Halloween Costume ideas 2015

पत्नींचे अधिकार : प्रेषितवाणी (हदीस)

अमर बिन अहवस जुशमी (रजि.) यांच्या कथनानुसार, मी पैगंबर मुहम्मद (स.) यांना ‘हज्जतुल-विदाअ’ (पैगंबरांच्या जीवनातील शेवटाच हज) मध्ये सांगताना ऐकले, सुरूवातीला पैगंबरांनी ‘हम्द’ (अल्लाहची स्तुती) व ‘सना’ (गुणगान) म्हटले आणि मग इतर गोष्टीचे उपदेश केले आणि म्हणाले, ‘‘लोकहो ऐका! महिलांशी चांगला व्यवहार करा कारण त्या   तुमच्याजवळ कैद्यासम आहेत. त्यांच्यावर सक्ती फक्त तेव्हाच केली जाऊ शकते जेव्हा त्यांच्याकडून उघड अवज्ञा प्रकट होत असेल, जर त्यांनी अशी वर्तणूक केली तर त्यांच्याशी   त्यांच्या शयनगृहातील संबंध तोडून टाका आणि त्यांना इतका मार देऊ शकता जो जखमी करणारा नसावा. मग जर त्यांनी तुमचे म्हणणे ऐकले तर त्यांना त्रास देण्याकरिता मार्ग शोधू  नका. ऐका! काही अधिकार तुमच्या पत्नींचे तुमच्यावर आहेत आणि काही तुमचे अधिकार त्यांच्यावर आहेत. तुमचा अधिकार त्यांच्यावर हा आहे की तुम्हाला पसंत नसलेल्या व्यक्तीला त्यांनी आपल्या घरात प्रवेश देऊ नये आणि तुम्हाला न आवडणाऱ्या व्यक्तींना त्यांनी घरात येण्याची परवानगी देऊ नये. ऐका! आणि त्यांचा अधिकार तुमच्यावर हा आहे की  तुम्ही त्यांचा योग्यप्रकारे सांभाळ करावा.’’

माननीय अबू मसऊद बदरी (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘जेव्हा मनुष्य आपल्या कुटुंबियांवर परलोकात मोबदला मिळण्याच्या उद्देशाने खर्च करतो   तेव्हा तो त्याच्यासाठी ‘सदका’ (दान) बनतो.’’ (हदीस : मुत्तफ अलैहि)

माननीय अब्दुल्लाह बिन उमर (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘मनुष्याला अपराधी बनविण्याकरिता तो जेवू घालत असलेल्या लोकांना खराब करणे  पुरेसे आहे. (हदीस : अबू दाऊद)

माननीय अबू हुरैरा (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘जेव्हा मनुष्याला दोन पत्नी असतील आणि त्याने त्यांच्या अधिकारांमध्ये न्याय व समानता  राखली नसेल तर अंतिम निवाड्याच्या दिवशी तो अर्धे शरीर नष्ट झालेल्या स्थितीत येईल.’’ (हदीस : तिर्मिजी)

स्पष्टीकरण
तो अर्ध्या शरीरासह याकरिता येईल की ज्या पत्नीचे अधिकार त्याने प्रदान केले नसतील ती त्याच्या शरीराचाच एक भाग होती. आपल्या शरीराच्या अर्धा भाग त्याने जगात कापून टाकला होता, मग अंतिम न्याय-निवाड्याच्या दिवशी त्याच्याजवळ पूर्ण शरीर कुठून येईल!

पतीचे अधिकार
माननीय अनस (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘जी स्त्री पाच वेळची नमाज अदा करते आणि रमजानचे रोजे पाळते आणि आपल्या लज्जास्थानाचे  रक्षण करते आणि आपल्या पतीची सेवा व आज्ञापालन करते ती स्वर्गाच्या द्वारांपैकी हव्या त्या द्वारातून प्रवेश करील.’’ (हदीस : मिश्कात)

माननीय अबू हुरैरा (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांना विचारण्यात आले, ‘‘कोणती पत्नी सर्वांत चांगली आहे?’’ पैगंबर म्हणाले, ‘‘ती पत्नी जी आपल्या पतीला   आनंदी ठेवते, जेव्हा तो तिच्याकडे पाहील तेव्हा तिने आपला सेवाभाव सादर करावा आणि आपल्या संपत्तीबाबत कोणतीही अशी गोष्ट करू नये जी पतीला पसंत नसेल.’’ (हदीस :  निसई)

स्पष्टीकरण
आपली संपत्ती म्हणजे जी पतीने घराची मालकीन म्हणून आपल्या पत्नीच्या हवाली केलेली असते.

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget