Halloween Costume ideas 2015

लोकांना न समजलेली साथ


औद्योगिक क्रांतीनंतर जगात खूप बदल घडले. लोकांची जीवनशैली बदलली. लोकांचे विचार बदलले. लोकांच्या सवई बदलल्या. मनोरंजनाचे प्रकार बदलले.  काय बदलले नाही तर माणसाचे शरीर. या शरिराला वेगाने होणारा बदल जुळवून घ्यायला संधी मिळाली नाही. याचा आरोग्यावर झालेला दुष्परिणाम दिसून येत आहे ते या पेंडामिक च्या स्वरूपात. ही साथ आहे जीवनशैली आणि क्रॉनिक डिसीजची. म्हणजे जे रोग माणसाला दीर्घकाळ ग्रासत व एकमेकांना पसरत नाही (जसे कोरोना पसरतो.) याचे उदाहरण म्हणजे बीपी, शुगर, कर्करोग, हृदयरोग, लकवा, लठ्ठपणा इत्यादी. 

जागतिक आरोग्य संघटनेच्या अनुसार प्रत्येक वर्षी जगात 71 टक्के मृत्यू हे जीवनशैलीतून होणार्‍या आजारामुळे होतात. एवढा आरोग्यव्यवस्थेवरील भर आपला देश झेपू शकतो का? 

या पेंडामिकची कारणे पुष्कळ आहेत. पुढील लेख या कारणावर प्रकाश टाकणार व त्याच्या उपायांवर विचार करायला भाग पाडणारा आहे. 1. जीवन, 2. व्यायाम 3. तंबाखू 4. अल्कोहोल, 5. हवामान बदल. 

याला आधुनिक शैली पूर्ण: जबाबदार आहे. सगळ्यांना प्रत्येक गोष्ट तात्काळ पाहिजे. जसे जेवण, पैसा, मनोरंजन आणि जगणे गतीने पाहिजे. मग त्या गोष्टींमध्ये अर्थ वा विवेक असो वा नसो. यामुळे माणसाने आपल्या शारीरिक व मानसिक आरोग्यावर फार घातक अत्याचार केले आहेत. जीवनैशलीमधील आजार प्रिव्हेंटीबल आहेत. क्युरेबल नाहीत म्हणून आजार होण्याअगोदर त्याच्या बचावासाठी उपाय महत्त्वाचे. आपल्या जीवनातील सवई बदलून आणि नियमित व्यायामाने या रोगांशी आपण दोन हात करू शकतो. अंतरराष्ट्रीय वैद्यकीय संशोधनातून हे ठळकपणे आढळून आले आहे की, फक्त डायट कंट्रोल केल्यामुळे मधुमेहाचे प्रमाण कमी करू शकतो. 

वैद्यकीय क्षेत्र याबद्दल काय सांगते, या आगळ्या वेगळ्या आणि तुलनेने नवीन पेंडामिक चे उपाय जुन्या फ्रेमवर्कवर जमणार नाही. जंतुसंसर्गाने होणारे आजार आणि हे लाईफस्टाईल आजार दोघांना एकच रंगाच्या चष्म्याने बघता येणार नाही. आजचा मनुष्य आजारी कसा पडतो व मनुष्याच्या मृत्यूचे कारण आता बदलले आहे. आता गरज आहे नवीन वैद्यकीय क्रांतीची. लाईफस्टाईल आणि डायट याना मेनस्ट्रीम उपचारपद्धतीत समाविष्ट करण्याची. 

वैद्यकीय बदल तेवढे झाले नाहीत, पण मार्केट मात्र भरपूर बदलले. मार्केट तुम्हाला त्याचे प्रोडक्ट विकण्यात पटाईत झाले आहेत. मग ते तुमच्यासाठी फायद्याचे असो वा नसो. तुमच्या आरोग्याची काळजी नव्हे तर तुमच्या जिभेवर त्यांचे लक्ष आहे. तुमच्या स्व:चे पण तेच हाल आहेत. कोल्ड ड्रींकला मी प्रेमाने नशा न देणारी दारू असे संबोधतो. टेस्ट नाही, आरोग्याला फायदा तर नाहीच नुकसान आहे, गिळताना गळ्यात त्रास, पोटात गेल्यावर अ‍ॅसिडीटी, मग एवढे शिकलेला आजच समाज ते चक्क विकत घेतो आणि त्या कंपन्याला बिलियन डॉलरचा व्यवसाय देतो, सॉलिड मार्केटिंग. म्हणून आता या विषयांवर बोलायचे आणि लोकांना जागृत करण्याची नितांत गरज भासत आहे. जर तुम्ही स्वस्थ असाल, समाज स्वस्थ असेल तर देश प्रगत होईल. कित्येक व्यसनांनी ग्रासलेल्या आजचा युवा जर देशाचा हेल्दी वर्कफेस बनेल तर आशा आहे की समाज व देश समृद्ध होईल. तुमचा यात काय सहभाग आहे. तुमचे शरीर किती हालचाल करते, तुमची झोप कशी आहे याची किमान जागरूकता तर असली पाहिजे. आपण स्व: आपल्या आरोग्याची जबाबदारी घेतली पाहिजे.

एक प्रॅक्टिकल उपाय 

प्रत्येक महिना संपल्यावर जसा आपण पैशाचे बजेट बनवतो. तसे हेल्थ बजेट बनवा. गेल्या महिन्यात किती दिवस व्यायाम केला. किती अन्न पौष्टीक दृष्ट्या व प्रमाणाने चुकीचे होते. अनहेल्दी सवई कोणत्या हे सर्व प्रत्यक्ष लिहून काडा. या अनुसार पुढच्या महिन्याचे हेल्थ बजेट बनवा. आहारात काय समाविष्ट करणार, काय कमी करणार आणि कोणते पदार्थ बंद करणार हे ठळकपणे लिहून ठेवावे. तसेच व्यायामासाठी वेळ निश्‍चित करावा, कोणता व्यायाम, किती वेळ, हे सर्व प्लान करावे. हे हेल्दी बजेट तुमच्या परिवारासोबत घेऊन बनवा व त्याच्यात छोट्या मोठ्या सगळ्यांचे मत व विचार समाविष्ट करा. आणि शेवटी, हे हेल्दीबजेट अमलात आणल्यावर तुम्हाला काय फायदा होणार आणि तुमचे जीवन व परिवाराचे वातावरण कसे बदलणार याच्यावर दोन वाक्य लिहा. आणि ते दोन वाक्य मोठ्या अक्षरात आपल्या किचनमध्ये स्पष्ट लिहा. 

समाजात याबद्दल जागृती निर्माण करून, स्व:च्या आरोग्याची स्व: काळजी कशी घेता येईल, आजार होण्यापासून कसे स्व:ला वाचविता येईल याबद्दल समाजाला सशक्त करण्याच्या उद्देशून हा कॉलम लिहिला जाणार आहे. 

हा लेखातील नमूद गोष्टींवर आपल्या परिवाराला आणि मित्रांना सोबत घेऊन यावर विचार विनिमय करा आणि ते अमलात आणण्यासाठी प्रयत्न करा. पुढच्या शुक्रवारी ”साखर, साखर लॉबी आणि आजार” या बद्दल बोलू. तोपर्यंत तुमचे हेल्दी बजेट बनवा. शेवटचे वाक्य ”  “Healthy citizens are the greatest asset any country can have” - Winston Churchill.


- डॉ. आसिफ पटेल 

एमबीबीएस (मुंबई), एम.डी. मेडिसीन (नागपूर)


Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget