Halloween Costume ideas 2015
April 2021

राजकारण-सत्ताकारणांचे काही नियम महाविकास आघाडीला शिकावे लागतील


महाराष्ट्रात सध्याचे सरकार स्थापन झाल्यानंतर एकामागे एक अरिष्ट या महाविकास आघाडीच्या सरकारवर कोसळत आहेत. उद्धव ठाकरे यांना राज्यकारभार चालवण्याचा अनुभव नसतांना त्यांनी हे सरकार दीड-वर्ष टिकवून ठेवलंय हे त्यांचे यश आहे. समोर विरोधी पक्ष काँग्रेस असता तर त्यांना इतका त्रास आणि वेदना सहन कराव्या लागल्या नसत्या; जसे आज त्यांना विरोधी पक्ष भाजपाकडून त्रास दिला जातो. सत्तेची धुरा सांभाळून 2-3 महिने उलटले नाहीत तोच त्यांना जागतिक कोरोना महामारीला तोंड द्यावे लागले. पण उद्धव ठाकरेंनी हिंमत, धैर्य आणि अप्रतिम कुशलतेने या परिस्थितीचा मुकाबला केला. कोरोनाची पहिली लाट खाली येत गेली तसतसे आता राज्यकारभाराचा इतर कामांचा आढावा घेण्याचे प्रयत्न करीत असतांनाच मंत्र्यांचे प्रेम-प्रकरण समोर आले. ती प्रकरणे राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्याची होती, अगोदर धनंजय मुंडे यांचा लिव्ह इन चव्हाट्यावर आला आणि नंतर दूसरे मंत्री राठोड यांचा उघडकीस आला. विरोधी पक्षाने त्यांचा राजीनामा मागितला नैतिकतेच्या कारणावरून. राज्य चालवताना नैतिकतेचे ही मापदंड पाळावी लागतात. हे ऐकूण चांगले वाटले. पण कोणत्या नैतिकतेची गोष्ट हे विरोधी पक्षाचे नेते करत होत होते हा भलामोठा प्रश्न आहे. राज्यातून सरकार गेल्यावर पुन्हा महाराष्ट्राची सत्ता हडप करण्यासाठी त्यांनी नैतिकतेबाहेर जावून जे प्रयत्न केले होते ते साऱ्या जगाने पाहिले आहे. त्यांनी स्वतःच नैतिकतेचे पालन केलेले नव्हते तर राज्यपालांनीही नैतिकतेचे काही धडे नव्हते. की ही नैतिकता थेट दिल्लीपासून थेट मुंबईत आली होती हे माहित नाही. कारण दिल्लीमध्ये एकापेक्षा एक नैतिकबाज दिग्गज बसलेले आहेत. जे दररोज चारित्र्य आणि नैतिकतेचे दर्शन जगभर करत आहेत. 

उत्तर प्रदेश, दिल्लीनंतर नैतिकतेचा गडकिल्लाच आहे. जेथे दररोज दर तासाला महिलांची अबु्र लुटली जाते, बलात्कार करून त्यांना सोडले जात नाही तर जीवनातूनच उठवले जाते. दिवसाढवळ्या हत्या केली जाते. पीडितेच्या नातलगांना, पित्याला कोर्टात जावू न देता मोटारीखाली चिरडून मारले जाते. याच नैतिकतेच्या आधारावर तिथले सत्ताप्रमुख राजीनामा देत नाही कारण राज्यशासन चालवण्यासाठी  नैतिकतेचा बळी दिला जातो. हे शासनकर्त्यांचे आद्य कर्तव्य आहे. 

दिल्लीतर नैतिकतेचा अंतरराष्ट्रीय अड्डा आहे. इथे सत्तारूढ असलेल्यांना रोज कितीतरी नैतिकतांशी सामना करून त्यांना संपवाव लागत आहे. यासाठी किती कष्ट घ्यावे लागत असतील? राष्ट्रप्रमुख स्वतः आपल्या मित्रांना बरोबर घेऊन आंतरराष्ट्रीय बाजारात हिंडत आहेत. त्या मित्रांना या ना त्या सौद्यामध्ये खंडणी मिळवून देण्याची सोय त्यांना करावी लागते. कोणत्या सौद्यात भ्रष्टाचार झाल्याच्या बातम्या आल्या तर त्यांना असे वाटते आपण किती पराक्रम केले. या व्यवस्थेने देशाची अब्रूच लुटली नाही तर उत्तर प्रदेशाच्या पीडितांसारखे त्यांचा खात्मा करून टाकला.

एका मागून एक राज्य जिंकण्यासाठी याच नैतिकतेचा आधार घेऊन लोकशाहीचा बळी दिला जात आहे. लोकांची मते कधी काळी पैसे आणि शक्तीचा वापर करून लुटली जायची. आता नवीन तंत्रज्ञान विकसित झाले असून त्याचा वापर करून नागरिकांची मते लुटली जातात आणि लोकशाही एखाद्या कोपऱ्यात निःशब्द होउन बघत असते. तिच्या मदतीला धावून येणारे राष्ट्रद्रोही ठरतात. लोकशाही अधिकारांबरोबरच लोकशाही समवेत त्या लोकांना कैद करून जेलमध्ये बसवले जाते. आपल्या यशावर हे चोरटे आनंदचा जल्लोष साजरा करतात. जगाला दाखवून देतात पाहा आम्ही शेवटी लोकशाहीद्वारेच म्हणजे त्या लोकशाहीला बंदिस्त करून कशा निवडणुका जिंकल्या. महाराष्ट्राच्या आणखी एका मंत्र्याने नैतिकतेच्या आधारावर राजीनामा दिला. त्यांना या नैतिकतेचा कसा वापर करावा हेच माहित नसेल म्हणून त्यांना राजीनामा द्यावा लागला. त्यांना प्रशिक्षणासाठी जर विरोधी पक्षांमध्ये पाठवून देण्यात आले असता तर त्यांनाही या नैतिकतेचा आधार घेवून मंत्रीपदाचे वैभव लुटले असते. त्यांच्यावर रस्त्यावर येण्याची पाळी आली नसती. राजकारण आणि सत्ताकारण या खेळाचे काही नियम असतात ते अबाधित ठेवायचे असतील तर काही नियमांचे पालन करावे लागते. हे सध्याच्या सरकारला माहित नसेल. त्यांनी विपक्षाकडून याचे धडे घेतले पाहिजे. मुंबईपासून दिल्लीपर्यंत आणि थेट उत्तर प्रदेशात जावून प्रशिक्षण घेऊन परत यावे लागेल तरच त्यांचे सरकार टिकेल नाहीतर आणखीन किती मंत्र्यांना नैतिकतेच्या आधारावर राजीनामे द्यावे लागतील माहित नाही. उद्धव ठाकरेंवर अशी पाळी येवू नये. बस्स. ’’लोकांसाठी सुलभता उत्पन्न करा. त्यांना अडचणीत टाकू नका. त्यांना चांगली बातमी द्या. त्यांच्याशी घृणा करू नका.’’           (हदीस : बुखारी : 6124)

रतीय मुस्लिमांचे दुर्भाग्य असे की, मूलनिवासी असूनही केवळ आस्था वेगळी आहे म्हणून त्यांच्याशी अनेक ठिकाणी सातत्याने भेदभाव केला जातो. त्यांच्या समस्या त्यांच्याच समजल्या जातात, त्या राष्ट्रीय समस्या मानल्या जात नाहीत, म्हणूनच पात्र असूनही त्यांना आरक्षण मिळत नाही, आरक्षण मिळत नाही म्हणून चांगले शिक्षण मिळत नाही, चांगले शिक्षण मिळत नाही म्हणून चांगले रोजगार मिळत नाहीत, चांगले रोजगार मिळत नाही म्हणून गरीबी दूर होत नाही, अशा या विश्शसर्कलमध्ये हा समाज अकडलेला आहे. 20 कोटी पेक्षा अधिक असूनही दयनीय जीवन जगत आहे. कमी शिक्षणामुळे त्यांच्यात एवढी समज वृद्धींगत झालेली नाही की सामाजिक अभियांत्रिकीचा वापर करून ते स्वतःची स्थिती सुधारू शकतील. 

सामाजिक अभियांत्रिकी म्हणजे काय?

प्रसिद्ध ब्रिटिश समाजशास्त्री कार्ल पॉप्पर याने 1994 मध्ये टप्प्याटप्प्याने केल्या जाणाऱ्या सामाजिक अभियांत्रिकीची संकल्पना मांडली. या अभियांत्रिकीचा उपयोग करून समाज सुधार करता येतो असा सिद्धांत त्यांनी मांडला. त्यांच्या सिद्धांताचा मूल गाभा असा की, कोणत्याही समाजामध्ये अनेक समस्या असतात. त्या सर्व समस्या एकदाच सोडविता येत नाहीत. म्हणून त्यांचा प्राधान्यक्रम निश्चित करून त्या टप्प्याटप्प्याने सोडविण्याचा प्रयत्न केल्यास त्या सहज सुटू शकतात. त्यासाठी आपल्याकडे असलेली साधनसामुग्री आणि तज्ञ कामगार यांची सांगड घालून सामाजिक समस्यांचे निराकरण केले जावू शकते. 

भारतीय मुस्लिमांच्या समस्या

‘‘हालात की सख्तीयों को मुसलमान फितरत का इशारा समझें, उसे एक ताबनाम मुस्तकबिल की बशारत समझें.’’    - सय्यद सादतुल्लाह हुसैनी. 

जसे की वर नमूद करण्यात आलेले आहे कमी शिक्षणामुळे मुस्लिम समाजामध्ये सामाजिक अभियांत्रिकीचा प्रयोग करण्याची जाणीव निर्माण झालेली नाही. ते अजूनही असे समजतात की त्यांच्या समस्या सोडविण्याची जबाबदारी सरकारची आहे. स्वातंत्र्याच्या 73 वर्षानंतरसुद्धा त्यांच्या लक्षात आलेले नाही की सर्वपक्षीय सरकारे ही शेतकरी आणि मुस्लिम या दोन समाज घटकांच्या समस्या सोडवू इच्छित नाहीत. न पेक्षा शरद पवार सारखा शेतकरी नेता अखंडपणे सत्तेत असतांनासुद्धा महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या समस्या जसच्या तशा राहत्या ना.

शेतकरी आणि मुस्लिम हे कायम अशिक्षित आणि गरीब राहण्यामध्येच भारतीय राजकीय पक्षांचे हित आहे. म्हणून हे दोन्ही घटक कायम गरीबीत राहत आलेले आहेत. सरकारकडून आपल्या समस्या सुटतील याच आशेमुळे आज शेतकरी दोन महिन्यापेक्षा जास्त कालावधी लोटूनही दिल्लीच्या सीमेजवळ आंदोलन करीत आहेत व गावोगावी मुस्लिम तरूणांची शिष्टमंडळे आपल्या निवेदनांच्या सुरळ्या घेऊन तहसील तहसील फिरत आहेत. अनेक वर्षांपासून सातत्याने आंदोलन करून आणि निवेदन देऊनही आपले काम न होण्यामागचे व विशिष्ट समाज घटकांचे कुठलेही निवेदन न देता काम होण्यामागचे मूळ कारण काय आहे? हे अर्धशिक्षित असल्यामुळे शेतकरी आणि मुस्लिमांच्या लक्षातच येत नाही. 

जनसमुहाचे प्रकार 

जगात अनेक जनसमूह आहेत. त्यांची वर्गवारी साधारणपणे तीन प्रकारात केली जाऊ शकते. एक उपजत शहाणी दूसरी परिस्थितीच्या रेट्यामुळे झालेली शहाणी आणि तीसरी अडाणी. उपजत शहाणा समूह म्हणून आपण ज्यू लोकांकडे पाहू शकतो. हजारो वर्षांपासून हजारो संकटांना तोंड देत या लोकांनी ज्या धैर्य, कौशल्य व समजूतदारपणे फक्त स्वतःचे अस्तित्व टिकविण्यामध्येच यश मिळविले नाही तर इस्त्राईल हस्तगत करून त्याचे एका शक्तीशाली राष्ट्रात रूपांतर करण्यात यश मिळविले आहे. त्यांच्या या शहाणपणाला दाद द्यावी तेवढीच कमी आहे.

परिस्थितीच्या रेट्यामुळे शहाणा झालेला जनसमूह म्हणून आपण जपानी समाजाचे उदाहरण घेऊ शकतो. 6 आणि 9 ऑगस्ट 1945 रोजी अमेरिकेने जपानच्या हिरोशीमा आणि नागासकी या दोन शहरावर अणुहल्ला केला. हे जरी सर्व विधित असले तरी फार कमी लोकांना या गोष्टीची माहिती आहे की, अणुहल्ला करण्यापूर्वी अमेरिकेने जपानच्या प्रत्येक शहरावर बॉम्बहल्ले करून जवळ-जवळ सर्व जपानी शहरांना उध्वस्त करून टाकले होते. हिरोशीमामध्ये 90 हजार तर नागासाकीमध्ये 70 हजार लोक पहिल्याच दिवशी मरण पावले होते. अणुबॉम्बमुळे रेडिएशन पसरले होते. व्यावसायिक जहाजे 81 टक्के तर औद्योगिक यंत्रसामुग्री 34 टक्के नष्ट झाली होती. नागरी भागातील 33 टक्के इमारती तर 25 टक्के मुलभूत सुविधा उध्वस्त झाल्या होत्या. टेलिफोन, टेलिग्राफ पूर्ण उध्वस्त झाले होते. पाणीपुरवठा 16 टक्के उध्वस्त झाला होता. वीजपुरवठा 18 टक्के, रेल्वे आणि रस्ते वाहतूक 10 टक्के नष्ट झाली होती. 

 एका अर्थाने संपूर्ण जपानचे कंबरडे मोडले होते. अशा बिकट परिस्थितीत जपानची जिद्दी जनता आणि नेत्यांनी मिळून सोशल इंजिनिअरिंग अर्थात सामाजिक अभियांत्रिकीचा उपयोग करत शिल्लक राहिलेल्या साधन सामुग्री व कुशल कामगारांच्या मदतीने पहिल्या टप्प्यात कोळसा निर्मितीचे अशक्यप्राय असणारे ध्येय गाठण्याचा निर्णय केला. या निर्णयाला प्रेऑरिटी प्रोड्नशन सिस्टम 1947-48 असे नाव देण्यात आले. त्या काळात उर्जेचे एकमेव स्त्रोत म्हणून कोळश्याकडे पाहिले जात होते. उध्वस्त झालेल्या जपानला उर्जेची अत्यंत गरज होती. म्हणून त्यांनी प्राधान्य क्रमांकाने कोळसा निर्मितीवर फोकस करून जापानला पुन्हा उभा करण्यासाठी जेवढ्या कोळशाची गरज होती तेवढा उत्पादित केला आणि त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात त्या कोळश्यापासून त्यांनी उर्जा निर्माण करून दुसरे उध्वस्त झालेले से्नटर पुन्हा उभे केले. 

मुस्लिमांच्या समस्या 

तुफान में ताशका घर नहीं बनता, 

रोने से बिगडा मुकद्दर नहीं बनता

दुनिया को जीतने का हौंसला रख्खो

एक हार से कोई फकीर, 

एक जीत से कोई सिकंदर नहीं बनता. 

तीसऱ्या वर्गवारीतील अडाणी समाज म्हणून मुस्लिम समाजाचा उल्लेख खेदाने करावा लागेल. भारतीय मुस्लिमांसमोर अनेक विक्राळ समस्या उभ्या आहेत. त्यातील काही प्रमुख समस्या खालीलप्रमाणे. 

1- गरीबी 2 - बेरोजगारी 3- व्यावसायिक शिक्षणाचा अभाव 4 - महागडी लग्नं 5- व्यसनाधिनता 6- शिवीगाळ 7- कुरआनशी तुटलेला संपर्क. 8- इबादतींपासूनची गफलत 9- मोबाईल अ‍ॅड्निशन 10. अप्रामाणिकपणा 11. टि.व्ही.चा दुरूपयोग 12. जातीय दंगली 13. युएपीएचा दुरूपयोग 14. तरूण-तरूणींमधील होत असलेल्या चारित्र्याचा ऱ्हास. 15. प्रेषित मुहम्मद सल्ल. यांच्या जीवन चरित्राचा अभ्यास नसणे. 

या समस्यांच्या यादीमध्ये वाचक आपल्या अनुभवातून अधिक भर घालू शकतात आणि ही यादी वर दिलेल्या यादीपेक्षाही मोठी होऊ शकेल. या यादीमधील एकही समस्या अशी नाही जी जाणीवपूर्वक सामाजिक अभियांत्रिकीचा वापर करून दूर करता येणार नाही. वाचकांना माझे हे म्हणणे अतिशोक्तीपूर्ण वाटू शकेल. परंतु सत्य हेच आहे की, सामाजिक अभियांत्रिकीच्या माध्यमातून वरील सर्व समस्या अगदी जातीय दंगली आणि युएपीएचा दुरूपयोगासह सोडविता येवू शकतात, ते कसे? याचा संक्षिप्त आढावा खालीलप्रमाणे -

कुरआन आणि प्रेषित मुहम्मद सल्ल. यांच्या जीवन चरित्राचा जाणीवपूर्वक अभ्यास केल्यास वरील समस्या कशा सोडवाव्यात याचे उत्तम मार्गदर्शन आपल्याला मिळू शकेल. हे केवळ माझे मत नसून हज्जतुल विदाच्या वेळेस स्वतः प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनी फरमाविले होते की,’’ हे लोकहो ! मी तुमच्यामध्ये दोन गोष्टी सोडून जात आहे 1. कुरआन 2. माझी जीवन पद्धत. तुम्ही या दोन गोष्टींशी एकनिष्ठ राहिलात तर कधीच अयशस्वी होणार नाहीत.’’ आपण आपल्या समाजावर एक ओझरता दृष्टीक्षेप टाकला तरी वाचकांच्या लक्षात येईल की या दोन्ही गोष्टी संकल्पना म्हणून जरी आपल्याला मान्य असल्या तरी प्रत्यक्षात त्या आपल्यापैकी बहुतेकांच्या जीवनात नाहीत. म्हणून आपल्या समोर या समस्या उभ्या आहेत. 

अन्सार-मुहाजिर बंधुभाव योजना 

जाया करो गरीबों के बस्ती में भी कभी

कुछ भी नहीं तो शुक्रे खुदा सीख जाओगे.

उदाहरणादाखल भारतीय मुस्लिमांची गरीबीची समस्या पाहूया. ही समस्या आपल्यापेक्षा तीव्र स्वरूपात मुहाजिर मुस्लिमांसमोर तेव्हा उभी टाकली होती जेव्हा ते मक्का येथील आपली सर्व संपत्ती सोडून अंगावरील कपड्यानिशी मदीना येथे हिजरत करून गेले होते. तेव्हा प्रेषित मुहम्मद सल्ल. यांंनी जे केले होते ते जर आज आपण केले तर आपली ही गरीबी दूर होऊ शकते. मदीना मॉडेलचा अभ्यास केल्यास त्यामध्ये ’अन्सार-मुहाजिर बंधुभाव योजना’ ही अभिनव संकल्पना आपल्याला दिसून येईल. या योजनेप्रमाणे मदीना येथील स्थानिक अन्सार मधील एका व्यक्तीस मुहाजिरांपैकी एका व्यक्तीचा भाऊ म्हणून त्यांनी जोडी लावून दिली होती. ही जोडी सख्या भावासारखी जोडी मानली गेली. जेव्हा या सर्व जोड्या लावून झाल्या तेव्हा अन्सार यांनी आपल्या मुहाजिर बंधूंची जी मदत केली त्याला मानवी इतिहासात तोड नाही. अन्सार यांनी आपल्या सर्व संपत्तीचे दोन समान भाग केले. एक भाग स्वतःकडे ठेवला तर दूसरा भाग आपल्या मुहाजिर बंधूला देऊ केला. हद्द तर तेव्हा झाली जेव्हा अनेक अन्सारींनी आपल्याकडे असलेल्या दोन पत्नींपैकी एका पत्नीला तलाक देवून आपल्या मुहाजिर भावासाठी तिचा पत्नी म्हणून स्विकार करण्याची विनंती केली. 

गरीबी आणि महागडी लग्नं ह्या प्रमुख समस्या असल्यामुळे पहिल्या टप्प्यात या दोन समस्या सामाजिक अभियांत्रिकीचा वापर करून कशा सोडविता येतील हे आता आपण पाहूया. आज भारतामध्ये जेवढे सधन मुस्लिम आहेत, त्यांनी आपल्याच शेजारी असलेल्या किमान दोन गरीब मुस्लिमांना आपले भाऊ म्हणून स्विकारले आणि आपल्या साधन सामुग्रीतून त्यांची अन्सारींसारखी मदत केली तर बघता-बघता मुस्लिम समाजामधून गरीबी निर्मुलन झाल्याशिवाय राहणार नाही. परंतु हे करण्यासाठी प्रेषित सल्ल. यांचे जीवनचरित्र अत्यंत गंभीर आणि प्रामाणिकपणे वाचून त्यातून प्रेरणा घ्यावी लागेल. शिवाय दरवर्षी प्रत्येक सधन मुस्लिम आपल्या बचतीचा अडीच टक्के भाग जकात म्हणून प्रामाणिकपणे काढू लागला तर गरीबी उन्मूलनाचे ध्येय आणखीन लवकर गाठता येईल. 

महागडी लग्नं ही एक अशी समस्या आहे जी केवळ बहुसंख्य समाजात वर्षानुवर्षे राहत असल्यामुळे नकळत त्यांच्या परंपरेतून आपल्याकडे आलेली आहे, अन्यथा इस्लाममध्ये महागडी लग्नं आणि हुंडा यांना काही स्थानच नाही. उलट मुलीला नगदी महेर अदा करण्याची सक्ती लग्नं करू इच्छिणाऱ्या मुलावर शरीयतने केलेली आहे. 

या दोन समस्या व्यतिरिक्त वर नमूद सर्व समस्यांचा आढावा घेता येईल परंतु विस्तारभयामुळे या ठिकाणी एकच विनंती करून थांबतो की प्रत्येक संवेदनशील मुस्लिमाने कुरआन आणि हदीसमध्ये आपल्या समस्यांचे उत्तर शोधावे. ते त्यांना नक्कीच मिळेल. त्यामुळे त्यांच्या समस्या तर दूर होतीलच परंतु बहुसंख्य बांधवांमधील अनेक समस्यासुद्धा आपण सामाजिक अभियांत्रिकीचा वापर करून सोडविण्यामध्ये सक्षम राहू व या देशाची सेवा करू शकू, याबद्दल किमान माझ्या मनात तरी शंका नाही. अट एकच !  कुरआन आणि प्रेषित सल्ल. यांच्या जीवन चरित्राचा बारकाईने अभ्यास. आणि हे न केल्यास आज जी दारून परिस्थिती आहे ती पुढेही चालू राहील, किंबहुना अधिक बिकट होत जाईल हे प्रत्येकाने लक्षात ठेवावे. 

यासंदर्भात मौलाना सद्रुद्दीन इस्लाही यांनी काय म्हटले, ते नमूद करून थांबतो. 

’’किसी भी समाज में कोई भी बुराई एकदम से विकराल रूप नहीं ले लेती. जब वो शुरू होती है तो छोटे आकार में होती है. अगर समाज में सालेह (अच्छे) लोग ज़्यादा हों और वो बुराई के ख़िलाफ उठ खडे हों तो वो वहीं दब जाती है. मगर अच्छे लोग कम हों और वो भी सिर्फ रस्मी तौर पर बुराई की मुख़ालिफत (विरोध) करने को काफी समझें तो फिर वो बुराई तेज़ी से फैलती है.

     ये एक नफ्सियाती (मानसिकता) अमल है. समाज में बुराइयों का फैलाव हमेशा इसी तरह होता है. फिर जो उसके विरोधक हैं उनकी नस्लें भी उनकी आंखों के सामने उसी बुराई में डूब जाती हैं और वो कुछ कर नही पाते. लिहाजा कोई करें न करें मुसलमानों को हर बुराई का विरोध पुरे शऊर और ताक़त के साथ करना चाहिए. क्यूँ के ये उनका फर्जे मनसबी (कर्तव्य) है.’’ (मौलाना सद्दरूद्दिन इस्लाही -फरिजा-ए-अकामत-ए-दीन).


- एम. आय. शेख


world health day

टू व्हिलर असो की फोर व्हिलर बाहेर जाताना जेव्हा आपण आपली गाडी काढतो तेव्हा सगळं तपासलं जातं. टायरमधली हवा, पेट्रोल, डिझेलचे प्रमाण इत्यादी का तर प्रवासात काही अडथळा येवू नये व प्रवास सुरळीत व्हावा म्हणून. परंतु , जीवनाच्या प्रवासात साथ देणाऱ्या शरीररूपी गाडीकडे आपला हलगर्जीपणा का?

आपण आपल्या जीवनात महत्त्वाच्या गोष्टींचे नियोजन करत असतो. जीवनाच्या विविध टप्प्यांमध्ये विविध प्रकारच्या चिंतेनेग्रस्त असतो. लहानमुलांना शाळेच्या अभ्यासाची चिंता, कॉलेजमध्ये गेले की करिअरची चिंता, मग जॉब, बिझनेसची चिंता, नंतर लग्नाची चिंता, लग्न झाल्यास मुला-बाळांची चिंता पुढे त्यांचे, शिक्षण, पालनपोषणाची चिंता. वगैरे या सर्व गोष्टींची चिंता पूर्वनियोजन करण्यात राहून जाते. ती म्हणजे आपल्या आरोग्याची चिंता, आरोग्याचे नियोजन.

चांगले शरीर असे पर्यंत आपण आरोग्याची चिंता करत नाही किंवा आपल्याला काही काळजी वाटत नाही. खूप कमी लोक आपल्या शरीराची निरोगी असताना काळजी घेत असतात. किंबहुना अधिक लोक तर दुर्लक्षच करतात. काही नागरिक इन्शुरन्स (विमा) काढून ठेवतात आणि मोकळे होतात. व्यायाम, वॉकिंग, वर्क आऊटला सुरूवात होते ती रोग जडल्यानंतर. स्थुलता वाढल्यानंतर. वजन खूप वाढल्यानंतरच शुगर, बीपी, हार्टअटॅक आल्यानंतरच. तोपर्यंत शरीरला इजा झालेली असते. 

निरोगी असतानाच जर काय आपण आपल्या शरीराची काळजी घेतली, तर रोग होण्याची शक्यता कमी असते. मला बघून व ऐकून खूप आनंद होतो. जेव्हा साठी पार केलेले माणे पेशंटस सांगतात की त्यांना शुगर, बी.पी., अ‍ॅस्टिडीटी सांध्यांचे आजार इ. काहीच नाही तेव्हा मी हमखास त्यांना त्यांच्या आरोग्याचे राज विचारते आणि नेहमी संतुलीत आहार व नियमित व्यायाम या दोन गोष्टी आढळतात. 

रोग म्हणजे काय आणि आरोग्य कसे जपावे याबद्दल काही माहिती. 

रोग : 

रोग म्हणजे शरीर क्रियात्मक किंवा मानसशास्त्रीयरित्या शरीराच्या महत्त्वाच्या जैविक कार्यांमध्ये अडथळा आणणारी स्थिती होय. शरीरक्रियात्मक म्हणजे शरीराच्या कार्यामध्ये बिगाड होणे. 

उदा. पचनक्रियेत, रक्ताभिसरण संस्थेत, किडनीच्या क्रियेत वगैरे बिघाड होणे. आंतरे इंद्रीयात बिघाड होते. मानसशास्त्रीयरित्या म्हणजे मेंदूच्या कार्यात बिघाड व मनाचा समतोल ढासळणे. आरोग्य म्हणजे नुसतं शारीरिकपणे चांगले असणेच नव्हे तर आरोग्य म्हणजे शारीरिक, मानसिक व सामाजिक संतुलनाची स्थिती होय. जी व्यक्ती आपली सामाजिक भूमिका सुव्यवस्थितपणे पार पाडण्यासाठी शारीरिक, मानसीकदृष्ट्या सक्षम असते ती आरोग्य संपन्न मानली जाते. आरोग्य हीच खरी संपत्ती. हेल्थ इज वेल्थ. हा सुविचार आपल्याला माहित असणार. आरोग्याला संपत्ती का म्हटले आहे? आरोग्य उत्तम असले तरच माणूस कार्यक्षम. दैनंदीन काम करून संपत्ती मिळवू शकतो. 

आरोग्य चांगले तर आयुष्य सहज आणि सोपे होते. वेळेवर भूक लागते, झोप येते, ताजेतवाने वाटते. याउलट रोगीट माणसाला भूक लागत नाही. झोप येत नाही, चिडचिडपणा होतो, कामात रस राहत नाही. साथीच्या रोगांत ताप, अंग दुखणे, मळमळ, उलट्या, डोकं दुखणे, सारखं पडून राहणे अशी लक्षण असतात. 

कालावधीनुसार रोगांचे दोन प्रकार असतात. 

1. तीव्र रोग (अ‍ॅक्युट डिसीज) 3 दिवस ते आठवड्यामध्ये बरे होणारे रोग. उदा. फ्लू, व्हायरल फिव्हर.

2. दीर्घकालीन रोग (क्रॉनिक डिसीज) - अस्थमा (दमा), किडनी फेल्यूर, पाईल्स इत्यादी. कारणांनुसार : 1. आनुवंशिक रोग उदा. डाऊन संलक्षण. 

2. संसर्गजन्य रोग : (पसरणारे रोग) : उदा. सर्दी, वायरसमुळे होणारे आजार (कांजण्या, डोळे येणे, गोवर, कोरोना, टी.बी. डेंग्यू इत्यादी.).

3. असंसर्गजन्य (न पसरणारे रोग) : उदा. मधुमेह, हृदयविकार, केसर इत्यादी काही विशिष्ट कारणांमुळे शरीरातच उद्भवतात व या रोगांपासून इतर व्यक्तींना काही धोका नसतो. 

निरोगी राहण्यासाठी काही उपाय : 

1. स्वच्छतेची काळजी घेणे, घर, परिसर स्वच्छ ठेवणे. 

2. जेवण्याअगोदर, नंतर, वॉशरूमला जावून आल्यास व बाहेरून आल्यास हात साबणाने धुणे.   3. स्वच्छ पाण्याचा वापर करणे, पाणी उकळून थंड करून पिणे, टायफॉईड, कॉलेरा, अतिसार सारखे आजार दुषित पाणी पिल्यानेच होतात. एकदा जर टाईफॉईड झाला तर पुन्हा-पुन्हा होण्याची शक्यता असते. जेव्हा आपली रोगप्रतिकार शक्ती कमी पडत असते, पाणी उकळून पिणे हेच त्यावर योग्य उपाय. 

4. भरपूर पाणी पिणे, दिवसांतून 8-10 ग्लास, कमी पाणी पिल्याने किडनी निकामी होऊ शकतात. 

5. पौष्टिक आहाराचे सेवन करणं अत्यंत आवश्यक आहे. 

6. जास्त मीठ असणारे पदार्थ कमी प्रमाणात घ्या. 

7. जास्त साखर असणारे पदार्थ ही कमी प्रमाणात घेणे. 

8. जंक फूड : उदा. वडापाव, पिझ्झा, बर्गर टाळणे.

9. गरजेपेक्षा जास्त खाणे टाळा.

10. जेवणात प्रोटिनयुक्त पदार्थांचा समावेश करा. 

11. दररोज व्यायाम करणे व शांत झोप.

जगभरात 7 एप्रिल हा ’’जागतिक आरोग्य दिवस’’ म्हणून साजरा केला जातो.  73 वर्षापूर्वी याच दिवशी 7 एप्रिल 1948 रोजी ’जागतिक आरोग्य संघटना म्हणजे (वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, (डब्ल्यूएचओ)’ या संघटनेची स्थापना  झाली होती. जिनेव्हा स्वित्झरलँड येथे 7 एप्रिल 1948 रोजी जागतिक आरोग्य संमेलन झाले. त्यात मानवासमोर असणारी आरोग्य समस्या सर्वांनी एकत्र येवून सोडविणे यावर एकमत झाले. विभिन्न वंशाच्या समस्या वेगळ्या अस वाटत असलं तरी सारे मानव एक या न्यायाने आरोग्य समस्या आणि त्यावर उपाय हे साधारणपणे समान आहेत. त्यानंतर 7 एप्रिल 1950 पासून जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शनात आरोग्य दिवस साजरा करण्यास सुरूवात झाली. 

गेल्या सात दशकांत सार्वजनिक आरोग्याच्या क्षेत्रातील सुधारणांमध्ये डब्ल्यूएचचाही वाटा आहे. कुठल्याही नव्या आजाराची माहिती मिळवणं आणि ती लोकापर्यंत पोहोचविणं, आजारांच्या साथी पसरत असतील तर त्या विषयी देशांना सावध करणे. जवळपास 193 देश याचे सदस्य आहेत. त्यात आपल्या भारताचाही समावेश आहे. लस आणि उपचारांविषयी संशोधन आरोग्यासाठी निधी जमा करणे आणि ती गरज असेल तेथे पोहोचवणं अशी   कामं ही संघटना करते. 

डब्ल्यूएचओ च्या प्रयत्नांमुळे स्मॉलपॉक्स (देवीरोग) रोगाचे उच्चाटन (इराडिकेशन), पोलिओसारख्या रोगांवर नियंत्रण शक्य झाले. सध्या जगभरात कोरोनाने हाहाकार उडवला आहे. त्यासाठी जागतिक आरोग्य संघटना यावर काम करीत आहे. जेव्हा अशा प्रकारचे आजार संपूर्ण जगभरात पसरतात तेव्हा जागतिक आरोग्य संघटना महत्त्वाची भूमिका बजावत असते. मागच्या वर्षी सपोर्ट नर्सेस आणि मिडवाईव्हस अशी थीम होती. कारण कोरोनाग्रस्तांच्या सेवेसाठी डॉक्टर्स, वैद्यकीय कर्मचारी जीवाची बाजी लावत आहेत. यंदा गरीब लोकांनाही आरोग्य सेवा चांगल्या मिळावेत म्हणून बिल्डींग ए फेअर हेल्दी वर्ल्ड ही थीम देण्यात आली आहे.  भारत सरकार तर्फे आयुष्यमान भारत हा उपक्रम चालविण्यात येतो. 

- डॉ. सीमीन शहापूरे 

8788327935

 मुस्लिम जगताचा चमकता तारा निखळला


ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे महासचिव मौलाना वली रहेमानी यांचे 3 एप्रिल रोजी निधन झाले. ते मागच्या काही काळापासून आजारी होते. पाटण्याच्या पारस रूग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांच्या निधनाने मुस्लिम जगतामध्ये शोकाकुल वातावरण निर्माण झाले. 

मौलानांचा जन्म 5 जून 1943 साली मुंगेर बिहार येथे झाला होता. ते पाटण्याच्या गर्दनीबागमध्ये राहत होते. 2015 ते अंतिम श्वास घेईपर्यंत ते इमारते शरियाचे प्रमुख होते. त्यांनी शेकडो खाजगी संस्था, मदरसे सुरू केले होते. ते 1974 ते 1996 या कालावधीमध्ये बिहार विधान परिषदेचे सदस्यही होते. 1972 मध्ये ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाच्या स्थापनेमध्ये त्यांनी महत्वाची भूमिका वठविली होती. ते ऑल इंडिया मजलिसे मुशावरातचे उपाध्यक्षही होते. त्यांचे सर्वात उल्लेखनिय कार्य म्हणजे रहेमानी फाऊंडेशनची स्थापना होय. 2009 साली त्यांनी याची स्थापना केली. यात ते दरवर्षी होतकरू 30 मुस्लिम विद्यार्थ्यांची निवड करून त्यांची आयआयटी, जेईई आणि नीटची मोफत तयारी करून घेत. त्यासाठी त्यांनी मुलभूत सुविधा उपलब्ध करून दिलेल्या होत्या. याशिवाय, ते अनेक शैक्षणिक आणि सामाजिक संस्थांशी संबंधित होते. उर्दू दैनिक ’इसर’चे प्रकाशन आणि सा. नकीब ची स्थापना करून आपल्यातील पत्रकारितेची चुनूकही देशाला दाखवून दिली होती. 1976 मध्ये त्यांनी औकाफच्या संपत्तीच्या संरक्षणासाठी राज्य व्नफ कायद्यामध्ये 21 वे संशोधन पास करून घेतले होते. बिहारमध्ये उर्दू भाषेला दुसऱ्या शासकीय भाषेचा दर्जाही त्यांनी मिळवून दिला होता. शिक्षण क्षेत्र हे त्यांचे आवडते क्षेत्र होते. मुस्लिम समाजामध्ये शिक्षणाचा प्रसार आणि प्रसार व्हावा यासाठी त्यांनी भरपूर मेहनत घेतली. मुस्लिम महिलांच्या शिक्षणाचे ते समर्थक होते. म्हणूनच त्यांनी रहमानी बी.एड. कॉलेजची स्थापना केली. जेथून शिक्षण घेवून शेकडो महिला देशाच्या वेगवेगळ्या शाळा आणि महाविद्यालयामध्ये शिक्षणाचे कार्य करू शकल्या. ते धार्मिक शिक्षणाबरोबरच समकालीन शिक्षणावरही भर देत होते. त्यांनी भारत सरकारच्या मदरसा आधुनिकीकरण समितीचे अध्यक्ष म्हणूनही काम केले. 

सार्वजनिक आरोग्यामध्येही त्यांना रस होता. रहेमानी फाऊंडेशनने जाती, धर्म, रंग, लिंग याकडे न पाहता दरवर्षी तीन हजार पेक्षा जास्त लोकांच्या डोळ्यांच्या शस्त्रक्रिया करण्याचा उपक्रम राबविला. त्यांनी कब्रस्तानमध्ये शिसम आणि सागवानची लागवड करण्याची अभिनव कल्पना राबविली. त्यामुळे कब्रस्तानशी संबंधित अनेक संस्थांना आर्थिकरित्या आत्मनिर्भर होता आले. सांप्रदायिक सद्भाव राखण्यासाठी ते खूपच आग्रही होते. त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता प्राप्त होती. कोलम्बो विश्वविद्यालयाने त्यांना मानद डॉ्नटरेटची पदवी दिली होती. त्यांना उत्कृष्ट सेवेसाठी राजीवगांधी पुरस्कार, शिक्षारत्न पुरस्कार, आयएसएएनए (अमेरिका)कडून सर सय्यद अहमद पुरस्कारासह अनेक पुरस्कार मिळाले होते. त्यांच्या जाण्याने भारतीय मुस्लिमांचे मोठे नुकसान झालेले आहे. मुस्लिम समाज त्यांच्या शैक्षणिक, सामाजिक, धार्मिक आणि आर्थिक क्षेत्रातील योगदानाला विसरू शकत नाही. त्यांच्या या अचानक जाण्याने हजारो विद्यार्थी एका गुरूपासून आणि समाज एका मार्गदर्शकापासून मुकला आहे. अल्लाह त्यांना जन्नतुल फिरदौसमध्ये जागा देओ. आमीन. 


रोममध्ये सुरुवातीला ग्रीक लोकांची सत्ता होती. त्यांच्यामध्ये बौद्धिक ज्ञान सर्वत्र पसरलेले होते. ग्रीक लोकांमध्ये महान बुद्धिजीवी आणि विद्वान होते. त्यांच्यात शाईन नामक एक जमात होती. ते लोक एखाद्या सावलीत बसून ज्ञान प्राप्त करत असत.  अॅरिस्टॉटल त्या वेळी एक प्रकारे जगतगुरूसारखी विद्वान व्यक्ती होती. अॅरिस्टॉटल अलेक्झँडरचा गुरू होता. त्या वेळी अलेक्झँडरने पर्शियाचे राज्य जिंकलेले होते. जगातल्या कानाकोपऱ्यातले लोक अॅरिस्टॉटलला ओळखत होते. जेव्हा ग्रीक लोकांना उतरती कळा लागली तेव्हा सत्तेवर रोमन लोकांचा कब्जा झाला, पण रोमन लोक ख्रिस्ती धर्माचे असल्यामुळे ते कट्टर धर्मनिष्ठ होते. म्हणून त्यांनी ज्ञानाचे हे भांडार बाजूला टाकून दिले. हस्तलिखित आणि छापलेल्या पुस्तकांचे भले मोठे भांडार खोल्यांमध्ये टाकून त्याच्यावर कुलूप लावून टाकले. जेव्हा रोमन लोकांनी सीरिया जिंकले तेव्हा ही पुस्तके त्या देशात पडून होती. जगात जेव्हा इस्लामचा उदय झाला आणि मुस्लिमांचा साऱ्या जगामध्ये अनन्यसाधारण दरारा पसरला तेव्हा एकामागून एक राजवट जिंकून मुस्लिम जगत विस्तारत गेले. जगाच्या इतर राष्ट्रांबरोबरच मुस्लिमानी रोमन राष्ट्रांनाही जिंकून घेतले. जेव्हा त्यांनी विकास व प्रगतीचा उच्चांक गाठला तेव्हा त्यांना बौद्धिक ज्ञान आणि इतर ज्ञान संपदण्याची मोहीम हाती घेतली. अबू जाफर मन्सुर यांनी रोमच्या राजाला संदेश पाठवून सांगितले की त्यांच्याकडे जे काही ज्ञानाचे भांडार आहे त्या पुस्तकांचा अनुवाद करून पाठवून द्यावे. रोमच्या राजाने अनेक ग्रंथांचा अनुवाद करून पाठवून दिला. त्या ग्रंथांमध्ये पदार्थविज्ञान आणि इतर वैज्ञानिक विषयांवर ग्रंथ होते. जेव्हा खलीफा मामुनचा काळ आला तेव्हा त्याने रोमन्सना सांगितले की त्यांनी जे काही ग्रंथ असतील ते सारेच्या सारे अरवबी लिपीत रुपांतर करून पाठवून द्यावे. मामुनने त्या ग्रंथांच्या अरबी भाषेत भाषांतराची मोहीम हाती घेतली. मुस्लिमांनी त्या ग्रंथांचा सखोल अभ्यास केला आणि अशा प्रकारे मुस्लिमांची ज्ञानविज्ञानाच्या जगतातही मक्तेदारी झाली. मुस्लिम अभ्यासकांनी ग्रीक लोकांच्या काही विद्वानांवर टीकादेखील केली. मुस्लिमांमधील उच्च कोटीचे विचारवंतांमध्ये अबु नसर फारावी, अबु अली इब्ने सीना, काझी अबुल वलीद, इब्ने रश्द, अबुबकर काझी, इत्यादी सुरुवातीचे अभ्यासक होते.

(संदर्भ – मुकद्दमा : इब्ने खहदून, खंड-२)

संकलन : सय्यद इफ्तिखार अहमद


(४४) आणि स्मरण करा की जेव्हा मुकाबल्याच्या वेळी अल्लाहने तुम्हा लोकांच्या नजरेत शत्रूंना कमी दाखविले आणि त्यांच्या नजरेंत तुम्हाला कमी करून दाखविले जेणेकरून जी गोष्ट घडणार होती तिला अल्लाहने प्रत्यक्षात आणावे, आणि सरतेशेवटी सर्व मामले अल्लाहकडेच रुजू होतात. 

(४५) हे श्रद्धावंतांनो! जेव्हा एखाद्या समूहाशी तुमचा सामना होईल तेव्हा दृढ राहा आणि अल्लाहचे खूप स्मरण करा, अपेक्षा आहे की तुम्हाला यश मिळेल. 

(४६) व अल्लाह आणि त्याच्या पैगंबराच्या आज्ञा पाळा व आपसांत भांडू नका नाहीतर तुमच्यात दुर्बलता येईल व तुमचा वचक नाहीसा होईल. संयम राखा.३७ निश्चितच अल्लाह संयमी लोकांबरोबर आहे. 

(४७) आणि त्या लोकांसमान रंगढंग अंगीकारू नका जे आपल्या घरातून ऐटीत आणि लोकांना आपली शान दाखवीत निघाले व ज्यांचे वर्तन असे आहे की अल्लाहच्या मार्गापासून रोखतात,३८ जे काही ते करत आहेत ते अल्लाहच्या पकडीच्या बाहेर नाही. 

(४८) जरा विचार करा त्या प्रसंगाचा जेव्हा शैतानाने त्या लोकांच्या कारवाया त्यांच्या दृष्टीत शोभिवंत करून दाखविल्या होत्या आणि त्यांना सांगितले होते की आज कोणीही तुमच्यावर वर्चस्व मिळवू शकत नाही आणि असे की मी तुमच्या संगतीत आहे, मग जेव्हा दोन्ही समूह समोरासमोर उभे ठाकले तेव्हा तो उलट्या पावली फिरला आणि म्हणू लागला की माझी तुमची संगत नाही. मी काही पाहात आहे ते तुम्ही लोक पाहात नाही. मला अल्लाहची भीती वाटते आणि अल्लाह फार कठोर शिक्षा देणारा आहे. 

(४९) जेव्हा दांभिक आणि ते सर्व लोक ज्यांच्या हृदयांना रोग जडला आहे, म्हणत होते की या लोकांना तर यांच्या धर्माने पछाडले आहे.३९ वस्तुत: जर एखाद्याने अल्लाहवर विश्वास ठेवला तर निश्चितच अल्लाह मोठा सामर्थ्यशाली व बुद्धिमान आहे. 

(५०,५१) जर तुम्ही ते दृश्य पाहू शकला असता तर किती छान झाले असते! जेव्हा दूत विद्रोहींचे प्राणहरण करताना त्यांच्या चेहऱ्यावर व पाठीवर मारा करीत म्हणत होते, ‘‘घ्या आता जळण्याची शिक्षा भोगा, हा तो मोबदला आहे ज्याची सामग्री तुम्ही स्वहस्ते अगोदरच उपलब्ध करून ठेवलेली होती. एरव्ही अल्लाह तर आपल्या दासांवर मुळीच अत्याचार करणारा नव्हे.’’ 

(५२) हा प्रसंग यांच्यावर तसाच ओढवला जसा तो फिरऔनवाल्यांवर व त्यांच्या पूर्वीच्या लोकांवर ओढवत राहिला आहे, की त्यांनी अल्लाहच्या संकेतांना मान्य करण्यास नकार दिला आणि अल्लाहने त्यांच्या अपराधापायी त्यांना पकडले. अल्लाह शक्तिशाली व कठोर शिक्षा करणारा आहे. 

(५३) हे अल्लाहच्या या रीतीप्रमाणेच घडले की तो आपली कोणतीही देणगी की जी त्याने एखाद्या जनसमूहाला बहाल केलेली असेल तोपर्यंत बदलत नाही जोपर्यंत ते लोक स्वत:च्या कार्यपद्धतीत बदल करीत नाहीत.४० अल्लाह सर्वकाही ऐकणारा व जाणणारा आहे. 

(५४) फिरऔनवाले व त्यांच्या पूर्वीच्या लोकांच्या संबंधाने जे काही घडले ते याच नियमाप्रमाणे होते. त्यांनी आपल्या पालनकत्र्याच्या वचनांना खोटे लेखले, तेव्हा आम्ही त्यांच्या अपराधामुळे त्यांना नष्ट करून टाकले आणि फिरऔनवाल्यांना बुडवून टाकले. हे सर्व अत्याचारी लोक होते. 

(५५) खचितच अल्लाहजवळ जमिनीवर चालणाऱ्या निर्मितीपैकी सर्वात जास्त वाईट ते लोक आहेत ज्यांनी सत्य मानण्यास नकार दिला. मग कोणत्याही प्रकारे स्वीकारण्यास ते तयार नाहीत. 

(५६) (विशेषत:) त्यांच्यापैकी ते लोक ज्यांच्याशी तू करार केला मग ते प्रत्येक प्रसंगी तो भंग करतात आणि त्यांना जरादेखील अल्लाहच्या प्रकोपाचे भय वाटत नाही.४१ ३७) म्हणजे आपल्या भावना आणि इच्छांना वशीभूत करा. उताविळपणा, भय, भीती, लोभ, घबराट आणि अनुचित उत्तेजनापासून स्वत:ला दूर ठेवा. शांत मनाने आणि संतुलित निर्णय शक्तीद्वारा काम करीत राहा. संकट आणि अडथळे समोर असले तर तुमचे पाऊल डगमगले जाऊ नये. उत्तेजनापूर्ण समयी क्रोध व उन्मादाने तुम्ही एखादे अनुचित कार्य करू नये. संकटे समोर असतील आणि स्थिती बिघडली असे वाटत असेल तर घाबरून तुम्ही विचलीत होऊ नये. उद्देशप्राप्तीच्या उन्मादात किंवा कच्चे पक्के उपायांनाच वरवर प्रभावकारी समजून तुमचे ध्येय गडबडीचे शिकार बनू नये. जग, जगाचे फायदे आणि मनाच्या इच्छांचे प्रलोभने तुम्हाला खुणवित असतील तर तुमचे मन त्यांच्याकडे आकर्षित होण्याइतपत कमजोर बनू नये. हा सर्व तपशील एक लहानसा शब्द `सब्र' (धैर्य) मध्ये समाविष्ट आहे. अल्लाह सांगतो की जे लोक या सर्व दृष्टीने सब्र करणारे (धैर्यवान) आहेत, माझे समर्थन त्यांनाच आहे.
३८) संकेत आहे कुरैशी शत्रूंकडे ज्यांचे सैन्य मक्का येथून या रूबाबात निघाले होते की गाणाऱ्या, नाचणाऱ्या बाया बरोबर होत्या. जागोजागी थांबून नाचगाणे आणि मदिरापान होत होते. जे जे कबिले आणि गावे रस्त्यात भेटत होते त्यांच्यावर आपली शक्ती, वैभव, भारी संख्या आणि युद्धसामुग्रीचा प्रभाव पाडत जात होते आणि भाव मारत होते की आमच्यासमोर कोण डोके वर काढू शकतो. ही अशी होती त्यांची नैतिक दशा! यावर आणखी अभिशाप होता की त्यांचा आगेवूâच करण्याचा उद्देश त्यांच्या चरित्रापेक्षासुद्धा अधिक अपवित्र होता. ते आपल्या जीवाची आणि संपत्तीची बाजी लावण्यासाठी निघाले नव्हते की सत्य आणि न्यायचा ध्वज उंचावला जावा; ते तर यासाठी निघाले होते की असे होऊ नये. आणि तो एकमेव गट जो जगात एकटाच सत्य आणि न्यायाचा ध्वज उंचावण्यासाठी सरसावला आहे त्यास नष्ट केले जावे जेणेकरून त्या ध्वजाला उंचावणारा जगात कोणीही राहू नये. यावर मुस्लिमांना सचेत करण्यात येत आहे की तुम्ही कधी असे बनू नयेत. तुम्हाला अल्लाहने ईमान आणि सत्यवादीतेची देणगी दिली आहे. त्याची निकड आहे की तुमचे चरित्र पवित्र असावेत आणि तुमचे युद्धध्येयसुद्धा पवित्र असावेत.
हा आदेश फक्त तात्कालिक आदेश नव्हता. आजच्यासाठी आहे आणि सततचा राहणारा आहे. शत्रूंच्या सैन्याची जी स्थिती  त्या काळी होती ती आजसुद्धा तशीच आहे. वेश्यालये आणि दारूअड्डे आजसुद्धा आहेत. गुप्त्पणे नव्हे तर राजरोसपणे आजसुद्धा हे धंदे धुमधडाक्यात सुरु आहेत. सैन्याच्या वासनापूर्तीसाठी आणि त्यांच्या निर्लज्जतेच्या पूर्तीसाठी सर्वकाही केले जाते. त्यांच्या या नैतिक घाणीचा  जाब  विचारणारा  समाजात  आजसुद्धा  कोणी  दिसत  नाही. अशा  सैन्यापासून  दूसरे राष्ट्र कोणती चांगली आशा बाळगेल. या सैन्याचा गर्व आणि ऐट त्यांच्या वर्तनातूनच दिसते. त्यांचे राजकीय पुढारी त्यांच्यासमोर गर्वाने म्हणतात की आमच्या पुढे सर्व शक्तीहीन आहेत. तुमच्यावर आज कोणीच विजय प्राप्त् करू शकत नाही. या नैतिक घाणीपेक्षा अधिक घाण त्यांचे युद्धउद्देश आहेत. जगाला धोका देऊन ते सांगतात की त्यांचा उद्देश मानवताकल्याण हेच आहे. परंतु वास्तविकपणे त्यांच्यासमोर मानवतेचे हित सोडून बाकी सर्व उद्देश असतात. त्यांच्या युद्धांचा उद्देश हा असतो की अल्लाहने जमिनीत आपल्या दासांसाठी जे काही निर्माण केले आहे, त्याला फक्त त्यांच्या राष्ट्राने हडप करावे आणि जगातील दुसरे राष्ट्र त्यांचे दास आणि नोकर बनून राहावेत. म्हणून ईमानधारकांसाठी कुरआनची शाश्वत शिकवण आहे की त्या अवज्ञाकारी आणि इस्लामच्या शत्रूंपासून सावध राहावे व त्यांच्या पद्धतीपासून दूर राहावे. त्यांच्या अपवित्र हेतूप्राप्तीसाठी आपली शक्ती खर्च करू नये.
३९) मदीना शहरातील दांभिक आणि ते सर्वजन जे भौतिकतेच्या मागे लागलेले आहेत आणि अल्लाहपासून निष्काळजी  होते. मुस्लिमांची थोडी  संख्या  कुरैशच्या  बलाढ्य सैन्याशी टक्कर देण्यासही जात आहे, हे पाहून ते  सर्वजण आपापसांत म्हणत असत की आता हे लोक आपल्या धार्मिक उन्मादात वेडे झालेले आहेत. आता युद्धात त्यांचा विनाश अटळ आहे. याच पैगंबर मुहम्मद (स.) यांनी त्याच्यांवर असा जादू चालवला आहे की त्यांची मती गुंग झाली आहे आणि डोळे असून हे मृत्यूच्या दाढेत जात आहेत.
४०) म्हणजे जोपर्यंत एखादे राष्ट्र स्वत:ला अल्लाहच्या देणगीसाठी पूर्णत: अपात्र बनवत नाही, अल्लाह त्यांच्यापासून आपली देणगी हिसकावून घेत नाही.
४१) येथे मुख्यरुपाने संकेत यहुदींकडे आहे. पैगंबर मुहम्मद (स.) यांनी मदीना येथे आल्यानंतर प्रथमत: त्यांच्याशीच चांगल्या शेजाऱ्यासारखा व्यवहार आणि परस्पर सहयोग आणि साह्यतासाठीचा करार केला होता. पैगंबर मुहम्मद (स.) यांनी आपल्या परीने पूर्ण प्रयत्न केले होते की त्यांच्याशी चांगले संंंबंध स्थापित केले जावेत. तसेच धार्मिक रुपाने पैगंबर मुहम्मद (स.) यहुदींना अनेकेश्वरवादींपेक्षा जवळचे समजत होते आणि प्रत्येक गोष्टीत अनेकेश्वरवादींच्या मुकाबल्यात यहुदीं (ग्रंथधारक) च्या पद्धतींना प्रमुखता देत असत. परंतु त्यांचे विद्वान आणि बुजुर्ग मंडळीला विशुद्ध एकेश्वरत्व पसंत नव्हते. तसेच त्यांना सच्च्रित्राचा प्रचार तसेच ईशप्रणित जीवनपद्धती (दीन) च्या स्थापनेसाठी पैगंबर मुहम्मद (स.) यांचे प्रयत्न अजिबात पसंत नव्हते. त्या लोकांचे प्रयत्न सततचे होते की हे नवीन आंदोलन कोणत्याहीप्रकारे सफल होऊ नये. याच उद्देशाने यहुदी लोक मदीनेतील दांभिक मुस्लिमांशी साठगाठ करून होते. याच कारणामुळे ते औस आणि खजरजच्या लोकांमधील जुन्या काळातील शत्रुत्वाला भडकवित असत. इस्लामपूर्व या दोन्ही टोळयांमुळे खुनी टकराव होत असत. यामुळे कुरैश आणि इतर इस्लामविरोधी कबिल्यांशी यहुदी लोकांचे कटकारस्थान रचण्याचे काम चालू होते. ही सर्व कटकारस्थाने मैत्रीकरार झाला असतानासुद्धा चालत होती. हा करार यहुदी आणि पैगंबर मुहम्मद (स.) यांच्यामध्ये झालेला होता. जेव्हा बदरचे युद्ध सुरु झाले तेव्हा प्रारंभी त्यांना वाटत होते की कुरैश सैन्याचा पहिलाच प्रहार इस्लामी आंदोलनाचा अंत करून टाकील. परंतु जेव्हा परिणाम त्यांच्या इच्छेविरुद्ध झाला तेव्हा त्यांच्या मनातील द्वेषअग्नी आणखीनच भडकला. बदर युद्धाचा विजय इस्लामी शक्तीचा एक स्थायी धोका आपल्यासाठी न बनो, ही त्यांना भीती होती. म्हणून त्यांनी आपल्या विरोधी प्रयत्नांना आणखीन प्रखर बनविले. त्यांचा एक पुढारी काब बिन अशरफ (जो कुरैशचा पराजय झाला हे ऐवूâन ओरडला की आज जमिनीचे पोट आमच्यासाठी तिच्या पाठीपेक्षा उत्तम आहे.) स्वत: मक्का येथे गेला तेथे त्याने उत्तेजनापूर्ण शोकगीते ऐकविली आणि कुरैश लोकांच्या मनात प्रतिशोध घेण्याची भावना भडकविली. यहुदीचे कबिले बनीकैनुकाअ यांनी चांगले शेजारीच्या कराराविरुद्ध मुस्लिम स्त्रियांशी छाड करण्यास सुरवात केली. पैगंबर मुहम्मद (स.) यांनी जेव्हा त्यांच्या या दुष्ट कर्माची निंदा केली तेव्हा त्यांनी धमकी दिली, ``आम्ही कुरैश नाही. आम्ही लढणारे आणि मरणारे लोक आहोत. आम्ही लढणे चांगल्या प्रकारे जाणतो. आमचा मुकाबला करण्यासाठी याल तर तुम्हाला कळून येईल की मर्द कोणाला म्हणतात.''


जागतिक महामारी ठरलेल्या कोरोनाने सर्वत्र उच्छाद मांडला आहे. चीन, ब्राझील, फ्रांस, इटली आदी देशांत कोरोनाने पुन्हा एकदा थैमान घातले आहे. देशात कोरोनाची दुसरी लाट धडकली असून दुसऱ्या लाटेचे विक्राळ रुप आता पाहावयास मिळत आहे. रोज हजारोंच्या संख्येने रुग्ण आढळत आहेत. शिवाय मृतांच्या आकड्यात वाढ होत आहे. जर आपण या जीवघेण्या विषाणूकडे डोळेझाक केली तर कधी आपण या कोरोनाचा बळी होऊ हे समजणारही नाही. मागील आठ दिवसांच्या रुग्णसंख्येच्या आकडेवारीवर नजर टाकली तर राज्यभरात चिंताजनक परिस्थिती असल्याचे निदर्शनास येत आहे. आठ नऊ महिने राज्यभर हैदोस घालणारा कोरोना डिसेंबर 2020 मध्ये हद्दपार होईल, अशी आशा निर्माण झाली होती, परंतु फेब्रुवारीपासून कोरोनाने पुन्हा डोके वर काढायला सुरुवात केली. कोरोनाचा पुन्हा एकदा उद्रेक पाहता अखेर महाराष्ट्रात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली.

कोरोनाला हरवण्यासाठी लॉकडाऊन हा पर्याय नाही हे सगळेच जाणतात. कोरोनाच्या महासंक्रमणात दुसऱ्या लाटेला आळा घालण्यासाठी गेल्या वर्षीसारखा सरसकट लॉकडाऊन न करता दिवसा जमावबंदी व रात्री संचारबंदी असे निर्बंध लागू करावयास हवे होते. सरकारचा हा निर्णय हातावर पोट असलेली लाखो गरीब कुटुंबे, नोकऱ्या जाण्याच्या भीतीने चिंतेत पडलेले मध्यमवर्गीय, तसेच उद्योग-व्यवसाय ठप्प होण्याची भीती बाळगणाऱ्यांना त्रासदायक आहे. मध्यमवर्गीयांसह बहुतांश कुटुंबांची आर्थिक परिस्थिती अतिशय नाजुक झाली आहे. जेवणाचा खर्च, घरभाडे, ऑनलाइन शिक्षण खर्च, वाहतूक खर्च, वीज बील, वैद्यकीय खर्च, कर्जाचे हफ्ते आदी अत्यावश्यक खर्चाचा बोजा असह्य  झाला आहे. अशा वेळी आणखी रोजगार बुडाला तर उपासमार, आत्महत्या, ताणतणाव, कौटुंबिक हिेंसा आदींनी लोकांचे समस्या वाढतील. त्यामुळे ज्या प्रमाणात लोकांना जगण्यासाठी मदत मिळायला हवी, सामान्यवर्गासाठी मोफत रेशन, वरखर्चासाठी सरकारकडून बॅकेत थेट रोख रक्कम जमा होणे, दरमहा किमान 50 युनिटपर्यंत वीजबील माफी अशा उपाययोजना शासनाकडून होणे अभिप्रेत आहे. 

संसर्गाची साखळी तोडणे व लोकांचे जीव वाचविणे ही आपली सर्वांचीच पहिली गरज आहे. सोबतच वाचविलेले जीव भूक व उपासमारीने जाणार नाही याची काळजी घेण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी आपल्या फेसबुक लाईव्हमध्ये सांगितले. लॉकडाऊनच्या भीतीने अगोदरच परप्रांतीय मजूर मोठ्या संख्येने पुन्हा आपल्या गावी निघून जातानाचे चित्र दिसत आहे. नाशवंत मालाचे उत्पादन करणारे शेतकरी काळजीत आहेत. सरकार आणि जनता दोन्हींच्या दृष्टीने खडतर काळ आहे. सरकारने घ्यावयाचा तो निर्णय घेतला आहे, आता कोरोनाचा फैलाव आटोक्यात आणण्याची जबाबदारी जनतेवर येऊन पडली आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखणे हे आपल्या सर्वांच्या हातात आहे. पुढील काही दिवस जनतेने स्वयंशिस्त पाळून शासनाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन केले तर परिस्थिती आटोक्यात येऊ शकते.  कोरोनाला हरवण्यासाठी सोशल डिस्टन्सिंगसह तोंडावर मास्क लावणे, गर्दी टाळणे व हात स्वच्छ धुणे या त्रिसूत्री नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. अन्यथा भविष्यात घराघरात कोरोनाचा रुग्ण असेल हे कटू सत्य नाकारता येत नाही. कोरोना हा श्रीमंत गरीब असा भेदभाव करीत नाही.  कोरोनारुपी आलेल्या संकटाला हरविण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने सरकारला साथ देणे गरजेचे आहे. कोरोनाच्या धोक्याकडे दुर्लक्ष केले तर पुढील काही दिवसांत कोरोनाचा उद्रेक होईल आणि त्याला आपणच जबाबदार असू. भविष्यात आपल्याला कुटुंबासोबत जगायचे असेल तर कोरोना विरोधातील लढा सुरुच ठेवणे गरजेचे असेल. शासनाने आखून दिलेले नियम त्या नियमांचं आपण किती पालन करावे हे काही नव्याने सांगायची गरज नाही. काही नागरिक संचारबंदी, कोरोना प्रतिबंधक आचारसंहितेची कशी ऐशीतैशी करत आहेत, हे समाजाने सामूहिक शहाणपणापासून फारकत घेतली असल्याचेच निदर्शक आहे. ज्या कुटुंबांनी कोरोना अनुभवला ती शहाणी झाली आहेत, पण इतरांना शहाणपण कधी येणार? तसेच काही बेजजाबदार नागरिकांच्या बेफिकीर वृत्तीचा फटका कोरोना प्रतिबंधक आचारसंहिता पाळणाऱ्या नागरिकांच्या कुटुंबियांना बसतो. मात्र जर शासनाने आखलेले नियमांचे काटेकोरपणे पालन न केल्यास आपल्याच जीवावर बेतू शकते, याचा विचार करण्याची वेळ आली आहे. आपला बेजबाबदारपणा कोरोना वाढीस आणखी कारणीभूत ठरेल. 

या संसर्गाला तोंड देण्यासाठी सरकारने लसीकरणाला सुरुवात केली आहे. परंतु सरकार अजूनही आपल्या उद्दिष्टांपासून बराच मागे आहे. 45 वर्षांपेक्षा जास्त वयासाठीच्या लोकांसाठीचं उद्दिष्ट सरकारने पूर्ण केलं नाही. जर सर्वांसाठी लसीकरण खुलं केल्यास अडचणी वाढू शकतात. सगळे ताकदवान लोक लस आधी घेतील आणि गरजवंत मागे राहतील. ज्या वयेगटाला अधिक धोका आहे त्यांनाच आधी लस द्यावी. म्हणूनच वयोगटानुसार उद्दिष्ट ठेवणं जास्त योग्य राहील. लसीकरणाची संख्या वाढवून टप्प्याटप्प्याने वयाची असलेली मर्यादा काढून टाकावी जेणेकरुन आबालवृद्धांना ती मिळावी. प्रत्येक नागरिकाने शासनाने दिलेले निर्बंध पाळावे व शासनाने व्यापक प्रमाणात लसीकरण मोहीम आखावी जेणेकरुन कोरोनाची सुरु असलेली दुसरी इनिंग आटोक्यात येईल व कोरोना हद्दपार होईल अशी आशा करु या...

- अफसर खान

महाराष्ट्र मीडिया नेटवर्क

भ्रमणध्वनी :९८६०५४३४६०गत सोमवारी मुंबई उच्च न्यायालयाने केंद्रीय तपास संस्थेला महाराष्ट्राचे माजी ग्रहमंत्री अनिल देशमुख यांनी खंडणी वसूल करण्याचे आदेश दिल्याच्या प्रकरणात चौकशी करण्याचे आदेश दिल्यानंतर नैतीकतेचा मुद्दा उपस्थित करून अनिल देशमुखांनी शरद पवारांची भेट घेऊन आपला राजीनामा सुपूर्द केला. या राजीनाम्यानंतर विरोधी पक्षाने वेगवेगळ्या पत्रकार परीषदा घेऊन न्यायालयीन निकालानंतर नैतीकता अचानक कशी आली अशा आशयाचे वेगवेगळे आरोप करून मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंना लक्ष्य करण्यास सुरूवात केली आहे.

राजकारणात हे नेहमीच होते. नव्हे तसे प्रघात पडलेले आहेत. या प्रकरणात दररोज नवनव्या बातम्या पुरवण्याचे काम विरोधी पक्ष सातत्याने करीत आला आहे.मुळात या प्रकरणाकडे अधिक डोळसपणे पहाण्याची गरज यानिमित्ताने निर्माण झाली आहे.त्यासाठी हे नेमके प्रकरण काय आहे हे पहिल्यांदा समजावून घेतले पाहिजे. उद्योगपती अंबानी यांच्या घराच्या बाहेर एका बेवारस अवस्थेत सापडलेल्या मोटारीत काही स्फोटके ठेवून धमकीचे पत्र ठेवल्यानंतर एकच खळबळ उडाली. हे पत्र अगदी दर्शनी भागात गाडीच्या समोरील सिटवर ठेवले होते.यात कोणत्यातरी दहशतवादी संघटनेचा हात असेल अशी शंका होती. मात्र कोणत्याही संघटनेने याची जबाबदारी घेतलेली नाही.त्यामुळे या प्रकरणाचा  तपास राज्य सरकारकडून सुरू झाल्यानंतर सचीन वाझे या पोलीस अधिकाऱ्याकडे याचा तपास देण्यात आला.तपास सुरू झाल्यानंतर एक एक खुलासे होत होते. ही  बेवारस अवस्थेतील गाडी ठाण्यातील मनसुख हिरेन यांची होती. पुढे हिरेन बेपत्ता होऊन चार दिवस उलटल्यानंतर त्यांचा संशयास्पद रीत्या ठाण्याच्या खाडीत म्रतदेह सापडल्यानंतर या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले.हा तपास राज्य सरकारकडून सुरू असतानाच यात केंद्रीय तपास संस्थेने हस्तक्षेप केला. मुळातूनच हा हस्तक्षेप करण्याची गरज केंद्रीय तपास संस्थेला का वाटली हा यातला खरा प्रश्न आहे.

या अगोदरही असा प्रयत्न सुशांतसिंग राजपूत आत्महत्या प्रकरणात केंद्रीय तपास संस्थाकरवी भाजपाने केला.सुशांतसिंग राजपूत आत्महत्या प्रकरणी काय दिवे या तपास यंत्रणांनी लावले हे कळायला मार्ग नाही. पुढे बिहार विधानसभा निवडणूकीत याचा खूबीने राजकीय उपयोग करून घेतल्यानंतर हे प्रकरण विजनवासात गेले. याअगोदरही नरेंद्र दाभोळकर हत्या प्रकरणाचा तपासही याच संस्थेकडे देेेऊन गेली सात वर्ष झाली असून त्यातही एकाही आरोपीला पकडण्यात या यंत्रणेला यश आलेले आहे. आजपर्यंत एकाही प्रकरणात निष्पक्ष आणि वस्तुनिष्ठ तपास केल्याचा या संस्थेचा इतिहास नाही.केवळ राजकीय दबावाखाली कार्यवाही केल्याचा आव आणीत या संस्थेचा वापर विरोधी पक्षाला नमवण्यासाठी झाला आहे आणि होत आहे. हे वारंवार देशाने पाहिलेले आहे. मुळातच केंद्रीय तपास संस्थाची जनमानसात कितपत विश्वासार्हता टिकून आहे हा खरेतर संशोधनाचा मुद्दा आहे.

मोदी सरकार सत्तेवर आल्यानंतर अनेक स्वायत्त संस्थाची विश्वासार्हता संपल्यात जमा आहे हे वेगळे सांगायला नको. हे कमीअधिक प्रमाणात काँग्रेस कार्यकाळात होत होते म्हणून एका प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने सीबीआय ही संस्था सरकारी पिंजऱ्यातील पोपट असल्याचे निरीक्षण नोंदवले होते.सीबीआयच्या कामकाजावर न्यायालयाने अनेकदा ताशेरे ओढलेले आहेत. असे असतानाही उच्च न्यायालयाला हे संवेदनशील प्रकरण सीबीआयकडे का सोपवावे वाटले हे समजलेले नाही. मोदी सरकारच्या येण्यामुळे सीबीआयची विश्वासार्हता वाढलेली आहे असा समज न्यायालयाने करून घेतल्यास त्यात काही नवल नाही.तेव्हा सीबीआय जोपर्यत हे प्रकरण राजकीयदृष्ट्या तापवले जाईल तोपर्यंत नवनवीन खुलासे करण्यापलीकडे काहीही करेल अशी तुर्तास शक्यता नाही. हे प्रकरण सरकारच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे असल्याने यातील सत्य लोकांसमोर येणे महाविकास आघाडी सरकारच्या द्रुष्टीने महत्वाचे आहे.

ज्या आक्रमकपणे फडणवीस सरकार आरोपांची राळ उठवीत आहे ते पहाता आपल्याकडे बहुमत असतानाही विरोधी बाकावर का बसावे लागले याचाही विचार यानिमीत्ताने केल्यास फडणवीसांचे राजकारण अधिक सुलभ होईल. आपल्या कार्यकाळात भीमा कोरेगावसारख्या जातीय दंगली करणाऱ्या धर्माध आरोपींना कुठलीही चौकशी न करता सभागृहात क्लिनचिट द्यायची, महाभरतीसाख्या नोकरभरतीत उघड घोटाळे होऊनही त्याबद्दल मिस्टर क्लिन प्रतिमा जपण्यासाठी त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करायचे, शेतकरी मंत्रालयात येऊन विष प्राशन करून आत्महत्या केल्यानंतर त्याच्या पत्नीला भेट नाकारत उलट तिलाच जळगाव जिल्ह्याच्या दोऱ्यावर असताना नजरकैदेत ठेवायचे, आणि नैतीकतेचा आव आणीत आज ज्या राष्ट्रवादी पक्षावर भष्टाचारी पक्ष असल्याचा आरोप फडणवीस महोदय करीत आहेत त्याच पक्ष नेत्यांसोबत सगळी नैतीकता खुंटीला टांगून पहाटेचा शपथविधी करताना ही नैतीकता कुठे गेली होती हेही महाराष्ट्राला सांगावे.भाजपा सोडून इतर पक्ष नेते देशद्रोही, भष्टाचारी हे पुरेपूर ठसवण्याचा आटापिटा भाजपाने चालविलेला आहे.

एकवेळ जे सुरेंद्र अधिकारी भष्टाचारी म्हणून भाजपा प्रचाराची राळ उठवित होती त्यांनाच पक्षात घेऊन उमेदवारी दिल्यानंतर ते एकदम कसे पवित्र झाले ही नैतिकता कोणती याचाही विचार भाजपाने केला पाहिजे.जो पक्ष एवढी सत्यनिष्ठा जपतो त्या पक्षाच्या आसाममधल्या  मुख्यमंत्री पदाच्या उमेदवाराच्या गाडीत ईव्हीएम मशीन सापडलेल्या आहेत ही कोणती नैतीकता आणि देशप्रेमी निष्ठा आहेत याचेही सीबीआयतर्फ एकदा सत्य जनतेसमोर मांडावे. एकूणच काय तर महाराष्ट्रात विरोधी पक्षाचे सरकार सत्तेवर आले हे भाजपाला रूचलेले नाही. मुख्यमंत्री पदावर बसण्याची फडणवीसांची मनीषा अजूनहि त्यांच्या मनातून गेलेली नाही.त्यांना मुख्यमंत्री पदाचे डोहाळे लागलेले आहेत.त्यामुळे महाराष्ट्रातील आघाडी सरकारला कसे बदनाम करून पायउतार करता येईल हाच एककलमी कार्यक्रम भाजपा आणि त्यांनी पुरस्कूत केलेली माध्यमे चालवीत आहेत.थोडेही कोण्या एका मंत्र्यांनी एक विधान केले की लागलीच त्याचा किस पाडून भाडोत्री राजकीय विश्लैषकांकरवी हे सरकार कसे खिळखिळे झाले आहे याचा बनाम करून सनसनाटी बातम्या दिल्या जात आहेत.

खरेतर माध्यमे म्हणजे भाजपाचे भाडोत्री प्रवक्ते अशी अवस्था झाल्याने माध्यमांची विश्वासार्हता लोप पावली आहे.अशातच राज्य प्रशासनातील  काही अधिकारीवर्ग आतून फडणवीसांना मदत करीत आहे.मनसुख हिरेन प्रकरणात ज्या तडफेने फडणवीसांनी निष्णांत कायदेपंडीताची भूमीका वठवीत सीडीआर सारखे पुरावे सभाग्रहात सादर केले जे खुद्द ग्रहमंत्री अनिल देशमुखांकडेही नव्हते हे सर्व पहाता इतके संवेदनशील पुरावे फडणवीसांच्या हाती कसे लागले हा कळीचा प्रश्न आहे. यामुळेच यात परमवीर सिंगासारख्या अधिकाऱ्यांवर याचा संशय बळावल्याने त्यांची तडकाफडकी बदली केल्यानंतरच त्यांनी हे.खंडणीचे प्रकरण पुढे आणले. राजकीय पाठींबा असल्याशिवाय परमवीरसिंग असे गंभीर आरोप  करूच शकत नाहीत. आपण काय करीत आहोत आणि त्याचे काय परीणाम होऊ शकतात हे परमवीरसिंग पुरते जाणून आहेत असे असताना त्यांनी ही बाब मुंबई पोलीस आयुक्त पदावर असताना का जाहीर केली नाही. त्यांनी ही बाब शरद पवारांना सांगीतल्याचे खुलासे करताना आपण जबाबदार पदावर आहोत त्यामुळे या प्रकरणी पुरावे घेऊन पोलीस कार्यवाही त्यांना का करावी वाटली नाही.कदाचित त्यांना मुंबई पोलीस आयुक्तपदावरून हटवीले गेले नसते तर कदाचित त्यांनी ही बाब उघडही केली नसती. त्यामुळे या प्रकरणात नुसत्या अनिल देशमुखांचा राजीनामा घेऊन उपयोगी नाही तर परमवीर सिंगाचीही बडतर्फी करून स्वतंत्र चौकशी करणे महत्वाचे आहे. इतकी खंडणी हे कोणाच्या सांगण्यावरून उकळीत होते असा आरोप करणाऱ्या विरोधी पक्षाने परमवीर सिंग कोणाच्या राजकीय आशिर्वादाने हे खुलासे करीत आहेत हेही स्पष्ट केल्यास त्यांची नैतीकता सिद्ध होईल.

मुळात अनिल देशमुखांनाच का लक्ष्य करण्यात आले याच्याही खोलात जाणे यानिमीत्ताने महत्वाचे आहे. अनिल देशमुख यांनी फडणवीस कार्यकाळातील अनेक भाजपाला अडचणीत आणू शकतील असे प्रकरणे बाहेर काढायला सुरूवात केली होती.भिमा कोरेगाव प्रकरण हे त्याचे उत्तम उदाहरण होय.फडणवीस कार्यकाळात ह्या प्रकरणीचा तपास पुणे पोलीस करीत होती ठाकरे सरकार ह्या प्रकरणी लक्ष देण्यास सुरूवात केल्यांनतर हे प्रकरण केंद्रीय तपास संस्थेकडे देण्यात आले.त्यांंनंतर रिपब्लिकन टिव्हीचा संपादक अर्णव गोस्वामीचा टीआरपी घोटाळा उघड करण्यात देशमुखांचा मोठा वाटा होता.गोस्वामीवर केलेली कार्यवाही आणि मोहन डेलकर आत्महत्या प्रकरण, वास्तुविशारद अन्वय नाईक प्रकरणात महाविकास आघाडी सरकारने दाखवलेली चौकशीची तत्परता यामुळे काहीहीकरून देशमुखांना पायउतार करण्यासाठी फडणवीस आक्रमक झाले.त्याची हा राजीनामा परीणीती आहे.फडणवीस एवढे न्यायप्रिय असते तर अन्वय नाईक प्रकरण दडपले गेले नसते आणि सेवानिवृत्तीनंतर सत्यपाल सिंगाना भाजपाची खासदारकी मिळाली नसती.सत्यपाल सिंग असो की परमवीर सिंग हे सत्तेपुढे ,राजकीय दबावापुढे आपली कार्यनिष्ठा गमावून बसले त्यामुळे अनिल देशमुखांसारख्या नेत्यांचा राजकीय बळी गेला हे उघड सत्य आहे.

सीबीआय चौकशीतले सत्य एथावकाश समोर येईलच परंतू  तुर्तास अनिल देशमुखांची अवस्था खडसेंसारखी झाली आहे. आणि त्याचे कर्तुत्व फडणवीसांकडेच जाते.त्यामुळे फडणवीसांच्या बाणेदारपणाला सलामच केला पाहिजे. तो करतानाच हे लेखन वाचणाऱ्या काहींना मी महाविकास आघाडीचा हितचिंतक असल्याची शंका येऊ शकते तशी ती येणे स्वाभाविक आहे.कारण सध्याला सगळे जण कोणत्यातरी एका गटात टोळीने विभागले जात असतानाच्या काळात अशी शंका मनात येणे स्वाभाविक आहे. परंतू ते तसे नसून भाजपाचे राजकारण आणि निष्ठा कशा नैतीकतेच्या नावाखाली उखड होणारे दंभ आणि ढोंग आहे हे पटवून देण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न आहे.

लोकशाहीत राजकीय सत्ता प्राप्त करणे हे एक ध्येय असून ते निवडणूकीच्या माध्यमातून साध्य होत असले तरी त्या निवडणुका ज्या खालच्या स्तरावर जाऊन लढवल्या जात आहेत आणि अगदी प्राणघातक हल्ले करून सत्ता प्राप्त केली जात आहे ते पाहता आपण सत्ताधारी पक्ष किती व्यापक लोकहिताला प्राधान्य देत आहोत हे उघड होत आहे.सध्याला भारतीय राजकारणात आणि पक्षसंस्कूतीत जी अत्यंतीक हिंसा आणि टोकाचा द्वैष पहायला मिळतो आहे त्यावरून आपण लोकशाहीचा आत्माच गमवला आहे की काय अशी शंका घ्यायला जागा आहे.

- हर्षवर्धन घाटे 

नांदेड. मो.: ९८२३१४६६४८

(लेखक सामाजीक राजकीय प्रश्नांचे अभ्यासक व विश्लेषक आहेत)  राष्ट्रीय सुरक्षा कायद्याचा (NSA) अर्थात रासुकाचा उत्तर प्रदेशात गैरवापर झाल्याचा ठपका अलाहाबाद हायकोर्टानं ठेवला आहे. या कायद्यांतर्गत कोर्टानं १२० पैकी ९४ जणांची अटक ही चुकीची असल्याचं म्हटलं आहे. या कायद्यांतर्गत ३२ जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी अटकेचे आदेश दिले होते. हायकोर्टानं हे सर्व आदेश रद्द केले आहेत. जानेवारी २०१८ ते डिसेंबर २०२० दरम्यान तीन वर्षांत हे आदेश देण्यात आले होते. इंडियन एक्सप्रेस या इंग्रजी वृत्तपत्रानं याबाबत वृत्त दिलं आहे. रेकॉर्डनुसार, रासुकाचा सर्वाधिक ४१ वेळा वापर कथित गोहत्या प्रकरणांमध्ये करण्यात आला आहे. यामध्ये सर्व कारवाया अल्पसंख्यांक समुदयावर झाल्या आहेत. या सर्व प्रकरणांमध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी गोहत्येच्या एफआयआरवरुन कारवाई केली होती. यांपैकी ३० म्हणजेच ७० टक्क्यांहून अधिक प्रकरणांत हायकोर्टाने उत्तर प्रदेश सरकारला जोरदार फटकारलं. तसेच कोर्टानं या कायद्यान्वये देण्यात आलेले आदेश रद्द केले तसेच अटकेत असलेल्यांची सुटका करण्याचे निर्देश दिले. यामध्ये एक महत्त्वाची बाब ही आहे की, हायकोर्टाकडे आलेली ४२ प्रकरणं एकूण प्रकरणांपैकी एक तृतीयांशपेक्षा अधिक होती. गोहत्येच्या इतर ११ प्रकरणांमध्येही अटक योग्य असल्याचं सांगण्यात आलं. यामध्ये एकाला सोडून सर्वांत कनिष्ठ किंवा हायकोर्टांनी नंतर जामीन मंजूर केले. म्हणजेच या आरोपींची न्यायालयीन कोठडी गरजेची नव्हती. इतकेच नव्हे तर पडताळणीत हेदेखील समोर आलंय की, गोहत्येच्या जवळपास सर्व प्रकरणांमध्ये विविध जिल्हाधिकारी एक दुसऱ्यांची नक्कल करताना दिसतात. राष्ट्रीय सुरक्षा कायदा का लावावा लागला? यामध्ये सर्वांचा जबाब जवळपास एकसारखाचं आहे. यामध्ये म्हटलंय की, आरोपीने जामीनासाठी अर्ज केलाय, त्याची सुटका होता कामा नये कारण जर तो तुरुंगाबाहेर आला तर पुन्हा यांसारखे गु्न्हे करेल आणि समाजासाठी हे नुकसानकारक आहे. मात्र ११ प्रकरणांमध्ये आदेश देताना जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी मेंदूचा वापर केला नाही तर १३ प्रकरणांमध्ये अटक आरोपीला राष्ट्रीय सुरक्षा कायद्याला आव्हान देण्यासाठी आपली बाजू मांडण्याची संधी देण्यात आली नाही, असे कोर्टाचं म्हणणे आहे. अटकेच्या सात प्रकरणांत कोर्टानं म्हटलं की, ही प्रकरणं कायदा आणि सुव्यवस्थेच्या कार्यक्षेत्रात येतात. यांसाठी राष्ट्रीय सुरक्षा कायदा लावण्याची गरज नाही. तसेच सहा प्रकरणात आरोपींवर केवळ एकाच गुन्ह्याच्या जोरावर रासुका लावण्यात आला. आरोपीच्याविरोधात यापूर्वी अशा प्रकारचा कुठलाही गुन्हा केल्याची नोंद नव्हती. कोणत्याही व्यक्तीवर रासुका लावून अटक झाल्यास, त्या व्यक्तीला १२ महिन्यांपर्यंत कैद करता येऊ शकतं. अशा व्यक्तीला १० दिवस तरी अटकेचं कारण न सांगता पोलीस कैदेत ठेऊ शकतात. अशा प्रावधानांमुळं हा कायदा अनेकवेळा विरोधी आवाज दाबण्यासाठी किंवा सामाजिक कार्यकर्ते इत्यादींना अटक करण्यासाठी वापरला जाऊ शकतो. या कायद्यांअंतर्गत, सामान्यपणे अटक झालेल्या व्यक्तीस असलेले अधिकार काढून घेतले जातात.  दिल्लीतही जामिया मिलिया इस्लामिया आणि जवाहरलाल नेहरू विद्यापीठात झालेल्या हिंसक हल्ल्यांपासून ते शाहीन बाग इथं महिलांनी किमान महिनाभर दिलेल्या अविस्मरणीय लढ्यानं देशात नुकताच अंमलात आलेला नागरिकता संशोधन कायदा आणि राष्ट्रीय नागरिकत्व रजिस्टर या संशयास्पद दोन कायद्यांना जनमान्यतेच्या आभासातून बाहेर काढलं आहे. त्यामुळे या आंदोलकांविरोधात रासुकाचा गैरवापर करून पोलिसांनी अनेकांना तुरुंगात डांबलं आहे. एकट्या उत्तर प्रदेश राज्यात ५,५३८ हून अधिक प्रतिबंधात्मक नजरकैदेत ठेवण्यात आलं. या आणि अलीकडच्या अनेक प्रकरणांमुळे हा ४ दशकांचा कायदा पुन्हा चर्चेत आला आहे. इंदिरा गांधी यांच्या सरकारनं अध्यादेशाद्वारे लागू केलेल्या या आदेशाचा वारंवार गैरफायदा कार्यकारी अधिकाऱ्यानं व्यक्तींना ताब्यात घेतल्याबद्दल, भविष्यातील सार्वजनिक व्यवस्थेतील गोंधळ रोखण्याच्या याचिकेचा वापर करून केला आहे. यामुळे राज्यानं मानवी हक्कांचं उल्लंघन मंजूर केलं आहे.  हा कायदा प्रथम १८१८ मध्ये तयार करण्यात आला आणि बंगाल रेग्युलेशन ३ असे नाव देण्यात आले, ज्याचा हेतू ब्रिटिश सरकारला कोणत्याही खटल्याशिवाय संरक्षण आणि सार्वजनिक व्यवस्थेच्या नावाखाली कोणालाही अटक करण्याचे अधिकार देणे हा होता. म्हणजेच या कायद्याचा वापर राजकीय मतभेदांना आळा घालण्यासाठी करण्यात आला होता आणि तो वारसा आता पाळला जात आहे. हा कायदा केवळ मर्यादित कालावधीसाठी लागू करण्यात आला असल्याने त्याची मुदत ३१ डिसेंबर १९६९ रोजी संपणार होती. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी सरकार आणि कायदा अंमलबजावणी संस्थांना अनिश्चित काळासाठी अधिकार देणारा अधिक वादग्रस्त कायदा अर्थात एमआयएसए (अंतर्गत सुरक्षा कायदा, १९७१ ची देखभाल) आणला. इंदिरा गांधी यांच्या सरकारनं लादलेल्या आणीबाणीच्या काळात तो कुप्रसिद्ध झाला. इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस पक्षाचा पराभव करून १९७७ मध्ये सत्तेवर आलेल्या जनता दल सरकारने नंतर तो रद्द केला. परंतु इंदिरा गांधी १९८० मध्ये पुन्हा सत्तेवर आल्या आणि राष्ट्रीय सुरक्षा कायदा, १९८० घेऊन आल्या, ज्याला लोकप्रियपणे  "नो वकील, नो अपील, नो दलील" (वकील नाही, अपील नाही, युक्तिवाद नाही) म्हणून ओळखले जाऊ लागले. एका त्रोटक आकडेवारीनुसार, सर्व प्रकरणांपैकी ७२.५% प्रकरणांमध्ये कार्यकारी अधिकाऱ्यांकडून एनएसएचा गैरवापर किंवा गैरवापर केला जात होता. या कायद्यावर देशातील अनेक बुद्धिजीवींकडून टीकेची झोड उठली असली, तरी त्यानंतर आंतरराष्ट्रीय समुदायाकडूनही त्यावर तितकीच टीका झाली आहे. मानवी हक्क तसेच धोरण आखणीच्या क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक संस्था स्थापनेच्या काळापासून या कृतीवर तसेच त्याच्या वापरावर टीका करत होत्या. त्यापैकी काही चांगल्या समजुतीसाठी सूचीबद्ध आहेत. दक्षिण आशिया मानवी हक्क दस्तऐवज केंद्राने (एसएएचआरडीसी) एनसीआरडब्ल्यूसीला सादर केलेल्या निवेदनात मानवी हक्कांच्या उल्लंघनाच्या चिंतेदरम्यान, प्रतिबंधात्मक अटकेचीस्पष्टपणे परवानगी देणाऱ्या भारतीय संविधानातील त्या तरतुदी हटविण्याची शिफारस केली आहे. अॅम्नेस्टी इंटरनॅशनलने भारत सरकारला एनएसए रद्द करण्याचे आवाहन केले आहे. कॉमनवेल्थ ह्युमन राइट्स इनिशिएटिव्हने (सीएचआरआय) भारतातील मानवी हक्कांच्या उल्लंघनाच्या अहवालात भारतातील विविध कठोर कायद्यांच्या कलमांचा अहवाल दिला, ज्यात एनएसएचाही समावेश होता. लोकांच्या कल्याणासाठी आणलेला हा कायदा त्याच्या विरुद्ध वापरला गेला आहे. राष्ट्रीय सुरक्षा कायद्याच्या राजकीय हेतूने प्रेरित गैरवर्तन स्वातंत्र्य आणि स्वातंत्र्याची काळजी घेणाऱ्या सर्वांकडून त्वरित नापसंती व्यक्त करते. तथापि, सामान्य फौजदारी कायद्याला पर्याय म्हणून एनएसएचा वापर भारतीय नागरिकांच्या मूलभूत हक्कांसाठी तितकाच धोकादायक आहे आणि कदाचित हा अधिक प्रचलित प्रकारचा गैरवापर आहे. म्हणूनच, या कायद्यात सुधारणा करण्याची गरज आहे कदाचित आता नाही, तर नजीकच्या भविष्यात, जेणेकरून सध्या प्रचलित असलेल्या पळवाटांचा पोलिसांच्या मदतीनं सत्ताधारी मंडळी गैरफायदा घेणार नाहीत.

-शाहजहान मगदुम

कार्यकारी संपादक

मो.:८९७६५३३४०४


Tabliq

सुमारे वर्षभरापूर्वी दिल्लीतील निजामुद्दीन येथील तबलिगी जमाअतचे मुख्यालय खूपच गाजले. त्यावेळी दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेद्वारे कोरोना प्रसाराच्या संसर्गादरम्यान धार्मिक मेळावा आयोजित केल्याच्या आरोपावरून त्यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला होता. धार्मिक मेळाव्याला उपस्थित असलेले 24 लोक कोविड-19 पॉज़िटिव असल्याचे आढळून आले तेव्हा या धार्मिक केंद्र कोरोना व्हायरस हॉटस्पॉटच्या रूपात उदयास आले. गुन्हे शाखेने परदेशी कायदा, आपत्ती व्यवस्थापन कायदा, साथीचे रोग कायदा आणि भारतीय दंड संहितेतील विविध तरतुदींनुसार जमाअतच्या 955 परदेशी सदस्यांविरुद्ध खटला दाखल केला.

दिल्ली पोलिसांनी असा आरोप केला की, हे लोक टुरिस्ट व्हिसाच्या माध्यमातून भारतात भारतात प्रवेश केला आणि जमाअतच्या मर्कजमध्ये पार पडलेल्या कार्यक्रमात सहभागी झाले. व्हिसाच्या तरतुदींचे उल्लंघन करण्याव्यतिरिक्त या परदेशी नागरिकांनी संसर्गजन्य रोग तर पसरलाच त्याचबरोबर मर्कजमध्ये उपस्थित असलेल्या लोकांसह सामान्य जनतेच्या जीवालादेखील धोका निर्माण केला, असेही पोलीस म्हणाले.

या कार्यक्रमात सहभागी झालेल्यांपैकी काहींना कोरोना विषाणूची लागण झाल्याचे आढळून आले तेव्हा सरकारने तबलिगी जमातच्या लोकांवर भारतात कोरोना विषाणूचा प्रसार केल्याचा आरोप केला,  ज्यामुळे देशात भीतीचे वातावरण निर्माण झाले. केंद्र सरकारच्या सांगण्यावरून त्यांना शोधून क्वारन्टाइन करण्याची राज्य सरकारांनी देशव्यापी मोहीम हाती घेतली. त्यामुळे एका वर्षानंतर दिल्लीतील तबलिगी जमात कार्यक्रमात सहभागी झालेल्यांचे काय झाले हे जाणून घेणे औत्सुक्याचे ठरेल.       -(उर्वरीत पान 7 वर)

सर्वप्रथम आपण या वस्तुस्थितीकडे पाहू या दिल्लीतील  निजामुद्दीन मर्कजमधील 955 परदेशी नागरिकांवर खटला दाखल करण्यात आला होता. त्यांच्यापैकी 911 जणांनी ‘प्ली बार्गेन’ केले होते आणि आपापल्या मायदेशी परतले होते. ’प्ही बार्गेन’ ही सरकारी वकील आणि प्रतिवादी यांच्यातील एक व्यवस्था आहे ज्यामध्ये प्रतिवादी एखाद्या किरकोळ आरोपासाठी स्वतःला दोषी मानतो आणि त्याऐवजी मोठे आरोप एकतर रद्द केले जातात किंवा त्यांना कठोर शिक्षा दिली जात नाही. उर्वरित 44 परदेशी नागरिकांनी खटल्याला सामोरे जाण्याचा निर्णय घेतला, त्यापैकी 8 जणांना प्राथमिक पुराव्यांअभावी खटला सुरू होण्यापूर्वी सोडून देण्यात आले आणि उर्वरित 36 जणांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली.

दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या खटल्याव्यतिरिक्त दिल्लीतील विविध पोलिस ठाण्यांमध्ये जमाअतच्या सदस्यांविरुद्ध आणखी 29 गुन्हे दाखल करण्यात आले होते. दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ते एकाच वेळी साकेत कोर्टात स्थानांतरित करण्यात आले. यातील काही खटले रद्द करण्याची याचिका दिल्ली उच्च न्यायालयात प्रलंबित असल्याने ट्रायल कोर्टास या याचिकांचा निकाल लागल्याशिवाय कोणताही आदेश देण्यास उच्च न्यायालयाने मनाई केली आहे. सध्या या 29 खटल्यांपैकी केवळ 13 खटले प्रलंबित आहेत आणि 51 भारतीय नागरिकांचा या खटल्यांमध्ये समावेश आहे. दिल्ली पोलिसांनी वेगवेगळ्या भागात दाखल केलेल्या 29 प्रकरणांमधील 193 परदेशी नागरिक हे गुन्हे शाखेच्या खटल्यानुसार निजामुद्दीन मर्कजमध्ये आढळले होते, असे तबलिगी जमाअतच्या वकील आशिमा मांडला यांनी म्हटले आहे.

मांडला म्हणतात, आम्ही न्यायालयाला सांगितले की, ज्या लोकांना मर्कजमधून ताब्यात घेण्यात आले त्याच लोकांवर शहरातील अन्य मस्जिदींमध्ये त्याच दिवशी दाखवून त्यांच्याविरुद्ध स्वतंत्र खटले दाखल करण्यात आले, हे कसे शक्य आहे? आशिमा मंडला म्हणतात की, ’प्ली बार्गेन’ अंतर्गत दिल्लीतील तबलिगी जमाअतच्या लोकांनी सुमारे 55 लाख रुपये दिल्ली उच्च न्यायालयात दंड म्हणून जमा केले असून त्यापैकी सुमारे 20 लाख रुपये पीएम केअर फंडात जमा झाले आहेत. मांडला यांच्या मते, तबलिगी जमातच्या लोकांची निर्दोष मुक्तता करण्याचा आदेश 15 डिसेंबर 2020 रोजी आला होता आणि दिल्ली सरकारने अद्याप कोणतेही अपील केलेले नाही. मांडला यांच्या मते निर्दोष सुटलेल्या 36 लोकांपैकी एक ट्युनिशियन नागरिक होता जो मरण पावला आहे.  उर्वरित 35 लोक आपल्या मायदेशी परतले आहेत, पण त्यांना अशी अट घालण्यात आली आहे की या  प्रकरणात पुढील सहा महिन्यांत अपील झाल्यास त्यांनी सहकार्य करावे. जर निर्दोष सुटल्यानंतर सहा महिन्यांपर्यंत अपील न झाल्यास त्यांना खटल्यातून निर्दोष मुक्त समजले जाईल.

या मुद्द्यावर विविध न्यायालये काय म्हणतात?

परदेशी नागरिकांना बळीचा बकरा बनविण्यात आला होता आणि त्यांच्याविरूद्ध ली कारवाई नागरिकता (संशोधन) कायद्याच्या विरोधानंतर भारतीय मुस्लिमांसाठी एक अप्रत्यक्ष चेतावणीच आहे, असे म्हणत गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने याच प्रकरणात 29 परदेशी नागरिक आणि सहा भारतीयांविरुद्ध दाखल केलेला एफआयआर फेटाळून लावला. तबलिगी जमाअत कार्यक्रमाच्या प्रसारमाध्यमांच्या वृत्तसंकलनावरील याचिकेच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश एस. ए. बोबडे यांच्या अध्यक्षतेखालील तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाने सांगितले की, अलीकडच्या काळात भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा सर्वाधिक गैरवापर झाला आहे. तबलिगी जमाअत प्रकरणावरून प्रसारमाध्यमांचा एक गट जातीय द्वेष पसरवत असल्याचे सांगत एका याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने हे विधान केले.

डिसेंबर 2020 मध्ये दिल्लीतील एका न्यायालयाने 36 परदेशी तबलिगी जमाअतच्या सदस्यांची निर्दोष मुक्तता करताना सांगितले की आरोपी नमूद केलेल्या तारखेला मर्कजमध्ये पोहोचले किंवा मार्च 2020 अखेरपर्यंत मर्कजमध्ये राहिले हे हजेरी रजिस्टर देखील सिद्ध करत नाही. न्यायालयाने स्पष्टपणे म्हटले की 12 मार्च ते 1 एप्रिल या कालावधीत मर्कजमध्ये कोणत्याही आरोपीचे अस्तित्व सिद्ध करण्यात सरकारी वकील अपयशी ठरले. कुठेही उल्लंघन झालं असं वाटत नाही. तबलिगी जमाअतच्या एका तरुण सदस्याने दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना अलाहाबाद उच्च न्यायालयाने डिसेंबर 2020 मध्ये म्हटले होते की, नवी दिल्लीतील तबलिगी जमाअत कार्यक्रमात सहभागी झाल्यावर एखाद्यावर खुनाचा प्रयत्न केल्याचा आरोप करणे हे कायद्याचा गैरवापर करण्यासारखे आहे. ऑक्टोबर 2020 मध्ये मुंबईतील एका न्यायालयाने तबलिगी जमाअतच्या 20 परदेशी सदस्यांची निर्दोष मुक्तता  करताना म्हटले की त्यांच्याविरुद्ध जरादेखील पुरावा नाही.

मर्कज पुन्हा उघडू शकते?

कोविद-19 च्या संक्रमणादरम्यान धार्मिक सभा आयोजित केल्याच्या आरोपावरून बंद करण्यात आलेल्या निजामुद्दीन येथील तबलिगी जमाअतचे मर्कज अजूनही पुन्हा सुरू होण्याच्या प्रतिक्षेत आहे.

दिल्ली सरकारने धार्मिक कार्यासाठी मर्कज पुन्हा सुरू करण्याचे मान्य केले असले तरी शब-ए-बारातच्या निमित्ताने राज्य वक्फ बोर्डाने निवडलेल्या 50 जणांना निजामुद्दीन मर्कज येथील एका मस्जिदीत प्रार्थना करण्याची परवानगी दिली जाऊ शकते, असे केंद्र सरकारने म्हटले होते.

याबाबत दिल्ली उच्च न्यायालयाचा निर्णय अद्याप आलेला नाही. 

दिल्ली सरकारने उच्च न्यायालयाला सांगितले आहे की, गेल्या वर्षी सोशल डिस्टन्सिंगच्या तथाकथित उल्लंघनाच्या प्रकरणात अडकलेल्या अनेक परदेशी नागरिकांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे आणि उर्वरित लोकांवर खटल्यास विलंब लागू शकतो आणि गेल्या जूनमध्ये सर्व धार्मिक स्थळे पुन्हा सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे न्यायालय मर्कजमधील धार्मिक कार्ये पुन्हा सुरू करण्याचा आदेश देऊ शकते.

दिल्ली वक्फ बोर्डाने न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेद्वारे मर्कजमधील मस्जिदी, मदरसे आणि वसतिगृहांसह संपूर्ण कॅम्पस सुरू करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी केली आहे.

तबलिगी जमाअत म्हणजे काय?

1926-27 मध्ये भारतात तबलिगी जमाअतची स्थापना झाली. इस्लामी विचारवंत मौलाना मुहम्मद इलियास    यांनी त्याचा पाया घातला. मौलाना मुहम्मद इलियास यांनी दिल्ली लगतच्या मेवात येथील लोकांना धार्मिक शिक्षण देण्याचे काम सुरू केले. नंतर ही मालिका पुढे वाढत गेली.

तबलिगी जमाअतची पहिली बैठक 1941 साली भारतात झाली आणि त्यात 25,000 लोक सहभागी झाले होते. 1940 च्या दशकापर्यंत जमाअतचे कार्य अविभाजित भारतापुरतेच मर्यादित होते, पण नंतर त्याच्या शाखा पाकिस्तान आणि बांगलादेशात पसरल्या. जमाअतचे कार्य झपाट्याने पसरले आणि ही चळवळ जगभर पसरली. तबलिगी जमाअतचे सर्वांत मोठे संमेलन दरवर्षी बांगलादेशात होते, तर पाकिस्तानात देखील रायविंडमध्ये एक वार्षिक कार्यक्रम आयोजित केला जातो, ज्यामध्ये जगभरातील लाखो मुस्लिम सहभागी होतात. त्याची केंद्रे 140 देशांमध्ये आहेत. भारतातील सर्व प्रमुख शहरांमध्ये याचे मर्कज (केंद्र) आहे. या केंद्रामध्ये वर्षभर इज्तेमा (धार्मिक शिक्षणासाठी लोकांचे एकत्रित जमणे) सुरू असतो.

तबलिगी जमाअतचा शाब्दिक अर्थ ‘आस्था आणि श्रद्धा लोकांदरम्यान पसरवणारा समूह’ असा होतो. सामान्य मुस्लिमांपर्यंत पोहोचणे आणि विशेषतः आयोजन, पेहराव आणि वैयक्तिक वर्तणुकीच्या बाबतीत त्यांचा विश्वास-आस्था पुनरुज्जीवित करणे हा या लोकांचा उद्देश आहे.


- राघवेंद्र राव

(बीबीसी हिंदी मधून साभार)


kaba

जगात जेवढे काही धर्म आहेत त्यांना काहीतरी नाव आहे. धर्माचे नाव एका विशिष्ट व्यक्तीवर ठेवले जाते किंवा त्या वंशाच्या धर्मावर असते ज्यात तो वंश उदयास येतो.  उदाहरणार्थ ख्रिश्चन धर्म हा ईसा (अलैहिस्सलाम) यांच्या नावावर आहे. बौद्ध धर्म गौतम बुद्धांच्या नावावर आहे. ज्यू धर्माचे नाव ज्यूमधील एका कबिल्याच्या नावावर यहूदी ठेवलेले आहे ज्याचे नाव यहुदा होते. असाच प्रकार इतर धर्मांच्याबाबतीत आहे. पण इस्लाम धर्माचे नाव कोणत्या व्यक्ती अथवा वंशाच्या नावावर नाही. इस्लाम ही एक खास / विशिष्ट प्रवृत्तीला जाहीर करतो जी इस्लाम या शब्दात आहे. हे नाव कुठल्याही व्यक्तीने शोधून काढलेले नाही किंवा हे नाव एखाद्या वंशाच्या नावावर ठेवलेले आहे. याचा सबंध कोणा व्यक्ती किंवा देशाशीही नाही. फक्त इस्लामची गुणवैशिष्ट्ये लोकांमध्ये बानवणे याचा उद्देश आहे. प्रत्येक काळात ते लोक जे सत्य बोलत होते, पवित्र आचरण करत होते ते सर्व मुस्लिम होते आहे आणि भविष्यातही राहतील. (अरबी भाषेत इस्लामचा अर्थ होतो आदेश मानने. इस्लाम या शब्दाचा दूसरा अर्थ शांती, आश्रय देणे, संरक्षण करणे सुद्धा आहे.) 

आपण पाहतो जगात आज जितक्या काही वस्तू आहेत ते एका नियमात बांधलेल्या आहेत. सूर्य, चंद्र, पृथ्वी सर्व आपल्या ठरवून दिलेल्या कक्षेतच फिरतात. पाणी, हवा, झाड-झुडपे सर्व काही एक नियमानुसार चालतात. मनुष्यासाठीही हे नियम आहेतच तो सुद्धा या नियमाप्रमाणेच श्वास घेतो, पाणी पितो, जेवन करतो त्याच्या शरीराचे सर्व अवयव काम करत असतात.  

या सर्व गोष्टी ज्या निर्मात्याने बनविल्या त्यानेच या नियमात या गोष्टींना बांधले आहे. संपूर्ण सृष्टी त्याचा आदेश मानणारी आहे. त्याप्रमाणे या सर्वांचा धर्म इस्लाम आहे व त्या सर्व गोष्टी मुसलमान आहेत. कारण ते आपल्या निर्मात्याचे म्हणजेच अल्लाहच्या आदेशाचे पालन करीत आहेत. 

सूर्य,चंद्र, तारे, जमीन, वृक्ष, दगड, प्राणी या सर्व गोष्टी मुस्लिम आहेत व सर्व मनुष्यही मुस्लिम आहेत पण काही मनुष्य शिर्क व कुफ्र सारखे गुन्हा करून मुस्लिम बनण्यापासून वंचित राहतात. 

मनुष्याला आपले मार्ग निवडण्याचे स्वातंत्र्य आहे, तो इस्लाम आत्मसात करून मुस्लिम होऊ शकतो पण हे त्याच्या निवडीची बाब आहे. 

एक व्यक्ती आहे जो आपल्या निर्मात्याला ओळखतो व त्यालाच आपला मालक समजतो आणि तो आपल्या जीवनात आपल्या निर्मार्त्याने घालून दिलेल्या नियमांचे पालन करतो तो पूर्णपणे मुस्लिम आहे तो आता सत्य व शांतीच्या मार्गाने अनुकरण करेल. 

कुफ्र म्हणजे काय?

आता एक दुसरा व्यक्ती जो जन्मतः तर मुस्लिम आहे पण त्याने अल्लाहचे आदेश मानले नाहीत तर तो व्यक्ती काफीर आहे. कुफ्रचा अर्थ लपवने, नकार देणे किंवा पडदा टाकणे असा होतो. 

कुफ्रचे नुकसान

कुफ्र हे एक अज्ञान आहे, अथवा खरे अज्ञान कुफ्रच आहे. जो व्यक्ती आपल्या निर्मात्याला मानण्यास मनाई करत असेल ज्याने कार्बन, सोडियम व कितीतरी गोष्टींना मिळवून मनुष्य तयार केले. ज्याने एवढे सुंदर जग अगदी काटेकोरपणे बनवले ज्याच्याकडे सर्व ज्ञान आहे त्याचा आदेश मानण्यास नकार करणाऱ्याला अज्ञानीच म्हणावे लागेल.

त्याने आता जीवनात कितीही ज्ञान आत्मसात केले तरीही त्याचा उपयोग नाही कारण त्याला ज्ञानाचे पहिले टोकच मिळाले नाही. 

सर्वात मोठे अत्याचार / दडपण कुफ्र आहे कारण आपल्या प्रवृत्तीच्या विरोधात त्यांच्याकडून काम करून घेतले जाते. सर्व गोष्टींची प्रवृत्ती आहे कि ते अल्लाहच्या आदेशाचे पालन करावेत. पण कुफ्र करणारा व्यक्ती या प्रवृत्तीच्या विरूद्ध कामे करतो. 

कुफ्र म्हणजे दडपणे नव्हे तर बंड, कृतघ्नता व नमक-हरामीपण आहे. ज्या अल्लाहने बुद्धी दिली त्याच बुद्धीचा वापर अल्लाहविरूद्ध होत असेल तर त्याला बंड म्हणणार. ज्या अल्लाहमुळे आपण जगतो आहोत त्या अल्लाहचे आभार न मानणे व त्याविरूद्धच कारवाया करणे यालाच नमक-हरामी म्हणतात. 

कुफ्रमुळे जे काही नुकसान होते ते मनुष्याचेच होते. ज्या बादशाहची सल्तनत एवढी मोठी आहे कि वैज्ञानिकांनाही याच्या शेवटच्या टोकाचा शोध घेता आला नाही. त्या अल्लाहचे मनुष्याचे त्याला मानण्या न मानण्याने काही नुकसान होणार नाही.

कुफ्र करणाऱ्याला कधीच सत्याचा मार्ग सापडणार नाही व ज्ञान प्रप्त होणार नाही. त्याचे सामाजिक जीवन खराब होईल त्याची आर्थिक स्थिती खराब होईल. त्याची सत्ता खराब होईल, तो जगात अशांतता पसरवेल. हिंसा करेल, दुसऱ्यांचे हक मारेल, दडपशाही करेल कारण जो आपल्या निर्मात्याला ओळखत नाही त्यात काय नितीमत्ता आणि काय सत्य असणार तो आपली संपत्ती गैरप्रकारे कमवेल. आखिरतच्या दिवशी त्याचेच हात, पाय व इतर अवयव त्याच्या विरूद्ध अल्लाहच्या दरबारात ग्वाही देतील. 

इस्लामचे फायदे

अल्लाहने मनुष्याला विचार करण्याची, बरोबर-चूक कोणते ही ओळखण्याचा विवेक दिला आहे तसेच स्वातंत्र्यही दिले आहे. हे स्वातंत्र्यच खरी परीक्षा आहे. आपण या स्वातंत्र्याचा वापर कसे करतो यावर आपले यश अवलंबून आहे. आपण ईश्वराला ओखळून सत्य व त्याच्या कायद्याचे पालन करत असू तर आपल्याला यश मिळेल अन्यथा नाही. 

जो मुसलमान असेल तो आपल्या ज्ञानाचा उपयोग मनुष्याचा कल्याणासाठी करेल तो कधीच स्वतःला कुठल्याही गोष्टीचा मालक समजणार नाही त्यात अहंकार असणार नाही. 

तसेच इतिहास, अर्थशास्त्र, राज्यशास्त्राचे ज्ञान मिळवून एक मुस्लिम आपल्या प्रयत्नाने एका काफीरापेक्षा मागे नसेल. पण दोघांत अंतर असेल. एक मुस्लिम चांगल्या पद्धतीने या ज्ञानाचा वापर करेल. भूतकाळात तो वंश ज्या जमाती नष्ट झाल्या त्यांच्यापासून तो बोध घेईल. 

मुसलमानाचे विचार हे सत्य. अल्लाहला मानणारे असतील तो सर्व काही अल्लाहचे आहे असे मोल व अल्लाहने दिलेल्या गोष्टींचा वापर अल्लाहच्या मर्जीच्या प्रमाणे तो करेल. कारण त्याला एकादिवशी सर्व गोष्टींचा हिशोब द्यावा लागणार आहे. 

असे ज्याचे विचार असतील तो स्वतःला वाईट कामांपासून मुक्त ठेवेल. तो आपल्या बुद्धीला वाईट विचारांपासून रोखेल. डोळ्यांनी, कानांनी वाईट काम करणार नाही. त्यांच्या तोंडून वाईट गोष्टी निघणार नाहीत. तो आपले हात अत्याचार करण्यासाठी उचलणार नाही, त्याचे पाय चुकीच्या जागी जाणार नाहीत. तो गैरप्रकारे ऐशआरामाचे जीवन जगणार नाही तर तो साधे जीवन जगेल. 

या व्यक्तीसारखा सभ्य कोणीही नसेल तो दोन्ही जगात यश संपादन करेल. त्याच्यासारखा सन्मान कोणाचा नसेल कारण तो अल्लाहशिवाय कोणासमोर झुकत नाही. त्याच्यासारखा ताकतवान कोणी नसेल कारण त्याच्या मनात अल्लाहशिवाय कोणाचीही भीती नाही. तो थोड्या संपत्तीवरच समाधान मानणारा असेल तो सर्वांना प्रिय असेल कारण तो सर्वांची मदत करेल. सर्वांचे हक अदा करेल. 

मुस्लिमाची ही प्रवृत्ती बघितल्यानंतर एक मुस्लिम कधीच अस्वाभीमानी व खालच्या दर्जाचा राहूच शकत नाही.

या जगात अल्लाहच्या आदेशाचे पालन करून व सन्मानाने जीवन जगल्यानंतर त्या जगात अल्लाह कधीही न संपणारे खजीने आपल्या गुलामासाठी खुले करेल व अशाप्रकारे इस्लामचे अनुयायी दोन्ही जगांत यश संपादन करतात. 

इस्लाम हा धर्म कुण्या एका विशिष्ट देशाचे किंवा वंशाचे लोकांचे नाव नसून तो संपूर्ण मानवजातीच्या मालकीचे आहे. प्रत्येक युगात प्रत्येक देशात जो व्यक्ती अल्लाहला जाणला व सत्याचे आचरण ज्याने केले ते सर्व मुस्लिम होते. त्यांचा धर्म इस्लाम होता. (संदर्भ : दिनीयात भाग 1 चा सार. )


- अबु सकलैन रफिक अहमद पटेल, 

लातूर 

9860551773


लोकहो, आम्ही तुम्हाला एका पुरुष व एका स्त्रीपासून निर्माण केले आणि मग तुमची राष्ट्रे आणि वंश बनविले जेणेकरून तुम्ही एकमेकांना ओळखावे. वास्तविकतः अल्लाहजवळ तुमच्यापैकी सर्वात जास्त प्रतिष्ठित तो आहे जो तुमच्यापैकी सर्वात जास्त ईशपरायण आहे. निश्चितच अल्लाह सर्वकाही जाणणारा आणि खबर राखणारा आहे.’’  (सुरे अलहजरात आयत नं. 13)

आजच्या धावपळीच्या जगामध्ये जीवनाचा गांभीर्याने विचार करायला लोकांकडे वेळच नाही. उपजिविकेची काळजी लोकांना जीवनासंबंधी आणि विशेषतः मरणोत्तर जीवनासंबंधी विचार करण्याची संधीच देत नाही. जीवन काय आहे? शाप आहे की वरदान? ठरवून केलेली खेळी आहे की निव्वळ योगायोग? परिपूर्ण आहे का अपूर्ण ? आपल्याला कोणी जन्माला घातले की आपण आपोआप जन्माला आलो? जन्म देण्यामध्ये आई-वडिलांव्यतिरिक्त तिसरी कोणती शक्ती कार्यरत होती काय? होती तर मग ती शक्ती कोणती? ती कशी आहे? का तिने आपल्याला जन्माला घातले? या सर्व प्रश्नांची उत्तरे कोठे सापडतील? ही सारी प्रश्नावली केवळ काल्पनिक नसून या मागे निश्चित असा कार्यकारणभाव आहे व तो कुरआनने मोठ्या सुंदर पद्धतीने उलगडून दाखविलेला आहे. 

मुळात कुरआन एक नसून दोन आहेत. एक पुस्तक स्वरूपात तर दुसरा प्रेषित मुहम्मद सल्ल. यांच्या स्वरूपात. जर फक्त पुस्तकाचे अवतरण झाले असते तर त्याचा परिणाम तेवढा झाला नसता जेवढा आज आहे. आज जवळ-जवळ 200 कोटी लोक मुस्लिम आहेत व ते गर्वाने स्वतःला मोहमेडन अर्थात प्रेषित मुहम्मद सल्ल. यांचे पाईक असल्याचा उल्लेख करतात. प्रेषित मुहम्मद सल्ल. यांचे वारस म्हणून कुरआनचे प्रात्यक्षिक दाखविण्याचे काम मुस्लिमांचे आहे. फक्त कुरआन वाटप करून जमणार नाही तर स्वतः कुरआनचे प्रात्यक्षिक दाखविल्याशिवाय इतरांना कुरआन काय आहे समजणार नाही. 

ज्याप्रमाणे गुलाबासोबत काटे असतात तसेच सामाजिक स्वातंत्र्यासोबत वाईट गोष्टी असतात. इस्लाम स्वतंत्र समाजामधून ’इव्हील’ म्हणजे वाईट गोष्टी समाप्त करू इच्छितो. दुसऱ्या जीवन व्यवस्थेमध्ये वाईट गोष्टींना उत्तेजन दिले जाते. 

प्रसिद्ध समाजशास्त्री अनिल उपाध्याय यांच्या मते इस्लाममध्ये कट्टरता आहे, हे सत्य आहे. पण ती कट्टरता सत्यासाठीची आहे, न्यायासाठीची आहे, मानव कल्याणाविषयी आहे. हीच कट्टरता लोकांना नकोय. या कट्टरतेमुळेच ते नाराज आहेत. त्यांना लवचिक व्यवस्था पाहिजे. इस्लाम त्याच्यासाठी तयार नाही. 

कुरआनचे मानवीय स्वरूप

कश्ती-ए-हक का जमाने में सहारा तू है

असरे नौरात है धुंदलासा सितारा तू है

मागच्या आठवड्यात आपण ’त्या 24’ आयातीचे विश्लेषण केले होते ज्या संंबंधी धिक्कारपात्र वसीम रिझवीने  सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केलेली आहे. या आठवड्यात कुरआनच्या त्या आयातींचा उहापोह करण्याचा विचार आहे. ज्यांच्याकडे सहसा कोणाचे लक्ष जात नाही. 

1. ’’पृथ्वीवर उपद्रव माजवू नका’’ (सुरे बकरा आयत नं.11)

2. ’’ईश्वर न्याय करणाऱ्यांना पसंत करतो’’ (सुरे अलमायदा आयत नं. 42)

3. ’’ निवाडा न्यायपूर्ण पद्धतीने करा’’ (सुरे अलमायदा आयत नं.42)

4. ’’हे श्रद्धावंतांनो, अल्लाहसाठी सत्यावर अढळ राहणारे व न्यायाची ग्वाही देणारे बना. एखाद्या गटाच्या शत्रुत्वाने तुम्हाला इतके प्रक्षोभित करू नये की तुम्ही न्यायापासून विमुख व्हाल. न्याय करा, हे ईशपरायणतेशी अधिक निकटवर्ती आहे. अल्लाहचे भय बाळगून कार्य करीत राहा. जे काही तुम्ही करता, अल्लाह त्याची पुरेपूर खबर ठेवणारा आहे.’’(सुरे अलमायदा आयत नं. 8)

जगाला न्यायाशिवाय दुसऱ्याच कुठल्याच गोष्टीची गरज नाही. - ताब्दुक ऍम्रे (प्रसिद्ध तुर्की सुफी संत) 

वरील सर्व आयातींमध्ये पृथ्वीमध्ये राहणाऱ्यांचे सर्वोच्च कल्याण करण्यासाठी त्या मुलभूत गोष्टींचा उल्लेख केलेला आहे ज्यांची गरज एका आदर्श समाजाच्या निर्मितीसाठी आवश्यक आहे. पहिल्या आयातीमध्ये म्हटलेले आहे की, पृथ्वीवर उपद्रव माजवू नका. म्हणजेच सभ्यतेने रहा. दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या आयातीमध्ये न्यायाचे महत्त्व विशद केलेले आहे. न्याय निष्पक्षपणे करण्याचे निर्देश दिलेले आहेत. न्याय करतांना तुम्हाला अशा लोकांचाही विचार करावा लागेल जे तुम्हाला आवडत नाहीत किंवा ज्यांच्याशी तुमचे वैर आहे. त्या वैराचा परिणाम तुमच्या न्यायबुद्धीवर होवू नये याची काळजी घेण्याचे निर्देश दिलेले आहेत. न्यायाशिवाय सामाजिक शांतता प्रस्थापित होवू शकत नाही. राजकीय शक्तीने, लष्करी बळाने जरी लोकांची मुस्कटदाबी करता येत असली तरी तो एक ’सप्रेस्ड वॉर’ असतो. म्हणून इस्लाममध्ये न्याय करण्यास फार महत्त्व दिलेले आहे. न्याय करण्यासाठी न्यायबुद्धी अत्यंत जरूरी असते. न्यायबुद्धी निर्माण करण्यासाठी जागतिक दृष्टीकोण आवश्यक असतो आणि तो दृष्टीकोन निर्माण करण्यासाठी कुरआन म्हणतो की, ’’लोकहो! आम्ही तुम्हाला एका पुरुष व एका स्त्रीपासून निर्माण केले आणि मग तुमची राष्ट्रे आणि वंश बनविले जेणेकरून तुम्ही एकमेकांना ओळखावे. वास्तविक पाहता अल्लाहजवळ तुमच्यापैकी सर्वात जास्त प्रतिष्ठित तो आहे जो तुमच्यापैकी सर्वात जास्त ईशपरायण आहे. निश्चितच अल्लाह सर्वकाही जाणणारा आणि खबर राखणारा आहे.’’  (सुरे अलहजरात आयत नं. 13)

जेव्हा जगातील सर्व लोक एका आई-वडिलांची संतती आहे एवढा व्यापक दृष्टीकोण माणसाच्या विचारांचा ताबा घेतो तेव्हाच तो न्याय करू शकतो. संकुचित दृष्टीकोणाने न्याय कधीही होवू शकत नाही, ही सूर्यप्रकाशाएवढे स्वच्छ गोष्ट आहे. धर्माच्या बाबतीत कुरआनचे म्हणणे स्पष्ट आहे की, 

1.’’ धर्माच्या बाबतीत जबरदस्ती नाही.’’ (सुरे बकरा आयत नं. 256).

2. ’’ जर तुझ्या पालनकर्त्याची अशी इच्छा असती की, पृथ्वीतलावर सर्व (लोक) श्रद्धावंत / आज्ञाधारक अर्थात मुस्लिमच असावेत.’’ तर सर्व भूतलवासियांनी (तशी) श्रद्धा ठेवली असती. मग तू (काय) लोकांना भाग पाडशील. की ते श्रद्धावंत बनावेत?’’ (सुरे युनूस आयत नं.99)

इस्लामच्या बाबतीत असा एक व्यापक गैरसमज लोकांमध्ये पसरलेला आहे की, इस्लाम हा तलवारीच्या बळावर पसरलेला धर्म आहे. ही धारणा अतिशय चुकीची आहे. भारताच्या पूर्वेकडील मलेशिया, इंडोनेशिया, ब्रुनोई या मुस्लिम व 8 कोटी उइगर मुस्लिम असलेल्या चीन सारख्या देशांचा इतिहास पाहिला तर एक गोष्ट लक्षात येईल की, मुस्लिमांनी कधीच या देशावर आक्रमण केलेले नव्हते. तरी सुद्धा ही राष्ट्रे मुस्लिम आहेत. इंडोनेशिया तर जगातील सर्वात मोठे मुस्लिम राष्ट्र आहे. स्पष्ट आहे, येथे इस्लाम आपल्या वैचारिक क्षमतेच्या आणि मुस्लिमांच्या चारित्र्याच्या बळावर विस्तारपावला. भारतासारख्या देशात जरी मुस्लिम आक्रमणकर्ते आले आणि इथे शेकडो वर्ष त्यांनी राज्य केले, तरी त्यांची आक्रमणे ही राजकीय स्वरूपाची होती, संयोगाने ते मुस्लिम होते. अपवाद वगळता इस्लामचा प्रचार आणि प्रसार हे त्यांचे कधीच धोरण नव्हते. मुळात ताकदीच्या बळावर श्रद्धा बदलता येते, हेच गृहितक चुकीचे आहे. 

वरील पहिल्या आयातीमध्ये स्पष्ट म्हटलेले आहे की, धर्माच्या बाबतीत जबरदस्ती नाही. इस्लामच्या बाबतीत कोणावर जबरदस्ती करताच येत नाही. साधे अतिक्रमण करून मस्जिद बांधता येत नाही तर लोकांच्या श्रद्धेवर अतिक्रमण कसे करता येईल? दुसऱ्या आयातीमध्ये स्पष्ट म्हटलेले आहे की, ईश्वराची ही इच्छाच नाही की, पृथ्वीवरील सर्व लोकांना बळजबरीने मुस्लिम बनविण्यात यावे. स्पष्ट आहे त्याची जर तशी इच्छा असती तर पृथ्वीवर एकही माणूस बिगर मुस्लिम राहिला नसता. म्हणूनच मुस्लिमेत्तरांबरोबर विनाकारण युद्ध करण्याची परवानगी इस्लाम देत नाही. कुरआनमध्ये स्पष्ट म्हटलेले आहे की, 

1. ’’ आणि तुम्ही अल्लाहच्या मार्गात त्या लोकांशी लढा जे तुमच्याशी लढतात परंतु अतिरेक करू नका. अल्लाहला अतिरेक करणारे आवडत नाहीत.’’ (सुरे अलबकरा आयत नं. 190)

पहा! यात स्पष्ट म्हटलेले आहे की, ईश्वराच्या मार्गात त्या लोकांशी लढा जे तुमच्याशी लढतात. यात मुस्लिम आणि मुस्लिमेत्तर असा फरक नाही. जे तुमच्याशी लढतील त्यांच्याशी लढण्याची परवानगी दिलेली आहे. ही किती न्यायसंगत बाब आहे, हे वाचकांनी स्वतःच ठरवावे. उलट यात असे म्हटलेले आहे की, लढतांना अन्याय करू नका. म्हणजे या ठिकाणी शत्रुंशी लढतांना सुद्धा अतिरेक करण्यापासून रोखण्यात आलेले आहे. म्हणूनच माझे स्पष्ट मत आहे की, कुरआन म्हणजे तीन गोष्टींचा समुच्चय आहे. कृपा, कृपा आणि कृपा.

2.  ’’जर अल्लाह अशा प्रकारे मानवाच्या एका समुदायाला (दंगलखोर आणि अत्याचारी) दुसऱ्या समुदायाच्या हस्ते हटवत नसता तर पृथ्वीची व्यवस्था बिघडली असती.  परंतु जगातील लोकांवर अल्लाहची मोठी कृपा आहे की (तो अशा तर्हेने हिंसाचाराच्या विनाशाची व्यवस्था करीत असतो.)’’  (सुरे अलबकरा आयत नं.:251)

या आयातीमध्ये अल्लाहच्या त्या वैशिष्ट्याचे वर्णन केलेले आहे ज्यात ईश्वराने अत्याचारी गटांचा बिमोड दुसऱ्या न्याय गटांच्या माध्यमातून करण्याची व्यवस्था ठेवली नसती तर पृथ्वीवरची सर्व व्यवस्थाच बिगडून गेली असती. हे असे सत्य आहे जे की, कोणत्याही सामान्य बुद्धिच्या माणसाच्या लक्षात आल्याशिवाय राहणार नाही. 

3. ’’मग काय कारण आहे की तुम्ही अल्लाहच्या मार्गात त्या असहाय पुरुष-स्त्रियां आणि मुलांकरिता लढत नाही जे दुर्बल असल्यामुळे त्यांचे दमन केले गेले आहे आणि (असे लोक) धावा करीत आहेत की, हे पालनकर्त्या! आम्हाला या वस्तीतून बाहेर काढ ज्याचे रहिवाशी अत्याचारी आहेत, आणि तुझ्याकडून आमचा एखादा वाली व सहायक निर्माण कर.’’  (सुरे अन्निसा आयत नं.:75). 

आयीन-ए-नौ से डरना तर्ज़े कुहन पे अड़ना

मंज़िल यही कठीण है कौमों की ज़िंदगी में 

या आयातीमध्ये एका अशा मुद्याकडे सभ्य आणि सक्षम लोकांना ईश्वराने आवाहन केलेले आहे की, तुम्ही सक्षम असून, त्या स्त्री- पुरूष आणि मुलांकरिता का लढू इच्छित नाही, ज्यांच्यावर अत्याचार होत आहेत. साधारणपणे दुर्बलांचे रक्षण करणे हे सबलांचे नैतिक कर्तव्य आहे आणि याच कर्तव्याकडे या आयातींमध्ये न्यायप्रिय लोकांचे लक्ष वेधण्यात आलेले आहे. आणि त्या अत्याचारग्रस्त लोकांच्याकडून अत्याचार कणाऱ्या लोकांविरूद्ध लढताना जी हिंसा होणार आहे त्या हिंसेला ईश्वराने ’न्याय हिंसा’ ठरवलेले आहे आणि हे सत्य समजण्यासारखे आहे. 

सरसकट बिगर मुस्लिमांच्याविरूद्ध कुठलेही कारण नसतांना ’लढा’ असे निर्देश देणारी एकही आयत कुरआनमध्ये नाही. उलट कुरआन म्हणतो की, 

1. ’’अल्लाह तुम्हाला या गोष्टीची मनाई करीत नाही की तुम्ही त्या लोकांशी सद्व्यवहार आणि न्यायाचे वर्तन करावे, ज्यांनी धर्माच्या बाबतीत तुमच्याशी युद्ध केले नाही आणि तुम्हाला तुमच्या घरातून बाहेर काढले नाही. अल्लाह न्याय करणाऱ्यांना पसंत करतो.’’  (सुरे अलमुम्तहना आयत नं. 8).

ही आयत स्वयंस्पष्ट आहे. त्याच लोकाशी लढण्याची परवानगी आहे ज्यांनी तुमच्यावर अत्याचार केलेले असतील. धर्माच्या कारणावरून तुम्हाला घरातून बाहेर काढले असतील. बाकी कोणत्याही धर्माचे लोक असो त्यांच्याशी न्यायपद्धतीने वागा. कारण असे लोकच ईश्वराला प्रिय आहेत. एवढे स्पष्ट उदाहरण दिलेले असतांना असे म्हणायला कुठे जागा राहते की, इस्लाम हा इतर धर्मियांचा द्वेष शिकवितो. त्यांच्याविरूद्ध हिंसा करायला प्रेरित करतो. 

या काही मोजक्या आयाती आहेत ज्या मी वाचकांच्या सेवेमध्ये सादर केलेल्या आहेत. अशा अनेक आयातींनी कुरआन भरलेले आहे. प्रश्न फक्त त्या आयातींचा मतीतार्थ समजून घेण्याचा आहे व याची प्राथमिक जबाबदारी मुस्लिमांची आहे. मुस्लिमेत्तरांना त्यांच्या भाषेत कळेल अशा पद्धतीने कुरआनचा उपदेश पोहोचविणे हे त्यांच्या जीवनाचे उद्देश आहे. मुळात मुस्लिम समाजातील एक मोठा वर्ग कुरआनपासून व्यवहार्यरित्या तुटलेला असल्यामुळे कुरआनमधील निर्देशांचा परिणाम त्यांच्या जीवनात दिसून येत नाहीत. म्हणून अशा लोकांचे जीवनसुद्धा तणावग्रस्त आहे आणि भौतिकवादी लोकांच्या जीवनापेक्षा वेगळे नाही. 

वस्तुस्थिती अशी आहे, इस्लाम तीन प्रकारच्या लोकांना पसंत नाही. एक- ज्यांच्या पर्यंत त्यांच्या मातृभाषेत इस्लामबद्दल पुरेशी माहिती पोहोचलेली नाही. दोन - ते लोक जे मीडियाच्या अपप्रचाराला बळी पडलेले आहेत. तीन - ते लोक   ज्यांना जगामध्ये मनमानी करावयाची आहे. अनैतिक जीवन जगायचे आहे. अनैतिक कृत्य करायची आहेत. अनैतिक पद्धतीने व्यवहार करायचे आहे. अनैतिक पद्धतीने साधन सामुग्री गोळा करायची आहे. अनैतिक व्यवसाय करायचे आहेत. जे लोक नैतिकतेचे पाईक आहेत, नैतिकतेला पसंत करतात. त्यांच्यासाठी गरज आहे ती या गोष्टीची की कुरआनचा परिचय प्रत्येक मुस्लिमाने आपल्या सद्वर्तनातून करून द्यावा. तेव्हाच कुरआन विषयी असलेले गैरसमज बहुसंख्य बांधवांच्या मनातून दूर होतील.


- एम. आय. शेख


मार्चला कोरोना पळवून लावण्याला एक वर्ष पूर्ण झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी असे म्हटले होते की, महाभारताचे युद्ध 18 दिवसात संपले होते. पण कोरोना विरूद्धचे युद्ध जिंकण्यासाठी 21 दिवस लागणार आहेत. या घोषणेआधी दोन दिवस पंतप्रधानांनी जनता कर्फ्यू दरम्यान लोकांना टाळी आणि थाळी वाजवण्याची नाट्यमय घोषणा केली होती. लोकांनीही कर्फ्यूच्या समाप्तीनंतर मोठ्या उत्साहाने मोदींना प्रतिसाद दिला होता. यानंतर दोनच दिवसांनी रात्रीच्या 8 वाजता कुणाला काही समजण्याआधी नोटाबंदी प्रमाणेच देशात टाळेबंदीची घोषणा करून टाकली. नोटा बंदीचे समजू शकतो लोकांना याची माहिती मिळू नये म्हणून अचानक घोषणा केली होती. पण लॉकडाऊनला कुठला बहाणा करता येत नव्हता. करावे काय लोकांना पंतप्रधानांच्या अशा व्यवहारांची जणू सवयच जडलेली दिसते. 

तसे पाहता नोटाबंदीचाही उपयोग करूनच घेतला होता. काळेधन पांढरे करूनच घेतले. त्यासाठी भ्रष्टाचाराचा मार्ग निवडला असेल. पण या भ्रष्टाचाराच्या काळ्या धनाचे काय झाले असेल? आश्चर्य या गोष्टीचे वाटते की लॉकडाऊन लावताना अशा कोट्यावधी लोकांचा थोडा देखील विचार केला गेला नाही ज्यांना पाणी पिण्यासाठी दररोज विहीर खांदावी लागते. प्रवासी मजुरांकडे एक आठवडा पोट चालवण्याचा खर्च देखील शिल्लक नसतो. सरकारने हे आश्वासन दिले की कुणावर उपासमारीची वेळ येऊ देणार नाही पण गेल्या 70 वर्षांचा अनुभव असा की सरकारी वचन पूर्ततेसाठी नव्हे तर त्यांची मते हस्तगत करण्यासाठी असतात. गरीबांनी पंतप्रधानांनी घोषित केेलेले लॉकडाऊन पायाखाली तुडविले. रेल्वे आणि मोटारीची आशा सोडून दिली पायी चालतच आपापल्या गावी निघाले. 

5 ट्रिलियन अर्थव्यवस्थेचा फुगा आंतरराष्ट्रीय चौकात फुटला. लाखो लोकांनी पायीच घरी आपापल्या गावी जाण्याचा निर्णय घेऊन जगाला दाखवून दिले की मोठमोठ्या शहरांमध्ये इमारतींमध्ये माणूस नाही तर पशुप्राणी निवास करतात. पंतप्रधानांच्या विनंतीकडेही लोकांनी कानाडोळा केला ते म्हणाले होते की, लोकांना एकमेकांची काळजी घ्यावी कोणाला उपाशी राहू देऊ नये. राष्ट्राच्या सर्वेसर्वाच्या शोषण मनोरंजन असू शकते पण त्यांच्यात एकमेकांसाठी संवेदना सद्भावना जागृत करत नसतात. प्रवासी मजुरांनी माध्यमांना सांगितले होते की, त्यांना मृत्यू जरी आला तरी ते थांबणार नाहीत त्यांना मरायचे आहे. पण आपल्या घरी, आपल्या नातलगांमध्ये. अशा रीतीने कोरोना महामारीनंतर लॉकडाऊन लावल्यामुळे भारतीय समाज आणि शासन यंत्रणेसमोर एक दर्पण ठेवले गेले. ज्यामध्ये लोकांनी आपला विकृत चेहरा पाहिला. जे लोक आपले प्राण हातात घेऊन या प्रवासी मजुरांच्या मदतीला धावून आले, त्यांना सोडून या सगळ्या प्रकरणात शासन व्यवस्थेने आपले संवेदनशून्य व्यक्तीत्वाचा पुरावा दिला. लाखो लोक देशाच्या सर्व सडकांवर निघालेले असताना कोर्टात खोटे सांगितले होते. एकही प्रवासी मजूर सडकेवर नाही. 

आंधळ्या न्याय व्यवस्थेने सरकारशी कोणताही प्रश्न न विचारता त्यांनी जे सांगितले ते जसेच्या तसे स्वीकारले. थोडी जरी लाज असती तर प्रवासी मजुरांसाठी विशेष रेलगाड्या आणी बसेसची सोय केली असती आणि नंतरच लॉकडाऊन लागू केले असते. जगातील साऱ्या देशांनी आपल्या नागरिकांना सांभाळून घेण्यासाठी पुरेसा वेळ दिला आणि मग नंतर लॉकडाऊन लावला. पण आपल्या लोकशाहीने तर लोकांचा गळाच दाबून टाकला. आपल्या या दुर्वर्तनाकडून लोकांचे लक्ष्य दुसरीकडे वळवण्यासाठी माध्यमांमध्ये तबलीगी जमातच्या मुस्लिमांना कोरोनाच्या फैलावासाठी जबाबदार धरण्यात आले. रेल्वे सुरू झाल्याची घोषणा ऐकूण प्रवासी मजूर मुंबईतील बांद्र जामा मशीदीजवळ जमले असताना त्यांचा संबंध मशीद आणि साहजिकच मुस्लिमांशी जोडला गेला. पण जसाजसा काळ लोटत गेला सत्य परिस्थितीसमोर आलीच.

लॉकडाऊनच्या एका वर्षानंतरची स्थिती अशी की जगात अमेरिका आणि ब्राझील नंतर भारताचा क्रमांक लागतो. कोरोना बाधितांचा आकडा झपाट्याने वाढताना दिसत आहे. तरी देखील खरी परिस्थिती समोर येत नाही. लोक सीटीस्कॅन, टेस्ट करून उपचार घेत आहेत. देशात गेल्या आठवड्यापर्यंत एक कोटी 19 लाखाहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. 106100 लोकांचे प्राण गेले. लसीकरणाची मोहिम चालू आहे. कोरोनाच्या परतण्याचा अर्थ असा की टाळीथाळी वाजवून लोकांना मुर्ख बनवले जावू शकते पण कोरोना महामारीला पिटाळून लावता येत नाही. देशाची भोळीभाबडी जनता आणि कोरोना विषाणूत भला मोठा अंतर आहे. यासाठी शासनाला गांभीर्याने उपाययोजना करावी लागेल. पण ज्या सत्ताधारींना फक्त निवडणुका जिंकणे हाच एकमेव उद्देश आहे. त्यांच्याकडून कोणत्या गांभीर्याची अपेक्षा करणे मूर्खपणा ठरेल. हे सत्ताधारी जनतेला निवडणूक मोहिमेत गुंतवून ठेवून आपले सत्ताप्राप्तीचे उद्दिष्ट साकार करणार आहेत. ज्याची किंमत गोरगरीब जनतेला मोजावी लागते. 

कोरोना विषयी पहिली अशी धारणा होती की हा रोग झोपडपट्टीतून इमारतीपर्यंत पसरतो. पण आताच्या तपासात असे उघडकीस आले आहे. की हा रोग उंचउंच इमारतीत राहणाऱ्या सधन संपन्न लोकांपासून झोपडपट्यापर्यंत येतोय. गोरगरीबांना महागड्या दवाखान्यात उपचार करणं परवडत नाही. तेव्हा त्यांनाच स्वतःची काळजी करावी लागेल.

statcounter

MKRdezign

Contact form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget