Halloween Costume ideas 2015

महाराष्ट्रातील बिनव्याजी सोसायट्या देशात अव्वल

नवी दिल्ली (बशीर शेख)
’’सहूलत मायक्रोफायनान्स सोसायटी द्वारा दोन दिवसीय राष्ट्रीय प्रशिक्षण कार्यशाळा ’’फाइनेंशियल डिसीप्लीन / वित्तीय अनुशासन’’ नवी दिल्ली येथील अमिया सूट हॉटेल येथे  आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेत देशातील 26 बिनव्याजी सोसायटी, संस्थांचा सहभाग होता. यामध्ये महाराष्ट्रातील 12 सोसायट्यांनी सहभाग नोंदविला. कार्यशाळेत  संस्थाच्या 70 प्रतिनिधींनी भाग घेतला होता. यावेळी घोषित झालेल्या तीन मुख्य आणि दोन प्रोत्साहन पुरस्कारात महाराष्ट्रातील चार संस्थांनी आपले नाव कोरले.
दोन दिवसीय कार्यशाळेच्या समारंभास जमाअते इस्लामी हिंदचे राष्ट्रीय अध्यक्ष सय्यद सआदतुल्लाह हुसैनी, पूर्व राष्ट्रीय अध्यक्ष मौलाना जलालुद्दीन उमरी, महाराष्ट्राचे माजी प्रदेशाध्यक्ष तौफिक असलम खान, इंडियन सोसायटी फॉर इस्लामिक फाइनान्सचे संस्थापक ए.अब्दुल रकीब, सहूलत मायक्रोफायनान्स सोसायटीचे अध्यक्ष टी.आरिफ अली, उपाध्यक्ष  मोहम्मद जाफर, तासीस चे संचालक ए.एम. खटखटे, दिल्ली अल्पसंख्यांक आयोगाचे जफरूल इस्लाम यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी सहुलतचे संचालक अर्शद अजमल यांनी यावेळी माहिती देताना सांगितले की, संस्थेच्या 26 लघू संस्था व त्याच्या 62 शाखा कार्यरत आहेत. या संस्थांनी आतापर्यंत 1 लाख 22  हजार व्यक्तींना 171 करोड रूपये बिनव्याजी कर्ज दिले आहे. ते म्हणाले, महाराष्ट्रात सहकारी संस्था उभा करणे अवघड कार्य आहे. तरी परंतु, राज्यात सर्वधिक सहकारी संस्थां उघडत  आहेत. समाधान सोसायटी नागपूरचा उल्लेख करताना ते म्हणाले, की 75 लाख रूपये 4 हजार सभासदांपासून जमवून शासनाची मंजूरी मिळविणे कठीण वाटले होते. परंतु, अथक  परिश्रम आणि नम्रतापूर्वक हे काम प्रगतीपथावर आहे.
यावेळी अर्थशास्त्री विजय मोहन म्हणाले की, देश भयंकर मंदीच्या विळख्यात आहे. घरेलू उत्पादने महाग झाली आहेत. बँक लोकांना कर्ज देऊ इच्छित आहे परंतु, लोक घेऊ इच्छित  नाहीत. बँकेवरून लोकांचा विश्वास उठत आहे. अशा स्थितीत सरकारने इस्लामी कर्जे हसना ’उसने कर्ज’ योजना सुरू करणे गरजेचे आहे. तरच देशातील आर्थिक मंदी दूर होऊ शकते.  ते म्हणाले की, या योजनेला इक्विटी फंड या नावाने सरकारकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. आजच्या परिस्थितीत इस्लामच्या या कल्याणकारी व्यवस्थेचा लाभ उठवून आर्थिक  क्रांती केली जाऊ शकते. कार्यशाळेत व्याजमुक्त आर्थिक व्यवस्था, कौशल्य विकासावर भर होता. समारोप कार्यक्रमात तीन संस्थांना गेल्या तीन वर्षाच्या आर्थिक देवाण-घेवाणीच्या  उत्कृष्ट कार्याबद्दल राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी उस्मानाबाद राहत संस्थेचे संचालक अशरफ शेख, शुजाउद्दीन शेख, रियाज शेख, लातूर युनिटीचे संचालक इक्राम शेख, नागपूर ’’समाधान सहकारी संस्थेचे शारिक जमाल आणि  इरफान सिद्दीकी, अंबाजोगाई येथील अलखैर नागरी पतसंस्था उपाध्यक्ष शेख तालेब चाऊस, संचालक शेख रिजवान, व्यवस्थापक सय्यद रऊफ उपस्थित होते. बिनव्याजी बँका देशात  मोठ्या संख्येने उभारून सामान्य नागरिकांना मुख्य प्रवाहात आणावे, असे आवाहनही करण्यात आले.

यांना मिळाले पुरस्कार...
प्रथम पारितोषिक सुवर्णपदक मुंबई येथील बैतुन नस्र सोसायटी ला देण्यात आले. पुरस्काराचे प्रमाणपत्र, ट्रॉफी, 2 लाख रूपये, द्वितीय पारितोषिक रजत पदक अंबाजोगाईच्या अलखैर  नागरिक सहकारी पतसंस्थेला दिले गेले. याचे स्वरूप प्रमाणपत्र, ट्रॉफी आणि दीड लाख रूपये तर तिसरे पारितोषिक कांस्य पदक केरळच्या संगमम मल्टी स्टेट संस्थेला मिळाले.  पुरस्काराचे स्वरूप प्रमाणपत्र, ट्रॉफी आणि एक लाख रूपये असे होते. विशेष कार्य केल्याबद्दल प्रोत्साहनपर बक्षीस राहत को-ऑप सोसायटी उस्मानाबाद प्रथम, युनिटी को-ऑप सोसायटी  लातूर द्वितीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. देशभरातील बिनव्याजी संस्थांनात महाराष्ट्रातील संस्थांचे कार्य समाधानकारक व प्रगतीच्या दिशेने सुरू आहे, असल्याची  प्रतिक्रियाही मान्यवरांनी व्यक्त केली.

Labels:

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget