Halloween Costume ideas 2015

सोशल डिस्टन्स जनजागृतीचा जाणून घ्या “जनवाडी मस्जिद पॅटर्न” आदर्श उपक्रम!

मशिदीवरील लाऊडस्पीकरचा जनजागृतीसाठी वापर

पुणे
कोरोना -लॉकडाऊन मध्ये पुण्यातील शिवाजीनगर येथील जनवाडी मस्जिद समाजातर्फे स्तुत्य उपक्रम राबविण्यात येत आहे.
जनवाडी मस्जिद मॉडेल जाणून घ्या!
शिवाजी नगर मतदार संघात असणाऱ्या जनवाडी भाग हा दाट लोकसंख्या असलेला असून या मध्ये विविध जातीधर्माचे नागरिक समसमान संख्येत आहेत व येथील सुमारे चाळीस हजार लोकसंख्येला जनवाडी अरुण कदम चौक हा मध्यस्थ व्यापार व भाजीपाला केंद्र असून सुमारे दोन किलोमीटर परिघातील नागरिक येथे खरेदीसाठी रोज गर्दी करतात त्यामुळे 10 ते 12 ही वेळ अपुरी पडते.
तसेच या परिसरात अल्पशिक्षित संख्या मोठ्या प्रमाणावर आहे ,

याबाबत चतुरशिंगी पोलीस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री शेवाळे यांच्याशी सल्ला मसलत करून जनवाडी मस्जिद ट्रस्ट च्या पुढाकाराने रोज सकाळी 11 च्या सुमारास लाऊडस्पीकरवर सोशल डिस्टन्स तसेच लॉक डाऊन चे पालन विषयी जनजागृती करण्यात येत असून परिसरातील आजी माजी लोकप्रतिनिधी व पोलीस अधिकारी रोज विविध भाषेमध्ये प्रबोधन करीत आहे.
सामाजिक कार्यात जातीय सलोखा ठेवून नेहमी अग्रेसर असे नाव लौकिक असणाऱ्या जनवाडी मस्जिद तर्फे जनवाडी मस्जिद चे लाऊडस्पीकर रोज जनजागृती उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत असून असा “जनवाडी मस्जिद पॅटर्न ‘ राज्यभर राबविला जाऊ शकतो.!
Labels:

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget