Halloween Costume ideas 2015

रेप इन इंडिया!

मुझे तहेजीबे हाजीर ने अता की है वो आजादी
के जाहीर में तो आजादी है बातील में गिरफ्तारी
मेक इन इंडिया तर दिसत नाही, रेप इन इंडिया मात्र दिसतोय. राहूल गांधी यांच्या या विधानाने मागच्या आठवड्यात खळबळ उडवून दिली होती. दिल्लीपासून-गल्लीपर्यंत त्यांच्या या वक्तव्यावर उलट-सूलट प्रतिक्रियाही आल्या. हैद्राबाद आणि उन्नाव येथील महिलांवर सामुहिक बलात्कार करून त्यांना जाळून टाकल्याच्या पार्श्‍वभूमीवर राहूल गांधींनी वरील विधान केलेले होते. म्हणून सामुहिक बलात्कार का होतात? याबद्दल या आठवड्यात चर्चा केली गेली तर अनावश्यक होणार नाही.
    सर्वोच्च न्यायालयाने अगदी अलिकडे केंद्र सरकारला देशात होणार्‍या बलात्कारांच्या संबंधीची माहिती विचारली होती. त्यानुसार केंद्र सरकारने जी आकडेवारी कोर्टात सादर केली खालीलप्रमाणे. 1 जानेवारी 2019 ते 30 जून 2019 पावेतो देशात 24 हजार 212 बलात्काराच्या घटनांची नोंद देशातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात झालेल्या आहेत. एनसीआरबीच्या आकड्याप्रमाणे 2017 साली 32 हजारांपेक्षा जास्त बलात्कार झाले होते. म्हणजे रोज 132 बलात्कार होतात. बलात्कारांची ही आकडेवारी अचंबित करणारी आहे. त्यामुळे असे म्हणावेसे वाटते की, राहूल गांधी यांनी जे म्हंटलेले आहे ते काही चुकीचे म्हंटलेले नाही. रोज एवढ्या मोठ्या संख्येने जेव्हा बलात्कार होतात तेव्हा या प्रश्‍नाचे गांभीर्य सरकार, राष्ट्रीय संस्था, स्वयंसेवी संस्था यांना असायला हवे होते. प्रत्येक नागरिक यामुळे अस्वस्थ व्हायला हवा होता. पण असे होतांना दिसत नाही. हा आपल्या सामाजिक असंवेदनशीलतेचा कळस आहे. बरे! नुसते बलात्कारच होत नाहीत तर अनेक महिला व मुलींना त्या बलात्काराचे चित्रीकरण करून ब्लॅकमेल केले जाते. रोज-रोजच्या ब्लॅकमेलमुळे भावनिकदृष्ट्या उध्वस्त झालेल्या अनेक महिला आणि मुली आत्महत्या करतात. इभ्रतीच्या भीतीने अशी अनेक प्रकरणे चर्चेविनाच संपुष्टात येतात ती आकडेवारी तर वेगळीच. बलात्काराच्या घटनांच्या बातम्या ह्या शेतकरी आत्महत्यासारख्या नित्याच्या झालेल्या आहेत. चर्चा तेव्हाच होते जेव्हा कोपर्डी, दिल्ली आणि हैद्राबाद सारख्या मोठ्या घटना होतात. हा लेख लिहित असतांना पुन्हा एक बातमी आली की, मुजफ्फरपूर जिल्ह्यातील नजीरपूर (बिहार) येथे एका स्त्रीला बलात्काराचा विरोध केला म्हणून जाळून टाकल्यात आले. जिच्यावर 8 डिसेंबरपासून उपचार चालू होते, ती मरण पावली.
बलात्कार का होतात ?
    सर्वसाधारण समज असा आहे की, लैंगिक संबंध स्थापन करण्यासाठी बलात्कार होत असतात. हे अर्धसत्य आहे. केवळ लैंगिक संबंधच स्थापित करायचे असतील तर देशातील जवळ-जवळ प्रत्येक  शहरात वेश्यावस्त्या आहेत, सहमतीने संबंध स्थापित करण्याच्या सुविधा पुरविणार्‍या हॉटेल्स, गर्भनिरोधक साधणे आणि लॉज प्रत्येक शहरात उपलब्ध आहेत आणि प्रचंड मोठ्या संख्येने लोक या तिन्ही सुविधांचा लाभही घेत आहेत. मग प्रश्‍न असा उत्पन्न होतो की, बलात्कार का होतात? त्यातही सामुहिक बलात्कार का होतात?
    जेव्हापासून भारतात इंटरनेट आलेले आहे तेव्हापासून बलात्कार वाढलेले आहेत. गुगलनेच जाहीर केल्याप्रमाणे पॉर्न संकेतस्थळांना भेट देण्याचे प्रमाण भारतात सर्वात जास्त आहे. पॉर्न संबंधी अभ्यास करणार्‍यांचे मत असे आहे की, पॉर्न ही थिअरी आहे आणि बलात्कार प्रॅक्टीकल. रॉबिन मॉर्गन म्हणतो की, ’झेीपेसीरहिू ळी ींहश ींहशेीू रपव ीरशि ळी िीरलींळलश’ माणसासाठी पॉर्न पहाणे आणि ड्रग्स घेणे सारखेच घातक आहे. पॉर्न पाहिल्याने मानवी मेंदूमध्ये फिलगुड रसायनाचा जास्त स्त्रव होतो व त्यामुळे मिळणार्‍या कृत्रिम आनंदाच्या आहारी पाहणारे कधी जातात हे त्यांचे त्यांनाच कळत नाही. कच्च्या वयातील तरूण तर इतके आहारी जातात की एकलकोंडी होतात, मनोरूग्ण होतात, पॉर्नमधील चटकन संबंधासाठी तयार होणार्‍या महिलांना पाहून त्यांचा असा समज होतो की, समाजातील महिलासुद्धा तशाच चटकन त्यांच्याशी संबंधासाठी तयार होतील. जेव्हा त्यांच्या मनाप्रमाणे घडत नाही तेव्हा त्यांच्या मेंदूमधील विकृती उफाळून येते ते बेचैन होतात व त्यातून आपल्या व आपल्या सारख्याच आहारी गेलेल्या मित्रांचा कंपू बनवून हैद्राबादमध्ये शोधल्यासारखा सावध शोधून सामुहिक बलात्कार करतात. पॉर्न पहाणे शास्त्रीयदृष्ट्या घातक असल्याचे सिद्ध होऊनही सरकार केवळ महसूलासाठी या वेबसाईट बंद करत नाही. याच आठवड्यात बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी पंतप्रधानांची भेट घेऊन वाढत्या बलात्कारांना आळा घालण्यासाठी या वेबसाईटवर बंदी घालण्याची मागणी केली आहे.
    सामुहिक बलात्काराचे दूसरे महत्त्वाचे कारण दारू आहे. जगात सर्वाधिक मद्यउत्पादन व उपयोग सुद्धा आपल्याच देशात केला जातो. अलिकडे तर ड्रग घेणार्‍याचे प्रमाणही शहरी भागात वाढलेले आहे, नव्हे निमशहरी भागापर्यंतसुद्धा हे लोन पसरत आहे.
    सामाजिक न्याय व सक्षमीकरण विभागाचे मंत्री रतनलाल कटारिया यांनी नशेसंबंधी एका प्रश्‍नाचे लेखी उत्तर देताना संसदेच्या ह्याच सत्रामध्ये सांगितले आहे की, 2018 च्या राष्ट्रीय सर्व्हेक्षणानुसार देशभरातील 10 ते 17 वयोगटातील सुमारे 40 लाख मुले अमली पदार्थांचे सेवन करतात तर 30 लाख मुलांना दारूचे व्यसन आहे. 30 लाख मुले उत्तेजना प्राप्त करण्यासाठी इनलहेलरचा तर 20 लाख मुले भांग आणि वेदनाशामक औषधांचा वापर करतात. दोन लाख मुले कोकेन आणि ग्लानी आणणारी औषधांचा उपयोग करतात तर प्रोढांमध्ये म्हणजे 18 ते 75 वयोगटात 15 कोटी 10 लाख व्यक्ती नियमित मद्यसेवन करतात. 2 कोटी 90 लाख भांग घेतात. 1 कोटी 90 लाख इतर आम्ली पदार्थांचे सेवन करतात. 1 कोटी 10 लाख व्यक्ती वेदनाशामक औषधांचे व्यसन करतात. 60 लाख लोकांना इनहेलरचे व्यसन आहे. 20 लाख व्यक्ती वेगवेगळ्या प्रकारची उत्तेजके आणि ग्लानी निर्माण करणारी औषधे घेतात. तर 10 लाख व्यक्ती कोकेनचा वापर करतात. लोकसभेमध्ये सादर केल्या गेलेल्या या आकडेवारीवरून आपला समाज कोणत्या दिशेकडे जात आहे. याचा अंदाज वाचकांना येईल.
    अनेक पोलीस अधिकार्‍यांचा हा अनुभव आहे की, जास्त करून गुन्हेगार गुन्हा करण्यापूर्वी नशा जरूर करतात. त्यातून त्यांना गुन्हा करण्यासाठी जी अतिरिक्त उर्जा हवी असते ती प्राप्त होते. प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनी सांगून ठेवलेले आहे की, ” दारू ही समस्त वाईट कृत्यांची जननी आहे.” एवढ्या मोठ्या प्रमाणात दारू आणि अमली पदार्थ आणि सोबतीला घातक पॉर्न हे सर्व रसायन मिळून त्यांच्या आहारी गेेलेल्या पुरूषांना मनोरूग्ण बनवितात व त्या रूग्णावस्थेतच अनेक तरूण सामुहिक बलात्कार करतात एवढे निश्‍चित. एरव्ही सामान्य मानसिकतेचे लोक कोपर्डी, दिल्ली आणि हैद्राबाद एवढे घृणित कृत्य करण्याचा विचारसुद्धा करणार नाहीत.
    तिसरे कारण समाजातील अनावश्यक खुलेपणा आहे. महिलांच्या मनामध्ये एक गोष्ट बिंबविण्यात ’सो कॉल्ड विकसित पुरूषांना यश आलेले आहे की, गृहिणीचे काम हे हीन दर्जाचे काम असून, त्यांनी घराबाहेर पडून पुरूषाप्रमाणे इतर सर्व कामे करायला हवीत. स्त्रीयांनी या बंधनातून मुक्त व्हावे. या विचारातूनच स्त्री मुक्ती चळवळ जागतिक स्तरावर गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. यामुळे स्त्री आणि पुरूष यांच्यातील कामाच्या नैसर्गिक विभागणीला सुद्धा खीळ बसलेली असून, मोठ्या संख्येत काम करण्यासाठी महिला, काम करण्याची गरज नसतांनासुद्धा कामासाठी म्हणून घराबाहेर पडत असल्यामुळे त्यांचा परपुरूषांशी संपर्क वाढत चालला आहे. त्यातून अनेक गुंतागुंतीची नाती तयार होत आहेत. ज्या नात्यांना कुठलेच नाव किंवा सामाजिक मान्यता नाही. या खुल्या वातावरणातून बलात्काराची संभावना वाढत असते. या संदर्भात एका महिलेची प्रतिक्रिया अतिशय बोलकी आहे, ” फ्री सेक्स असल में स्त्री मुक्ती नहीं है. वास्तव में ये सेक्स के भूके, शातीर पुरूषोंद्वारा हमारे लिए बिछाया गया जाल है. हमें लगता है के वो हमें मुक्त होने के लिए प्रोत्साहित कर रहे हैं. वास्तव में वे हमें शोषण के लिए तयार कर रहे होते हैं.” - अनुजा चौहान (आऊटलूक, फेब्रुवारी 2011). 
    चौथे कारण अदृश्य असे आहे. समाजामध्ये अनेक माध्यमातून लैंगिकदृष्ट्या रूचकर अशा वाईट गोष्टींचा प्रचार आणि प्रसार मोठ्या प्रमाणात केला जातो. सिनेमा, सिरअल्स, यू ट्यूब, शॉर्ट फिल्मस् आणि टिक टॉक सारख्या सोशल नाव्याच्या अनेक अन्सोशल अ‍ॅपद्वारे लैंगिक संबंधांची रूचकर मांडणी मोठ्या प्रमाणावर केली जात आहे. या सामुग्रीचा भडीमार रात्रंदिवस पुरूषांवर केला जातोय. यातून अनेक पुरूषांची लैंगिक उत्तेजना वाढवली जात आहे. समाजात अनेक पुरूष काही कारणांमुळे घरापासून लांब राहतात, उच्च शिक्षणासाठी म्हणून अनेक वयस्क तरूण-तरूणी मोठमोठ्या शहरात वास्तव्य करून असतात. रूचकर सामुग्रीचा विपरित प्रभाव त्यांच्यावर सातत्याने पडत असतो. यामुळे अनेक तरूण आपल्यावरचा ताबा गमावून  बसतात आणि महिलांवर बलात्कार करतात.
    पाचवे कारण भांडवलशाही सामाजिक व्यवस्था आहे. या व्यवस्थेमध्ये ती प्रत्येक गोष्ट प्रतिष्ठित मानली जाते जी नफा देते. मग ती दारू असो, ड्रग्ज असो की लैंगिक संबंध. यातूनच डान्स बार आणि इतर लैंगिक गोष्टींना चालना देणारे व्यवसाय भरभराटीस येतात. ज्या लोकांकडे पैसा असतो ते पैसा खर्चून या व्यवस्थेचा लाभ घेतात व आपली उत्तेजना शमवितात. मात्र ज्यांच्याकडे पैसा नसतो फक्त उत्तेजना असते ते लोक मग बलात्कारासाठी प्रेरित होतात. पाण्याचे धरण जर फुटले तर अनेक गावे उध्वस्त होतात, मात्र त्याच धरणाचे पाणी कावले करून नियंत्रित पद्धतीने सोडण्यात आले तर अनेक गावे सुजलाम सुफलाम होतात. लैंगिक शक्ती ही पाण्याने तुडूंब भरलेल्या मोठ्या धरणासारखी असते. ती फुटली तर समाज उध्वस्त करते व लग्नाच्या कालव्यातून नियंत्रित केली गेली तर समाजाला सुजलाम सुफलाम करते. आपल्या देशात पाश्‍चात्यांचे अंधानुकरण करत लैंगिक शक्तीला लग्न व्यवस्थेपासून वेगळी करून ’लिव्ह-इन’ व्यवस्थेपर्यंत पोहोचविण्यापर्यंत आपण प्रगती साधलेली आहे. अनेकवेळा त्याचेच विकृत परिणाम बलात्काराच्या स्वरूपात आपल्या समोर येत आहेत.
    पाश्‍चात्य पुरूष अत्यंत चालाक असतात. त्यांना महिला हव्या असतात. म्हणून ते वेगवेगळ्या कारणाने महिलांना घराबाहेर काढण्याचा प्रयत्न करत असतात. कार्पोरेट सेक्टरमध्ये मोठ्या प्रमाणात महिला काम करतात. टाईम्स ऑफ इंडियाने यावर भाष्य करताना अगदी बरोबर लिहिले आहे की कंपन्यांमध्ये एका स्त्री-कर्मचार्‍यांकडून जी अपेक्षा केली जाते ती अशी की, तीने एकाच वेळी मूर्तीमंत सौंदर्यवती व्हावे, प्रसन्न स्त्रीसारखे वागावे, पुरूषासारखा विचार करावा आणि कुत्र्यासारखे काम करावे. (डहश ीर्हेीश्रव श्रेेज्ञ ङळज्ञश र ुेारप, लशहर्रींश श्रळज्ञश र श्ररवू, ींहळपज्ञ श्रळज्ञश र ारप रपव ुेीज्ञ श्रळज्ञश र वेस.)
 बलात्कार रोखण्याचे उपाय
    असे म्हटले जाते की, ”औरत दुनिया की निगाह में होती है तो इस्लाम की पनाह में. दुनिया चाहती है के औरत का सौंदर्य पब्लिक हो, इस्लाम चाहता है के वो सिर्फ और सिर्फ उसके पती के लिए प्रायव्हेट लिमिटेड हो.”
    बलात्कार हे अंतिम चरण असते, प्राथमिक चरण समाजामध्ये अश्‍लीलता, दारू, संगीत, डान्स, सिरीयल, चित्रपट, स्त्री-पुरूषांची अनावश्यक जवळीक हे आहे. दुर्दैवाने या सर्व गोष्टी आपल्या देशात प्रगतीसाठी आवश्यक मानल्या जातात. या सर्वांचा एकत्रित परिणाम जेव्हा बलात्कार आणि हत्येमध्ये होतो तेव्हा ’तात्काळ फाशी द्या’, अशी मागणी केली जाते. जोपर्यंत वरील सर्व वाईट गोष्टी बंद केल्या जाणार नाहीत बलात्कार बंद होणार नाहीत, ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे.
    समाजामध्ये वावरणारे सर्व पुरूष एकसारखेच दिसतात. त्यातील कोणते पुरूष लैंगिकदृष्ट्या भुकेले आहेत? कोणाची भूक विकृतीपर्यंत वाढलेली आहे? याचा अंदाज घेता येत नाही. म्हणून महिलांनी दक्षता घेणे हाच उपाय शिल्लक राहतो आणि इस्लाममध्ये त्या दक्षतेचे नाव परदा आणि मेहरमची व्यवस्था असे आहे. इस्लाम एक ईश्‍वरीय व्यवस्था आहे म्हणून त्रुटीमुक्त आहे आणि सर्वांसाठी आहे. या व्यवस्थेविरूद्ध कोणीही वागो मग ते मुस्लिम का असेनात त्याचे त्यांना मुल्य चुकवावे लागते. हे शाश्‍वत सत्य आहे. इस्लाम प्रतिगामी व्यवस्था आहे, असा अपप्रचार मोठ्या प्रमाणात झाल्याने अनेकजण आपण प्रतिगामी ठरविले जावू, या भितीने इस्लामचा अभ्यास करत नाहीत. पण शेवटी किती मुल्य चुकवायची यालाही सीमा असायला हवी ना. म्हणून हीच वेळ योग्य वेळ आहे, महिलांच्या सुरक्षेसंबंधी जी फुलप्रुफ परदा आणि महेरमची व्यवस्था इस्लामने दिलेली आहे खुल्या मनाने तिचा अभ्यास करण्याची गरज आहे. प्रत्येक गंभीर नागरिकाने देशात प्रचंड संख्येने होत असलेल्या बलात्कारांची व त्यांना रोखण्यात असमर्थ ठरलेल्या फौजदारी न्यायव्यवस्थेची दखल घेऊन आपल्या आया-बहिणींचे रक्षण करण्यासाठी इस्लामच्या परदा आणि महेरमच्या व्यवस्थेवर पक्षपात विसरून गंभीरपणे विचार करायला हवा. आपण सर्वांनी मिळून लैंगिकतेला प्रोत्साहित करणारे सर्व वाईट मार्ग अगोदर बंद करायला हवेत व मग लोकांकडून चांगल्या चारित्र्याची अपेक्षा करायला हवी. आपण एकीकडे वाममार्गाला प्रोत्साहित करण्याचे सर्व मार्ग खुले ठेवतो आणि दुसरीकडे लोकांनी चांगले वागावे अशी अपेक्षा करतो. समाजातील सर्वच पुरूषांना हे जमत नाही. म्हणून अगोदर सर्व वाम मार्ग बंद करावेत व नंतरच चांगल्या वर्तनाची लोकांकडून अपेक्षा ठेवावी. त्यासाठी गांभीर्याने सर्व नागरिकांनी विचार करण्याची गरज निर्माण झालेली आहे. हा विचार जितका लवकर केला जाईल तितक्या लवकर बलात्कार थांबतील आणि हा विचार जितका उशीरा केला जाईल तितका वेळ बलात्कार होतच राहतील यात किमान माझ्या मनात तरी शंका नाही. म्हणून शेवटी अतिशय व्यथित अंतःकरणाने मी वाचकांना आवाहन करतो की, कृपया आपल्या देशातील महिलांना या बलात्काराच्या कचाट्यातून वाचविण्यासाठी म्हणून तरी इस्लामच्या परदा आणि महेरम व्यवस्थेचा गांभीर्याने अभ्यास करावा.                 जय हिंद !

- एम.आय.शेख
9764000737

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget