.

2. दावते हक (सत्याकडे आमंत्रण देण्या) कडे बोलवण्यात मोठ्यात मोठी शक्ती न रोखू शकलेली आहे आणि न रोखू शकणार आहे. 3. मात्र आम्हाला हे विसरता येणार नाही की सत्यावर चालणाऱ्या लोकांना प्रत्येक काळामध्ये त्याग करावा लागतो. म्हणून तबलिगी जमाअतच्या समर्थन आणि संरक्षणासाठी जमियते उलेमा-ए-हिंद कोणताही त्याग करण्यासाठी तयार आहे. आम्ही मागे हटणार नाही. 4. जमियते उलेमाच्या सर्व कार्यकर्त्यांनी तबलिगी जमाअतच्या कार्याला आपले कार्य समजावे आणि त्यांचे प्रबळ समर्थन करावे. वर्तमान स्थितीमध्ये याची अत्यंत गरज आहे. 

जमाअत-ए-इस्लामी हिंदचे अध्यक्ष सय्यद सआदतुल्लाह हुसैनी यांनी या संबंधी म्हटले आहे की, ’’सऊदी अरबने तबलिगी जमाअतवर लादलेल्या प्रतिबंधाच्या निर्णयाला आम्ही चूक समजतो. सऊदी सरकारकडून असे पहिल्यांदाच घडलेले आहे असे नाही यापूर्वीसुद्धा त्यांनी अनेक धार्मिक संघटना आणि जमाअतींवर प्रतिबंध लावलेले आहेत. त्यांच्या साहित्यावर प्रतिबंध लावलेला आहे. त्यांच्या गतिविधींवर प्रतिबंध लावलेला आहे. जेव्हा-जेव्हा त्यांनी अशी पावले उचलली आहेत तेव्हा-तेव्हा जमाअते इस्लामींनी त्यांचा विरोध केलेला आहे. सध्याचा त्यांचा तबलिगी जमाअत संबंधीचा निर्णय चुकीचाच नव्हे तर बिगर इस्लामी सुद्धा आहे. आज ज्या मुल्यांवर सऊदी सरकार चालण्याचा दावा करते हा निर्णय त्या मुल्यांच्याही विरूद्ध आहे. एवढेच नव्हे तर मानवाधिकाराच्याही विरूद्ध आहे.’’

सऊदी सरकारचा गैरसमज

सऊदी अरब सरकारने एकतर तबलिगी जमाअतच्या रचनेचा अभ्यासच केलेला दिसून येत नाही किंवा ते जाणून बुजून खोटे तरी बोलत आहेत. जमाअतमध्ये जे लोक चालतात त्यांची कुठलीच चारित्र्य पडताळणी करण्याची पद्धत जमाअतमध्ये पूर्वीपासूनच नाही. आपल्याबरोबर कोण चालत आहे, तो कोणत्या पंथाचा आहे, तो कोणत्या विचारधारेचा या संबंधी तब्लिगी जमाअत कोणालाच विचारपूस करत नाही. त्यामुळे सऊदी सरकारचा हा दावा की त्यांच्या तुरूंगामधील काही लोक असे आहेत ज्यांनी तबलिगी जमाअतमध्ये काही काळ व्यतीत केलेला आहे आणि ते देशविरोधी कारवायांमध्ये लिप्त आढळले तसेच ते आतंकवादी विचारसरणीचे होते, तर यात आश्चर्य वाटण्यासारखे काहीच नाही. कारण त्या लोकांची ती व्यक्तीगत कृती आहे. जमाअतमध्ये फक्त त्यांच्या चारित्र्यसंवर्धनाचेच काम केले गेले असावे. त्यांच्या इतर व्यवहाराशी जमाअतचा काही एक संबंध येत नाही.

तबलिगी जमाअतवर प्रतिबंध लावण्यामागची कारणे

मुळात खादीमैन-ए-हरमैन-शरीफैन अर्थात मक्का आणि मदिनाचे सेवक म्हणून सऊदी सरकार सऊदी अरबकडे सगळेच आदराने पाहतात. परंतु सऊदी अरबमध्ये सत्तारूढ असलेले सऊदी घराने हे स्वतः इस्लामच्या मूळ शिकवणीपासून लांब गेलेले आहे.  

1. त्यांची पहिली सर्वात मोठी चूक ही की त्यांनी आपल्या देशाचे नाव अरबस्थान (जजीरतुल अरब ) बदलून सऊदी अरब केलेले आहे. सऊद हे नाव सऊदी अरबच्या सत्ताधाऱ्यांच्या कबिल्याचे नाव आहे. येणेप्रमाणे सऊदी अरब जगातील एकमेव असा देश आहे ज्याचे नाव त्याच्या भूमीमध्ये राहणाऱ्या एका कबिल्याच्या नावावर ठेवण्यात आलेले आहे. जे की चूक आहे. 

2. एवढेच नव्हे तर त्यांनी आपल्या देशात इस्लामला मान्य असलेली खिलाफत आधारित लोकशाही न स्थापन करता स्वतःची घराणेशाही लागू केलेली आहे. 

3. त्यांची तीसरी चूक अशी की, त्यांना सऊदी अरबमध्ये वहाबीजम (कट्टर इस्लामी विचारधारा) सुरू ठेवायची आहे. त्यामुळे त्यांना इस्लामच्या इतर विचारधारांची भीती वाटते. त्या भीतीतूनच त्यांनी तबलिगी जमाअतवर प्रतिबंध लादलेले आहेत.

3. तबलिगी जमाअत ही रूढीवादी जमाअत असून, इस्लामच्या प्राचीन मुल्यांवर तिचा विश्वास आहे. आणि अलिकडे राजपुत्र मुहम्मद बिन सलमान यांनी सऊदी अरबमध्ये आधुनिकतेच्या नावाखाली बिगर इस्लामी मुल्यांना स्थान देण्यास सुरूवात केलेली आहे. उदा. (अ) इस्लामला मान्य असलेली महिलांसंबंधीची महेरमची पद्धत त्यांनी बंद केली. (ब)  हॉटेलमध्ये अविवाहित बिगर अरब  जोडप्यांना प्रवेश देण्यास सुरूवात केली. (क) मदिनासारख्या पवित्र शहरामध्ये सिनेमा थिएटच्या बांधकामाला परवानगी दिली. (ड) नवीन वर्षाच्या स्वागतासाठी 31 डिसेंबरच्या रात्री समारोह करण्याच्या बिगर इस्लामी पद्धतीला मान्यता दिली. (इ) मागच्या आठवड्यात त्यांनी पाकिस्तानला 3 कोटी डॉलर कर्ज म्हणून 6 टक्के व्याजाने दिले. म्हणजे इस्लामला मान्य नसलेल्या व्याजाधारित अर्थव्यवस्थेला त्यांनी मान्यता दिली. (ई) अरबांची ऐश जगप्रसिद्ध आहे. भारतातील प्रत्येक मोठ्या शहरात विशेषतः मुंबई, मिरज आणि हैद्राबादमध्ये येवून सऊदी नागरिक  काय करतात हे सर्वांना माहित आहे. (उ) काबागृहाच्या मुख्य प्रवेशद्वाराचे नाव बाब-ए-शहा अब्दुल अजीज असे आपल्या पूर्वजाच्या नावावर ठेऊन त्यांनी काबागृहाचे महत्व कमी केले. (ऊ) अमेरिका आणि इजराईलच्या कच्छपी लागून त्यांनी कुरआनला मान्य असलेली संगसारी (गुन्हेगाराला दगडाने ठेचून मारण्याची शिक्षा पद्धती) बंद केली. (ड) आधुनिकतेच्या नावाखाली पाश्चिमात्य संस्कृतीचा जो धुडगुस सऊदीमध्ये घातला जातोय तबलिगचे लोग येवून हे सर्व हराम आहे, हे तेथील जनतेला समजावून सांगतील व असंतोष निर्माण होईल. या भीतीनेसुद्धा त्यांच्यावर प्रतिबंध घालण्यात आला असावा.

एवढेच नव्हे तर 11 डिसेंबर शुक्रवारी ज्या दिवशी चारित्र्य संवर्धनास प्रसिद्ध असलेल्या तबलिगी जमाअतवर प्रतिबंध लावण्याची घोषणा मस्जिदीमधून करण्यात आली त्याच दिवशी रियाद या राजधानीच्या शहरात सलमान खानने 80 हजार सऊदी नागरिकांच्या समोर आपला डान्स, इतर कलाकार शिल्पा शेट्टी, प्रभू देवा, सई परांजपे आणि आयुष्य यांच्यासोबत सादर केला. ही किती मोठी विडंबना आहे. तबलिगी जमाअतमुळे जर सऊदी नागरिक पथभ्रष्ट होत असतील तर सलमान खानच्या परफॉर्मन्सने ते सन्मार्गावर येणार आहेत काय? याची उत्तर किंग सलमान यांनीच द्यावे. 

ज्या मुहम्मद बिन सलमानवर सऊदी नागरिक व पत्रकार जमाल खशोगी याच्या निघृण खुनाचा आरोप आहे, ज्या देशाच्या नागरिकांना 9/11 च्या हल्ल्यामध्ये शिक्षा झालेली आहे, जो सऊदी अरब गेल्या पाच वर्षापासून यमन या शेजारी देशावर कारपेट बॉम्बिंग करून लाखो नागरिकांच्या हत्येसाठी जबाबदार आहे त्याच्या तोंडातून इस्लामच्या संरक्षणाची भाषा शोभत नाही व तबलिगी जमाअतवर प्रतिबंध लावण्याचा त्या देशाच्या शासनकर्त्यांना कुठलाच नैतिक अधिकार नाही. कुरआनमध्ये म्हटले आहे की, ’’हे श्रद्धावंतांनो! न्यायावर दृढ राहा आणि अल्लाहसाठी साक्षीदार बना, यद्यपि तुमच्या न्यायाचा व तुमच्या साक्षीचा आघात तुम्हा स्वतःवर अथवा तुमच्या आईबापावर व नातेवाईकांवर जरी होत असेल तरी देखील! मामल्यातील पक्षकार मग तो श्रीमंत असो अथवा गरीब, अल्लाह तुमच्यापेक्षा जास्त त्यांचा हितचितक आहे. म्हणून आपल्या मनोवासनेच्या अनुकरणात न्यायापासून दूर राहू नका आणि जर तुम्ही पक्षपाताची गोष्ट बोललाच अथवा सत्याला बगल दिली तर समजून असा की जे काही तुम्ही करता अल्लाहला त्याची माहिती आहे.  (सुरे अन्निसा : आयत नं.135)

तबलिगी जमाअत उपयोगात आणत असलेल्या पुस्तकांमधील काही मजुकराविषयी इस्लामी विद्वानांमध्ये मतभेद असले तरी वरील कुरआनच्या आदेशाप्रमाणे प्रत्येक श्रद्धावान मुस्लिमांचे हे कर्तव्य आहे की, सऊदी सरकारच्या या चुकीच्या आदेशाचा निषेध करावा. समाधानाची बाब ही आहे की, स्वतः सऊदी अरबमधूनच एवढे प्रतिबंध असतांनासुद्धा या आदेशाविरूद्ध स्वर उमटत आहेत. 

- एम. आय. शेख


Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget