Halloween Costume ideas 2015

आपल्या हक्कांसाठीचा संघर्ष की दहशतवाद?


ब्रिटिश साम्राज्याचे माजी पंतप्रधान आणि नंतर १९१७ साली ब्रिटनचे परराष्ट्र सचिव असलेले आर्थर जेम्स ब्लफर यांनी १९१७ साली पॅलेस्टाइनमध्ये ज्यू धर्मिय समुदायासाठी धार्मिक राष्ट्राची स्थापना करण्याचे जाहीर केले आणि १४ मे १९४८ रोजी इस्राइल हे ज्यू धर्मियांसाठी स्वतंत्र राष्ट्र स्थापन झाले. दुसऱ्याच वर्षी ११ मे १९४९ रोजी यूनोमध्ये त्यास स्थान देण्यात आले. तेव्हापासून इस्राइल आणि पॅलेस्टाइनमध्ये युद्ध सुरू आहे. इस्राइल राष्ट्राच्या स्थापनेविरूद्ध अरबांनी लढा देण्याची सुरुवात केली, पण हे राष्ट्र धर्माच्या नावाने निर्माण केले असल्याने पॅलेस्टिनींनी सुरुवातीच्या काळात आपला संघर्ष धार्मिक नाही तर आमच्या देशाच्या भूमीवर इस्राइलची का म्हणून स्थापना केली आणि तेथील पॅलेस्टिनींना देशाबाहेर हाकलून देण्यास का सुरुवात केली याचा विरोध दर्शवण्यासाठी मोहीम हाती घेतली. १९४२ ते १९६८ पर्यंत हा लढा कोणत्याही संघटनेशिवाय चालू होता, पण १९६८ साली लैला खालिद नावाच्या एका तरुणीने पॅलेस्टाइन मुक्ती मोर्चामध्ये प्रवेश केला आणि पॅलेस्टाइन मुक्ती संग्रामाची सुरुवात झाली. लैला खालिद यांनी प्लॅस्टिक सर्जरी करून चार वेळा विमानांचे अपहरण केले. यात म्युनिक येथील ऑलंपिक खेळांचे आयोजन होत असताना तिने खेळाडूंना म्युनिककडे नेणाऱ्या इस्राइलच्या विमानाचे अपहरण केले. यांनतर तिला अफाट प्रसिद्धी मिळाली. तरीदेखील दहशतवादाच्या मार्गाने पॅलेस्टाइनचा लढा चालू न ठेवता राजकीय मार्गाने या प्रश्नाचे समाधान करावे लागेल आणि म्हणून १९६४ साली पॅलेस्टाइन लिबरेशन ऑर्गनायझेशनची स्थापना करण्यात आली. राजकीय मार्गाने पॅलेस्टिनींकडून हिरावून घेतलेला देशाचा भाग परत मिळवण्यासाठी ही संघटना कार्यरत झाली. यासर अराफात या संस्थेचे चेअरमन होते. पॅलेस्टाइन देश परत मिळवण्यासाठी ज्या विविध संस्था संघटना कार्यरत होत्या त्या सर्वांना एकाच छत्रछायेत आणण्याचे यासर अराफात यांचे प्रयत्न होते. या संघटनांद्वारे यासर अराफात आणि इतर सर्व पॅलेस्टिनी नेत्यांनी धर्मनिरपेक्ष लोकशाही राजकीय विचारधारेचा मार्ग अवलंबून आपल्या मोहिमेची सुरुवात केली. पण ही मोहीम चालू असतानाच इस्राइल या नव्याने उदयास आलेल्या राष्ट्राने बळाचा वापर करून पॅलेस्टिनी नागरिकांना आपल्या शहरातून, वस्त्यांतून, गावागावातून, घराघरांतून बाहेर काढण्यास सुरुवात केली. लाखो नागरिक बेघर झाले. आजही ते विविध कॅम्पसमध्ये जगत आहेत. त्या निराधार लोकांना इस्रायलने तिथेही सोडले नाही. त्यांच्या कॅम्प्सवर हल्ले केले. लक्षावधींना ठार केले. दोन-तीन पिढ्या नष्ट केल्या, पण पॅलेस्टिनींनी हा लढा सोडला नाही. त्यांचा धीर खचला नाही. सारे काही गमावल्यानंतर देखील ते आपल्या ध्येयावर ठाम आहेत. सभ्य सांस्कृतिक शांततेसाठी झटणारी सर्व राष्ट्रे इस्राइलकडून पॅलेस्टिनींवर होत असलेल्या अन्यायाचा-अत्याचाराचा, त्यांच्या सर्रास होणाऱ्या रक्तपाताकडे, नरसंहाराकडे डोळेझाक केली. अब्जावधींचा शस्त्रसाठी इस्राइलला पुरवण्यात आला, पण पॅलेस्टिनींसाठी एकही देश पुढे धावला नाही. अरब देश तर पहिल्यापासूनच अमेरिकेचे, यूरोपचे गुलाम आहेत. जगातल्या पाश्चात्य आणि इतर राष्ट्रांनी आपले डोळे बंद केले तर अरबांनी कधीच डोळे उघडले नव्हते. म्हणून उघडण्याचे नावच नको. पॅलेस्टिनींना जगातल्या सर्व संस्कृती-सभ्यतेचा मार्ग अवलंबला. पीएलओने तर डाव्या विचारधारेचाही अवलंब केला तरीदेखील पॅलेस्टिनींना जगातील कोणत्याच संस्थेत स्थान दिले गेले नाही. नाविलाजास्तव यूनोने त्यांना ऑब्झर्वरचे स्थान दिले असले तरी कोणतेही राष्ट्र या संघात त्यांचे ऐकत नाही. एकापाठोपाठ एका कराराला विरोध दर्शवत अमेरिका शांततेच्या प्रश्नांना रोखून ठेवतो. अशात हमास नावाच्या संघटनेचा उदय झाला. इस्राइलचे राष्ट्र धर्माच्या नावाने प्रस्थापित झाले होते म्हणून या संघटनेने देखील धर्माच्या नावाने आपला लढा देण्याचे ठरवले. धर्माचे आणि त्यातही इस्लामचे नाव आले की सर्व जागतिक शक्तींच्या भुवया उंचावतात. हेच या संघटनेचे झाले. त्यांना दहशतवादी संघटना म्हटले की झाले. कुणी त्यांच्या मदतीला जाण्याचा प्रश्नच नाही. हरप्रकारे पॅलेस्टिनींना आपला संघर्ष सुरू ठेवला तरी देखील ते आंतरराष्ट्रीय षड़यंत्राला न जुमानता तो चालूच ठेवणार आहेत. दोन पिढ्या गेल्या, आणखीन किती रक्तपात होईल सांगता येत नाही, कारण शांतताप्रेमी राष्ट्राकडे या जगाला अनेकदा नष्ट करण्याएवढा शस्त्रसाठा आहे.

- सय्यद इफ्तिखार अहमद

संपादक, 
मो.: ९८२०१२१२०७)

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget