Halloween Costume ideas 2015

गरीबांसाठी ‘राहत’ देणारा अवलिया हरपला

शोधन ट्रस्ट व मायक्रोफायनान्सचे सचिव इंज़ि मो अशरफ शेख यांचे निधन

ashraf shaikh

आयीन-ए-जवां-मर्दा हक गोई वो बेबाकी

अल्लाह के बंदो को आती नहीं रूबाही

रीब गरजूंना सदैव साथ देणारे, त्यांना उभा राहण्यासाठी भक्कम व्यवस्था उभा करणारे आणि कोमल हृदयाचे अवलिया व्यक्तिमत्व शोधन ट्रस्टचे सचिव व जमाअते इस्लामी हिंद महाराष्ट्राच्या मायक्रो फायनान्स विभागाचे सचिव इंजि. मो. अशरफ शेख यांचे मंगळवारी सोलापूर येथे उपचारादरम्यान निधन  झाले.  ते गेल्या काही दिवसांपासून कोविडग्रस्त होते. त्यांच्या अकाली जाण्याने उस्मानाबादसह  समस्त जमाअते इस्लामी हिंद महाराष्ट्राच्या कॅडरची फार मोठी हानी झाली आहे  

ते नेहमी सांगत की कुठलेही काम करताना भविष्याचा विचार करून करावा आपले काम हे अल्लाहला राजी करण्यासाठी असावे ना की स्वत:च्या स्वार्थासाठी किंवा इतरांना खुश करण्यासाठी. आपल्या कार्यामुळे इतरांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला पाहिजे  मराठी वृत्तपत्र जगतात सा. शोधनचे एक वेगळेच स्थान आहे. शोधन ट्रस्टचे सचिव या नात्याने त्यांनी शोधनला प्रज्ञावंतांमध्ये लोकप्रिय करण्यासाठी भरपूर कष्ट घेतले. त्यांच्या या अकाली निधनाने शोधन परिवाराला मोठा धक्का बसला आहे.   इन्शाअल्लाह शोधनची टीम त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी भविष्यात सर्वोत्तम प्रयत्न करेल.

- (उर्वरित पान 7 वर)

अशरफ शेख हे सदैव गरीब आणि गरजू युवकांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी ठोस उपाययोजना करण्यासाठी प्रयत्नशील होते. हे कार्य नोकरी करत शक्य होणार नसल्याचे त्यांना वाटे. त्यामुळेच त्यांनी बांधकाम विभागातील स्थापत्य अभियंता या पदावरून 2010 मध्ये स्वेछानिवृत्ती घेतली. आणि जमाअते इस्लामी हिंदच्या माध्यमातून त्यांनी पूर्णवेळ सामाजिक कार्य करण्यास सुरूवात केली. उस्मानाबादेत शेख सजीयोद्दीन फसीयोद्दीन, शेख मुहम्मद साबेर, मुहम्मद हनीफ, मुस्तफा दस्तगीर खोंदे, शेख रियाज अ.गणी, सय्यद इजहारोद्दीन रिजवानोद्दीन, अ‍ॅड. कमरउज्जमा यांच्या सहकार्याने अशरफ शेख यांनी राहत नागरी सहकारी पतसंस्थेची उभारणी केली. आपल्या अथक परिश्रमातून त्यांनी राहतला नावलौकिक मिळवून दिला. या संस्थेला त्यांनी पोटच्या मुलासारखे जोपासले  या उपक्रमाला यश मिळाल्याने त्यांनी या इस्लामिक (बिनव्याजी) बँकींगचे रोपटे पूर्ण महाराष्ट्रात लावण्यास सुरूवात केली. 10 वर्षात तब्बल राज्यात 12 ठिकाणी अशा संस्थांची उभारणी केली. त्यांच्या या कार्याचा जमाअतच्या केंद्रीय समितीनेही गौरव केला  इंजि. अशरफ शेख यांचे ध्येय अख्ख्या महाराष्ट्रात बिनव्याजी बँकींगचे जाळे विणण्याचे होते. त्यांच्या कामाची दखल टाटा इन्स्टिट्यूटनेही घेतली  केंद्र सरकारने त्यांच्या इस्लामिक बँकींग संकल्पनेबद्दल त्यांचा गौरव केला. दुबईच्या अमीरनेही त्यांना सन्मानित केले. सऊदी अरबमध्येही त्यांचे इस्लामिक बँकिंगवर मार्गदर्शन झाले

आपली शासकीय नोकरी सोडून पूर्णवेळ समाजकार्यात वेळ घालविणारे हे अवलिया व्यक्तीमत्व सर्वांना हवेहवेसे वाटते. त्यांनी स्वतःला. जमाअतच्या कार्यात वाहून घेतले  त्यांचे व्यवस्थापन अतिशय उत्तम होते. त्यांना जमाअतने  मायक्रो फायनान्ससोबतच शोधन ट्रस्टच्या सचिवपदीही नियुक्ती केली. त्यांनी या दोन्ही जबाबदाऱ्या उत्तमरित्या सांभाळल्या. हाती घेतलेला प्रोजेक्ट यशस्वी कसा करून दाखवायचा, याचे जादुई कसब त्यांच्याकडे होते संयमी, मितभाषी, हसतमुख संवाद साधत प्रश्नांची सोडवणूक करण्याची त्यांची शैली वाखाण्याजोगी होती संस्थांच्या बैठकीत कोणीही नाराज होवू नये याची ते खबरदारी घेत सर्व प्रश्नांवर चर्चा घडवून आणत इंजि. अशरफ साहेबांचे व्यक्तीमत्व सदैव आठवणीत राहण्याजोगे आहे

आज ते अल्लाहदरबारी गेले अल्लाह त्यांची मग्फिरत करो आमीन  त्यांची नमाज-ए-जनाजा उस्मानाबाद येथे अदा करण्यात आली. त्यांच्या पश्चात पत्नी, भाऊ, एक मुलगा, मुलगी, सून, जावई, नातू असा परिवार आहे. त्यांच्या परिवारास अल्लाह रब्बुल इज्जत सब्र-ए-जमील अता करो. आमीन. 


शरफ शेख यांच्या जाण्याने जमाअते इस्लामी हिंद महाराष्ट्राची मोठी हानी : रिजवानुर्रहेमान खान

कोरोनामुळे अनपेक्षितपणे हादरून टाकणाऱ्या अनेक बातम्या येत आहेत. त्यातच मंगळवारी एक अत्यंत दुःखद बातमी आली की, शोधन ट्रस्टचे सचिव आणि इस्लामी मायक्रोफायनान्सचे विस्तृत जाळे विणणारे अशरफ शेख यांनी पण या जगाचा निरोप घेतला. 

अशरफ शेख यांच्या जाण्याने जमाअते इस्लामी महाराष्ट्राचीच हानी झालेली नसून समाज एका अशा व्यक्तीपासून वंचित झालेला आहे ज्याने सामाजिक आणि आर्थिक क्षेत्रात व्याजमुक्त मायक्रोफायनान्सिंगची मुहूर्तमेढ रोवली. त्यांच्या या प्रयत्नामुळे कित्येक गरजूंना बिनव्याजी अर्थसहाय्य मिळाले आणि त्यांची वेळेवर आर्थिक मदत झाली. साधारणपणे लोक व्याजमुक्त इस्लामी मायक्रोफायनान्सिंग व्यवस्थेला प्रत्यक्षात उतरविणे अशक्य समजतात. शेख अशरफ यांनी पहिल्यांदा उस्मानाबादमध्ये आपल्या व्यावसायिक कौशल्य, सचोटी, - (उर्वरित पान 7 वर)

आणि प्रामाणिकपणाच्या बळावर हे अशक्यप्राय काम शक्य करून दाखविले आणि पाहता-पाहता महाराष्ट्रातील 12 ठिकाणी या मायक्रोफायनान्सिंगचे जाळे विनले गेले. ज्याची देखरेख त्यांच्याकडेच होती. त्यांच्या प्रयत्नांमुळेच पतसंस्था यशस्वीपणे सुरू आहेत. 

मला चांगलं आठवतं पुणे विद्यापीठातील विदेशी संशोधनकर्त्यांना जेव्हा या प्रोजे्नटची माहिती झाली तेव्हा ते आश्चर्यचकित झाले आणि शेख अशरफ यांची भेट घेवून त्या संदर्भात बारीक-सारीक तपशील जाणून घेतला. आणि त्या प्रोजे्नटला त्यांनी आपल्या संशोधनाचा विषय बनविला. इस्लामी मायक्रोफायनान्सिंगचे काम हे अतिशय नजाकतीचे काम आहे. त्यात अनेक गुंतागुंती आहेत. अनेक अशक्यप्राय आव्हाने आहेत. पण शेख अशरफ यांनी मोठ्या हिमतीने या साऱ्या आव्हानांचा फक्त सामनाच केला नाही तर राज्यातील 12 ठिकाणी हे अशक्यप्राय प्रोजे्नट यशस्वीपणे राबवून दाखविले. जमाअते इस्लामी हिंद महाराष्ट्राला गेल्या काही वर्षांपासून केंद्रीय स्तरावर आणि सामाजिक स्तरावर ज्या मोर्चांवर यश प्राप्त झाले आहे त्यात इस्लामी मायक्रोफायनान्सिंग एक महत्त्वाचे क्षेत्र होते. 

शेख अशरफ त्या विशिष्ट लोकांमध्ये सामील होते ज्यांना जोरदार भाषणाची आणि दर्जेदार लेखन करण्याची कला अवगत नव्हती. त्यामुळे ते सामान्य लोकांमध्ये फारसे परिचित नव्हते. परंतु मायक्रोफायनान्सिंगच्या व्यवस्थेच्या माध्यमातून त्यांनी आपल्या गंभीर आणि ठोस प्रयत्नातून प्रत्यक्ष जमीनीवर जे चांगले परिणाम दाखवून दिले त्यामुळे मला असे म्हणावे वाटते की, प्रसिद्धी पासून दूर राहून सुद्धा लोकप्रिय लोकांपेक्षा जास्त पुण्य त्यांनी कमाविले आहे. अशरफ साहेब या दृष्टीकोणांनी खरोखरच ’अशरफ’ (श्रेष्ठ) होते.


Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget