Halloween Costume ideas 2015

आमचं हे कर्तव्य वाटलं म्हणून आम्ही उभे राहिलो : (भाग-8)

याप्रमाणे ज्यांना या सर्व गोष्टी मान्य असतील ते जमाअत-ए- इस्लामीमध्ये सामील होऊ शकतात. त्यांच्यासाठी आमच्याकडे फक्त एकच असे काम आहे की त्यांनी आपल्या कथनी आणि करणीने इस्लाम सत्य असल्याची साक्ष द्यावी आणि संपूर्ण इस्लामला जीवन जगण्याची एक व्यवस्था म्हणून स्वतःच्या जीवनात कायम करावे व समाजामध्येही कायम करण्यासाठी सामुहिक प्रयत्न करावेत. जेणेकरून समाजासमोर सत्याची साक्ष देण्याची गरज पूर्णपणे स्पष्ट होईल.
    तोंडी साक्ष देण्याचा जिथपर्यंत संबंध आहे तर आम्ही आमच्या सदस्यांना अशा प्रकारचे प्रशिक्षण देत आहोत की जेणेकरून ते आपापल्या योग्यतेप्रमाणे जीव्हेने, लेखनीने जास्तीत जास्त लोकांना इस्लाम सत्य असल्याची साक्ष देण्यासाठी तयार करण्याचा प्रयत्न करावा.
    यासाठी आम्ही अनेक छोट्या-छोट्या संस्थाही सुरू केलेल्या आहेत ज्या की आपल्या संघटित प्रयत्नांतून इस्लामी ज्ञानातील खरेपणा आपल्या साहित्यातून लोकांसमोर स्पष्ट करतील. आणि या उद्देशाच्या प्राप्तीसाठी प्रचाराची जेवढी म्हणून साधने उपलब्ध आहेत त्या सर्वांचा आम्ही उपयोग करू. राहता राहिली गोष्ट प्रत्यक्ष साक्षची तर या संबंधात आमचे हे प्रयत्न आहेत की, सुरूवातीला आमच्या प्रत्येक सदस्याला इतके प्रशिक्षित करण्यात येईल की, ते इस्लामचे जीवंत साक्षीदार होऊन समाजात वावरतील आणि मग अशा लोकांचा एक  संघटित समाज विकसित होईल, ज्यामध्ये इस्लाम आपल्या मूळ उद्देशाप्रमाणे काम करत असल्याचे जगाला पाहता येईल. शेवटी हाच समाज आपल्या भगीरथी प्रयत्नाने अन्यायपूर्ण व्यवस्थेच्या वर्चस्वाला शह देऊन सत्याचे वर्चस्व कायम करील, जो की सगळ्या जगामध्ये इस्लामचे प्रतिनिधीत्व करणारा असेल.
    बंधूंनों ! फक्त हाच आमचा उद्देश आणि कार्यक्रम आहे. आम्हाला अशी शंका नव्हती की, हे काम करत असतांना मुस्लिमांना काही आक्षेप असू शकेल. परंतु ज्या दिवसापासून आम्ही या मार्गामध्ये चालत आहोत, आक्षेपांचा महापूर आमच्यासमोर आलेला आहे. मात्र हे सारे आक्षेप लक्ष देण्याइतपत महत्त्वाचे नाहीत. ना एका बैठकीमध्ये त्यांच्या बाबतीत फारसं काही सांगता येण्यासारखे आहे. मात्र याप्रसंगी मी त्या आक्षेपांबद्दल थोडसं स्पष्टीकरण देऊ इच्छितो ज्यांचा उपयोग आपल्या शहरामध्ये गैरसमज पसरविण्यासाठी केला जात आहे.
    असं म्हटलं जात आहे की, तुमची ही जमाअते इस्लामी एका नव्या सांप्रदायाची (फिरका) पायाभरणी करीत आहे. या प्रकारची भाषा जे लोक बोलत आहेत त्यांना कदाचित माहित नसेल की फिरकाबंदीची कारणं काय असतात, धर्मामध्ये ज्या कारणांमुळे खूप फूट पडत असते ती कारणं फक्त चार प्रकारची आहेत. पहिले प्रकार असा की, धर्मामध्ये एखादी अशी गोष्ट वाढविली जाईल, जी की मूळ धर्मात नव्हती आणि त्याच गोष्टीला ईमान आणि कुफ्र (इन्कार), उपदेश (हिदायत) आणि पथभ्रष्टता यामध्ये फरक करण्यासाठीचा निकष मानले जाईल.
    दूसरा प्रकार असा की, धर्माच्या एका विशिष्ट गोष्टीला एवढे अवास्तव महत्व दिले जाईल, जेवढे महत्व कुरआन आणि हदिसच्या अनुसार त्या गोष्टीला प्राप्त नाही.         तीसरा प्रकार असा की, त्या धार्मिक प्रश्‍नांमध्ये अतिशोक्ती केली जाईल ज्यांचा स्पष्टपणे कुरआन आणि हदिसमध्ये उल्लेख नसेल. उलट कुरआन आणि हदीसच्या सामान्य आदेशांच्या प्रकाशामध्ये विचार करून निर्धारित केले गेलेले असतील. (इज्तेहादी मसले अर्थात धर्माचा अर्थ लावून घेतलेले निर्णय). याप्रकरणी आपल्या मताच्या विरूद्ध ज्यांची मतं आहेत त्यांना काफीर ठरविले जाईल, त्यांचा अपमान केला जाईल किंवा कमीत कमी त्यांच्यापासून अलिप्तता बाळगण्यात येईल.
    चौथा प्रकार असा की, प्रेषित मुहम्मद सल्ल. यांच्या नंतर एखाद्या खास व्यक्तीच्या संबंधाने असा दावा केला जाईल जणू तो प्रेषितच आहे आणि त्याचे म्हणणे मानल्यानेच मुस्लिम राहता येईल आणि जे मानणार नाहीत ते काफिर ठरविले जातील किंवा एखादी संघटना असा दावा घेऊन उठेल की, जे त्यांच्या संघटनेमध्ये सामील आहेत तेच सत्य मार्गावर आहेत बाकी सगळे मुसलमान पथभ्रष्ट आहेत.
    आता मी आपल्याला विचारू इच्छितो या चार प्रकारांपैकी आम्हाला कोणत्या प्रकारामध्ये बसवणार? आम्ही कोणता अपराध केलाय? जर कोणाकडे काही पुरावा आणि तर्क असेल तर त्यांनी आम्हाला स्पष्टपणे सांगावं की तुम्ही आमुक हा अपराध केलेला आहे. आम्ही तात्काळ तौबा करू आणि आपल्या वर्तनामध्ये सुधार करतांना आम्हाला किंचितही संकोच होणार नाही. कारण आम्ही स्वतःच अल्लाहच्या या सत्य धर्माला स्थापित करण्यासाठी उठून उभे राहिलेलो आहोत, यात फूट पाडण्यासाठी नव्हे. मात्र अशी कोणतीही चूक आम्ही केलेली नाही तर मग आमच्या कामामुळे कुठल्यातरी नवीन सांप्रदायाची पायाभरणी होत आहे, असा अंदाज कसा काय केला जाऊ शकतो?
    आम्ही केवळ मूळ स्वरूपात असलेल्या इस्लामला त्याच्यात किंचितही घट किंवा वाढ न करता घेऊन उभे राहिलेलो आहोत आणि मुस्लिमांसमोर आमचा संदेश याशिवाय दूसरा कुठलाच नाही की, या ! आपण सर्व मिळून या सत्य धर्माला प्रत्यक्षात आपल्यामध्ये स्थापित करू आणि जगासमोर हेच सत्य असल्याची साक्ष देऊ. जमाअते इस्लामीचा पाया आम्ही संपूर्ण इस्लामला बनविलेला आहे, त्याच्या एखाद्या आदेशाला किंवा भागाला नाही.
    अशी प्रश्‍न ज्यांचा स्पष्ट उल्लेख कुरआन आणि हदीसमध्ये आलेला नाही त्या प्रश्‍नासंबंधी आम्ही सर्वांच्या मतांना आणि विचारपीठांना तिथपर्यंत मान्यता देतो जिथपर्यंत शरीयतमध्ये परवानगी आहे. यासंदर्भात आम्ही प्रत्येकाचा अधिकार इथपर्यंत स्वीकार करतो की, आपल्याला ज्या विचारपीठाच्या विचारांविषयी संतुष्टी वाटेल, आपण त्यांची अंमलबजावणी करा. मात्र त्या गोष्टीला पाया बनवून आपला वेगळा गट तयार करण्याला आम्ही योग्य समजत नाही.
    जमाअते इस्लामीबाबतही आम्ही कुठल्याही अतिशोक्तीपासून लांब राहिलेलो आहोत. आम्ही असा कधीच दावा केलेला नाही की, सत्य आमच्याच जमाअतमध्ये एकवटलेले आहे. आम्हाला आमचंं हे कर्तव्य वाटलं म्हणून आम्ही उठून उभे राहिलो आहोत आणि आपल्याला आपल्या कर्तव्याची आठवण करू देत आहोत. आता हे आपल्या मर्जीवर अवलंबून आहे की आपण आमच्यासोबत उभे राहता किंवा स्वतः उठता आणि आपल्या कर्तव्याचे निर्वहन करता किंवा दूसरा कोणी या कर्तव्याचा निर्वाह करत आहे असे आपणाला वाटत असेल तर आपण त्यांची साथ देता.
Labels:

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget