Halloween Costume ideas 2015
October 2019

मला माहीत आहे की माझ्या लेखाचे शीर्षक वाचूनच वाचकांच्या भुवया उंचावल्या असतील, पण मला विश्वास आहे की लेख पूर्ण वाचल्यानंतर आपल्या मनात डोकावलेल्या प्रश्नांची  समाधानकारक उत्तरे आपणास मिळतील. भारत हा विविध धर्म व परंपरांनी नटलेला देश आहे. सर्व आबालवृद्धांमध्ये सणाच्या दिवशी आनंद व उत्साहाची लहर असते. हा एक भाग  झाला. पण सण साजरे करण्यामागचा खरा उद्देश असतो की त्या सणाशी निगडीत इतिहास जाणून घेणे व त्यामधून मिळणारी शिकवण, बोध आत्मसात करणे.
१. रामाने रावणाचा वध केला. या विजयास्तव दसरा सण साजरा केला जातो. म्हणजेच कुकर्मावर सत्याचा व हक्काचा विजय, हा बोध हा सण साजरा करण्यामागे असतो.
२. मातृइच्छेला मान देऊन बारा वर्षांचा वनवास संपवून, रावणाचा पराजय करून राम स्वदेशी परतले. या आनंदास्तव दिवाळी साजरी केली जाते.
३. श्रीकृष्णाने जुलमी राक्षस नरकासूराचा वध करून आपल्या बंदिवासात असलेल्या सोळा हजारांपेक्षा अधिक स्त्रियांना मुक्त केले. नरक चतुर्थी साजरी करण्यामागचा हा इतिहास आहे.   म्हणजेच कृष्णाने स्त्रीसन्मान व स्त्रीहक्कांसाठी दिलेला लढा हा या सणामधून मिळणारा बोध आहे.
४. कार्तिक आमावस्येच्या दिवशी पांडव बारा वर्षांच्या अज्ञातवासातून परतले होते आणि त्यांच्या स्वागतास्तव दिवे लावण्यात आले होते. त्यानंतर महाभारत घडले.
आपल्याच लोकांना युद्धभूमीवर पाहून धनुष्य खाली ठेवलेल्या अर्जुनाला अन्यायाविरूद्ध लढणे का व कसे आवश्यक आहे हे कृष्णाने केलेले प्रबोधन हाच महाभारताचा गाभा आहे.  म्हणजेच हक्कासाठी व सत्य स्थापनेसाठा rलढणे आवश्यक आहे. हा बोध या सणामधून मिळतो.
५. लक्ष्मीपूजन या दिवशी भगवान विष्णूने वामन अवतार धारण करून लक्ष्मीला बळी राजाच्या तावडीतून सोडविले होते. म्हणजे स्त्री अस्मितेसाठी तढा देणे हा बोध यामागे आहे.
६. राजा विक्रमादित्य यांचा राज्याभिषेक देखील याच दिवसांत झाला होता. विक्रमादित्य हे जनतेची काळजी घेणारे व शत्रूंशी लढणारे शूर राजा होते. म्हणजेच सामान्य जनतेसाठी शत्रूशी  लढणे महान कार्य आहे हा बोध या उत्सवातून आम्हाला मिळाला.
वरील सर्व इतिहास आणि आख्यायिका वाचल्यानंतर आम्हास समजते की दसरा व दिवाळी हे सण साजरे करण्यामागे ‘सत्याचा असत्यावर विजय’ हा मतितार्थ आहे. म्हणजे दसरा,  दिवाळी साजरी करण्यामागचा उद्देश ‘जिहाद’ होता, असे जर का मी म्हटले तर ते कानांना ऐकण्यासाठी खूप जड जाते. पण हे योग्य आहे का अयोग्य आहे हे समजण्यासाठी आपण  प्रथम ‘जिहाद’ या शब्दाचा खरा अर्थ समजून घेऊ या. कारण दुर्दैवाने आमच्यासमोर जिहादची खूप चुकीची प्रतिमा उभी करण्यात आली आहे. कुरआनच्या परिभाषेत जिहादचा अर्थ होतो   ‘अन्यायाविदूद्ध लढा देणे, स्वत:मधील व समाजामधील वाईट गोष्टी काढून टाकण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणे.’
जिहाद हा वेगवेगळ्या प्रकारचा असू शकतो. म्हणजे नैतिक जिहाद, आध्यात्मिक जिहाद, रक्षणात्मक जिहाद, वंशभेदविरोधी जिहाद, अन्यायाविरूद्ध जिहाद, सेवात्मक जिहाद इ.  स्वत:पुरते मर्यादित न राहता सर्व समाजाचे भले व्हावे यासाठी पुढाकार घेणे याला ‘जिहाद’ म्हणतात.
म्हणजे अन्यायाविरूद्ध लढा देणे हे स्वत: श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतो, तर इस्लामी व्याख्येत तो जिहादच झाला. किंवा परस्त्रीवर हात घालणाऱ्या रावणाचा जेव्हा राम अंत करतो, तर  हाही जिहादच आहे. प्रेषित मुहम्मद (स.) यांनी गुलामांना गुलामगिरीतून मुक्त केले, स्पृश्यास्पृश्यतेचा भेद मिटविला, दारूला हराम केले, व्याजाला हराम केले, असत्याविरूद्ध युद्धे लढली,  हा सर्व जिहादच होता.
जवळच्या भूतकाळात जायचे झाले तर म. गांधी, मौ. आझाद यांच्यासह इतर भारतीयांनी इंग्रजांविरूद्ध दिलेला स्वातंत्र्य लढा हादेखील जिहादच आहे. सध्याच्या काळातील उदाहरण  द्यायचे झाले तर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे उपोषण, मेधा पाटकर यांचे वंचितांसाठी लढा देणे हा जिहाद आहे. बाबा आमटे यांनी कुष्ठरोग्यांची केलेली सेवा जिहाद आहे.  दाभोळकरांनी अंधश्रद्धा निर्मूलनासाठी केलेला प्रयत्न जिहाद आहे. अशी एक ना अनेक उदाहरणे आपणास अन्यायाविरूद्ध लढणाऱ्या महान व्यक्तींची देता येतील.

जिहाद समजून घ्या
‘जिहाद’ म्हणजेच  अन्यायाविरूद्ध लढणे ही जर का चांगली गोष्ट आहे तर मग जिहादला तलवार व रक्तपात या व्याखेशी का जोडले गेले आहे? याचे उत्तर आहे कुरआनचे अर्धवट  ज्ञान! म्हणजे बघा कुरआनमध्ये म्हंटले आहे, ‘‘युद्ध करणे जरी तुम्हाला नापसंत असले तरी ते तुमचे कर्तव्य आहे.’ (अध्याय २, श्लोक २१६)
हा श्लोक वाचल्यानंतर वाचकाला शंका येते की शांतीचा संदेश देणाऱ्या कुरआनात लढायची गोष्ट का येते? आणि मग वाचक याचा अभ्यास करण्याऐवजी इस्लाम धर्माला वाईट समजू  लागतो. खरे पाहता कुरआनमध्ये जिहादचा आदेश तेव्हाच येतो जेव्हा सत्य व हक्काला दाबून असत्यावर चालणाऱ्या अत्याचारी लोकांचा बिमोड करणे आवश्यक असते. आता असाच  एक श्लोक महाभारतात आहे, ‘‘कृष्ण अर्जुनाला म्हणतो की- अन्यायाविरूद्ध लढणे, शस्त्र उचलणे हे क्षत्रियाचे कर्तव्य आहे.’’ आता या दोन्ही श्लोकांमध्ये केलेले संबोधन एकच आहे.  म्हणजेच कोणाला उगाचच मारणे वा नुकसान पोहचविणे शंभर टक्के चुकीचे आहे. पण पोलिसांनी चोराला पकडणे, गुन्हेगाराला बंदुकीचा धाक देणे, गंभीर गुन्ह्यात न्यायालयाने फाशीची  शिक्षा सुनावणे योग्य आहे की अयोग्य? रस्त्यात एकट्या मुलीला छेडणाऱ्या टोळक्याला शक्तीचा वापर करून पळविणे योग्य की अयोग्य? अर्थातच योग्य आहे. नाही तर वाईट  प्रवृत्तींना समाजात आणखी बळ मिळेल आणि त्याचा परिणाम संपूर्ण समाजाला भोगावा लागेल. कुरआनमध्ये अशा वाईट गोष्टींना ‘फसाद’ असे संबोधले आहे आणि अशा फसादींना  रोका म्हणजे जिहाद करा, असे सांगितले आहे. यासाठी तुमच्या वाणीचा उपयोग करा, समजवा, कायद्याचा उपयोग करा, तुमच्या हातांनी रोका, असे सांगितले आहे. या तुमच्या सर्व  सामूहिक प्रयत्नांना ‘जिहाद’ असे म्हटले गेले आहे.

गैरसमजांची कारणे-
१, प्रसारमाध्यमे- ‘इस्लाम व मुस्लिमांबद्दल शक्य तितके वाईट दाखवा आणि टी.आर.पी. वाढवा’ हे साधे समीकरण आज झाले आहे. कोणतेही चॅनेल उघडा हाच मुद्दा पुन्हा पुन्हा  चघळून तुमच्यासमोर सादर केला जातो आणि त्या आधारे माध्मयांच्या तिजोऱ्या भरल्या जात आहेत.
२. इस्लामोफोबिया- जगात सर्वाधिक जोमाने पसरणारा धर्म म्हणजे इस्लाम होय. याची पडताळणी आपण कोठेही करू शकता. मग या धर्माला रोखण्यासाठी विरोधकांकडून निर्माण  केलेले वैचारिक षङ्यंत्र म्हणजे इस्लामोफोबिया. यामागे पूर्वग्रहावर आधारलेली इस्लामविषयी असुरक्षिततेची भावना असते. त्यामुळे भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात ‘इस्लामोफोबिया’  पसरत असल्याचे सध्या तरी दिसत आहे. ‘फोबिया' या शब्दाचा अर्थ आहे अतिशयोक्त, नीटपणे मांडता न येणारी व तर्कशुद्ध नसणारी भीती. कोणत्याही बुद्धिनिष्ठ, तर्कसुसंगत  कारणाशिवाय एखाद्या गोष्टीविषयी माणसाला सतत भीती वा संशय वाटत राहिला, तर त्याला 'फोबिया' म्हणतात.
३. खनिज तेल साठे- तिसरे कारण म्हणजे मुस्लिम देशांकडे असलेले तेलसाठे. त्यावर कब्जा करण्यासाठी स्वत:ला महापॉवर म्हणविणाऱ्या देशांकडे कारण हवे होते. मग जिहादी टोळ्यांची उपज करून त्यांना जेरीस आणण्याचा बू करून, युद्धे लादून तेलसाठ्यांवर नियंत्रण मिळविणे हा या तथाकथित महाशक्तींनी उद्देश साध्य करून घेतला.

हा जिहाद नव्हे-
दाढी व टोपी धारण केलेल्या दहशतवाद्यांनी सामान्य लोकांवर केलेला गोळीबार.
‘जय श्रीराम’च्या घोषणा देऊन गोरक्षेच्या नावाखाली सामान्य माणसांची केलेली हत्या.
श्रीलंकेतील चर्चमध्ये खिश्चन बांधवांवर झालेला भ्याड हल्ला.
न्यूझिलंडच्या मस्जिदीमध्ये नमाजींवर झालेला क्रूर हल्ला.
ही सर्व उदाहरणे जिहाद नव्हे. निरपराधांना मारणे जिहाद होऊच शकत नाही. कुरआनात स्पष्ट सांगितले आहे,
‘‘ज्याने एका निष्पाप व्यक्तीची हत्या केली त्याने पूर्ण मानवजातीची हत्या केली आणि ज्याने एका निष्पाप व्यक्तीला वाचविले, त्याने संपूर्ण मानवजातीचे रक्षण केले. (मग ती व्यक्ती  कोणत्याही जातीधर्माची असो)’’ (अध्याय ५, श्लोक ३२)

जिहाद असा करा
पाचशे रुपयांचे जेवण व दारू मिळेल त्या राजकीय पक्षासाठी मोर्चे काढणे योग्य आहे का? एका नि:शस्त्र माणसाला शंभर-दोनशे जणांच्या जमावाने काठ्यांनी, दगडांनी, लाथाबुक्क्यांनी  जीव जाईपर्यंत मारणे वीरता आहे का? आजच्या तरुणपिढीला सांगावेसे वाटते की जिहाद करायचाच असेल तर खालील बाबतीत करा-

१) व्यसनमुक्त राहा आणि इतरांनाही व्यसनमुक्त करा.
२) शिक्षणापासून वंचित असणाऱ्यांना मदत करा.
३) अन्यायाविरूद्ध उभे राहा आणि लढा द्या.
४) गरीब, अनाथ, रुग्ण यांची शक्य तितकी मदत करा.
५) सत्यासाठी उभे राहा, मग तो कोणत्याही जातीधर्माचा असो.
आज दसरा-दिवाळीच्या निमित्ताने ‘जिहाद’बद्दल असलेले आपले गैरसमज दूर झाले असतील असा मला विश्वास आहे.

- -मिनाज शेख, पुणे

माननीय अनस यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले की, ‘‘ही धर्मद्रोह्याची नमाज आहे, तो सूर्योदयाची वाट पाहात बसतो, अगदी तो उगवतोही आणि  अनेकेश्वरवाद्यांची सूर्यपूजेची वेळ होते तेव्हा हा उठतो आणि घाईघाईत चार रकआत पूर्ण करतो (जसे कोंबडी जमिनीवर चोच मारते आणि वर उचलते). असा मनुष्य आपल्या   नमाजमध्ये अल्लाहचे अजिबात स्मरण करीत नाही.’’ (हदीस : मुस्लिम)

स्पष्टीकरण
या हदीसद्वारा ईमानधारक आणि धर्मद्रोह्याच्या नमाजमधील फरक स्पष्ट करण्यात आला आहे. ईमानधारक आपली नमाज वेळेवर अदा करतो, रुकुअ आणि सजदा योग्य पद्धतीने
करतो, त्याचे मन अल्लाहच्या स्मरणात गुंतलेले असते आणि धर्मद्रोह्याची नमाज वेळेवर अदा होत नाही, रुकुअ व सजदा योग्य प्रकारे करीत नाही आणि त्याचे मन अल्लाहसमोर  नसते. खरे  पाहता प्रत्येक नमाज महत्त्वाची आहे, परंतु ‘फजर’ आणि ‘अस्र’च्या नमाजचे महत्त्व अधिक आहे. ‘अस्र’ची वेळ गफलतीची असते. सर्वसाधारणपणे सर्व लोक आपापल्या  कामात असतात आणि रात्र होण्यापूर्वी आपला व्यापारउदीम आटोपण्याच्या प्रयत्नात असतात आणि आपल्या विखुरलेल्या कामांना पूर्ण करण्याची प्रत्येकाची इच्छा असते. म्हणून  ईमानधारकाची बुद्धी जागृत नसेल तर ‘अस्र’ची नमाज सुटण्याची शक्यता असते. तसेच सकाळच्या नमाजचे महत्त्व यासाठी आहे की झोपेची वेळ असते. सर्वांना ठाऊक आहे की रात्रीच्या शेवटच्या प्रहरची झोप गाढ व गोड असते. जर मनुष्याच्या मनात ईमान जागृत नसेल तर तो आपल्या प्रिय झोपेला सोडून अल्लाहचे स्मरण करण्यासाठी उठू शकत नाही.

माननीय अबू हुरैरा (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘जमिनीची देखरेख करणारे रात्र आणि दिवसाचे ‘फरिश्ते’ (देवदूत) आपल्या कामाच्या वेळा बदलत  असतात आणि ‘फज्र’ आणि ‘अस्र’च्या नमाजमध्ये एकत्र येतात, मग जे फरिश्ते तुमच्यात असतात ते आपल्या पालनकर्त्यासमोर जातात तेव्हा तो त्यांना विचारतो की तुम्ही माझ्या  भक्तांना कोणत्या स्थिती सोडले? तेव्हा ते म्हणतात की जेव्हा आम्ही त्यांच्याजवळ गेलो होतो तेव्हा ते नमाज अदा करीत होते आणि जेव्हा आम्ही त्यांना सोडले तेव्हा ते नमाज अदा   करीत होते.’’ (हदीस : मुस्लिम)

स्पष्टीकरण 
ही हदीस ‘फज्र’ आणि ‘अस्र’च्या नमाजचे महत्त्व स्पष्ट करीत आहे. ‘फज्र’च्या नमाजमध्ये रात्रीचे ‘फरिश्ते’ (देवदूत) सहभागी होतात आणि ते फरिश्तेदेखील ज्यांना  दिवसा काम करायचे असते. अशाप्रकारे ‘अस्र’च्या नमाजदेखील दोन्ही वेळचे फरिश्ते ईमानधारकांसह नमाजमध्ये सहभागी असतात. ईमानधारकांना फरिश्त्यांचा सहवास लाभावा यापेक्षा  मोठे सुदैव ते कोणते. माननीय अबू हुरैरा (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘सात प्रकारचे लोक अल्लाह आपल्या छायेत जागा देईल, त्या दिवशी  अल्लाहच्या छायेव्यतिरिक्त दुसरी कोणतीही छाया नसेल. (१) न्याय करणारा सम्राट, (२) अल्लाहच्या भक्तीत आपले तारुण्य व्यतीत करणारा तरुण, (३) असा मनुष्य ज्याचे मन   मस्जिदशी अडकलेले असते, जेव्हा तो मस्जिदमधून बाहेर पडतो तेव्हा पुन्हा दुसऱ्यांदा मस्जिदमध्ये प्रविष्ट होण्याची वाट पाहत असतो, (४) ती दोन माणसे ज्यांच्या मैत्रीचा आधार  अल्लाह आणि अल्लाहचा ‘दीन’ (इस्लाम) आहे, त्याच भावनेसह ते एकत्र येतात आणि त्याच भावनेसाठी ते अलिप्त होतात, (५) तो मनुष्य ज्याने एकांतात अल्लाहचे स्मरण केले  आणि त्याच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले, (६) तो मनुष्य ज्याला एखाद्या उच्च कुलीन सौंदर्यवतीने दुष्कृत्यासाठी बोलविले आणि त्याने फक्त अल्लाहच्या भयापोटी तिला नकार दिला  आणि (७) तो मनुष्य ज्याने अशाप्रकारे ‘सदका’ (दानधर्म) केला की त्याच्या डाव्या हातालादेखील माहीत नाही की उजव्या हात काय देत आहे.’’
(हदीस : मुत्त़फक अलैहि)

(१७) नि:संशय कुफ्र (नकार) त्या लोकांनी केला ज्यांनी सांगितले की मरयमपुत्र मसीह हाच ईश्वर आहे.३९ हे नबी (स.)! त्यांना सांगा की जर अल्लाहने मरयमपुत्र मसीह आणि त्याची  आई तसेच पृथ्वीवरील सर्वांना नष्ट करू इच्छिले तर कोण त्याला या इराद्यापासून रोखू शकेल? अल्लाह तर पृथ्वी आणि आकाशांचा आणि त्या सर्व वस्तूंचा स्वामी आहे ज्या पृथ्वी आणि आकाशांमध्ये आढळतात. तो जे काही इच्छितो सृजन करतो४० व त्याचे प्रभुत्व प्रत्येक वस्तूवर आहे.
(१८) यहुदी आणि खिस्ती सांगतात की आम्ही अल्लाहचे पुत्र व त्याचे लाडके आहोत. त्यांना विचारा, मग तो तुमच्या अपराधांकरिता तुम्हाला शिक्षा का देतो? खरे पाहता तुम्हीदेखील  तशीच माणसे आहात जशी इतर माणसे अल्लाहने निर्माण केली आहेत.तो ज्याला इच्छितो माफ करतो आणि ज्याला इच्छितो शिक्षा देतो. पृथ्वी, आकाश आणि त्यात आqस्तत्वात  असलेल्या सर्व वस्तू त्याच्या मालकीच्या आहेत आणि त्याच्याकडे सर्वांना परतावयाचे आहे.
(१९) हे ग्रंथधारकांनो! आमचा हा पैगंबर अशा वेळी तुमच्यापाशी आला आहे आणि धर्माची अशी सुस्पष्ट शिकवण तुम्हाला देत आहे - जेव्हा पैगंबरांच्या आगमनाचा क्रम एका  दीर्घकाळापासून बंद होता - ते अशाकरिता की तुम्ही असे सांगू नये की आमच्यापाशी कोणी शुभवार्ता देणारा आणि भय दाखविणारा आला नाही. तर पाहा, आता तो शुभवार्ता देणारा व   भय दाखविणारा आला आहे - आणि अल्लाह प्रत्येक वस्तूवर प्रभुत्वसंपन्न आहे.४१
(२०) आठवा, तो प्रसंग जेव्हा मूसा (अ.) यांनी आपल्या लोकांना सांगितले होते की, ‘‘हे माझ्या बांधवांनो! अल्लाहची ती देणगी ध्यानात घ्या जी त्याने तुम्हाला प्रदान केली होती. त्याने  तुमच्यात नबी (पैगंबर) निर्माण केले. तुम्हाला सत्ताधारी बनविले आणि तुम्हाला ते सर्वकाही दिले जे या जगात कोणालाच दिले नव्हते.४२
(२१) हे माझ्या बांधवांनो! या पवित्रभूमीत दाखल व्हा जी अल्लाहने तुमच्याकरिता विधिपूर्वक बहाल केली आहे.४३ मागे फिरू नका नाहीतर अयशस्वी व निराश परताल.’’४४





३९) खिस्ती लोकांनी सुरवातीला इसा (अ.) यांच्या व्यक्तित्वाला मानवता आणि ईशत्वाचे मिश्रण दाखवून जी घोडचूक केली त्याची फलनिष्पत्ती इसा (अ.) त्यांच्यासाठी एक रहस्य  बनून राहण्यात झाली. या रहस्याला त्यांच्या धर्मविद्वानांनी शब्दजाळात आणि कल्पनाविलासाने जाणून घेण्याचा जितका प्रयत्न केला तितकेच ते आणखी भ्रमात पडत गेले.  त्यांच्यापैकी ज्यांच्या मनावर या मिश्रित व्यक्तिमत्त्वाच्या मानवअंशाचा प्रभाव होता, त्यांनी इसा (अ.) यांना खुदाचा बेटा (ईशपुत्र) आणि तीन ईश्वरांपैकी एक होण्यावर जोर दिला.   तसेच ज्या लोकांच्या मनावर ईशत्वाच्या अंशाचा मोठा प्रभाव पडला त्यांनी पैगंबर इसा (अ.) यांना अल्लाहचे शारीरिक प्रकटन समजून (अवतार) साक्षात ईश्वर बनवून टाकले आणि  पैगंबर इसा (अ.) यांना ईश्वर मानून त्यांची उपासना सुरु केली. या दोघांच्या मधला मार्ग ज्यांनी काढण्याचा प्रयत्न केला त्यांनी शब्दजाळात फसून असे शब्दप्रयोग केले ज्यामुळे पैगंबर  इसा (अ.) यांना ईश्वर व मनुष्य दोन्ही समजण्यात येऊ लागले. अशाप्रकारे ईश्वर आणि मसीह (इसा) वेगवेगळेसुद्धा राहावेत आणि एकसुद्धा राहावेत. (पाहा कुरआन ४:१७१, टीप २१२,२१३,२१५)
४०) या वाक्यात एक सूक्ष्म संकेत आहे. फक्त इसा (अ.) यांचे चमत्कारिकरित्या जन्माला येणे आणि त्यांच्या नैतिक परिपूर्णतांना आणि साक्षात चमत्कारांना पाहून ज्यांनी त्यांना  ईश्वर ठरवून टाकले होते; ते लोक खरे तर नादान आहेत. पैगंबर इसा (अ.) तर अल्लाहच्या अगणित निर्मितीपैकी एक निर्मिती आहे ज्याला पाहून या दृष्टीदोष असलेल्या लोकांचे डोळे  विस्फारले गेले. या लोकांना व्यापक दृष्टी असती तर याना स्पष्ट दिसले असते की अल्लाहने यापेक्षासुद्धा अधिक चमत्कारिक निर्मिती केलेल्या आहेत. तसेच अल्लाहचे सामथ्र्य एका  मर्यादेत सीमीत नाही, याची त्यांना जाणीव झाली असती. म्हणून ही एक घोर अविचारी वृत्ती आहे की, सृष्टीच्या चमत्कारांना पाहून स्रष्टीलाच सृष्टा (निर्माता) समजून बसावे.  समजुतदार लोक तर ते आहेत जे सृष्टीच्या निशाण्यांमध्ये (चमत्कार) सृष्टीनिर्मात्या अल्लाह (स्रष्टा) च्या महान सामथ्र्याला पाहतात आणि त्यातून ईमानचा प्रकाश प्राप्त् करतात आणि आणखीन दृढ श्रद्धाशीलता धारण करतात.
४१) या प्रसंगी हे वाक्य अत्यंत भावपूर्ण आणि सूक्ष्म आहे. याचा अर्थ असासुद्धा होतो की अल्लाह शुभवार्ता आणि भयवार्ता देणारे पैगंबर पाठविण्याचे सामथ्र्य राखून होता. त्यानेच  आता पैगंबर मुहम्मद (स.) यांना जगात यासाठी पाठविले आहे. अल्लाह असे करण्याचे सामथ्र्य राखून आहे. दुसरा अर्थ होतो की जर तुम्ही शुभवार्ता आणि भयवार्ता देणाऱ्याचे म्हणणे  ऐकले नाही तर याद राखा की अल्लाह सामथ्र्यवान आणि बलशाली आहे. कोणतीही शिक्षा तो तुम्हाला विनाविलंब कधीही देऊ शकतो.
४२) हा संकेत आहे बनीइस्राईलच्या गतवैभवाकडे जे पैगंबर मूसा (अ.) यांच्या फार पूर्वीच्या काळात त्यांना प्राप्त् होते. एकीकडे पैगंबर इब्राहीम, इसहाक, याकूब आणि यूसुफ (अ.) असे  महान पैगंबर त्यांच्या वंशात जन्माला आले. दुसरीकडे पैगंबर यूसुफ (अ.) यांच्या काळात आणि त्यानंतर बनीइस्राईलींना इजिप्तची पूर्ण सत्ता प्राप्त् झाली होती. बराच काळ सभ्य   जगाचे सर्वात मोठे शासक म्हणून हेच बनीइस्राईल लोक होते. इजिप्त् आणि त्याच्या लगतच्या प्रदेशात यांचा पूर्ण दरारा होता. सर्वसामान्यत: लोक बनीइस्राईलच्या उत्कर्षाचा इतिहास  पैगंबर मूसा (अ.) यांच्यापासून सुरू करतात. परंतु कुरआन येथे स्पष्ट करत आहे की बनीइस्राईलचा खरा वैभवाचा काळ हा पैगंबर मूसा (अ.) यांच्या पूर्वीचा काळ होता. या गत  वैभवाला स्वत: पैगंबर मूसा (अ.) आपल्या लोकसमुदायापुढे एक आदर्श काळ म्हणून सांगत होते.
४३) म्हणजे पॅलेस्टाईन (पॅलेस्टीन) ची भूमी जी पैगंबर इब्राहीम, इसहाक व याकूब (अ.) यांची जन्मभूमी होती, त्या काळी कट्टर अनेकेश्वरवादी आणि दृष्ट लोकांनी ती भूमी वसलेली  होती. बनीइस्राईल जेव्हा मिस्र (इजिप्त्) हून बाहेर पडले तेव्हा याच भूमीला अल्लाहने त्यांच्यासाठी नामांकित केले आणि आदेश दिला की जा आणि त्या भूभागावर विजय प्राप्त् करा.
४४) आदरणीय पैगंबर मूसा (अ.) यांचे हे भाषण त्या काळातले आहे जेव्हा इजिप्तहून बाहेर पडल्यानंतर दोन वर्षानी त्यांनी आपल्या अनुयायींना घेऊन फारानच्या जंगलात पडाव  टाकलेला होता. हे जंगल अरबच्या उत्तरे कडील सीना प्रायद्वीपमध्ये स्थित आहे जे पॅलेस्टाईनच्या दक्षिण भागाला लागून आहे.

अयोध्येतील बाबरी मस्जिद प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाची ४० दिवस सुनावणी पूर्ण झाली. या प्रकरणाचा निकाल १७ नोव्हेंबरला लागेल असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. इंग्रजांच्या  काळात म्हणजेच जवळपास २०६ वर्षांआधी बाबरी मस्जिदीच्या मुद्द्यावरून पहिल्यांदा वाद सुरू झाला. १५२६ साली बाबरने  राम मंदिर तोडून मस्जिद बनवली होती आणि त्याच्या  नावावर बाबरी मस्जिद असे नाव ठेवण्यात आल्याचा दावा ब्रिटीश राजवटीत १८१३ साली हिंदू संघटनांनी केला होता. त्या वेळी दोन्ही पक्षकरांमध्ये हिंसक घटनाही घडल्या होत्या. सन  १८५९ मध्ये ब्रिटीश सरकारने विवादित जागेवर तारेचे कुंपण बांधले. यानंतर १८८५ मध्ये प्रथमच महंत रघुबर दास यांनी ब्रिटिशांच्या कारकिर्दीत न्यायालयात याचिका दाखल करत मंदिर  बांधण्यासाठी परवानगी मागितली होती. १९३४ साली वादग्रस्त क्षेत्राची तोडफोड करण्यात आल्याने पहिल्यांदा या ठिकाणी हिंसा भडकली. यानंतर तत्कालीन ब्रिटीश सरकारने मस्जिदीची  दुरुस्ती केली होती. यानंतर २३ डिसेंबर १९४९ रोजी हिंदूंनी रचनेच्या मध्यभागी भगवान रामाची मूर्ती ठेवून पूजाअर्चना करण्यास सुरवात केली. यामुळे मुस्लिम पक्षाने तेथे नमाज अदा  करणे बंद केले आणि याविरुद्ध न्यायालयात दाद मागितली. १९५० मध्ये गोपालसिंग विशारद यांनी रामलल्लाची पूजा करण्यासाठी फैजाबादच्या न्यायालयात विशेष परवानगी मागितली.  त्यानंतर डिसेंबर १९५९ मध्ये निर्मोही अखाडा यांनी विवादित जागेचे हस्तांतरण करण्यासाठी दावा दाखल केला आणि डिसेंबर १९६१ मध्ये उत्तर प्रदेश सुन्नी वक्फ बोर्डाने बाबरी  मशिदीवर दावा दाखल केला. अशा प्रकारे स्वतंत्र भारतात बाबरी मस्जिदीचा मुद्दा पुन्हा एकदा मोठा मुद्दा बनला. विश्व हिंदू परिषदेने १९८४ मध्ये बाबरी मस्जिदीचे कुलूप उघडण्यासाठी  आणि येथे विशाल मंदिर बांधण्यासाठी एक मोहीम सुरू केली. या कालावधीत, देशभरात निदर्शने करण्यात आली. विहिंपबरोबरच भारतीय जनता पक्षानेही या प्रकरणाला हिंदू अस्मितेशी  जोडून संघर्ष सुरू केला. १९८६ मध्ये फैजाबादच्या जिल्हा न्यायाधीशांनी पूजा करण्याची परवानगी दिली. यामुळे नाराज झालेल्या मुस्लिम पक्षाने बाबरी मस्जिद कृती समिती स्थापन  करण्याचा निर्णय घेतला. ६ डिसेंबर १९९२ मध्ये कारसेवक मोठ्या संख्येने अयोध्येत पोहोचले आणि पुन्हा एकदा मस्जिदीची रचना पाडली. या काळात देशभर जातीय दंगल झाल्या  आणि तात्पुरते राम मंदिरही बांधले गेले. त्यानंतर मंदिराच्या बांधकामासाठी दगडांच्या कोरीव कामांनाही वेग आला. डिसेंबर १९९२मध्ये लिब्रहान कमिशनची स्थापना झाली. बाबरी  मस्जिद प्रकरणात अलाहाबाद उच्च न्यायालयाने सन २०१० साली एक निकाल दिला आहे. त्यात त्यांनी अयोध्येतील वादग्रस्त २.७७ एकर जागेचे त्रिभाजन करून ती जागा निर्मोही  आखाडा, सुन्नी वक्फ बोर्ड आणि रामलल्ला यांना समान पद्धतीने वितरीत करावी असा निर्णय दिला आहे. त्यामुळे उर्वरीत जी ६७ एकराची कोणताहीं वाद नसलेली जागा आहे जी  सरकारने संपादित केली आहे ती त्यांच्या मूळ मालकांना परत करावी असा प्रस्ताव केंद्र सरकारने मांडला आहे. यानंतर अयोध्येतील वादग्रस्त जागेवर बाबरी मस्जिद विध्वंसाबाबतचे  प्रकरण मध्यस्थांकडे सोपण्यात आले. मध्यस्थीसाठी तीन सदस्यीय समिती नेमण्यात आली. परंतु, मध्यस्थीही निष्फळ ठरली. अखेर यानंतर, ६ ऑगस्ट २०१९ पासून सर्वोच्च न्यायालयाने दररोज सुनावणी घेण्यात आली. ६ डिसेंबर रोजी अयोध्येमध्ये बाबरी मस्जिद जमीनदोस्त करण्याची राजकीय कृती ही भारतीय राष्ट्रवादाच्या, भारतीय एकात्मतेच्या दहा  हजार वर्षांच्या भक्कम पायाला सुरूंग लावणारी आहे. या घटनेने मुस्लिम समाज व्यथित होणे स्वाभाविक आहे. हा बहुसंख्य समाज अशिक्षित, निरक्षर, बेकारी, स्रfरद्र्याने गांजलेला  आहे. त्याचा भावनात्मक उद्रेक होणे हे समजू शकते; पण खरे दु:ख झाले ते बहुधर्मीय राष्ट्रवाद मानणाऱ्यांच्या मनाला. येथील मुस्लिम समाज परदेशांमधून आलेल्या वेगळ्या वंशांमधून  तयार झालेला नाही. काही शतकांपूर्वी हिंदू समाजाचा शोषित भाग म्हणून जीवन कंठणारा हा समाज आहे. तो अस्सल भारतीय वंशाचा आहे. भारतात राहण्याचा त्याचा जन्मसिद्ध,  वंशसिद्ध, इतिहाससिद्ध हक्क आहे. जगातले सर्वांत मोठे मुस्लिम संख्येचे राष्ट्र म्हणून भारताकडे जग पाहते. बाबरी मस्जिदीचा विवाद सोडविण्याच्या दृष्टिकोनातून हिंदू व मुस्लिम  नेतृत्व संस्था संघटना आणि देशातील न्यायव्यवस्था प्रयत्नशील असताना येथील काही राजकीय सत्तापीपासू नेतेगण आणि काही मुस्लिम नेत्यांचा स्वार्थीपणा विलंबास कारणीभूत  ठरला. त्यातच देशातील सत्ताबदल घडल्यामुळे येथील धार्मिक ध्रुवीकरणाला वेग आला. त्यामुळे सर्वसामान्य भारतीय मुस्लिम संभ्रमावस्थेत गेला. मुस्लिम जनतेला मुख्य प्रवाहात  आणण्याऐवजी उलट अलगतावादी वृत्ती नेत्यांनी पोसली. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल जो काही लागेल तो दोन्ही बाजूंनी स्वीकारावा अशी समंजस हिंदूमुस्लिम नेते, विचारवंत यांची  अपेक्षा आहे. सुनावणी संपली, आता संयमाची आतुरता लागून राहिली आहे. आपला भलाबुरा इतिहास स्वीकारून आपण एक आहोत ही भावना हिंदू-मुस्लिम दोन्ही समूहाने मनोमन  अंगीकारल्याशिवाय एकोपा येणार नाही.

- शाहजहान मगदुम
मो.:८९७६५३३४०४
Email: magdumshah@eshodhan.com

Truth
आता मी थोडक्यात आपल्याला सांगणार आहे की, आपण कुठल्या उद्देशासाठी उठून उभे राहिलेलो आहोत. आपण सर्व त्या लोकांसाठी जे स्वतःला इस्लामचा पाईक मानतात, हा संदेश देऊ इच्छितो की, त्यांनी वास्तवमध्ये इस्लामला आपला दीन (धर्म / व्यवस्था) बनवायला हवा. त्याला व्यक्तीगत आणि सामुहिक जीवनामध्ये लागू करावयास हवा. त्याच्या इस्लामी तत्वांना आपल्या घरामध्ये, आपल्या परिवारामध्ये, आपल्या सोसायटीमध्ये , आपल्या शैक्षणिक संस्थांमध्ये, आपल्या साहित्य आणि पत्रकारितेमध्ये, आपल्या व्यवसायामध्ये, आपल्या आर्थिक उलाढालीमध्ये, आपल्या सामाजिक संस्थांमध्ये, आपल्या इतर संघटनांमध्ये आणि सामुहिक रितीने आपल्या कौमी पॉलीसी (मुस्लिम समाजाच्या नीती निर्धारणामध्ये) प्रत्यक्षात लागू करावे आणि आपल्या वाणी आणि कृतीने जगापुढे इस्लाम खरा असल्यासंबंधीची खर्‍या अर्थाने साक्ष द्यावी.
    आम्ही त्यांच्यासमोर हे ही स्पष्ट करू इच्छितो की, मुस्लिम होण्याच्या नात्याने धर्माची स्थापना करणे आणि धर्मासंंबंधीची खरी साक्ष देणे हाच तुमच्या जीवनाचा खरा उद्देश आहे. यामुळे तुमच्या सार्‍या प्रयत्नांचा केंद्रबिंदू याच गोष्टीवर फोकस व्हायला पाहिजे. तुम्हाला ते प्रत्येक काम सोडून द्यावे लागतील जे या उद्देशाच्या विपरीत असतील आणि इस्लामविषयी चुकीचे प्रतिनिधीत्व करत असतील. इस्लामला केंद्रस्थानी ठेऊन आपल्या पूर्ण जीवनाचा आढावा घ्या. पुन्हा एकदा सर्व गोष्टी तपासून पाहा. जेथे त्रुटी आढळतील त्यांना दूर करा आणि आपले सर्व प्रयत्न याच एका मार्गामध्ये लावून टाका जेणेकरून इस्लाम संपूर्णपणे प्रत्यक्षात प्रत्येकाच्या जीवनात आणि समाजात प्रस्थापित होवून जाईल. या संबंधीची साक्ष व्यवस्थित दिली जाईल, याकडे लक्ष द्या. जेणेकरून कोणालाही असे सांगण्याची संधी मिळू नये की, आम्हाला तर सत्यमार्गाची कल्पनाच नव्हती.
    हा आहे जमाअत-इस्लामीच्या स्थापनेमागचा एकमेव उद्देश्य. या उद्देशाच्या प्राप्तीसाठी जी पद्धत आम्ही अवलंबिलेली आहे ती ही आहे की, सर्वप्रथम मुस्लिमांना त्यांच्या कर्तव्याची आठवण करून द्यावी. स्पष्ट शब्दात त्यांना सांगावे की इस्लाम काय आहे? आणि तो तुमच्याकडून काय अपेक्षा करतो? मुस्लिम असण्याचा अर्थ काय आहे? आणि मुस्लिम होताच कुठल्या जबाबदार्‍या त्यांच्यावर येतात?
    जेव्हा लोक या गोष्टी समजून घेतात तेव्हा आम्ही त्यांना सांगतो की, इस्लामला अपेक्षित असलेले सर्व काम व्यक्तीगतरित्या साध्य करणे शक्य नाही. त्यासाठी सामुहिक प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. इस्लामचा एक छोटासाच भाग व्यक्तीगत जीवनाशी संबंधी आहे. त्याची स्थापना तुम्ही स्वतःच्या जीवनामध्ये करूनही घेतली तरी संपूर्ण इस्लामी व्यवस्थेला त्यामुळे समाजात लागू करता येणार नाही किंवा संपूर्ण इस्लाम संबंधीची साक्ष पूर्णपणे देण्याची जबाबदारी पार पाडता येणार नाही. उलट जेव्हा सामुहिक जीवनावर कुफ्र (इन्कार करणार्‍यांची व्यवस्था) कायम असेल. तेव्हा व्यक्तीगत जीवनातील बहुतेक भागांवरही इस्लामी आदेश लागू करता येणार नाहीत आणि सामुहिक व्यवस्थेची पकड दिवसेंदिवस या व्यक्तीगत इस्लामच्या सीमांना कमी-कमी करत जाईल. म्हणून संपूर्ण इस्लामला कायम करण्यासाठी आणि त्याची खरी-खरी साक्ष देण्यासाठी आवश्यक आहे की, ते सारे लोक जे मुस्लिम असल्याच्या नात्याने इस्लामी ज्ञान बाळगून आहेत व प्रामाणिक पणे त्या ज्ञानाला लागू करण्यासाठी इच्छुक आहेत त्यांना संघटित होऊन, संघटित प्रयत्नांद्वारेच इस्लामला प्रत्यक्षात आपल्या व्यक्तिगत आणि सामुहिक जीवनामध्ये प्रस्थापित करता येईल. तेव्हाच ते जगाला आपल्याकडे बोलविण्याचा प्रयत्न करू शकतात. सामुहिकरित्याच ते या कामात येणार्‍या अडचणींवर मात करू शकतात. हेच कारण आहे की ज्यामुळे इस्लाममध्ये सामुहिकतेला अनिवार्य करण्यात आलेले आहे. इस्लामची प्रतिस्थापना करण्यासाठी आणि त्याच्या संदेशाकडे दुसर्‍यांना बोलावण्यासाठी, एक क्रम आणि योजना ठेवली गेलेली आहे. म्हणजेच अगोदर एक जमाअत असावी, मग त्या जमाअतने अल्लाहच्या मार्गामध्ये प्रयत्न करावेत. हेच कारण आहे की, जमाअत शिवाय जे लोक जीवन जगतात त्यांना अज्ञानी जीवन जगणारे असे संबोधले जाते आणि जमाअतपासून वेगळे राहणार्‍यांना इस्लामपासून विभक्त राहणार्‍यांच्या बरोबर असल्याचे भाकीत केले गेलेले आहे.
    जे लोक ही गोष्ट समजतात आणि त्यातून त्यांच्यामध्ये मुस्लिम होण्याच्या नात्याने (त्यांच्यावर) येणार्‍या जबाबदार्‍यांची जाणीव एवढी मजबूत होऊन जाते की, ते आपल्या दीनसाठी आपले वैयक्तिक फायदे आणि अहंकाराचा त्याग करून जमाअतच्या अनुशासन आणि व्यवस्थेचा स्वीकार करतात, अशा लोकांसमोर आम्ही स्पष्ट करतो की, आता तुमच्यासमोर तीन मार्ग उपलब्ध आहेत आणि तुम्ही स्वतंत्र आहात की, या तिन्ही मार्गापैकी कुठलाही एक मार्ग स्वतःसाठी निवडू शकता. जर तुमचे मन साक्ष देत असेल की आमचा संदेश (दावत), श्रद्धा (अकीदा),   उद्देश (मक्सद) आणि जमाअतची व्यवस्था व आमच्या काम करण्याच्या पद्धती सर्व काही शुद्ध इस्लामी आहे आणि आम्ही तेच काम करण्यासाठी उभे ठाकलेलो आहोत जे काम कुरआन आणि हदीसच्या अनुसार मुस्लिम उम्मतचे मुलभूत कार्य आहे तर आमच्यासोबत व्हा. जर काही कारणांमुळे तुम्हाला आमच्यावर व आमच्या कार्यपद्धतीवर विश्‍वास होत नसेल व तुमच्या नजरेमध्ये दुसरी एखादी जमाअत अशी असेल की जी इस्लामी व्यवस्थेच्या स्थापनेच्या उद्देशाला केंद्रस्थानी ठेऊन इस्लामी पद्धतीने कार्य करीत असेल तर तुम्ही त्यात सामील होऊन जा. आम्हाला स्वतःला सुद्धा अशी जमाअत आढळून आली असती तर आम्ही तीत सामील झालो असतो, कारण की आम्हाला स्वतःची दीड विटांची वेगळी मस्जिद बनविण्याची इच्छा नव्हती आणि जर का तुम्हाला ना आमच्यावर विश्‍वास आहे ना कुठली दुसरी जमाअत अशी आढळून येते जी की तुमच्या अनुसार शुद्ध इस्लामी पद्धतीने कार्यरत आहे, तेव्हा तुमच्यावर हे अनिवार्य आहे की आपल्या इस्लामी कर्तव्याच्या पुर्तीसाठी स्वतः उभे रहावे आणि इस्लामच्या मुलभूत शिकवणीवर आधारित एक अशी जमाअत तयार करावी, जीचा उद्देश संपूर्ण दीन (इस्लाम)ची स्थापना करणे आणि वाणी आणि वर्तनाने त्याची साक्ष देणे असेल. या तीन मार्गापैकी जो मार्ग तुम्ही अवलंबाल इन्शाअल्लाह तो सत्यमार्ग असेल.

(मौलाना  अबुल आला मौदूदी, शहादत-ए-हक या पुस्तकातून) (भाग - 6)

विवाह सोपा करा कार्यशाळा : जुबेदा बाजी यांचे प्रतिपादन

नागपूर (डॉ. राशीद)
विवाह प्रक्रिया साधी आणि सोपी केली पाहिजे. विवाहित मुलींनी सासरमध्ये तनावमुक्त जीवन जगण्यांवर लक्ष द्यायला हवं. प्रत्येक गोष्ट शरियतच्या कसोटीत पाहून आचरण करायला हवं. घरातील वृद्धांना मान, सन्मान द्यायला हवा, त्यांची सेवा करायला हवी हे पुण्याचे काम आहे. वर्तमान काळात मोबाईल फोनवर तासन्तास बोलण्यामुळे अनेक समस्या उद्भवत आहेत. त्यामुळे ते टाळले पाहिजे, असे प्रतिपादन नागपूर येथील जुबेदा बाजी यांनी येथे केले.
    जमाअत-ए-इस्लामी हिंद नागपूर महिला विभागातर्फे गड्डीगोदामच्या वाय.एम.सी.ए. हॉलमध्ये आयोजित ’विवाह सोपा करा’ या विषयावर कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी त्या बोलत होत्या. मंचावर जेबा खान यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरूवात इरफाना कुलसुम यांनी कुरआनमधील सुरे निसा आयत क्रमांक 34 आणि 35 से पठण केले. व त्याचा अनुवाद सादर केला. यावेळी त्या म्हणाल्या, कुटुंबामध्ये पतीचा दर्जा जबाबदारीचा आहे. चांगली पत्नी ती आहे जी आपल्या पतीची अज्ञाकारी आहे. पत्नीने पतीच्या अनुपस्थितीमध्ये अल्लाहच्या रक्षणातून पतीच्या अधिकारांची रक्षा करते. पती-पत्नीच्या मध्ये काही कारणाने वितुष्ट निर्माण झाल्यास मध्यस्थांची भूमिका प्रामाणिक असेल तर ते संबंध अल्लाहच्या कृपेने पुनःश्‍च बहाल होतात.
    यावेळी जेबा खान म्हणाल्या, इस्लामी सिद्धांतानुसार कोणतीही व्यक्ती अविवाहित रहायला नको. विवाह खूप साधेपणानं व्हावेत. प्रेषित हजरत मुहम्मद सल्ल. यांच्या काळात त्यांचे घनिष्ठ सोबती हजरत अब्दुल रहमान बिन औफ रजि. यांनी आपला विवाह खूपच साधारण पद्धतीने केला होता. या विवाहाबद्दल त्यांनी प्रेषित सल्ल. यांनाही कळविले नव्हते. प्रेषित सल्ल. यांनी आपल्या मुलींचे विवाह एकदम साध्या पणाने केले. त्यामुळे कमीत कमी प्रत्येक मुस्लिम बांधवांने प्रेषित सल्ल. यांचे अनुकरण करावे, असे आवाहनही जेबा खान यांनी केले.  त्या पुढे म्हणाल्या, श्रीमंत लोक आपल्या मुलींचे विवाह मोठ्या थाटामाटात करून आपला मोठेपणा दाखवतात. याचा परिणाम गरीब लोकांवरही होतो. तो ही कर्ज काढून का होईना आपल्या मुलीचा विवाह तसाच करायला जातो अन् तो अनंत अडचणीत फसतो. त्यातून त्याला बाहेर पडायला फार मोठा कालावधी जातो. त्यामुळे विवाह करताना सगळ्या स्तरातील लोकांनी साधेपणा स्वीकारावा. वायफळ खर्चाला फाटा देत समाजोपयोगी कामात तो खर्च करावा, असे आवाहनही खान यांनी केले. यावेळी उपस्थित महिलांनीही आपले विचार व्यक्त केले. कार्यक्रमास परिसरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. सुत्रसंचालन अफरोज अंजुम यांनी केले. जुबेदा बाजी यांनी दुआ केली.

इस्लामी शरीअत कायद्यात बलात्काराला एक वेगळा अपराध गट म्हणून वर्गीकृत केले गेले नाही. ज्यामुळे यावर शिक्षा-संदर्भात काहीसा संदेह निर्माण झाला आहे. काही लोकांनी चुकीने असे समजून घेतले आहे की बलात्काराचे व्यभिचाराच्या शीर्षकान्वये मूल्यांकन करण्याची गरज आहे. वास्तविक बलात्कार दहशतवादी अपराधांच्या श्रेणीत येतो, ज्याला ’हिराबा’ म्हटल जाते. ’हिराबा’ म्हणजे लोकांवर सशस्त्र हल्ला करून किंवा बळाचा वापर करून त्यांना धमकावून भयभीत करणे, हत्या करणे, त्यांच्यावर दहशत बसविणे आणि जोर जबरदस्तीने उघडपणे त्यांची संपत्ती ताब्यात घेणे होय. संपत्तीचा उल्लेख प्रामुख्याने केला गेला आहे, कारण ’हिराबा’ दरोडाशी जुळलेला आहे, परंतु हा आदेश समानरीत्या त्या लोकांना लागू पडतो, जे बलात्काराच्या हेतुने इतरांना आतंकित करतात.
    इस्लाम धर्मात हिराबा मोठमोठ्या अपराधांमध्ये सर्वात जास्त गंभीर स्वरूपाचा अपराध आहे आणि कुरआन व पैगंबरीय आचरणशैली (सुन्नत) नुसार याचा कठोरपणे निषेध केला गेला आहे. वस्तुतः अशा अपराधांच्या शिक्षेसंबंधी कुरआनात अल्लाहचे फर्मान खालीलप्रमाणे आहे ः
    ”जे लोक अल्लाह आणि त्याच्या पैगंबराशी लढतात आणि जमिनीवर बिघाड निर्माण करण्यासाठी धाव-पळ करतात, त्यांचा मोबदला तर केवळ हाच आहे की त्यांना वाईटरीत्या ठार केले जावे किंवा सूळावर चढविले जावे किंवा त्यांचे हात-पाय परस्पर विरूद्ध दिशेत कापून टाकले जावेत किंवा त्यांना देशाबाहेर घालविले जावे. हा अपमान आणि तिरस्कार त्यांच्यासाठी जगात आहे आणि आखिरतमध्ये त्यांच्यासाठी भयंकर यातना आहे. परंतु जे लोक, या आधी की तुम्हाला त्यांच्यावर अधिकार प्राप्त व्हावा, परत येतील (अर्थात क्षमा-याचना करून सुधारतील) तर अशा स्थितीत तुम्हाला माहीत असले पाहिजे की अल्लाह मोठा क्षमाशील दया करणारा आहे.” (कुरआन - 5 ः33,34).
इस्लामी कायद्यात व्याभिचार व बलात्कारात फरक
    इस्लाम धर्माचे सुरूवातीच्या काळातील विद्वान, विशेषतः अल् दसूकी आणि न्यायाधीश इब्नुल अरबी यांनी हे कारण स्पष्ट केले की बलात्काराला व्यभिचाराच्या उलट ’हिराबा’ (दहशतवादा)च्या अपराधांसमान का समजले गेले पाहिजे. इब्नुल अरबी एक घटना सांगतात, ”जिच्यात एका समुहावर हल्ला चढविला गेला आणि त्या समुहातील एका स्त्रीवर बलात्कार केला गेला.” काही लोकांचा या संदर्भात तर्क असा होता की हा अपराध ’हिराबा’मध्ये समाविष्ट केला जाऊ नये, कारण यात संपत्ती वगैरे लुटली गेली नाही आणि शस्त्रांचाही वापर झाला नाही. या तर्कास उत्तर देताना इब्नुल अरबी म्हणाले, ”लज्जास्थानांवर घातलेला दरोडा, संपत्तीवर टाकलेल्या दरोड्यापेक्षा अधिक वाईट आहे आणि असा कोण आहे जो आपला बलात्कार केल्या जाण्याच्या तुलनेत आपल्यावर दरोडा टाकला जाणे पसंत करील.” हे वर्गीकरण तर्कसंगत आहे कारण यात जी वस्तू घेतली गेली ती पीडित व्यक्तीची संपत्ती होय आणि ही संपत्ती त्या व्यक्तीच्या मान-प्रतिष्ठा आणि सुरक्षेची भावना आहे.
    अशा प्रकारे ’हिराबा’च्या स्वरूपात बलात्कार एक हिंसक अपराध आहे. ज्यात बलात्काराचा वापर एका शस्त्राच्या स्वरूपात केला जातो. अशा प्रकारे हिराबाचा खटला चालविण्यात लक्ष बलात्काराच्या आरोपीवर केंद्रीत होते. विशेषतः त्याचा इरादा आणि शारीरिक कृत्य आणि खटल्याचे लक्ष बलात्काराला बळी पडलेल्या व्यक्तीवर नसते, कारण यात सहमती घेतली गेलेली नसते. हिराबाचा आरोप सिद्ध करण्यासाठी चार साक्षीदारांची गरज भासत नाही जशी सध्याच्या काळातील काही अप्रामाणिक शरीअत कौंसिल चुकीने विश्‍वास ठेवतात. त्याच्याऐवजी यात परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारावर वैद्यकीय तपासणी आणि प्रमाणांच्या आधारे खटला चालविला जातो.
    परिणामी, बलात्काराच्या अपराधीला अपराधी म्हणून सिद्ध करणे पूर्णतः नाजूक ठरते कारण इस्लामी न्यायालयात याचा अर्थ गुन्हेगाराच्या जीवन-मृत्यूचे अंतर आहे. यास्तव ही गोष्ट निर्धारित करण्यासाठी एक काळजीपूर्वक मूल्यांकन केले जाते. आरोपी असलेल्या व्यक्तीने काय खरोखर हा अपराध केला आहे? जर ठोस पुराव्यांनी हे सिद्ध झाले की लैंगिक संबंध आपसातील संमतीने झाला आहे आणि बलात्काराच्या आरोपीवर मिथ्यारोप ठेवला जात आहे. तर त्या दोघांवर व्यभिचाराचा आरोप निश्‍चित केला जाईल आणि त्या दोघांना, व्यभिचाराच्या अपराधाचीच शिक्षा मिळेल.
- सय्यद हामीद मोहसीन

Abhijit banerjee
या आठवड्यात अभिजित बॅनर्जी नावाच्या अर्थशास्त्राज्ञाने जेव्हा भारतात सुरू असलेल्या मंदीबद्दल चिंता व्यक्त केली आणि त्याच्या नावासमोर प्रतिष्ठित नोबेल पारितोषिक विजेता असे लिहून आले तेव्हा अनेक लोक चकित झाले. हे बॅनर्जी कोण, असा प्रश्‍न सगळेच एकमेकांना विचारू लागले आहेत. लगेच एक बातमी प्रमुख मीडिया हाऊसकडून दिली गेली की, यावर्षीचे अर्थशास्त्राचे नोबेल पारितोषिक हे अभिजित भट्टाचार्यासह तिघांना मिळालेले आहे. त्यामुळे आश्‍चर्याचा सुखद धक्का बसला. जेव्हा या संदर्भात अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा असे समजले की, अभिजित बॅनर्जी यांच्यासह त्यांची पत्नी एस्थर डफ्लो आणि मायकेल क्रेमा यांनाही अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिक मिळालेले आहे. श्री बॅनर्जी यांचे प्रारंभिक शिक्षण कलकत्ता विद्यापीठातून झाले व जवाहरलाल नेहरू विद्यापीठ दिल्ली येथून त्यांनी उच्चशिक्षण घेतले. पुढील संशोधनासाठी हावर्ड विद्यापीठ गाठले. गरीबी निर्मुलनासाठी मागच्या लोकसभेत काँग्रेसच्या जाहिरनाम्यात जी न्याय्य योजना सामील करण्यात आली होती ती अभिजित यांनीच तयार केलेली होती. या दाम्पत्याने, ’पुअर इकॉनॉमिक्स-ए रॅडिकल थिंकिंग ऑफ द वे टू फाईट ग्लोबल पावर्टी’ अर्थात जागतिक गरीबी निर्मुलनासाठी काय प्रयत्न व्हायला हवेत, याबद्दलचे संशोधन करून आपला अहवाल मांडला होता. त्यांच्याबरोबर काम करणारे क्रेमर हे आफ्रिकेतील संशोधक असून, बॅनर्जी यांनी भारतामध्ये संशोधन केलेले आहे. गरीबी दूर करण्यासाठी ज्या सरकारी योजना तयार केल्या जातात त्यामधील दोष आणि अडचणी याबाबत प्रत्यक्ष पाहणी करून त्यांनी जे निष्कर्ष काढले त्याची सैद्धांतिक मांडणी केल्यामुळे आणि त्या मांडणीवरून रॉयल स्विडिश अकॅडमीने गरीबांच्या प्रश्‍नावर सगळ्या जगाचे लक्ष वेधले. उच्च दर्जाचे शिक्षण आणि रोजगाराच्या संधी या भरपूर प्रमाणात उपलब्ध करून दिल्यास लोकांची गरीबी लोक स्वतःच दूर करून घेतात. ती दूर करण्यासाठी शासनाला वेगळे प्रयत्न करावे लागत नाहीत, असे त्यांच्या संशोधनाचे निष्कर्ष आहेत.
    अमेरिकेतील एका वृत्तवाहिनीशी बोलताना ते म्हणाले की, जगातलं दारिद्र्य कमी व्हावं यासाठी आम्ही गेल्या वीस वर्षांपासून प्रयत्न करतो आहोत. द्रारिद्र्य ही समस्या आहे, त्यावर कायमस्वरुपी उपाय योजण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहोत. मात्र भारतीय अर्थव्यवस्था सध्या चिंताजनक आहे.     एकीकडे विरोधक सरकारवर ढासळत्या अर्थव्यवस्थेवरुन आणि समोर आलेल्या जीडीपीच्या आकडेवारीवरुन टीका करत असताना आता अर्थशास्त्रातील योगदानाबद्दल नोबेल मिळालेल्या अभिजित बॅनर्जी यांनीही ढासळत्या अर्थव्यवस्थेबाबत चिंता व्यक्त केली आहे. त्यामुळे येणार्‍या काळात अर्थव्यवस्था कुठल्या दिशेने मार्गक्रमण करेल हे सांगणे अद्यापि शक्य नाही.

अलिकडेच राष्ट्रपिता महात्मा गांधींची 150 वी जयंती साजरी केली जात आहे. याप्रसंगी माध्यमांमध्ये अनेक गोष्टी लिहिल्या व बोलल्या जात आहेत. काही लोक प्रामाणिकपणे गांधीजींच्या शिकवणीवर आपले मत प्रदर्शित करीत आहेत. त्यांनी दाखविलेल्या मार्गावर आज जगाने चालणे कसे आवश्यक आहे, गांधींचे विचार कसे प्रासंगिक आहेत, हे समजावून सांगण्यावर जोर देत आहेत. परंतु काही लोक या संधीचा वापर करून आपली प्रतीमा संवर्धन करून स्वतःची स्वीकार्हता वाढविण्याचा प्रयत्न करीत आहेत. यासाठी मोठ्या कुटिलतेने ते बापूच्या लेखनाचा, त्यांच्या जीवनाचा आणि त्यांच्या वक्तव्यांचा वेचून उपयोग करीत आहेत.
    यामध्ये सर्वात पुढे हिंदू राष्ट्रवादी आहेत. विशेषतः संघ परिवार. संघाने आधीच गांधींच्या जातीय सलोख्याच्या मूळ संदेशाला बाजूला करून त्यांना केवळ स्वच्छतेचे प्रतीक म्हणून सादर केले आहे. आणि आता ते हे ही दाखविण्याच्या प्रयत्नात आहेत की, संघाची शिस्त आणि तिच्या स्वयंसेवकांमध्ये असलेल्या एकात्मतेच्या भावनेने गांधीजी खूपच प्रभावित होते. संघाच्या संकेतस्थळावर सरसंघचालक मोहन भागवत लिहितात, ”फाळणीनंतर तात्काळ निर्माण झालेल्या कष्टदायक काळात महात्मा गांधी हे दिल्लीमध्ये त्यांच्या घराच्या जवळ असलेल्या संघाच्या शाखेत पोहोचले होते व त्यांनी स्वयंसेवकांशी चर्चा केली होती. त्यांच्या या भेटीसंबंधीचा अहवाल हरिजनच्या 27 सप्टेंबर 1947 च्या अंकात प्रकाशित झाला होता. गांधीजींनी संघाच्या स्वयंसेवकांच्या शिस्तीवर आनंद प्रकट केला होता आणि म्हटलं होतं की, मला प्रसन्नता आहे की, स्वयंसेवकांच्या दरम्यान जातीच्या भिंती नाहीत.”
    मुळात हरिजनच्या ज्या अंकाचा भागवत यांनी उल्लेख केलेला आहे तो 27 सप्टेंबरचा नसून 28 सप्टेंबरचा आहे. गांधींचे उद्गारही खरे आहेत. परंतु या विधानाच्या पार्श्‍वभूमीबद्दल भागवत गप्प आहेत. ते मुळीच सांगत नाहीत की, गांधींनी पुढे काय म्हटले?
    खरे पाहता गांधीजी 1936 मध्ये वर्धा येथे असताना जमुनालाल बजाज यांच्यासोबत आरएसएसच्या त्या शाखेसंबंधी बोलत होते जिथे त्यांनी भेट दिली होती. गांधींनी 28 सप्टेंबरच्या आपल्या रिपोर्टमध्ये लिहिलेले होते की, ”तेव्हापासून आरएसएस एक मोठी संघटना बनलेली आहे. परंतु कोणत्याही संघटनेला वास्तविक रूपाने उपयोगी होण्यासाठी बलिदानाच्या भावनेसोबत पवित्र उद्देश्य आणि खर्‍या ज्ञानाची गरज असते. ही गोष्ट सिद्ध झालेली आहे की, या दोहोंच्या शिवाय केवळ बलिदान समाजाला नष्ट करून टाकतो.”
    गांधीजी मुस्लिमांच्या तक्रारी ऐकूण 16 सप्टेंबरला संघाच्या या शाखेमध्ये पोहोचले होते. यावरून हे स्पष्ट होते की, गांधी संघाच्या स्वयंसेवकांना कोणता संदेश देऊ इच्छित होते?
    गांधींनी संघाबद्दल हे काही एकदाच विधान केलेले नव्हते. हरिजनच्या 9 ऑगस्ट 1942 च्या अंकात गांधीजींनी लिहिले होते की, ”मी आरएसएस आणि त्यांच्या गतिविधींबद्दल ऐकूण आहे आणि मला हे ही माहित आहे की, ही एक जातीयवादी संघटना आहे.” गांधींनी ही टिप्पणी त्यांना पाठविण्यात आलेल्या तक्रारींच्या नंतर केली होती. ज्यात एका विशिष्ट धार्मिक समुहाबद्दल नारेबाजी करणे, भाषण देणे याबाबत तक्रार केली गेली होती. गांधींना सांगण्यात आले होते की, संघाच्या स्वयंसेवकांनी व्यायामाच्या सत्रानंतर असे नारे बुलंद केले होते की, हा देश केवळ हिंदूंचा आहे आणि इंग्रज गेल्यानंतर बिगर हिंदूंना गुलाम बनविण्यात येईल. जातीय संघटनांद्वारे दिल्या जाणार्‍या त्रासांवर प्रतिक्रिया देतांना गांधींनी लिहिले होते की, ”मी संघाच्या बाबतीत ऐकूण आहे की, या सर्व गोष्टींच्या मुळामध्ये संघ आहे.” (संदर्भ ः गांधी खंड, 98 पृष्ठ 320 ते 322).
    स्वातंत्र्यानंतर दिल्लीमध्ये झालेल्या हिंसाचाराच्या संदर्भात राजमोहन गांधी (मोहनदास ः पृष्ठ क्र. 642) मध्ये लिहितात की, ”गांधीजींनी संघाचे प्रमुख गोळवलकरकडे संघाच्या हिंसक कारवायामध्ये सहभागाबद्दल संबंधी विचारणा केली होती. तेव्हा गोळवलकरांनी इन्कार करत म्हटलं होतं की, संघाला मुस्लिमांना मारण्यात रस नाही. तेव्हा गांधींनी त्यांना सांगितले होते की, गोळवलकरांनी ही बाब सार्वजनिक स्वरूपात स्पष्ट करावी. तेव्हा गोळवलकर उत्तरले होते की, गांधी त्यांना आपल्या लेखनात बोलण्यात उधृत करू शकतात. तेव्हा गांधींनी त्याच दिवशीच्या संध्याकाळच्या प्रार्थनासभेमध्ये गोळवलकरांकडून केल्या गेलेल्या विधानाचा हवाला दिला होता. त्यांनी गोळवलकरांना हे ही सांगितले होते की, संघाने या संदर्भात स्वतः एक जाहीर वक्तव्य करण्याची आवश्यकता आहे. नंतर गांधीजींनी नेहरूंशी बोलताना म्हटले होते की, त्यांना गोळवलकरांचे बोलणे फारसे विश्‍वासार्ह वाटले नाही”
    गांधींचे संघाच्या बाबतीत काय आकलन होते, याचा सर्वात मोठा पुरावा यांचे सचिव प्यारेलाल यांनी दिलेला आहे. प्यारेलाल लिहितात की, ”सन 1946 च्या दंगलीनंतर गांधींच्या काफिल्यामधील एका सदस्याने पंजाबमधून आलेल्या शरणार्थ्यांसाठी वाघामध्ये बनवलेल्या एका कॅम्पची स्तुती करताना सांगितले होते की, संघाच्या कार्यकर्त्यांमध्ये कार्यक्षमता, शिस्त, साहस आणि कष्ट करण्याची प्रवृत्ती आहे. तेव्हा गांधी उद्गारले होते की, मात्र हे विसरू नका की हिटलरचे नाझी सैनिक आणि मुसोलीनीचे फॉसिस्ट कार्यकर्ते हे सुद्धा असेच होते” गांधीजींची अशी धारणा होती की, संघाचा दृष्टीकोन एकाधिकारवादी आहे आणि ती एक जातीयवादी संघटना आहे. (संदर्भ : प्यारेलाल, महात्मा गांधी द लास्ट फेज, अहेमदाबाद, पृष्ठ क्र. 440).
    संघ सध्या हे दर्शविण्यासाठी प्रयत्नशील आहे की, संघाच्या कार्यक्रमाला गांधीजी पसंत करत होते. खरं पाहता संघ परिवार संकीर्ण हिंदू राष्ट्रवादाचा पोषक आहे, या उलट गांधी सर्वसमावेशी भारतीय राष्ट्रवादाचे पुरस्कर्ते होते. तरी परंतु, संघ आपल्या काळातील एका महान हिंदूंकडून प्रमाणपत्र घेऊ इच्छित आहेत. गांधीजी निर्विवादपणे जगातील सर्वात प्रसिद्ध भारतीय व्यक्ती आहेत. देशात जस-जसा संघाचा प्रभाव वाढत आहे तसा-तसा संघाचा प्रयत्न आहे की, तो स्वतःला अशा महान नेत्यांशी जवळीक दर्शवावी ज्यांची विचारधारा संघाच्या विचारधारेविरूद्ध होती. संघ सरदार पटेल आणि सुभाष चंद्रबोस यांनाही स्वतःशी जोडू इच्छितो. हे माहित असतांनासुद्धा की पटेल आणि बोस यांची विचारधारा संघाच्या विचारधारेशी थोडीसुद्धा जुळत नव्हती. गांधीजी स्वातंत्र्याच्या आंदोलनाचे शिर्षतम नेते होते आणि त्यांची हत्या संघाच्या एका नथुराम गोडसे नावाच्या प्रचारकाने केली होती. गोडसेची ही कुत्सित कृती हिंदू राष्ट्रवादाचा भारतीय राष्ट्रवादावर सुनियोजित वैचारिक हल्ला होता.
    संघ राष्ट्रवादाचा एक नवीन अध्याय रचू पाहत आहे. तो भारतातील मध्यकालीन मुस्लिम शासकांना हिंदूंचे दमन करणारे शासनकर्त्यांच्या रूपात सादर करत आलेला आहे. संघ हे दाखवू इच्छितो की, जेथे हिंदू धर्म भारतीय आहे तसा इस्लाम आणि ख्रिश्‍चन धर्म भारतीय नाहीत तर विदेशी आहेत. ही गोष्ट शाबित करण्यासाठी संघ जबरदस्त प्रयत्नशील राहिलेला आहे. काहीही करून आर्य भारताचे मूळ निवासी होते, हे ही त्याला पटवून द्यायचे आहे. एवढेच नव्हे तर विज्ञान आणि तंत्रज्ञानातील प्रत्येक उपलब्धी ही प्राचीन भारताची जगाला देणगी असल्याचे तो सांगत असतो. मुळात तो भारताच्या कथित गौरवशाली हिंदू भूतकाळ आणि त्या काळात असलेल्या जातीगत आणि लैंगिक असमानतेचे महिमामंडन करू इच्छितो. गांधींशी स्वतःला जोडून घेण्याचा प्रयत्न या दिशेने टाकलेले एक पाऊल आहे. मागच्या काही वर्षांमध्ये संघाच्या या वैचारिक कसरतींमध्ये गति आलेली आहे. आपल्याला गांधींच्या विचारांच्या या विकृतीकरणाला रोखावे लागेल. आपल्याला गांधींच्या विचारावर होणार्‍या अन्यायाच्या विरूद्ध संघर्ष करावा लागेल. राष्ट्र आणि समाजाच्या प्रश्‍नांना मानवीय पद्धतीने सोडविण्यासाठी गांधींच्या प्रयत्नांना प्रकाशात आणावे लागेल.

- राम पुनियानी
(लेखक : आयआयटी मुंबईत शिकवित होते आणि 2007 च्या नॅशनल कम्युनिल हार्मोनी अ‍ॅवॉर्ड ने सन्मानित आहेत.)
(मूळ इंग्रजी लेखाचे हिंदी भाषांतर अमरीश हरदेनिया यांनी केले तर हिंदीतून मराठी भाषांतर बशीर शेख, एम.आय. शेन यांनी केले.)

मुझे डरा नहीं सकती फिजा की तारीकी
मेरी शरीस्त में है पाकी व दरख्तशानी
तू ऐ मुसाफिर शब में खुद चराग बन अपना
कर अपनी रात को दाग-ए-जीगर से नुरानी


सतत प्रवासात राहिल्यामुळे मागच्या महिन्यातील एक महत्त्वाचा विषय वाचकांपर्यंत पोहोचवायचा राहून गेला, तो या आठवड्यात आपल्या सेवेत सादर करीत आहे.
    मागच्या महिन्यात ’स्टेटस् ऑफ पोलिसिंग इन इंडिया रिपोर्ट 2019’ हा अहवाल प्रकाशित झाला होता. हा अहवाल एक सर्व्हेक्षण अहवाल आहे जो की, सर्वोच्च न्यायालयाचेे पूर्व न्यायाधिश जे. चेलमेश्‍वर यांच्या मार्फतीने ’कॉमन कॉज अँड सेंटर ऑफ द स्टडी डेव्हलपिंग सोसायटीज’ च्या माध्यमातून तयार करून घेण्यात आलेला होता. या अहवालामध्ये एक आश्‍चर्यजनक खुलासा असा करण्यात आलेला आहे की, देशातील प्रत्येक दुसर्‍या पोलीस कर्मचार्‍याला असे वाटते की, मुसलमान हे गुन्हेगारी प्रवृत्तीचे असतात.
    या सर्व्हेक्षणादरम्यान अनेक पोलीस अधिकारी आणि अनेक नागरिकांच्या मुलाखती घेण्यात आलेल्या होत्या. सर्व्हेक्षणाप्रमाणे 35 टक्के पोलीस कर्मचार्‍यांनी गोरक्षेच्या नावावर होत असलेल्या हत्यांचे समर्थन करतांना म्हटलेले आहे की, ”गोहत्येच्या प्रकरणामध्ये कथित अपराध्याला झुंडीकडून शिक्षा देणे ही स्वाभाविक बाब आहे.” देशाच्या 21 राज्यातील 12 हजार पोलीस कर्मचारी आणि त्यांच्या परिवारातील जवळ-जवळ 11 हजार लोकांशी संवाद साधून सदरचा अहवाल तयार करण्यात आलेला आहे, म्हणून या अहवालामध्ये असलेल्या तत्थ्यांना नाकारता येणार नाही.
    अलिकडेच मानवाधिकार आयोगाकडून पोलीस दलातील कर्मचार्‍यांची एक वादविवाद स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. त्यात ’मानवाधिकारांचे पालन करत आतंकवादाशी मुकाबला करता येईल काय?’ या विषयावर बोलताना तरूण महिला शिपाई खुशबू चव्हाण हिने जी मुक्ताफळे उधळली त्यावरून पोलिसांची मानसिकता केवळ मुस्लिमांच्या विरूद्धच नसून देशाच्या सामान्य नागरिकांच्या विरूद्ध असल्याचेही उघड झालेले आहे. बेरोजगार तरूण, आंदोलन करणारे शिक्षक आणि शेतकरी अशा समाजातील विविध घटकांवर ज्या निर्दयीपणे पोलीस लाठीहल्ला व बेछूट गोळीबार करतात ते पाहता पोलिसांच्या मानसिकतेचा सहज अंदाज येतो.
    उत्तर प्रदेशचे माजी पोलीस प्रमुख विभूती नारायण यांनी या संदर्भात म्हटलेले आहे की, ”पोलीस खात्यात सर्वसाधारणपणे ही धारणा आहे की जातीय दंगली मुसलमान सुरू करतात.” म्हणूनच प्रत्येक दंगलीनंतर पोलीसांद्वारे अटक केल्या जाणार्‍या लोकांमध्ये मुस्लिमांचीच संख्या जास्त असते, संचारबंदी सुद्धा मुस्लिम वस्त्यांमध्येच कठोरपणे लागू करण्यात येते, मुस्लिमांच्याच घरांच्या अधिक प्रमाणात झडत्या घेतल्या जातात. पोलिसांचा असा समज आहे की मुस्लिमांच्या विरूद्ध कठोर कार्यवाही केल्याशिवाय दंगली नियंत्रणात आणता येत नाहीत. एवढे सर्व होऊनही बहुसंख्य समाजात अशी धारणा असते की, दंगलींमध्ये मरणार्‍यांपैकी हिंदूच जास्त असतात.
    पोलिसांची अशी धारणा का झालेली आहे ?
    हा झाला सर्व्हेक्षण अहवाल. परंतु साधारणपणे पोलिसांच्या मनात अशी एक धारणा घट्ट रूजलेली आहे की, देशात जेवढे बॉम्बस्फोट होतात ते सुद्धा मुस्लिम तरूणच करत असतात. म्हणूनच बॉम्बस्फोट मंदिरात झालेले असोत की मस्जिदीत झालेले असोत, 1990 च्या दशकात अटक मुस्लिम तरूणांनाच होत होती. 2001 च्या जनगणनेनुसार देशात मुस्लिमांची संख्या 13.7 टक्के एवढी होती. मात्र तुरूंगामध्ये त्यांची संख्या 21 टक्के एवढी होती. यावरून पोलीस किती मोठ्या प्रमाणात मुस्लिमांना अटक करतात याचा अंदाज यावा.
     पोलिसाच्या मनामध्ये मुस्लिम समाजाबद्दल ज्या चुकीच्या धारणा घर करून बसलेल्या आहेत त्याची अनेक कारणे आहेत.
    पहिले कारण राजकारण आहे. मुस्लिमांना सातत्याने खलनायकाच्या भूमिकेत ठेऊन, बहुसंख्य मतदारांच्या मनामध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण करून, त्यांच्याकडून मतं पदरात पाडून घेण्याचा जुना फॉर्म्युला स्वातंत्र्यानंतर आजपावेतो सर्वच पक्षांनी अंमलात आणलेला आहे. याबाबतीत कोणत्याच पक्षाचा अपवाद करता येण्यासारखी परिस्थिती नाही.
    दूसरे कारण म्हणजे देशात अशा अनेक जातीयवादी संघटना आहेत ज्या मुस्लिमांची प्रतिमा हिंसक करून जनतेपुढे मांडतात. यासाठी ते चक्क खोटे बोलतात, चुकीची आकडेवारी देतात, कपोलकल्पित घटना सत्य असल्याचा भास निर्माण करतात, मोठ्या प्रमाणात दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करतात. याचा दुष्परिणाम पोलिसांच्या मानसिकतेवर होतो. 
    तीसरे कारण म्हणजे, मीडियाचा दुरूपयोग होय. मीडिया त्यातल्या इलेक्ट्रॉनिक मीडियाचा दुरूपयोग करून मुस्लिमांविषयी बहुसंख्य बांधवांच्या मनामध्ये तिरस्कार निर्माण कसा करता येईल, यासाठीचे पराकोटीचे प्रयत्न मीडियाद्वारे केले जातात. त्याचाही दुष्परिणाम पोलिसांच्या मानसिकतेवर होतो. 
    चौथे कारण म्हणजे शिस्तीच्या नावाखाली वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांकडून कनिष्ठ पोलिसांवर होणारे अत्याचार हे आहे. वरिष्ठांकडून सतत अत्याचार होत असल्याने व शिस्तीच्या बडग्यामुळे त्यांच्याविरूद्ध ब्र-सुद्धा काढण्याची सोय नसल्यामुळे खालच्या फळीमधील पोलिसांमध्ये एका प्रकारची मानसिक कुंठा निर्माण होते व समाजामध्ये एखादी घटना घडली की ती नियंत्रणात आणण्यासाठी कनिष्ठ कर्मचारी अवाजवी बळाचा वापर करतात. त्यावेळी कनिष्ठ कर्मचार्‍यांचा तोल ढासळतो व त्यांच्या हातून जनतेवर विशेषतः अल्पसंख्यांक मुस्लिमांवर प्रचंड अत्याचार केले जातात, ही एका प्रकारची कुंठेतून बाहेर पडण्याची त्यांची धडपड असते. 
    पाचवे कारण पोलिसांवर त्यांनी केलेल्या कृत्यांची जबाबदारी निश्‍चित करण्याची कुठलीच पद्धती आपल्या देशात अस्तित्वात नाही. पोलिसांनी जाणून बुजून निरपराध अल्पसंख्यांक तरूणांना अटक करूनही बेकायदेशीर अटक करणार्‍या पोलीस अधिकार्‍यांविरूद्ध कधीच, कुठलीच कार्यवाही केली जात नाही. त्यामुळे पोलिसांचे मनोबल अवास्तवरित्या वाढते व ते बेलगामपणे वागू लागतात. शेकडो मुस्लिम तरूण वर्षोन्वर्षे तुरूंगात खितपत पडून निर्दोष सुटल्यानंतरही त्यांना गैरकायदेशीर पद्धतीने अटक करणार्‍या पोलिसांवर कोर्टाने ताशेेरे मारूनही काहीही कारवाई होत नाही. त्यामुळे पोलीस मुस्लिमांवर अत्याचार करताना मागचा पुढचा जरासुद्धा विचार करत नाहीत.
    सहावे कारण मुस्लिम समाजामध्ये राज्यघटनेच्या मुलभूत हक्कांच्या तरतुदी व देशातील कायद्यांच्या संबंधी पुरेशी जागरूकता नाही. त्यामुळे पोलिसांच्या चुकीच्या कृत्यांनाही उच्च किंवा सर्वोच्च न्यायालयामध्ये पीआयएलद्वारे आव्हान देण्याची पद्धत मुस्लिम समाजात नाही, म्हणून सुद्धा पोलीस बेडरपणे मुस्लिमांवर अत्याचार करीत असतात.
    सातवे कारण असे की, अडाणी, अशिक्षित आणि पराकोटीचे दारिद्रय असल्यामुळे पोलिसांविषयी मुस्लिम समाजामध्ये प्रचंड भीती घर करून राहिलेली आहे.  साक्षीदाराचे समन्स घेऊन जरी एखादा युनिफॉर्ममधील कर्मचारी एखाद्या मुस्लिम व्यक्तीच्या दारी गेला तरी सगळ्या मोहल्ल्यामध्ये त्याच्या घरी पोलीस का आला? याबद्दल कुतर्क केले जातात. आतंकवादाच्या आरोपांमधून निर्दोष सुटून आलेल्या तरूणांशीही अंतर ठेऊन वागण्याची समाजाची भावना पोलिसांविषयी असलेल्या भीतीतूनच निर्माण झालेली आहे.
    आठवे कारण हिंदी चित्रपट आणि मालिकांमधून मुस्लिमांचे चित्रण गुन्हेगारी स्वरूपाचे केले जाते. त्याचा परिणामही पोलिसांच्या मानसिकतेवर होतो आणि ते मुस्लिमांवर अत्याचार करण्यासाठी धजावतात.
उपाय
    1. पोलिसांच्या मनामध्ये अल्पसंख्यांक मुस्लिम समाजाबद्दल जे गैरसमज आहेत ते दूर करण्याची मुलभूत जबाबदारी सरकारची आहे. परंतु हा समाज जेवढा असुरक्षित राहील तेवढीच आपली मतपेढी सुरक्षित राहील, याचा विश्‍वास असल्यामुळे कोणत्याही पक्षाचे सरकार असो पोलिसांच्या मनामधील गैरसमाज दूर करण्यासाठी फारसे प्रयत्न करतांना दिसून येत नाहीत. वास्तविक पाहता पोलिसांच्या प्रशिक्षणामध्ये मुलभूत सुधारणा करून मुस्लिम समाजाविषयी त्यांच्या मनामध्ये असलेले गैरसमज दूर करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला गेला तर फरक पडू शकतो.
    2. पोलिसांविषयी गैरसमज दूर करण्यासाठी पोलीस दलामध्ये मुस्लिम तरूणांना मोठ्या प्रमाणात सामावून घेणे गरजेचे असतांनासुद्धा त्यांना डावलण्याची प्रवृत्ती सरकारमध्ये निर्माण झालेली आहे. ही परिस्थिती बदलण्यासाठी काय करता येईल? या संबंधी समाजातील धुरीणांनी विचार करण्याची गरज निर्माण झालेली आहे.
    3. पोलिसांमधील गैरसमज दूर करण्यासाठी मुस्लिम समाजाला स्वतः होवून पुढाकार घेणे सुद्धा गरजेचे आहे. पोलीस प्रशिक्षण विद्यालय तसेच नाशिक येथील पोलीस प्रशिक्षण प्रबोधिनी येथे संपर्क करून गेस्ट लेक्चरच्या माध्यमातून मुस्लिमांची वास्तविक परिस्थिती प्रशिक्षणार्थी पोलिसांसमोर विशद करण्याचा प्रयत्न केला गेला पाहिजे. यासाठी मुस्लिम समाजातील बिगर सरकारी सामाजिक तसेच धार्मिक संस्थांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे.
    4. समाजमाध्यमाचा उपयोग करून मुस्लिमांची बाजू मांडणारे लेख, व्हिडीओ क्लिप्स आणि शॉर्ट फिल्म्स इत्यांदीची निर्मिती करून त्यांचा प्रचार व प्रसार समाजमाध्यमातून मोठ्या प्रमाणात केल्यास पोलिसांच्या आणि बहुसंख्य बांधवांच्या मनामधून मुस्लिमांविषयी गैरसमज दूर होण्यास मदत होईल.
    5. सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा की, इस्लाम हा सर्व मानवजातीच्या कल्याणासाठी असून, रूढ अर्थाने हा केवळ एक धर्म नसून एक परिपूर्ण जीवन व्यवस्था आहे. शिवाय मानवजातीला भेडसावणार्‍या प्रत्येक प्रश्‍नाचे उत्तर या व्यवस्थेमध्ये आहे. जीवनात यशस्वी होण्याचा हाच एकमेव मार्ग आहे. हा संदेश पोहोचविण्यामध्ये मुस्लिम केवळ भारतातच नव्हे तर जागतिक पातळीवरसुद्धा फारसे यशस्वी झालेले नाहीत. त्यामुळे भारतातच नव्हे तर जगातील इतर देशांच्या सुरक्षा दलांच्या मनामध्ये सुद्धा मुस्लिमांच्या विरूद्ध मोठ्या प्रमाणात गैरसमज निर्माण झालेले आहेत. म्यानमार आणि श्रीलंका ही या संदर्भातील ताजी उदाहरणे आहेत. म्हणून मुस्लिमांना इस्लामचा संदेश मुस्लिम्मेत्तर बांधवांपर्यंत पोहोचविण्यात जोपर्यंत यश येणार नाही तोपर्यंत पोलिसांच्या मनामधून त्यांच्या विषयीचे गैरसमज जाणार नाहीत, ही काळ्या दगडावरची पांढरी रेषा आहे. याची जाणीव प्रत्येकाने ठेवावी. म्हणून या कामाला मुस्लिमांनी सर्वात अधिक महत्त्व देणे गरजेचे आहे.
    शेवटी सर्व्हेक्षण अहवालाबद्दल माझे वैयक्तिक मत जे की 32 वर्षाच्या पोलीस खात्यातील अनुभवावर आधारित आहे ते असे की, किरकोळ स्वरूपाच्या गुन्ह्यामध्ये मुस्लिम लोक हे इतर समाजाच्या तुलनेत जास्त असतात, मात्र खून, बलात्कार, दरोडे , मोठे आर्थिक घोटाळे, पांढरपेशा गुन्हे यासारख्या गंभीर गुन्ह्यामध्ये त्यांची संख्या लक्षणीय रित्या कमी असते. किरकोळ गुन्ह्यामध्येही मुस्लिमांचा सहभाग हा त्यांच्या गरीबी व अडाणीपणामुळे असतो. ही दोन कारणे त्यांच्यातून काढण्यासाठी जकात आणि व्याजविरहित पतसंस्था तसेच शिक्षणाची व्यवस्था योग्यपणे लागू केली तर मला आशा नव्हे तर विश्‍वास आहे की, काही वर्षातच या समाजामधून किरकोळ गुन्हेगारीचे सुद्धा उच्चाटन झाल्याशिवाय राहणार नाही.

- एम.आय.शेख

sunilkumar sarnaik
भारत देश हा एक प्राचीन देश असून या देशावर परकीय शत्रूंनी मोठी आक्रमणे करून येथील निसर्ग संपदा, अमूल्य संपत्ती लुटली आहे. आपआपसातील मतभेद, द्वेष, कुटनीती, फुटीरवृत्ती, अज्ञान, अंधश्रद्धा, आक्रमक धर्मवाद, समाजातील विषमता वंशवाद, प्रांतवाद, भाषावाद आणि अतिस्वार्थ, देशाविषयी प्रेम नसणे, संरक्षणयंत्रणेकडे दुर्लक्ष कमी दर्जाचे सैनिकी प्रशिक्षण, सैनिकांची उदासीनता, अयोग्य व कुचकामी युद्धनीती प्रगतशस्त्राचा अभाव, राजेशाही, कर्तबगार व शुरवीर राजाचा अभाव, कुटनीतीचा अभाव, शस्त्रप्रबळ व युद्धस्थितीचा सखोल आढावा व सुसज्ज तयारी, योग्य निर्णयक्षमता यामुळे परकीय शत्रूंनी भारतीयांच्या अकार्यक्षमतेचा पुरेपूर फायदा घेऊन भारतातील निष्क्रिय, विलासी, अतिस्वार्थी राजांना पराभूत केले. काही परकीय शत्रूंचा उद्देश भारतातील अमाप संपत्तीची लूट करणे हा होता तर काही परकीयांनी येथे आपली सत्ता प्रस्थापित करून राजकीय यंत्रणा स्थापन केली. मुख्यत्वे मुघल राजवटीतील राजांनी भारतावर सत्ता प्रस्थापित केली. कालांतराने मुघलाचा शेवटचा बादशहा बहादूरशाह जफर याला इंग्रजांनी कैद करून दिल्ली काबीज केली. ज्याचे शस्त्रप्रबळ तसेच युद्धनिती, लढण्याची क्षमता व आत्मविश्वास, सैनिकी क्षमता, शस्त्राताचा मोठा साठा, कुशल सैनिक, तत्कालीन लालची भारतीय राजाची सत्तेसाठी फितूरी याचा वापर करून इंग्रजांनी भारतावरव सत्ता प्रस्थापित केली सुमारे १५० वर्षे इंग्रजांनी भारत देशावर सत्ता गाजवली. त्यामध्ये काही भारतीय राजांनी इंग्रजांचे मांडलिकत्व स्विकारून इंग्रजापुढे शरणांगती पत्करली. तर काहींना इंग्रजांनी पराभूत करून त्याचा प्रदेश हस्तगत केला. अशा स्थितीत भारतीय जनता ही मोठ्या गुलामगिरीत अडकली होती. भारतीय जनता ही पारतंत्र्यात आपले जीवन जगत होती त्यात इंग्रजांची सत्ता अधिक मजबूत होवून भारतीयांवर अन्याय अत्याचार, करत होती. मोठ्या प्रमाणावर जुलमी राजवट प्रस्थापित होती त्यांना प्रजे विषयी कोणतीही आस्था नव्हती कारण भारतीय नागरीकांमधील अज्ञान, अंधश्रद्धा लाचारी, फुटीरवृत्ती, अनिष्ठप्रथा, कालबाह्य पंरपरा, चालिरीती यामुळे भारतीय जनतेतील स्वाभीमान नष्ट झाला होता व त्याचबरोबर इंग्रजांचे अन्याय अत्याचार भारतीयावर अधिकाधिक वाढत होते. अशास्थितीत इंग्रजीसत्ता उलथून टाकण्याच्या उद्देशाने क्रांतीकारकांनी इंग्रज विरुद्ध मोठा लढा दिला. ब्रिटीशांमध्ये एक प्रकारची दशहत निर्माण करण्याचे कार्य क्रांतीकारकांनी केले. त्यासाठी प्रसंगी काहींना त्यांच्या प्राणाची आहूती द्यावी लागली. त्यांनी अत्यंत निर्भिडपणे त्यागी वृत्तीने, शौर्याने इंग्रजांशी झुंज दिली. भारतीय स्वातंत्र्य लढ्यात तत्कालीन वृत्तपत्रांनी सुद्धा मोठ्या प्रमाणात जनजागृती केली.  राष्ट्रनिष्ठा, राष्ट्रभक्ती यासाठी भारतीय नागरिकांमध्ये संघटीत भावना जागविण्याचे काम वृत्तपत्रांनी केले. शिवाय क्रांतीकारक विचारांची पेरणीसुद्धा केली. त्यातून प्रांत, जाती, धर्म, वंश यांचा विचार न करता हजारो लाखो युवक राष्ट्रासाठी एकत्र आले आणि देशाच्या स्वातंत्र्यासाठी हौतात्म्य पत्करण्यासाठी पुढे आले. अर्थात राष्ट्रनिष्ठा, राष्ट्रभक्ती आणि राष्ट्रप्रेम जागृत करण्यात भारतीय वृत्तपत्रांनी मोठे योगदान दिले. विचारातून क्रांती निर्माण करून राष्ट्रवादाचा पुरस्कार करणारी वृत्तपत्रे व त्यांचा वाढता वाचकवर्ग पाहून ब्रिटीशांनी अनेक वृत्तपत्रांवर बंदी घालण्यास सुरुवात केली. पण त्याचा परिणाम अधिककाधिक सकारात्मक होवून अनेक भारतीय युवक या क्रांतीकारी चळवळीत सहभागी झाले. छातीवर बंदूकीच्या गोळ्या झेलून इंग्रजांना भारतीयांनी आपले शुरत्व दाखवून दिले. राष्ट्रासाठी प्राण हातावर घेवून स्वातंत्र्य चळवळी अग्रभागी असणाऌया युवकांनी ब्रिटीशांना सळो की पळो करून सोडले. देशासाठी बलिदान देणारे कोवळे तरुण युवक पाहून ब्रिटीशांनाही नवल वाटले. त्यातूनच अनेक स्वातंत्र्यसैनिक स्वत:च्या घरावर तुळशीपत्रक ठेवून स्वातंत्र्याच्या होमवुंâंडात आहुती द्यायला पुढे सरसावले. मात्र अलिकडे याच क्रांतीकारकांच्या बलिदानाचा विसर पडत असून राष्ट्रनिष्ठा, राष्ट्रभक्ती व उच्च मुल्यांचा मोठ्या प्रमाणा ऌहास होताना दिसत आहे. ही बाब खचितच राष्ट्रासाठी योग्य नाही. राष्ट्रभक्ती, राष्ट्रनिष्ठा आणि राष्ट्रप्रेम पुन्हा एकदा चेतवण्यासाठी अशा क्रांतीकारी हुतात्म्यांच्या बलिदानाचे स्मरण होणे अगत्याचे आहे. शासनाने त्यादृष्टीने सकारात्मक पावले उचलून राष्ट्रभक्ती वाढविण्याचा प्रयत्न करायला हवा.

- सुनीलकुमार सरनाईक
भ्रमणध्वनी : ७०२८१५१३५२
(लेखक भारत सरकारतर्फे स्वामी विवेकानंद राष्ट्रीय पुरस्काराने तसेच दर्पण पत्रकार पुरस्कारने सन्मानित असून करवीर काशीचे संपादक आहेत.)

मुंबई (मीरा रोड)-
सामाजिक सुसंवाद, आपुलकी आणि आनंदमय वातावरण असे एक अनोखे दर्शन मीरा रोड व जवळच्या हिंदू, खिश्चन व इतर धर्मीय देशबांधवाना रविवार, ६ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी येथील स्थानिक मुस्लिम समुदायाने मस्जिदीच्या परिचयासाठी आमंत्रित केले.
जमात-ए-इस्लामी हिंद आणि स्टुडंट्स इस्लामिक ऑर्गनायझेशन ऑफ इंडिया (एसआयओ) यांच्या संयुक्त विद्यमाने सना मस्जिद, मील्लत वेलफेअर असोसिएशनच्या वतीने आयोजित, मीरा रोड येथे हा पहिलाच कार्यक्रम संपन्न झाला. खरे तर मस्जिद परिचय कार्यक्रमांच्या मालिकेचा हा एक भाग होता, जे राज्यात नव्हे तर संपूर्ण देशात आयोजित केले जात आहेत.
छोट्याशा स्वागतपर भाषणाने अनोख्या अशा या कार्यकर्माचा परिचय आणि महत्त्व पटवून देण्यात आल्यानंतर पाहुण्यांना मस्जिदमध्ये नेण्यात आले. तेथे त्यांना नमाज पठण करणारे (नमाजी) प्रार्थनापूर्व स्वच्छता (वुजू) कशी करतात हे प्रात्यक्षिकाद्वारे दाखविण्यात आले. नमाज कशी पठण करतात, नमाजचे विधी काय काय असतात? त्यात कशाचे पठण केले जाते याचेही प्रात्यक्षिक सादर करण्यात आले आणि मस्जिदचे मेहराब, मिम्बर (प्रवचन देण्यासाठीचा मंच), ग्रंथालय इत्यादींचे महत्त्व सांगण्यात आले.
संध्याकाळच्या प्रार्थनेसाठी अजान पुकारल्यानंतर अतिथींना त्याचा अर्थ सांगितला गेला आणि मस्जिदमध्येच पाहुण्यांना बसण्याची विनंती करण्यात आली. त्यांच्यासमोर नमाज पठण करण्यात आली. हा अनुभव एका पाहुण्याच्या शब्दांत चांगल्या प्रकारे स्पष्ट केला जाऊ शकतो, तो असा-
‘‘प्रथमच मला नमाज इतक्या जवळून पाहण्याची संधी मिळाली, नमाजमध्ये दिसणारी सामाजिक समानता आणि शिस्तीने मला सर्वांत जास्त प्रभावित केले. श्रीमंत, गरीब, छोट्यातला छोटा असो की कुणी कितीही मोठा असा कोणताही भेद न करता आणि खांद्याला खांदा लावून उभे राहणे आणि आम्हाला सांगितले गेले की एक नोकरसुद्धा प्रार्थनेचे नेतृत्व करू शकतो आणि इतरांनी त्याचे पालन करणे बंधनकारक असते, मग ते कितीही श्रीमंत आणि प्रतिष्ठित लोक असोत.’’
आयोजकांशी सुसंवाद साधून लोकांनी आपापले विचार, अनुभव व्यक्त केले. त्यानंतर पाहुण्यांनी उपस्थित केलेल्या शंकाकुशंकाचे निरसन करून समाधानकारक स्पष्टीकरणानंतर त्यांना मस्जिदीबाहेर नेण्यात आले. त्यांना इस्लामविषयी काही मूलभूत पुस्तके भेट म्हणून देण्यात आली आणि तज्ज्ञांशी इस्लामविषयी चर्चा करण्यासाठी आणि मुस्लिमांच्या श्रद्धा व पद्धतींबद्दल अधिक स्पष्टता मिळविण्यासाठी इस्लामिक माहिती केंद्राच्या १८००-२०००-७८७ या टोल-फ्री क्रमांकावर संपर्वâ साधण्यास सांगितले गेले.
एका पाहुण्याने आज उपस्थित असलेल्या सर्वांच्या वतीने सांगितले की आपल्यापैकी प्रत्येकाने आता आपल्या १०० मित्रांना भेटायला हवे आणि आज आपण जे काही पाहिले आणि ऐकले ते त्यांच्यापर्यंत पोहोचते केले पाहिजे.''
जमाअत-ए-इस्लामी हिंद मीरा रोडचे अध्यक्ष मुहम्मद अताउल हक यांनी सागितले की, ‘‘मस्जिद परिचय हे एक निमित्त होते. घाणेरड्या अशा तुच्छ राजकारणाने आणि आमच्या राजकीय पोटभरू नेत्यांनी आम्हा भारतीय बांधवांमध्ये निर्माण केलेला दुरावा नष्ट करण्याचा या आयोजनामागील मुख्य हेतू आहे.’’
लोकांमधून हा दुरावा कशा प्रकारे दूर केला जाऊ शकतो? असा प्रश्न विचारला असता एसआयओचे जिल्हाध्यक्ष रफीद शहाब यांनी सांगितले की पारंपरिक आमंत्रणपत्रके आणि बॅनर्सव्यतिरिक्त वैयक्तिक भेटीगाठी आणि सोशल मीडियाचा वापर करून अशा प्रकारचे कार्यक्रम आयोजित केले जाऊ शकतात. अशा प्रकारचे आणखी काही कार्यक्रम इन्शा अल्लाह आम्ही आयोजित करू, असा आत्मविश्वास त्यांनी या वेळी व्यक्त केला.

झुंडबळीच्या विरोधात बोलणाऱ्या देशातील ४९ मान्यवरांवर देशद्रोहाचा खटला दाखल केल्यानंतर या मान्यवरांच्या भूमिकेला पाठिंबा देण्यासाठी देशातील सांस्कृतिक व साहित्यिक क्षेत्रातील आणखी १८५ मान्यवर मैदानात उतरले आहेत. या कलावंतांनी देशात वाढते झुंडबळी रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींना साकडे घालणाऱ्या ४९ मान्यवरांच्या पत्राचे समर्थन केले असून लोकांचा आवाज दाबण्याचा व न्यायालयाच्या माध्यमातून त्यांचा छळ करण्याच्या कोणत्याही प्रयत्नांना त्यांचा कडाडून विरोध असेल असे त्यांनी स्पष्ट केले आहे. जर सरकार लोकांचा आवाज दाबण्याचा, त्यांचा छळ करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यावर आम्हीही सातत्याने आवाज उठवत जाऊ असाही इशारा या मंडळींनी दिला आहे. या १८५ मान्यवरांच्या यादीत प्रामुख्याने अभिनेता नसीरुद्धीन शाह, लेखिका नयनतारा सहगल, इतिहास संशोधक रोमिला थापर, विचारवंत आनंद तेलतुंबडे आदी सामील आहेत. भारतीय संविधानातील कलम १४२ नुसार सर्वोच्च न्यायालयाचा आदेश देशाचा कायदा मानला जातो. म्हणून सर्वोच्च न्यायालयादेखील कलम १४२ नुसार कायद्याला पूर्णत: प्रतिकूल असलेला आदेश पारित करू शकत नाही. सर्वोच्च न्यायालयाचे न्या. दीप मिश्रा आणि न्या. यू. यू. ललित यांच्या खंडपीठाने ५ सप्टेंबर २०१६ रोजी पुुन्हा एकदा स्पष्टपणे म्हटले होते की सरकारवर टीका केल्याने कोणाहीविरोधात राष्ट्रद्रोह अथवा मानहानीचा खटला लादला जाऊ शकत नाहीत. त्याचबरोरबर न्यायालयाने पोलीस आणि ट्रायल न्यायाधीशांसह सर्व अ‍ॅथॉरिटीज्ना आदेश दिला होता की ते याबाबतीत त्यांच्या संविधानपीठाच्या त्या निर्णयाचे पालन करावे ज्यामध्ये म्हटले होते की फक्त हिंसा भडकविणे आणि समाजात संभ्रम निर्माण करण्याच्या प्रकरणातच राष्ट्रद्रोहाचा आरोप केला जाऊ शकतो. जर कोणी सरकारविरूद्ध टीका करीत असेल तर तो राष्ट्रद्रोह अथवा मानहानीच्या कायद्यांतर्गत गुन्हा ठरत नाही. कलम १२४(ए) आयपीसी म्हणजेच राष्ट्रद्रोहाचे कलम लागू करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या पूर्वीच्या निर्णयानुसार काही दिशानिर्देशांचे पालन करावे लागते. विधी आयोगाने राष्ट्रद्रोहाबाबत म्हटले आहे की देश अथवा त्याच्या कोणत्याही पैलूवर टीका करणे देशद्रोह ठरू शकत नाही. देशाबद्दल प्रेम आपल्या भाषेत आणि शैलीत व्यक्त करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. तसेच सरकारविरोधात मतप्रदर्शन करणे, सरकारच्या धोरणांशी सहमत नसणे म्हणजे राष्ट्रद्रोह नाही, असे विधी आयोगाने गेल्या महिन्यात स्पष्ट केले आहे. त्यामुळे सरकारविरोधात भूमिका घेणाऱ्या कोणाविरोधातही राष्ट्रद्रोहाचा आरोप करण्यात येऊ शकत नाही. असे निवृत्त न्यायाधीश बी. एस. चौहान यांच्या अध्यक्षतेखालील विधी आयोगाने स्पष्ट केले आहे. कायदा सुव्यवस्था बिघडवण्याच्या हेतूने केलेले कृत्य आणि हिंसाचार किंवा बेकायदा मार्गानी सरकार विरोधात कारवाया करणे या बाबी राष्ट्रद्रोहाच्या कायद्यात येऊ शकतात, असेही आयोगाने स्पष्ट केले आहे. व्यक्तीस्वातंत्र्यावर कोणतीही बंधणे आणणे योग्य नाही. लोकशाही देशात विशिष्ट गोष्ट करणे किंवा राष्ट्रप्रेमाची गीते म्हणणे म्हणजे देशभक्ती अशी व्याख्या करता येत नाही. देशप्रेम दाखवण्यासाठी प्रत्येकजण आपला मार्ग निवडू शकतो. सरकारच्या धोरणांवर टीका करणे आणि चर्चा करणे हा प्रत्येकाचा अधिकार आहे. सर्वोच्च न्यायालयाचे न्या. दीपक गुप्ता यांनी ‘लॉ ऑफ सेडिशन इन इंडिया अ‍ॅण्ड फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन’ या विषयावर अहमदाबाद येथील एका कार्यक्रमात बोलताना म्हटले होते की ‘एकतर तुम्ही माझ्याशी सहमत आहात किंवा तुम्ही माझे शत्रू आहात आणि याच्याही पुढे जाऊन तुम्ही राष्ट्रद्रोही आहात,’ अशी धारणा सध्या दुर्दैवाने आपल्या देशात बनू पाहात आहे. समाजातील कोणीही व्यक्ती आपल्या संविधानानुसार विश्वास व विवेकाचे पूर्ण स्वातंत्र्य प्राप्त करू शकतो. जोपर्यंत एखादी व्यक्ती कायदा मोडत नाही अथवा संघर्षाला प्रोत्साहित करीत नाही तोपर्यंत त्याला इतरांपैकी प्रत्येकाशी आणि सत्तेतील लोकांशी असहमत असण्याचा अधिकार आहे आणि जे त्याला वाटते त्या विश्वासाचा प्रचार करण्याचा त्याला अधिकार आहे. इंग्लंडमध्ये १७व्या शतकात बनविलेला हा राष्ट्रद्रोहाचा कायदा १८७० मध्ये बंडखोरांचा आवाज दाबून टाकण्यासाठी ब्रिटीश शासनकाळात भारतात लागू करण्यात आला होता. संविधान निर्मात्यांनी कलम १९ नुसार स्वतंत्र भाषणाचा अधिकार अपवादात्मक स्वरूपात राष्ट्रद्रोहात सामील केलेला नव्हता, कारण त्यांच्या मते राष्ट्रद्रोह तेव्हाच गुन्हा ठरू शकतो जेव्हा तो सार्वजनिक अव्यवस्था किंवा हिंसाचाराला प्रेरित करेल. आपल्याला आपल्या असहमतीच्या अधिकाराचे तितकेच जाहीरपणे रक्षण केले पाहिजे ज्याप्रमाणे आपण आपल्या जीवनाचे करतो. देशातील जनतेला धोरणांवर टीका करण्याचा अधिकार नसेल तर स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर वातावरणात फारसा बदल नाही. प्रत्येकाच्या व्यक्तीस्वातंत्र्याचा अधिकार घटनेने अबाधित ठेवला आहे. त्याचा सन्मान केला पाहिजे. देशाची अखंडता आणि एकता टिकवण्यासाठी हे गरजेचे आहे. मत व्यक्त करण्याचा अधिकार नियंत्रित करून त्याचा गैरवापर होऊ नये.

-शाहजहान मगदुम
मो.:८९७६५३३४०४,
Email: magdumshah@eshodhan.com

अंबाजोगाई  (प्रतिनिधी)
अंबाजोगाई येथे गेल्या पंधरा वर्षांपासून चालणार्‍या अलखैर नागरी सहकारी पतसंस्थेने या भागातील गोरगरीब व सर्वसामान्य लोकांना आर्थिक व मानसिक बळ देण्याचे काम केले आहे. अलखैर ही संस्था नसून हे एक कुटुंब आहे. कुटुंबात ज्या पद्धतीने आपल्या माणसांची काळजी घेतली जाते तशी काळजी घेण्याचे काम अलखैरने आजवर केले. म्हणूनच गेल्या पंधरा वर्षात अलखैर ही शून्यातून आज वटवृक्षात रुपांतरित झाली आहे. कामाचा अवाका निश्‍चितच वाढलेला आहे. या भागातील गरीबी हटवून गरीबांना चांगले जीवन जगण्यासाठी संधी उपलब्ध करून दिलेली आहे. हजारो सुशिक्षित बेरोजगारांना रोजगारासाठी अल्पशा सेवाशुल्कावर कर्ज उपलब्ध करून दिले आहे. अशी अलखैर पतसंस्था ही अंबाजोगाई शहराचे भूषण ठरली असल्याचे बीड जमात-ए-इस्लामी-हिंद चे शहरअध्यक्ष सय्यद शफिक हाश्मी म्हणाले.
    या संस्थेची 15 वी वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच  स्व. विलासराव देशमुख न. प. सभागृह येथे पार पडली. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अलखैरचे अध्यक्ष शेख उमर फारूक हे होते. तर प्रमुख उद्घाटक बीड येथील जमात-ए-इस्लामी हिंद चे अध्यक्ष सय्यद शफीक हाश्मी हे होते. मंचावर अंबाजोगाईतील वसुंधरा नागरी सहकारी बँकेचे व्यवस्थापक सिद्राम कांबळे, प्रसिद्ध व्यापारी हाफेज सलिम चौधरी, आदित्य अ‍ॅटो यामाहा मोटर्स अंबाजोगाईचे वितरक कल्याण गुंजकर व सय्यद इफ़्तेख़ार जिल्हा अध्यक्ष जमात-ए-इस्लामी - हिंद बीड हे होते. यावेळी व्यासपिठावर देशमुख पतसंस्थेचे  बिभीषण देशमुख, शहर अध्यक्ष जे.आय.एच तथा संचालक मुजीब काजी, चेअरमन शेख उमर फारूक, एस.बी. सय्यद, शेख रहीमभाई आदी उपस्थित होते.
    यावेळी बोलताना सय्यद शफीक हाश्मी म्हणाले की, आज सामान्य माणसाला कोणी वाली नाही, सामान्य माणसाला कोठे पत व प्रतिष्ठा नाही. अशा माणसाची समाजामध्ये पत आणि प्रतिष्ठा निर्माण करण्याचे काम अलखैर नागरी सहकारी पतसंस्था करीत आहे. अल्लाहने फर्माविले आहे की, गरजवंतांच्या मदतीला आपण धावले पाहिजे, मदत केली पाहिजे आणि त्याला अडचणीतून बाहेर काढले पाहिजे. त्या अल्लाहच्या आदेशाची अंमलबजावणी खर्‍या अर्थाने अलखैर परिवार करीत आहे. समाजामध्ये अनेक संस्था काम करतात. परंतु त्यांच्याकडे केवळ व्यावहारिक दृष्टीकोन असतो. लोकसेवा ही कमी प्रमाणात असते. अलखैर नागरी सहकारी पतसंस्था ही समाजातल्या छोट्या माणसांना मोठे करीत असल्याचेही ते म्हणाले.  प्रास्ताविक चेअरमन  शेख उमर फारूक यांनी केले. संस्थेचा वार्षिक अहवाल सचीव मो.मुजम्मिल यांनी मांडला. त्यास उपस्थितांनी अनुमोदन दिले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उपाध्यक्ष शेख तालेब चाऊस, सचिव खतीब मोहम्मद मुजम्मील, संचालक शेख मुजाहेद, मुजीब काझी, शेख रिझवान, शेख मुनिरोद्दीन, पठाण नसिमुन्निसा बेगम, सिद्दिकी अर्शिया तरन्नुम, व्यवस्थापक सय्यद रऊफ आदींसह सर्व कर्मचार्‍यांनी परिश्रम घेतले.
    नुकतेच दिल्ली येथे झालेल्या बिनव्याजी संस्थांच्या कार्यशाळेत राष्ट्रीय स्तरावरील द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार अलखैर नागरी सहकारी संस्थेने पटकाविला. या कार्यशाळेत देशभरातील 62 बिनव्याजी संस्थांनी सहभाग घेतला होता. यात महाराष्ट्रातील 12 संस्थांचा सहभाग होता. अलखैर नागरी सहकारी पतसंस्थेचय या यशाबद्दल सर्वस्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.

मुस्लिम बुद्धीजीवींच बैठक : रिजवानुर्रहेमान खान यांचे आवाहन

मुंबई (नाजीम खान)
कुरआन आम्हाला हताश न होता निराशेच्या पुढे जावून एकत्र होवून विचार करण्याची कला शिकवितो. एकात्मता ही कुठल्याही गठबंधनाची शक्ती असते. एकत्रितरित्या मतदान करणे आज सर्वात महत्त्वाचे झालेले आहे. आपल्या या प्रिय  राज्यातील सौहार्द, एकात्मतेचे वातावरण खराब करणार्‍या पक्षांना आपल्या मतांद्वारे उत्तर देण्याची ही संधी मतदारांनी सोडू नये, असे आवाहन रिजवानुर्रहेमान खान यांनी येथे केले.
    महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीच्या संदर्भात मुंबईच्या खिलाफत हाऊसमध्ये जमाअत-ए-इस्लामी हिंद मुंबई मेट्रो द्वारा नुकतीच परिसरातील बुद्धीजीवींची बैठक घेण्यात आली. यावेळी खान बोलत होते.
    प्रास्ताविक मुंबई शहराचे अध्यक्ष अब्दुल हसीब भाटकर यांनी केले. यावेळी त्यांनी बैठकीचा उद्देश्य सांगितला. देशाच्या आणि राज्यातील राजकीय परिस्थितीबद्दल चिंता व्यक्त करताना जातीयवादी शक्ती ह्या मजबूत होत असून, धर्मनिरपेक्ष शक्ती ह्या कमकुवत होत असल्याबद्दल चिंता व्यक्त केली. मुव्हमेंट फॉर पीस अँड जस्टीसचे प्रदेशाध्यक्ष मुहम्मद सिराज यांनी याप्रसंगी बोलताना सांगितले की, 2019 च्या निवडणुका ह्या 2009 आणि 2014 च्या तुलनेत एकदम भिन्न आहेत. मुंबईमध्ये सात जागांवर चांगले उमेदवार जिंकण्याच्या स्थितीमध्ये आहेत. मागील निवडणुकांचे विश्‍लेषण करताना त्यांनी सांगितले की, मागच्या वेळेस काही जागी अत्यंत कमी फरकाने धर्मनिरपेक्ष उमेदवार पराभूत झाले होते. यावेळेस परिस्थिती थोडी वेगळी आहे. मागच्या वेळेस नसलेली शिवसेना आणि भाजपची युती यावेळेस झालेली आहे.  तसेच  काँग्रेस-राष्ट्रवादीचीही यावेळी आघाडी झालेली आहे. म्हणून नागरिकांना यासंबंधी योग्य मार्गदर्शन करणे गरजेचे आहे.
    मुहम्मद सिराज यांच्या वक्तव्यानंतर खुल्या चर्चेला सुरूवात झाली. ज्यात सर्व सहमतीने असे ठरले की, मुस्लिम समुदायाला जास्तीत जास्त मतदान करण्यासाठी प्रोत्साहित करण्यात यावे. देशासमोरील प्रमुख समस्या ह्या प्रचाराच्या केंद्रामध्ये ठेवण्यासाठी शक्य ते प्रयत्न करण्यात यावेत. सरकारी बजेटमध्ये शिक्षण, आरोग्य आणि जनकल्याणाच्या कार्यक्रमांना पर्याप्त निधी मिळावा यासाठी जनजागृती करण्यात यावी. शिवाय, मुस्लिमांचे मतदान विभाजित होणार नाही, यासाठी विशेष प्रयत्न करण्याचा निर्णय घेण्यात आला. ज्या उमेदवारांमुळे मतदान विभाजित होण्याची शक्यता आहे त्यांच्या भेटी घेऊन त्यांनाही समजावण्याचा निर्णय घेण्यात आला. याच कार्यक्रमामध्ये जनतेचा जाहीरनामा म्हणून सार्वजनिक निवडणूक घोषणापत्र प्रकाशित करण्यात आले.

ये किसकी दुआओंने सरपर हाथ रख्खा है
हजारों मुश्किलें है फिर भी थाम रख्खा है
20 ऑक्टोबर 2019 रोजी दुपारी इंडिगोच्या विमानाने सऊदी अरबच्या जद्दाह विमानतळावर उतरताच माझे लक्ष इमिग्रेशन डेस्कच्या पाठीमागे बसलेल्या दहा तरूण सऊदी महिलांकडे गेले. त्यांच्यापैकी आठ नखशिकांत बुरख्यात होत्या तर दोघींनी चेहरे उघडे ठेवले होते. एमबीएस नावाने आंतरराष्ट्रीय जगतात प्रसिद्ध असलेले सऊदी अरबचे राजपुत्र, मुहम्मद बिन सलमान यांच्या हातात प्रत्यक्ष देशाची सुत्रे आल्यापासून महिला सुधारणांच्या नावाखाली त्यांनी जे काही निर्णय घेतले आहेत त्याचा परिणाम म्हणून चेहरा उघडा असलेल्या अनेक अरेबियन वंशाच्या तरूणी माझ्या पुढील 15 दिवसांच्या प्रवासामध्ये ठिकठिकाणी आढळून आल्या.
    काही वर्षांपूर्वी सऊदी अरबमध्ये चेहरा उघडे ठेवून वावरत असलेली एकही महिला दिसने अशक्य होते. आज मक्का आणि मदीना सारख्या तीर्थ क्षेत्रामध्ये सुद्धा हॉटेल, मॉलच्या काऊंटरवर तरूण स्त्रिया बसलेल्या दिसून येतात. रियाज या राजधानीच्या शहरात तर फॅशन शो व अनेक स्त्री-पुरूषांचे संयुक्त मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. एवढेच नाही तर अरबी वृत्तवाहिन्यांवर केस मोकळे सोडून, मेकअप करून अनेक तरूण निवेदिका बातम्या देत असतांना आढळून आल्या. महेरमच्या शरई व्यवस्थेच्या विरूद्ध जाऊन राजपूत्र मुहम्मद बिन सलमान यांनी अनेक निर्णय घेतल्याचे दिसून आलेले आहे. अरबी महिलांना ड्रायव्हिंगचा अधिकार देणे, त्यांना फुटबॉल स्टेडियमच्या गर्दीमध्ये एकटीला प्रवेश देणे, एकट्या महिलेला परदेशी विमान प्रवासाची परवानगी देणे, अरबेत्तर अविवाहित जोडप्यांना सऊदी अरबच्या हॉटेलमध्ये राहण्याची परवानगी देणे यासारखे अनेक निर्णय एमबीएसनी सुधारणांच्या नावाखाली घेतलेले आहेत. ह्या घडामोडीमुळे सऊदी अरबच्या ’शरीयत -पसंद’ समाजामध्ये खळबळ माजलेली आहे. स्पष्टपणे कोणी या निर्णयांचा जरी विरोध करतांना दिसत नसला तरी सुप्तरित्या अनेक लोक राजपुत्राच्या या निर्णयाच्या विरोधात असल्याची जाणीव होते.
    मदिना शहरात पोहोचता-पोहोचता आम्हाला उशीर झाला. जद्दा ते मदिना या पाच तासाच्या प्रवासामध्ये एक गोष्ट लक्षात आली की सऊदी अरब अतिशय विरळ वस्तीचा देश आहे. एकही मोठे शहर या दरम्यान मला आढळले नाही. ज्या काही छोट्या-छोट्या वस्त्या आढळल्या त्याही महामार्गावरून दूर असल्यामुळे त्यांचा स्पष्ट अंदाज घेता आला नाही. अलबत्ता थोड्या-थोड्या अंतरावर एक पेट्रोलपंपाच्या बाजूला एक मस्जिद आणि चारदोन धाबे सदृश्य हॉटेल्स मोठ्या प्रमाणात आढळून आले. त्यावर मदिन्याकडे जाणारे प्रवाशी थांबवून चहा, पाणी करत आणि नमाज अदा करत होते. लातूरच्या हुसैन हज कॉर्पोरेशन तर्फे ’अमजद-अल-गर्रा’ नावाच्या हॉटेलमध्ये आमची थांबण्याची व्यवस्था करण्यात आलेली होती.
    जेवण करून झोपण्याचा प्रयत्न केला, परंतु इस्लामचे अंतिम प्रेषित मुहम्मद मुस्तफा सल्ललाहु अलैहि व सल्लम यांच्या रोजा (कबर) च्या इतक्या जवळ येऊन पोहोचल्याने त्यांच्या दर्शनाची ओढ लागल्यामुळे झोप येत नव्हती. त्यात परत भारत आणि सऊदी अरब यात साडेतीन हजार किलोमीटरचे भौगोलिक अंतर असल्यामुळे अडीच तासाची वेळ कमी झाली होती. मी जागाच होतो की, थोड्याच वेळात तेथील वेळेप्रमाणे पहाटे 4.00 वाजता मस्जिद-ए-नबवीमधून अजानची अतिशय सुरेल आवाज ऐकू आली. मी लगबगीने उठून वजू करून मस्जिद-ए-नबवीकडे निघालो. मनात विचारांचा काहूर माजलेला होता. प्रेषित सल्ल. यांनी याच भूमीवर केलेल्या संघर्षाची आठवण येऊन मन भरून आलेले होते. जशी-जशी मस्जिदे नबवी नजरेच्या टप्प्यात येत होती, तशी-तशी मनाची कैफियत बदलत होती. पाच सातशे पावलं चालल्यानंतर सात नंबर गेट (बाबुस्सलाम) मधून आत प्रवेश केला आणि एकदाची मस्जिद-ए-नबवी नजरेच्या टप्प्यात आली. प्रेषित सल्ल. यांचा रोजा आणि मस्जिद एवढी भव्य आहे की एका नजरेमध्ये ती सामावू शकत नाही.
    एकूण 48 प्रवेशद्वार असलेल्या या मस्जिद-ए-नबवीच्या प्रचंड परिसरामध्ये तेवढ्या पहाटेसुद्धा जवळ-जवळ 1 लाख जायेरीन (यात्रेकरूं)चा जमाव जमलेला पाहून आश्‍चर्य वाटले. तहाज्जुदची नमाज कशीबशी अदा करून प्रत्यक्ष प्रेषितांच्या कबरीच्या दर्शनासाठी रांगेमध्ये उभा राहिलो. जगातल्या वेगवेगळ्या देशातून आलेल्या वेगवेगळ्या वर्ण, उंची आणि भाषा बोलणार्‍या लोकांच्या सोबत उभा राहून अंतरराष्ट्रीय एकात्मतेची अनुभूती झाली. प्रचंड मोठी रांग शिस्तबद्धपणे हळूहळू पुढे सरकत होती. रांगेतील प्रत्येक व्यक्ती रडत होता. प्रत्येकाच्या डोळ्यातून आश्रू ओघळत होते. माझीही मानसिक अवस्था अतिशय भावनिक झाली होती. काही क्षणातच मी जगातील सर्वश्रेष्ठ व्यक्तीच्या कबरीसमोर उभा होतो. स्वतःच्या डोळ्यावर विश्‍वास बसत नव्हता की मी प्रेषित मुहम्मद सल्ल. यांच्या कबरीच्या समोर सदेह उभा आहे. अगोदर सलाम पेश करून मग एका बाजूला निमुटपणे उभा राहून स्वतःसाठी, कुटुंबातील व्यक्तींसाठी, मित्र परिवार आणि आपल्या प्रिय भारत देशाच्या उन्नतीसाठी प्रेषित मुहम्मद सल्ल. यांच्या वशील्याने अल्लाहकडे दुआ मागितली. लोकांची गर्दी इतकी होती की फार वेळ कबरीसमोर थांबता आले नाही. पण पुढील दहा दिवसाच्या मुक्कामामध्ये रोज पहाटे याच वेळी येवून नित्य नियमाने कबरीचे मनसोक्त दर्शन घेण्याचे भाग्य मला लाभले. ज्यामुळे मी स्वतःला भाग्यशाली समजतो.
    काही वेळेतच फजरची अजान झाली, नमाज झाली आणि लख्ख सूर्यप्रकाश पडला. त्या कोवळ्या प्रकाशात मस्जिद-ए-नबवीचे सौंदर्य इतके खुलून दिसत होते की, प्रत्येकजण ते सौंदर्य डोळ्याने टिपून अध्यात्मिक आनंदाच्या सर्वोच्च पातळीवर असल्याचा अनुभव घेत होता. प्रेषितांच्या कबरीवरील हिरवेजर्द गोल घुमट लक्ष वेधून घेत होते. मस्जिद-ए-नबवीची श्रीमंती नजरेत साठवत होतो. सगळीकडे संगमरवरी दगडाने केलेले बांधकाम, शेकडो लोक रात्रंदिवस मस्जिदीच्या साफसफाईसाठी तैनात केलेले आहेत. ते इतक्या मनोभावे सेवा करतात की, लाखो लोकांच्या उपस्थितीत होणारा कचरा एका क्षणात टिपून घेण्यासाठी ते सदैव सज्ज असतात. स्वच्छतेची 24 तास काळजी घेतली जात होती. मी जेव्हा-जेव्हा मस्जिदे नबवीमध्ये प्रवेश केला तेव्हा-तेव्हा स्वच्छता सेवक तत्परतेने स्वच्छतेचे काम करत असल्याचे मी प्रत्यक्ष पाहिले. हलक्याश्या पिवळ्या आणि हिरव्या रंगातील मस्जिदे नबवीचे खांब डोळ्यांना अतिशय अल्लाददायक वाटत होते. मस्जिदे नबवीच्या विस्तीर्ण परिसरात लाल रंगाचे उंची गालीचे मस्जिदीची शोभा वाढवित होते. मस्जिदीमधील दहाव्या क्रमांकाच्या गेटवर असलेल्या वाचनालयाच्या पाटीकडे माझे लक्ष गेले आणि अनाहुतपणे मी वाचनालयात प्रवेश करता झालो. 10 हजारांपेक्षा जास्त पुस्तकांच्या या विशाल वाचनालयाच्या श्रीमंतीचे वर्णन शब्दात करणे केवळ अशक्य आहे. अरबी, इंग्रजी, हिंदी, उर्दू एवढेच नव्हे तर तमीळ, मळ्यालम, तेलगू, फारसी भाषेमधील अनेक पुस्तकांची मांदियाळी येथे आढळून आली. माझा इबादतीनंतरचा पुढील मुक्काम बहुतकरून याच वाचनालयात राहिला.
    अनेक अरबी लोकांच्या संपर्कात केवळ इशार्‍याने आणि थोड्याफार लोकांना येणार्‍या इंग्रजी भाषेने माझ्या दहा दिवसाच्या काळामध्ये अनेक अरबी लोकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला व अरबी समाज जीवन समजून घेण्याचा प्रयत्न केला. दरम्यानच्या काळात एक दिवस वातानुकुलित बसने मदिनादर्शन या कार्यक्रमांतर्गत शहर पाहण्याचा योग आला.
मक्का-मदिनेची वैशिष्टये
    जुलै 2017 च्या जनगणनेप्रमाणे सऊदी अरबची लोकसंख्या 27,136,977 एवढी आहे. ज्यात 22,808,576 सऊदी नागरिक आहेत, बाकीचे सर्व विदेशी लोक त्या ठिकाणी कामधंद्यासाठी म्हणून आलेले आहेत. नागरिक सुविधांच्या दृष्टीने हा देश अतिशय संपन्न आहे. नागरिकांना सर्व प्रकारच्या सोयी आणि सुविधा मोफत उपलब्ध करून दिल्या जातात. याचा अनुभव मलाही आला. सातत्याने जम-जमचे थंड पाणी पिल्याने माझ्या पत्नीला सर्दी झाली. पाच नंबर गेटच्या बाजूलाच असलेल्या ’अल शिफा सरकारी रूग्णालया’मध्ये गेल्यावर मोफत तपासणीसह महागडी औषधे सुद्धा मोफत देण्यात आली.
    मदिनाचा दहा दिवसाचा प्रवास संपवून मक्कामध्ये प्रवेश करता झालो. ’अल-किसवा-टॉवर’ नावाच्या मोठ्या हॉटेलमध्ये आमची थांबण्याची व्यवस्था करण्यात आली होती. मदिना येथूनच एहराम (पांढर्‍या रंगाचे दोन कपडे) धारण करून निघालो होतो. हॉटेलमध्ये जेवण केल्याकेल्या काबा दर्शनासाठी रवाना झालो. काब्याच्या प्राथमिक दर्शनाने त्याच मनोदशेची पुनरावृत्ती झाली, जी की प्रेषित मुहम्मद सल्ल. यांच्या कबरीसमोर उभे असताना झाली होती. तवाफ (काबागृहाला सात चक्कर मारणे) व सई (सफा आणि मरवाह नावाच्या दोन टेकड्यांच्या मध्ये सात चकरा मारणे.) पूर्ण करून थोडावेळ काबागृहात थांबून दुआ मागून परत हॉटेलमध्ये गेलो. दुसर्‍या दिवशी बदरचे युद्ध ज्या ठिकाणी झाले ते मैदान पाहण्यासाठी बसने जाण्याची संधी मिळाली. बदर हे ठिकाण मक्कापासून 160 कि.मी. अंतरावर आहे. जाता-येताना दिवसाच्या प्रकाशात सऊदी अरबचा ग्रामीण इलाका पाहण्याची संधी मिळाली. प्रगत देशाची सर्व लक्षणे सऊदी अरबमध्ये आढळून आली.
मक्का शहराचे दर्शनही करता आले. मक्का आणि मदिना दोन्ही शहरांच्या बाबतीत जी एक गोष्ट नजरेत भरण्यासारखी होती ती म्हणजे स्वच्छता. प्रचंड रूंद आणि चकचकीत रस्ते, मोठ-मोठ्या टोलेजंग इमारतींबरोबर छोटी-छोटी टुमदार घरे, प्रत्येक घरासमोर दोन-तीन चार चाकी गाड्या, माझा तर असा विश्‍वास झालाय की, सऊदी अरबमध्ये लोकसंख्येपेक्षा किमान तीन पटीने जास्त चारचाकी वाहन असावीत. शहराच्या बाजूला एकर-दोन एकरची जमीन घेऊन तेथील नागरिकांना त्या ठिकाणी त्यांची जुनी वाहन डम्प करावी लागतात. अशी हजारो चारचाकी वाहने शहराच्या बाहेर डम्प केलेली मी पाहिलेली आहेत. शहरामध्ये एकही वाहन डम्प केलेले आढळून येत नाही. मक्का आणि मदिनाच्या रस्त्यांवर एकही भटका कुत्रा किंवा इतर भटकी जनावरे मला आढळून आलेली नाहीत. चौका-चौकात निरूद्देश्य उभी  असलेली लोकं, वाहनांचा जाम आढळून आले नाही. तीन तास शहरात फिरून 25 सुद्धा माणसं नजरेस आढळलेली नाहीत. तेथील लोक एकतर घरात असतात, गाडीत असतात किंवा कामाच्या ठिकाणी असतात. अरबी लोकांच्या आदरातीथ्याचा अनुभवही मिळाला. रोज असर आणि मगरीबच्या नमाजच्या दरम्यान मक्का आणि मदिनामध्ये बाजाप्ता दस्तरखान अंथरून त्यावर अनेक प्रकारचे खजूर, क्रीम, दही आणि अन्य रूचकर खाद्यपदार्थ मोफत अगदी आग्रहाने दिली जातात. अनेक अरबी लोक टेम्पोमध्ये थंड पाण्याच्या बाटल्या, बंद डब्यातील गरमा गरम चिकन बिर्याणी आणून यात्रेकरूंना मोफत देत असतात. कहवा नावाचे चहा सदृश्य पेय अगदी आग्रहाने पाजविले जाते. कुठल्याही ठिकाणी दानपेटी नाही. एक रूपया खर्च करावा लागत नाही. उलट तेच लोक आपल्यावर खर्च करत असतात. शरीयतची कट्टरपणे अमलबजावणी करणार्‍या या देशातील नागरिकांवर पाश्‍चिमात्य (अ) सभ्यतेचे परिणाम होत असल्याचे स्पष्टपणे जाणवू लागले आहेत. अरबी लोकांचा डीएनए जगातील उत्कृष्ट डीएनए असलेल्या लोकांपैकी एक मानला जातो. उंट आणि बकरीचे दूध पिऊन, पौष्टीक खारीक खाऊन, उंट राखण्यासाठी शेकडो किलोमीटर चालण्याची सवय असल्याने उंच व काटक शरीरयष्टीच्या अरबी लोकांची नवीन पिढी मात्र मैद्याचा पिझ्झा आणि बरगर खाउन तसेच पेप्सी पिऊन भद्दी (स्थूल) होत असल्याची जाणीव झाल्याशिवाय राहत नाही.असो एकूणच 15 दिवसाचे मक्का आणि मदिना शहरातील माझे धार्मिक पर्यटन अत्युच्च अध्यात्मिक आनंद देऊन गेले. त्यासाठी मी अल्लाहचा ऋणी आहे.

देशातील प्रचंड लोकसंख्या असलेले समृद्ध आणि प्रगत राज्य म्हणजे महाराष्ट्र. देशातील सर्वात मोठे औद्योगिक राज्य असण्याचा मान देखील महाराष्ट्राचाच आहे. आयकर दात्यांचे सर्वांत जास्त प्रमाण महाराष्ट्रात आहे. व्यापार, समृद्धी आणि आधुनिक प्रगतीचा विचार केल्यास महाराष्ट्राची तुलना रशिया आणि कॅनडा सारख्या देशांशी केली जाते. तब्बल जापान एवढी लोकसंख्या असलेल्या महाराष्ट्रात शिक्षणाचे प्रमाणसुद्धा देशभरातील शिक्षणाच्या प्रमाणापेक्षा अधिक आहे.
चिंताजनक परिस्थिती
          ह्यां सर्व जमेच्या बाजू असल्या तरी एक अत्यंत कटू सत्य असे की, आपले राज्य देशातील सर्व सर्वांत जास्त कर्जबाजारी राज्य असून कर्जाचे ओझे दरवर्षी वाढतच आहे. 2019 च्या आर्थिक पाहणीत आढळून आले की, आपल्या राज्यावर तब्बल 4 लक्ष 61 हजार 913 कोटींचे कर्ज आहे. हेच प्रमाण 2014 साली 2 लक्ष 61 कोटी होते. राज्यात बेरोजगारीचा दर 4.9 टक्के असून देशाच्या इतर भागांच्या तुलनेत अतिशय धक्कादायक आहे. शेतकर्‍यांच्या आत्महत्या थांबता थांबत नाहीत. 2010 ते 2014 पर्यंतच्या कालावधीत 8 हजार 9 शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या होत्या, मात्र 2015 ते 2018 सालच्या फक्त तीन वर्षांच्या कालावधीत 12 हजार शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या आणि आत्महत्यांचे हे दुष्टचक्र थांबता थांबत नाहीये.
          भ्रष्टाचार, जातिवाद, गरिबांचे शोषण यासारख्या बाबी आणि विकासासाठी समान संधी या सर्वच आघाड्यांवरील परिस्थिती चिंताजनक आहे
    स्वप्नांचा महाराष्ट्र
* आर्थिक, सामाजिक जनकल्याणकारी आणि सत्य व न्यायावर आधारित आघाडीवर सर्वसमावेशक प्रगती व्हावी.
* अन्यायपीड़ितांना न्याय आणि रोजगार मिळावा, विकास   -(उर्वरित पान 7 वर)
कार्यक्रम पूर्ण पारदर्शकतेसह तात्काळ सक्तीने लागू करण्यात यावा.
    * आरोग्य, स्वच्छता आणि शिक्षण क्षेत्रात राज्याने अशा प्रगत राष्ट्रांचे अनुसरण करावे जेथे कोणत्याही प्रकारचा भेदभाव न पाळता सामाजिक न्यायावर आधारित शिक्षण आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध असतात.
    * आपले राज्य भ्रष्टचारमुक्त असावे आणि कल्याणकारी राज्य असण्याचा आदर्श सादर करावा.
    * जनतेच्या मूलभूत गरजांची पूर्तता आणि त्याबरोबरच पोषक आहार, निर्मळ पाणी, उच्च दर्जाची आरोग्य सुविधा यासारख्या बाबी शासनाच्या प्राथमिकतेत असाव्यात.
          * मानवाधिकाराधीष्ठित मूल्यांचा केवळ आदर करण्यावर भर न देता त्यांची प्रत्यक्ष पेरणी जनतेच्या हृदयात व्हावी.
    * सामाजिक ऐक्याचे संवर्धन हा समस्त शासकीय धोरणाचा पाया असावा. समता, बंधुत्वाच्या आदर्शांवर सक्तीने अंमलबजावणी व्हावी. भारतीय संविधानाचे रक्षण व्हावे.
    जमात-ए-इस्लामी हिन्द, महाराष्ट्राला हा जाहीरनामा राज्यातील मतदार आणि राजकीय पक्षांसमोर प्रसिद्ध करताना आनंद होत आहे. हा जाहीरनामा जनतेच्या आतल्या मनाच्या आवाजाबरोबरच राजकीय संघटनासाठी आदर्श शासनप्रणाली साठीची मार्गदर्शक तत्वे आहेत.
    जमात-ए इस्लामी हिन्द, महाराष्ट्र प्रदेश उच्च नीतिमत्ता व मानवीय मूल्ये, जातीय सलोखा, बंधुत्व वृद्धिंगत करून न्यायावर आधारित सरकार स्थापन व्हावे, अशी इच्छा बाळगून आहे व त्यासाठी शक्य तेवढे सहकार्य करण्यास तयार आहे.
जन कल्याणास्तव जनतेच्या मागण्या
    1. महात्मा गांधी रोजगार हमी कायदा (रोहयो) मध्ये सुधारणा करून वर्षभरातील सलग 365 दिवस अल्प मजूरी कायद्यानुसार रोजगाराची हमी द्यावी.
2. यंत्रमाग उद्योगातील प्रश्‍न तात्काळ सोडविण्यात यावे आणि कमी दरात वीज पुरवठा तसेच पुरवठ्यासंबंधीचे प्रश्‍न निकाली लावण्यात यावेत. उद्योगासाठी आवश्यक असलेला कच्च्या मालास दलाल आणि व्यापार्‍यांच्या कचाट्यातून मुक्त करावे. कापूस आणि सूत ऐवजी सूती कापड आयात करण्यात यावे.
3. आपल्या जमिनीची पूर्ण कागदपत्रे नसलेल्या गरीब आणि मागासवर्गीय लोकांच्या जमिनी बळकावणार्‍यांना गुन्हेगार घोषित करावे. 4. जलयुक्त शिवार योजना भ्रष्टाचारमुक्त करण्यात यावी आणि अन्न प्राप्ती अधिकाराच्या (राईट टू फुड) धर्तीवर पिण्याच्या व वापरायच्या पाण्यासाठी जलप्राप्ती अधिकार ’राईट टू वॉटर’ कायदा करण्यात यावा.
 5. राज्यात असंघटित मजुरांची संख्या जवळपास 3 कोटी 65 लाख आहे. अनियमित रोजगार आणि अर्ध बेरोजगारी तसेच मजूर आणि मालक यांच्या दरम्यान संवाद नसणे व सामाजिक सुरक्षेचा अभाव ह्या सारख्या बाबी मजुरांच्या मुळावर उठलेल्या आहेत. शासनातर्फे इतर विभागातील मजुरांसाठी असलेले कार्यक्रम आणि कायदे असंघटित मजुरांसाठी सुद्धा सक्तीने लागू करण्यात यावेत.
6. राज्यात दुष्काळ निवारणासाठी माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या मे 2016 च्या आदेशाची अंमलबजावणी करण्यात यावी.
7. राज्यातील प्रत्येक नागरीकास मोफत उत्तम दर्जात्मक उपचार सवलत प्रदान करण्यात यावी. लोकसंख्येच्या प्रमाणात इस्पितळे उभारण्यात यावी आणि मोफत उपचाराबरोबर मोफत औषधी वितरणाचे उचित तंत्र निर्माण करण्यात यावे. औषधोपचारासंबंधी जनहिताचे निर्णय घेण्यात यावे.
    सामाजिक न्यायासाठी जनतेच्या मागण्या...
1. राज्यात सामाजिक उत्तरदायित्व कायदा (सोशिएल अकाऊंटीब्लिटी अ‍ॅक्ट) पारित करण्यात यावा.
2. अल्पसंख्यांकावर होणार्‍या विद्वेषपूर्ण (हेट क्राईम्स)  हल्ले व मॉबलिंचिंग विरूद्ध कायदा पारित करण्यात यावा.
3. मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाच्या निधीत वाढ करून बेरोजगार, विद्यार्थी आणि महिलांना व्याजमुक्त कर्ज वाटप करण्यात यावे. यासह ह्यासंबंधी जनजागृती निर्माण करून कर्ज प्रक्रिया सहज आणि सोपी करण्यात यावी.
4. राज्यात मुस्लिमांची संख्या 1 कोटी 20 लाख असून राज्यभरात त्यांचे आर्थिक, सांस्कृतिक इत्यादी प्रकारच्या विविध कल्याणकारी क्षेत्रातील असामान्य योगदान कोणीही नाकारू शकत नाही. तरी सुद्धा गेल्या कित्येक दशकांपासून ते शासन आणि राजकीय संकुचित वृत्ती असलेल्या लोकांच्या द्वेषाचे बळी ठरलेले आहेत. परिणामी त्यांची अवस्था अत्यंत मागास झालेली आहे. ही परिस्थिती बदलण्यासाठी कठोर पावले उचलण्याची गरज आहे. करीता महमुदउर्रहमान स्टडी ग्रुप व विशेषतः निम्नलिखित शिफारसी लागू करण्यात याव्यात.
5.  शासकीय सेवा क्षेत्र आणि शैक्षणिक संस्थांमध्ये मुस्लिमांना किमान 8 टक्के आरक्षण देण्यात यावे.
6. सरकारी व खाजगी आवास योजनांत किमान 8 टक्के वाटा देण्यात यावा.
7. मुस्लिम आणि इतर अल्पसंख्यांकांना त्यांचे अधिकार व संधी बहाल करण्यासाठी ’समान संधी आयोग’ स्थापन करण्यात यावा.
8. सच्चर आयोगाच्या शिफारसीनुसार डायव्हर्सिटी इंडेक्स कन्सेप्ट लागू करण्यात यावा. यानुसार सरकारी व खाजगी ह्या दोन्ही स्तरांवर मुस्लिमांना उत्तम संधी प्राप्त होऊ शकतात. करीता राज्यस्तरावरील समस्त योजना, अनुदान व इतर कल्याणकारी सवलती डायव्हर्सिटी इंडेक्स तहत देण्याची प्रक्रिया राबविण्यात यावी.
9. मागास भटक्या विमुक्त जाती व जमातीसाठी केलेल्या भेदभाव विरोधी कायद्याच्या धर्तीवर अल्पसंख्यांकासाठी योग्य व न्यायपूर्ण कायदा करण्यात यावा.
10. सरकारी नोकर्‍यात नियुक्ती करणार्‍या कमेटीत मुस्लिमांचे प्रतिनिधीत्व अनिवार्य करण्यात यावे.
11. अल्पसंख्यांक मंत्रालयाच्या मार्गदर्शनानुसार राज्यात बहु क्षेत्रीय विकास कार्यक्रमाची (मल्टी सेक्ट्रल डेव्हलपमेंट प्रोग्राम्स एमएसडीपी) सक्तीने अंमलबजावणी करण्यात यावी.
12. वक्फ संपत्तीचे रक्षण करण्यात यावे तसेच राज्य सरकारी संस्था व इतर संस्थांच्या बेकायदेशीर ताब्यातून मुक्त करण्यात याव्यात. अल्पसंख्यांक शैक्षणिक संस्था आणि व्यावसायिक शिक्षण केंद्रे चालविण्यासाठी वक्फ संपत्ती मुस्लिमांना परत करण्यात यावी.
13. 1992 सालच्या मुंबई दंगलीच्या तपासासाठी नियुक्ती करण्यात आलेल्या न्यायमूर्ती श्रीकृष्ण आयोगाच्या शिफारशी तात्काळ लागू करण्यात याव्यात.
14. पोलिस यंत्रणा दक्ष आणि लोकाभिमुख करण्यासाठी राष्ट्रीय पोलीस आयोगाच्या शिफारसी लागू करण्यात याव्यात. तसेच ही यंत्रणा भेदभावमुक्त करण्यासाठी यात अल्पसंख्यांक समुदायास 25 टक्के आरक्षण देण्यात यावे.
जनतेच्या शिक्षणासंबंधी मागण्या
    1. राज्यभरात के.जी. टू पी.जी. पर्यंत मोफत शिक्षण सवलत देण्यात यावी. 2. समस्त खाजगी शिक्षण संस्थांना 100 टक्के अनुदान देण्यात यावे. 3. समस्त सरकारी व खाजगी शाळांत निरोगी व दर्जेदार शिक्षणासाठी आरोग्य केंद्रे उभारण्यात यावी. 4. प्रत्येक जिल्ह्यात (आयुष) आयुर्वेद, होमिओपॅथी व युनानी वैद्यकीय महाविद्यालय उभारण्यात यावेत. 5. राज्यात अलीगढ मुस्लिम विद्यापीठाचे प्रादेशिक केंद्र स्थापन करण्यासाठी जमीन आणि आवश्यक त्या सवलती प्रदान करण्यात याव्यात. 6. प्रादेशिक आणि अल्पसंख्यांक भाषांच्या रक्षणासाठी उर्दू व मराठी विद्यापीठांची स्थापना करण्यात यावी.
7. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उपलब्ध नसलेल्या प्रत्येक जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालय स्थापन करण्यात यावेत. त्याचप्रमाणे आंध्र प्रदेशाच्या धर्तीवर एमबीबीएस शुल्काचे संयोजन करण्यात यावे.
8. इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये (फीस रेग्युलिटींग अ‍ॅथॉरिटी) स्थापन करण्यात यावी.
9. दिल्ली सरकार प्रमाणे महाराष्ट्र सरकारने देखील उत्पन्नाना 26 टक्के भाग शिक्षणावर खर्च करावा.
10. राज्यात प्रत्येक स्तरावर परीक्षांत सुधारणा करून पूर्ण राज्य कॉपीमुक्त करण्यात यावे.

मुलभूत कृती आराखड्यात सुधारणा
घडविण्यासाठी जनतेच्या मागण्या
1. सरकारी सेवा आणि यासंबंधी समस्त योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सोशल ऑडिटची यंत्रणा राबविण्यात यावी.
2. प्रत्येक गावात एस.टी. बस सेवा सुरू करावी. राज्य परिवहन महामंडळातील रिक्त जागा तात्काळ भराव्या तसेच बस टोल नाका मुक्त करावी .
3. समस्त प्रकारच्या परिवर्तनक्षम ऊर्जा (रिनीव्हेबल एनर्जी) कार्यक्रम तात्काळ पुनर्जीवित करण्यात यावा. त्याचप्रमाणे आर.ई. प्रकल्पांना कार्यक्षम बनविण्यात यावे. त्याचप्रमाणे दिल्ली सरकार प्रमाणे मोफत वीज पुरविण्यात यावी.
4. प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि रूग्णालयांच्या संख्येत वाढ करून त्यातील मुलभूत आराखडा व व्यवस्थापनात परिवर्तन घडवून आणावे. याबरोबरच सर्व बालक विकास कार्यक्रम (इंटिग्रेटेड चाईल्ड डेव्हलपमेंट स्कीम आयसीडीज) बालवाडी व अंगणवाडीकडे पूर्ण लक्ष देण्यात यावे.
शेतकरी वर्गाची समृद्धी आणि कृषी विकासासाठी
जनतेच्या मागण्या
1. कृषी क्षेत्रातील विकासासाठी उच्च दर्जाची नीती तयार करण्यात यावी. शेतकर्‍यांसाठी स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी लागू कराव्यात. विशेष म्हणजे उत्पन्नावर येणार्‍या खर्चाच्या किमान दीटपट दराने कृषी माल खरेदी करण्यात यावा. आयोगाने केलेल्या सूचना तात्काळ लागू करण्यात याव्या. कॉपारेट शेती आणि भावी विक्री सारख्या बाबीवर अंकुश ठेवण्यात यावा. पिकांचे नुकसान होण्याच्या परिस्थितीत शेतकर्‍यांच्या मदतीसाठी क्लायमेटी फंड च्या धर्तीवर निधी उपलब्ध करून देण्यात यावा.
2. शेतकरी आत्महत्या प्रभावित राज्यातील 14 जिल्ह्यात पेस्टिसाइडच्या वापर करण्यावर बंदी घालण्यात यावी आणि त्याना ऑरगॅनिक फार्मिंग झोन घोषित करण्यात यावे. सेंद्रीय शेतीस प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने विशेष पावले उचलावीत.
3. यावर्षी कमी पाऊस झालेल्या प्रत्येक जिल्ह्यात तात्काळ दुष्काळ जाहीर करावा. दुष्काळग्रस्त जिल्ह्यात ज्या शेतकर्‍यांच्या पूर्ण पिकांचे नुकसान झाले आहे त्यांना तात्काळ मदत पोहोचविण्यात यावी. त्याचबरोबरच पूरग्रस्त भागात पुनर्वसनाचे काम तात्काळ पूर्ण करावे.
4. रिजर्व बँक ऑफ इंडिया तर्फे स्थापित नायर समितीच्या सुधारित मार्गदर्शक कर्ज प्रकरणाच्या शिफारसी तात्काळ लागू करण्यात याव्यात. यानुसार बँकेतर्फे देण्यात येणार्‍या कर्जाच्या रकमेचा 18 टक्के भाग शेतकर्‍यांसाठी आरक्षित करण्यात यावा. 5. जे शेतकरी कर्ज पतरफेड करतात, त्यांना व्याजमुक्त कर्ज देण्यात यावे.

आर्थिक विकास आणि समृद्धीसाठी जनतेच्या मागण्या

1. अन्न, पाणी आणि निवारा तसेच रोजगार, शिक्षण इत्यादी समस्त बाबी जनतेच्या मूलभूत गरजा आहेत. ह्यांची पूर्तता करणे हे प्रत्येक कल्याणकारी राज्याचे आद्यकर्तव्य आहे. यामुळेच रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात आणि राज्य आर्थिक पातळीवर समृद्ध होते.
2. अन्न व ह्यासंबंधी समस्त गरजेच्या वस्तूंचे दर निश्‍चित करण्यासाठी तात्काळ धोरण ठरविण्यात यावे. अन्न आणि तत्सम गरजेच्या वस्तू वाजीपेक्षा जास्त महाग झालेल्या आहेत. परिणामी गरीब व सामान्य जनता होरपळून निघत आहे. जीवनमानात झालेला बदल तसेच गरजेपेक्षा जास्त खूप असे चुकीचे निमित्त महागाईसाठी पुढे करण्यात येत आहे. मात्र राज्य सरकारने शेतमालासाठी योग्य भाव आणि नफा दर निश्‍चित करावा आणि ह्या अनुषंगाने शेतकर्‍यांचे हितसमोर ठेऊन उपभोक्तांसाठी आवश्यक पावले उचलावीत.
3. दळणवळण खर्च कमी करून महागाईवर नियंत्रण मिळविण्यासाठी पेट्रोल व डिझेलवरील कर कमी करण्यात यावा. 4. किरकोळ वस्तू विक्रीसाठी एफडीआय ला परवानगी देता कामा नये. त्याचप्रमाणे लाखो एकर जमिनी संपादित करून त्यांच्या मूळ मालकांना मालकी अधिकारापासून वंचित करून बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या घशात घालण्यात येत आहे. करीता एसईझेड आणि एससीझेड वर ताबडतोब बंदी घालण्यात यावी.
    
- जमाअत-ए-इस्लामी हिंद, महाराष्ट्र

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget