Halloween Costume ideas 2015

कर्जदाराशी सहिष्णुतेची वर्तणूक : प्रेषितवाणी (हदीस)

पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘एक मनुष्य लोकांना कर्ज देत असे. मग तो आपल्या कर्मचाऱ्याला, ज्याला तो कर्ज वसूल करण्यासाठी पाठवत होता, समजावून सांगत असे की  जर तू एखाद्या गरीब कर्जदाराकडे जाशील तेव्हा त्याला क्षमा कर, कस्रfचत अल्लाह आम्हाला क्षमा करील.’’ पैगंबरांनी पुढे सांगितले, ‘‘जेव्हा हा मनुष्य अल्लाहला भेटला तेव्हा  अल्लाहने त्यास क्षमा केली.’’ (हदीस : बुखारी, मुस्लिम)

माननीय अबू कतादा (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘अल्लाहने आपल्याला अंतिम निवाड्याच्या दिवशी दु:ख व यातना देऊ नये असे ज्या मनुष्याला  वाटते त्याने गरीब कर्जदाराला ढील द्यावी अथवा त्याचे कर्ज माफ करावे.’’ (हदीस : मुस्लिम)

माननीय अबू सईद खुदरी (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांच्याकडे नमाज अदा करण्यासाठी एक ‘प्रेतवस्त्रात गुंडाळलेले शव’ (जनाजा) आणण्यात आले, तेव्हा  पैगंबरांनी विचारले, ‘‘या मयत इसमावर एखादे कर्ज आहे काय?’’ लोकांनी उत्तर दिले, ‘‘होय! याच्यावर कर्ज आहे.’’ पैगंबरांनी विचारले, ‘‘याने काही संपत्ती मागे सोडली आहे काय   ज्यातून ते कर्ज फेडता येईल?’’ लोक म्हणाले, ‘‘नाही.’’
यावर पैगंबर (स.) म्हणाले, ‘‘तुम्ही सर्वजण याच्या ‘जनाजाची नमाज’ अदा करा (मी अदा करणार नाही).’’ ही उद्भवलेली सद्यस्थिती पाहून माननीय अली (रजि.) यांनी पैगंबरांना  विचारले, ‘‘हे अल्लाहचे पैगंबर! मी हे कर्ज फेडण्याची जबाबदारी घेतो.’’
मग पैगंबर (स.) पुढे आले आणि नमाजचे नेतृत्व केले. मग म्हणाले, (जसे- दुसऱ्या एका हदीसमध्ये आले आहे.) ‘‘हे अली! तू ज्याप्रमाणे आपल्या या मुस्लिम बंधुच्या प्राणास मुक्ती  दिली, त्याप्रमाणे अल्लाह तुझे आगीपासून रक्षण करो आणि तुझ्या प्राणाचे रक्षण करो. कोणीही मुस्लिम मनुष्य असा नाही जो आपल्या मुस्लिम बंधुकडून त्याचे कर्ज फेडील, मात्र  अल्लाह अंतिम निवाड्याच्या दिवशी त्याला मुक्ती देईल.’’ (हदीस : शरहुस्सुन्ना)

स्पष्टीकरण
वर उद्धृत करण्यात आलेल्या दोन्ही हदीसद्वारे कर्जफेड करण्याचे महत्त्व अतिशय सुलभपणे स्पष्ट करण्यात आले आहे. अल्लाहच्या मार्गात प्राणार्पण करणाऱ्या मनुष्यावर जर  एखाद्याचे कर्ज असेल आणि फेडून आला नाही तर ते माफ केले जाणार नाही, कारण याचा संबंध भक्तांच्या अधिकाराशी आहे, जोपर्यंत कर्ज देणारा माफ करणार नाही, तोपर्यंत  अल्लाहदेखील माफ करणार नाही. जर एखाद्या मनुष्याची देण्याची मनिषा असेल आणि देऊ न शकला तर अंतिम निवाड्याच्या दिवशी अल्लाह कर्ज देणाऱ्याला बोलवून घेईल आणि  कर्जदाराला माफ करण्यास सांगेल आणि त्याबदल्यात त्याला नंदनवनातील (जन्नतमधील) देणग्या प्रदान करण्याचे वचन देईल, तेव्हा कर्ज देणारा आपले कर्ज माफ करील, परंतु जर  एखाद्याकडे कर्जफेडीची क्षमता आहे तरीही त्याने फेडले नाही आणि कर्जदाराला त्याच्या कर्जाची परतफेड केली नाही अथवा जगात त्याच्याकडून कर्जमाफी घेतली नाही तर त्याच्या  माफीस अंतिम निवाड्याच्या दिवशी कसलेही स्थान नाही.

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget