Halloween Costume ideas 2015

अल्अनआम : ईशवाणी (सुबोध कुरआन)

(३३) हे पैगंबर (स.)! आम्हाला माहीत आहे की ज्या गोष्टी हे लोक रचत आहेत त्यापासून तुम्हाला दु:ख होते, परंतु हे लोक तुम्हाला खोटे लेखत नाहीत तर हे अत्याचारी खरे पाहता  अल्लाहच्या संकेतवचनांचा इन्कार करीत आहेत.२१
(३४) तुमच्यापूर्वीदेखील अनेक पैगंबरांना खोटे लेखले गेले, परंतु या खोटे लेखण्यावर आणि त्यांना दिल्या गेलेल्या यातनांवर त्यांनी संयम दाखविला येथपर्यंत की आमची मदत त्यांना  पोहोचली. अल्लाहच्या गोष्टींना बदलण्याची शक्ती कोणातच नाही.२२ आणि पूर्वीच्या पैगंबरांशी जो काही व्यवहार झाला त्याविषयी बातम्या तुम्हापर्यंत आल्याच आहेत.
(३५) तथापि जर या लोकांची उपेक्षा तुम्हाला सहन होत नसेल तर मग तुमच्यात जर काही सामर्थ्य असेल तर जमिनीतील एखादा भुयारी मार्ग शोधा किंवा आकाशाला शिडी लावा  आणि त्यांच्यापाशी एखादे संकेतचिन्ह आणण्याचा प्रयत्न करा.२३ जर अल्लाहने इच्छिले असते तर या सर्वांना सन्मार्गावर जमा केले असते, म्हणून अज्ञानी बनू नका.२४



२१) वस्तुस्थिती ही आहे की जोपर्यंत पैगंबर मुहम्मद (स.) यांनी अल्लाहच्या आयतींना ऐकविण्यास प्रारंभ केलेला नव्हता तोपर्यंत समाजातील सर्वजण त्यांना अमीन (अमानतदार)  आणि सादिक (सत्यवान) मानत होते आणि त्यांच्या सत्यतेवर पूर्ण विश्वास ठेवून होते. लोकांनी पैगंबर मुहम्मद (स.) यांना त्या वेळी खोटे लेखले जेव्हा त्यांनी अल्लाहकडून अवतरित  संदेश लोकांना सांगण्यास सुरुवात केली. परंतु या दुसऱ्या टप्प्यातसुद्धा एकही माणुस त्यांना व्यक्तिश: खोटे लेखण्याचे धाडस करू शकत नव्हता. पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या कट्टर  विरोधकांनीसुद्धा त्या काळी त्यांच्यावर हा आरोप केला नव्हता की जीवनात कधीही कुठल्याही बाबतीत ते खोटे बोलले असावेत. त्यांनी पैगंबर मुहम्मद (स.) यांना केवळ पैगंबरत्वामुळेच  नाकारले होते. पैगंबर मुहम्मद (स.) यांचा सर्वात मोठा शत्रू अबू जहल होता. माननीय अली (रजि.) यांचे कथन आहे की एकदा त्याने स्वत: पैगंबर (स.) यांच्याशी बोलतांना सांगितले,  ``आम्ही आपणास खोटारडा तर मुळीच म्हणत नाही परंतु जे काही आपण सांगत आहात त्याला खोटे ठरवितो.'' बदरच्या युद्धाप्रसंगी अखनस बिन शुरैक याने एकांतात अबू जहलला  विचारले होते की, येथे माझ्या आणि तुमच्याशिवाय तिसरा कोणी नाही. खरे सांगा मुहम्मद (स.) यांना तुम्ही खरे समजता की खोटे? त्याने उत्तर दिले, ``खुदा शपथ! मुहम्मद एक  सच्चा मनुष्य आहे. आयुष्यभर कधी खोटे बोलला नाही. परंतु जेव्हा झेंड्याचा अधिकार, पाणी पाजणे, काबागृहाची देखभाल आणि पैगंबरत्व हे सर्व बनीकुसई यांच्याचकडे गेले तर सांगा  बाकी कुरैश लोकांजवळ काय राहिले?'' याचमुळे येथे अल्लाह आपल्या पैगंबराचे समाधान करत आहे की तुम्हाला नव्हे आम्हाला खोटे लेखले जात आहे. आणि जेव्हा आम्ही धैर्याने  आणि सहनशीलतेने यास सहन करत आहोत आणि सवलतीवर सवलती देत आहोत. तर तुम्ही बेचैन का होत आहात?
२२) म्हणजे अल्लाहने सत्य-असत्याच्या संघर्षासाठी जो कायदा बनविला आहे त्याला बदलून टाकणे कोणाच्या शक्ती-सामर्थ्याची गोष्ट नाही. सत्यवादींसाठी अनिवार्य आहे की ते  दीर्घकाळापर्यंत आजमाविले जातील. आपला संयम, सत्यनिष्ठा, त्याग, समर्पण आणि आपल्या ईमानची दृढता आणि अल्लाहवरील आपल्या एकनिष्ठेची परीक्षा द्यावी लागेल. कष्ट   आणि संकटातून पार होऊन आपल्यात ते गुण पल्लवित करावेत जे याच कठीण स्थितीत वृद्धिगंत होऊ शकतात. प्रारंभी विशुद्ध आणि उत्कृष्ट आचरण आणि चारित्र्यशीलतेच्या  हत्याराने अज्ञानतेवर विजय प्राप्त् करून दाखवावे लागेल. अशाप्रकारे जेव्हा ते सिद्ध करतील की ते उत्कृष्ट गुणधारी आहेत तेव्हा अल्लाहची मदत ठीक वेळी त्यांना पोहचू लागेल.  वेळेपूर्वी ती कोणाच्या आणल्याने येऊ शकत नाही.
२३) पैगंबर मुहम्मद (स.) जेव्हा पाहतात की एवढा प्रदीर्घकाळ समजावून सांगूनही हे लोक सत्य मार्गावर येत नाहीत. तेव्हा त्यांच्या मनात ही इच्छा निर्माण होत असे की अल्लाहकडून  एखादा चमत्कार झाला तर किती बरे होईल. जेणेकरून त्यांच्यातील विरोध नष्ट होऊन ते सर्व सत्यमार्गी बनतील. पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या याच इच्छेचे उत्तर या आयतीमध्ये  देण्यात आले आहे. अर्थ हा आहे की असंयमी वृत्तीने काम करू नका. ज्या पद्धतीने आणि ज्या क्रमाने या कार्याला आम्ही चालवित आहोत त्यावरच संयमाने चालत राहा. चमत्काराने  काम करून घ्यावयाचे असते तर काय आम्ही स्वत: हे काम केले नसते? परंतु आम्हाला माहीत आहे की ज्या वैचारिक आणि नैतिक क्रांतीसाठी आणि कल्याणकारी सभ्यता निर्माण  कार्यासाठी तुम्हाला आम्ही नियुक्त केले आहे; त्यास सफलतेच्या सीमेपर्यंत पोहचविण्याचा रास्तमार्ग हा नव्हे. तरीपण लोकांची वर्तमान वुंâठित वृत्ती आणि नकारात्मक कठोरता पाहून  तुम्ही अधीर होता. तेव्हा तुम्हाला वाटू लागते की या कठोरतम स्थितीला बदलण्यासाठी एखाद्या चमत्काराची नितांत गरज आहे. तेव्हा तुम्ही स्वत: जोर लावा आणि शक्य असल्यास  जमिनीत घुसून किंवा आकाशात चढून एखादा असा चमत्कार करा की तुम्हाला अनिश्चित स्थितीला निश्चित स्थितीत परिवर्तीत करण्यास पर्याप्त् वाटेल. परंतु तुम्ही आमच्यापासून ही  अपेक्षा ठेऊ नका की आम्ही तुमची ही इच्छा पूर्ण करू. कारण आमच्या शाश्वत योजनेत यासाठी अजिबात वाव नाही.
२४) केवळ हाच एकमात्र उद्देश असता की समस्त मानवजात काहीही करून सत्यमार्गी बनून जावी, तर पैगंबर पाठविण्याची आणि ईशग्रंथ अवतरणाचा प्रश्नच उद्भवला नसता. तसेच  श्रद्धावंत आणि अश्रद्धावंतामध्ये संघर्ष करविणे आणि सत्य संदेश युगे युगे आंदोलनाच्या मार्गातून जाण्याची आवश्यकताच मात्र राहिली नसती ! हे कार्य तर अल्लाहच्या एकाच  सृजनात्मक संकेताद्वारा पूर्ण झाले असते. परंतु अल्लाह या कार्याला अशा पद्धतीने करू इच्छित नाही. त्याची योजना तर अशीच आहे की सत्याला पुराव्यासह लोकांसमोर आणले जावे.  यांच्यापैकी जे लोक सत्य चिंतनाने काम करून सत्याला पूर्ण जाणून घेतील, त्यांनी स्वेच्छेने त्यावर श्रद्धा धारण करावी आणि आपले चारित्र्य त्यानुसार घडवून असत्यवादींच्या  मुकाबल्यात आपली नैतिक श्रेष्ठता सिद्ध करावी. मानव समूहांपैकी भल्या माणसांना आपल्या सशक्त तर्कांनी आपल्या महान लक्षप्राप्त्ीसाठी जीवनाच्या आपल्या उच्च् जीवन  सिद्धान्ताद्वारा तसेच आपल्या पवित्र आचरणाने आपल्याकडे आकर्षित करावे आणि असत्याविरुद्ध निरंतर संघर्ष करून स्वाभाविक विकासाच्या मार्गाने सत्य प्रस्थापित करण्याच्या  ध्येयाप्रत पोहचावे. अल्लाह या कार्यात त्यांचे मार्गदर्शन करील आणि स्वत:ला ज्या टप्प्यावर अल्लाहची मदत प्राप्त करण्यायोग्य बनवतील, ती मदतही त्यांना देत जाईल. परंतु कुणाची  अशी इच्छा असेल की या स्वाभाविक मार्गाला सोडून अल्लाहने केवळ आपल्या सामर्थ्यांने दूषित विचारांना नष्ट करावे आणि लोकांत उत्कृष्ट विचांराना फैलावावेत, तसेच दूषित सभ्यतेला नष्ट करून कल्याणकारी सभ्यता निर्माण करावी, तर हे कस्रfपही घडणार नाही. कारण हे अल्लाहच्या त्या योजनेविरुद्ध आहे ज्याच्यासाठी त्याने मनुष्याला जगात एक  उत्तरदायी सजीवाच्या रूपात निर्माण केले आहे. मनुष्याला उपभोगाचे अधिकार दिले आहेत. आज्ञापालन करणे अथवा न करण्यासाठी स्वातंत्र्य दिले आहे. परीक्षेसाठी सवलत दिली आहे  व त्याच्या कार्यप्रणालीनुसार पुरस्कार किंवा शिक्षा देण्यासाठी निर्णयाचा एक दिवस निश्चित केला आहे.

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget