Halloween Costume ideas 2015

बूस्टर डोसची सध्या गरज नाही


नवी दिल्ली  

कोरोना विषाणूचे व्हेरियंट आणि त्यामुळे होणारे परिणाम पाहता लस बणविणाऱ्या कंपन्यांनी दोन लसीनंतर बूस्टर डोस घ्यावी लागणार असल्याचे सांगितले होते मात्र, असा कोणत्याही बूस्टर डोसची सध्या गरज नसल्याचा निष्कर्ष एका संशोधनातून समोर आला आहे.

शास्त्रज्ञांच्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील टीमने केलेल्या संशोधनात कोरोना विषाणू, तसेट डेल्टा व्हेरियंटसाठी देखील बूस्टर डोसची गरज नसल्याचे लॅन्सेटच्या अहवालातून समोर आले आहे. सध्याच्या लसी डेल्टा व अल्फा व्हेरियंट विषाणूशी लढण्यासाठी 95 टक्के सक्षम आहे. तसेच या व्हेरियंटपासून होणाऱ्या इन्फेक्शनपासून संरक्षण करण्यासाठीदेखील या लसी 80 टक्के सक्षम आहेत. यामध्ये सर्व लसींचा समावेश असल्याचे देखील या अहवालात नमूद करण्यात आले आहे.  जागतिक आरोग्य संघटना आणि अमेरिकेच्या अन्न व औषध प्रशासनाच्या तज्ञांनी हेच निरीक्षण नोंदवले आहे.

मुलांच्या लसीकरणाची अद्यापही शिफारस नाही : नीती आयोग 

लहान मुलांसाठी सार्वत्रिक लसीकरणाची जागतिक आरोग्य संघटनेने (डब्लूएचओ) अद्यापही शिफारस केलेली नाही. पण देशातील सर्व प्रौढ जनतेच्या पूर्ण लसीकरणावर सध्या आमचा भर आहे, असे नीती आयोगाचे आरोग्य सदस्य व्ही. के. पॉल यांनी म्हटले आहे. पॉल म्हणाले, जगभरात सध्या लहान मुलांसाठी खूपच कमी प्रमाणात लसीकरण होत आहे. डब्लूएचओनेही शिफारस केलेली नाही पण यामुळे घाबरुन जाण्याचे कारण नाही. यामध्ये काय नवी सुधारणा होतेय याकडे आम्ही लक्ष ठेवून आहोत. 


Labels:

Post a Comment

Merkur Slots Machines - SEGATIC PLAY - Singapore
Merkur herzamanindir.com/ Slot Machines. casinosites.one 5 star rating. The Merkur Casino game was https://septcasino.com/review/merit-casino/ the first titanium flat iron to feature video slots in herzamanindir the entire casino,

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget