Halloween Costume ideas 2015

मानव समाजाचं ऋण फेडण्याचे कार्य कौतुकास्पद : आ. सुरेश भोळे

मौलाना आझाद आदर्श पुरस्काराने 51 मान्यवरांचा गौरव


जळगाव (शोधन सेवा) - आपण समाजाचं देणं लागतो. समाजासाठी जे चांगले काम करतात, त्यांचा सन्मान करणे म्हणजे त्यांना कामाची पावती देणे आहे. समाजाने तुमची दखल घेतल्याने तुमच्यावर असलेली जबाबदारी वाढली असून आणखी दुपटीने कार्य करायला हवे. मानव समाजाचं ऋण फेडण्याचे तुम्ही करीत असलेले कार्य कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार आ.सुरेश भोळे (राजुमामा) यांनी येथे काढले.
    जिल्ह्यातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या कर्तृत्ववान व्यक्तींचा नुकताच जळगाव येथील अल्पबचत भवन येथे मौलाना आझाद अल्पसंख्याक समाज विकास फाऊंडेशनतर्फे मौलाना आझाद आदर्श पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. 
    मंचावर प्रमुख अतिथी म्हणून आ.राजुमामा भोळे, जि.प.सदस्य पल्लवी देशमुख, सतिष देशमुख, सचिन सोमवंशी, पं.स.समिती उपसभापती कमलाकर पाटील, मजीद जकेरीया, फारुख शेख, शिवव्याख्याते संकेत पाटील, भावना शिरसेकर, फाऊंडेशनचे अध्यक्ष फिरोज शेख, क्रीडा शिक्षक प्रविण पाटील, सलीम इनामदार आदी उपस्थित होते.
    आ.भोळे यांनी पुढे बोलताना सांगितले की, कोणत्याही ठिकाणी शासन, प्रशासन कमी पडत असल्यास आपल्यासारखे लोक पुढाकार घेतात. परिवाराच्या सहकार्याशिवाय चांगले कार्य होवू शकत नाही. स्वत:साठी सर्वच जगतात, परंतु समाजासाठी जगणारे फार कमी असतात. चांगले कार्य करताना कोण काय म्हणेल याचा विचार करू नका, स्वत:च्या मनाचे समाधान करण्याचा प्रयत्न करा, असेही भोळे म्हणाले. शिवव्याख्याते संकेत पाटील यांनी, हिऱ्या, मोतींचे मोल केवळ जोहरीच करू शकतो. जे तुम्हाला पागल म्हणतात, त्यांना गर्वाने सांगा मी पागल आहे, हे कवितेच्या माध्यमातून पाटील यांनी पटवून दिले. तसेच समाजसेवेचा वेडेपना प्रत्येकाच्या मनाला भिडला तर जगात कुणीही दु:खी राहणार नाही, असे मतही त्यांनी मांडले. सूत्रसंचालन भावना चौधरी तर प्रास्ताविक प्रवीण पाटील यांनी केले. आभार फिरोज शेख यांनी मानले.
यावेळी सै. असलम सै. रसूल, चेतन रविंद्र वाणी, गिरीश मिलिंद नेहेते, बळीराम जंगलू दुलगज, प्रशांतराज सुपडू तायडे, सैय्यद अरशद मुमताज अली, किरण विठ्ठल पाटील, समीर रईस शेख, मिर्झा इकबाल बेग उस्मान बेग, समीर विष्णू घोडेस्वार, मिर्झा वसीम आफताब बेग, वैशाली चंद्रकांत पाटील, राजमोहम्मद खान शिकलगर, नुरुद्दीन गयासोद्दीन मुल्लाजी, ज्योती जगन्नाथ निंभोरे, पोलीस कर्मचारी अक्रम याकूब शेख, रेखा सुभाष पाटील, पूनम दिपक खैरनार, शुभांगी अनिल बिर्‍हाडे, वंदना भगवान पाटील, ज्ञानेश्वर हरचंद पाटील, राजेंद्र राजधर ठाकूर, जगदीश सुकदेव सपकाळे, चंद्रकांत शिवाजी कोळी, सविता राजेश बोरसे, सैतवाल विजय रामचंद्र, विलास पुरुषोत्तम नारखेडे, भावसार पितांबर नारायण, राहुल भागवत सुर्यवंशी, विद्या सुधाकर सोनार, भावना अतुल चौधरी, व्ही.आर.पाटील, महेंद्र ज्ञानदेव पाटील, भावना भगवान शिर्सेकर, योगेश सुपडू भालेराव, भारती रविंद्र काळे, पोलीस कर्मचारी बशीर गुलाब तडवी, प्रवीण हिरालाल धनगर, डॉ.श्रद्धा अमित माळी, स्वाती दामोदर पाटील, रुपाली शाम वाघ, प्रतीक्षा मनोज पाटील, उज्वला वर्मा, केतकी जितेंद्र गोहिल, अनिल वसंत वर्मा ,बुशरा शेख, संदीप पाटील यांचा सन्मान केला. तसेच स्व.विठ्ठल सदाशिव पाटील यांचा मरणोत्तर सन्मान करण्यात आला.
Labels:

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget