Halloween Costume ideas 2015

जमाअत-ए-इस्लामी हिंदच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी रिजवानुर्रहमान खान यांची निवड

मुंबई (शोधन सेवा) -
जमाअत-ए-इस्लामी हिंद महाराष्ट्राच्या प्रदेशाध्यक्ष (अमीर हल्का) पदी रिजवानुर्रहेमान खान यांची निवड करण्यात आली आहे. त्यांनी नुकतीच मावळते प्रदेशाध्यक्ष तौफिक असलम  खान यांच्याकडून सुत्रे स्विकारली. रिजवानुर्रहेमान यांचा जन्म 19 सप्टेंबर 1969 रोजी नागपूरमध्ये जमाअत-ए-इस्लामीच्या चळवळीशी संबंधित एका घराण्यामध्ये झाला. त्यांनी आपले  प्रारंभिक शिक्षण अचलपूर (जि.अमरावती) येथून पूर्ण केले. त्यांचे वडील मौलाना हबीबुर्रहेमान खान हे सुद्धा जमाअते इस्लामी महाराष्ट्राचे अध्यक्ष राहिलेले आहेत. त्यांच्या परिवारातील  अनेक नातेवाईक जमाअते इस्लामीशी संबंधित आहेत. त्यांचा परिवार जमाअते इस्लामीसाठी स्वतःला वाहून घेतलेल्यांचा परिवार आहे. रिजवानुर्रहेमान यांना वयाच्या 17 व्या वर्षी  त्यांच्या वडिलांनी या चळवळीशी जोडलेले होते. 1988 ते 1991 दरम्यान जेव्हा अजीज मोहियोद्दीन एसआयओचे प्रदेशाध्यक्ष होते तेव्हा रिजवानुर्रहेमान यांच्यावर मुंबई विभागाच्या अध्यक्षपद आणि सोबत कार्यालयीन सचिव अशी दुहेरी जबाबदारी टाकण्यात आली होती. 
1991-1993 या काळात ते एसआयओचे विभागीय सचिव आणि 1993 ते 95 मध्ये एसआयओ महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष बनले. 1995 ते 97 या काळात त्यांनी एसआयओचे राष्ट्रीय  सचिव म्हणून कामकाज पाहिले. 2015 ते 2019 या काळामध्ये महाराष्ट्र जमाअते इस्लामीचे सहअध्यक्ष म्हणून त्यांनी प्रदेशाध्यक्ष तौफिक असलम खान यांच्याबरोबर मोलाची सेवा  बजावली. याच कालावधीत त्यांना जमाअते इस्लामीच्या सामाजिक विभागाचे सचिव म्हणूनही जबाबदारी देण्यात आलेली होती. त्यांनी स्वतःसोबत आपल्या परिवारातील अनेक  सदस्यांना मानवकल्याणासाठी वाहून घेतले आहे.

कठीण परिस्थितीवर मात..
आजारपण एक असा प्रकार आहे ज्यात माणूस एकदा अडकला की तो बाहेर निघणे फार कठीण असते. तो निघालातरी स्वतःला मर्यादित चौकटीत अडकवून तो तेवढेच काम करतो.   मात्र रिजवानुर्रहेमान खान एक असे व्यक्तिमत्व आहेत की ज्यांनी दुर्धर आजारावर मात करीत मोठे आव्हान पेलले आहे. त्यांच्या एका डोळ्याला कर्करोगाने ग्रासले होते. त्यामुळे त्यांना  तो डोळा काढून टाकावा लागला. त्यानंतर हृदय विकाराने त्यांची परीक्षा घेतली. यावेळी त्यांना हृदयाची शस्त्रक्रिया करावी लागली. या दोन्ही गंभीर आजारातून ते सुखरूपपणे बाहेर पडले.  त्यांच्या या कठीण जीवन क्रमामध्ये त्यांच्या सुविद्य पत्नी आणि मुलांचीही त्यांना मोलाची साथ लाभलेली आहे. नैतिकतेला प्राधान्य देणारी आणि मानवकल्याणाची हित समोर  ठेवलेल्या जमाअते इस्लामी हिंद महाराष्ट्रच्या अध्यक्षपदाची माळ त्यांच्या गळ्यात पडली. हे कठीण जबाबदारी त्यांनी स्वीकारली आहे. ईश्वर त्यांना या कामी पावलोपावली मदद करो,  त्यांना शक्ती देओ (आमीन) अशी प्रार्थना जमाअतच्या सर्व कार्यकर्त्यांतून होत आहे. अत्यंत मनमिळावू स्वभावाचे रिजवानुर्रहेमान हे संघटनेमध्ये अतिशय लोकप्रिय आहेत. त्यांना  कुरआनचे गाढे अभ्यासक म्हणून ओळखले जाते.
Labels:

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget