Halloween Costume ideas 2015

भिवंडीत मस्जिदीचे रूपांतर कोविड उपचार केंद्रात

भिवंडी (प्रतिनिधी)
भिवंडीतील करोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी आरोग्य यंत्रणांनी कंबर कसलेली असतानाच येथील मक्का मस्जिदच्या ट्रस्टींनी मस्जिदीचं कोविड उपचार केंद्रात रुपांतर केलं आहे. यामध्ये कोरोनाबाधितांना नि:शुल्क ऑक्सिजन पुरविण्यात येत आहे. लॉकडाऊनच्या काळात मशिदीचंच कोविड केंद्रात रुपांतर करण्यात आल्याने कोरोनाबाधितांना मोठा दिलासा मिळाला आहे.
    भिवंडीच्या पूर्वेकडील जमात-ए-इस्लामी हिंद, मुव्हमेंट फॉर पीस अँड जस्टिस आणि शांती नगरमधील मक्का मशिदीच्या शांती नगर ट्रस्टने ही सुविधा निर्माण करून दिली आहे. भिवंडीत कोरोना रुग्णांची संख्या वाढली होती. अनेक रुग्णांना श्‍वास घ्यायला त्रास होत होता. त्यामुळे येथील मस्जिदीचं कोविड उपचार केंद्रात रुपांतर करण्यात आलं आहे. मस्जिदीत ऑक्सिजन सिलिंडरसह पाच बेड ठेवण्यात आले आहेत. त्याशिवाय जमात-ए-इस्लामीने रुग्णांना घरपोच ऑक्सिजन सिलिंडर मिळावी म्हणून नि:शुल्क सेवाही सुरू केली आहे.
    भिवंडी-निजामपूर महापालिका क्षेत्रामध्ये कोरोनाचे एकूण 1 हजार 332 रुग्ण आढळलेले आहेत. या ठिकाणी आतापर्यंत करोनाने 88 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. येथील मृत्यूदर 5.26 टक्के एवढा असून राज्याच्या उच्च मृत्यूदरा एवढा हा मृत्यूदर आहे. करोनाच्या प्रादुर्भावामुळे आरोग्य यंत्रणेवरही मोठा ताण आला आहे. त्यामुळे रुग्णांना योग्य उपचार मिळत नसून क्वॉरंटाइनच्या सुविधांचीही वानवा निर्माण झाली आहे. या पार्श्‍वभूमीवर 3 जुलैपर्यंत संपूर्ण भिवंडीत लॉकडाऊन करण्यात आलेला आहे. भिवंडी हे दाटीवाटीचं शहर आहे. त्यामुळे या शहरात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर फैलावत आहे. खासगी डॉक्टरांनी दवाखाने, रुग्णालये आणि नर्सिंग होम बंद केल्याने रुग्णांचे हाल होत आहेत. अनेकांमध्ये या आजाराची पुरेशी जागृती नाहीये. शिवाय उपचाराचा खर्चही त्यांच्या ऐपतीच्या पलिकडे आहे. त्यामुळे आम्ही त्यांना आरोग्य सुविधा देण्यासाठी छोटासा प्रयत्न केला आहे, असं जमात-ए-इस्लामी हिंद भिवंडी अध्यक्ष औसाफ अहमद फलाही यांनी दिली. आम्ही दिलेल्या सुविधेचा आतापर्यंत 70 रुग्णांनी लाभ घेतला आहे. 8 रुग्णांना त्यांच्या घरी 15 गॅस सिलिंडर उपलब्ध करून दिले आहेत. सर्वच जाती-धर्माचे रुग्ण या सेवेचा लाभ घेत आहेत, असंही या संस्थेने सांगितलं. मानवतेची सेवा करणं हा इस्लामचा मूलभूत सिद्धांत आहे. मस्जिद केवळ नमाज पठणाची जागा नाही. तर मस्जिद परिसरात राहणार्‍या लोकांचं कल्याण करण्याचं ते एक केंद्र आहे. मक्का मस्जिद लॉकडाऊनमुळे बंद होती. त्यामुळे आम्ही रुग्णांसाठी मशिदीचा काही भाग वापरण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. इतर ठिकाणी उपचार घेऊ शकत नसल्याचेही काही रुग्ण मस्जिदीत उपचार घेत असल्याचं शांतीनगर ट्रस्टेचे कैसर मिर्जा यांनी सांगितलं.
Labels:

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget