Halloween Costume ideas 2015

एक सकाळ कुष्ठरोगींच्या सानिध्यात

सकाळी 9 वाजण्यापूर्वीच रफीक भाईंचा फोन आला. आज नऊ वाजता एक ख्रिस्ती आश्रमात जायचा कार्यक्रम ठरला होता आणि त्यासाठी माझ्या घराखाली असलेल्या  इस्लामिक सेंटरमध्ये जमायचे ठरले होते. त्यांनी आणि अहमद भाईंनी अगोदर जाऊन कार्यक्रमाची परवानगी घेतली होती. जमाअत-ए-इस्लामी हिंद,मुंब्रा मधील 13 पुरूष आणि 6 स्त्रीयांवर आधारित टीम वेगवेगळ्या खाजगी वाहनांनी ’स्वर्गद्वार आश्रम’ परिसरात पोहोचलो. जवळपास 30 एकर जमिनीवर आधारित आश्रमाची स्थापना तीस वर्षे पूर्वी एका इटालियन भारतीय नागरिकाने केली होती. आज त्या आश्रमात तीन वेगवेगळ्या ख्रिस्ती संस्था स्वतंत्रपणे कार्यरत आहेत. त्यातील एक मुख्य संस्था कुष्ठरोग (ङशिीेीू) असलेल्यांसाठी इलाज, दूसरी रस्त्यावरील बेघर मुलांना (ीीींशशीं लहळश्रवीशप) आश्रय देणे आणि तिसरी एड्स ग्रस्त स्त्रीयांना आणि वृद्ध स्त्रीयांसाठी जोतीज् केअर सेंटर नावाने वृद्धाश्रम चालवत आहेत. स्वर्गद्वाराच्या गेटवर पोहचल्यावर स्त्रीयांची गाडी दुसरीकडे मागच्या बाजूला असलेल्या जोतीज् केअर सेंटरच्या प्रवेशद्वाराकडे पाठवून आम्ही सर्व  पुरूष आणि मुलांच्या आश्रमात पोहोचलो. गेटमध्ये दाखल झाल्यावरच समोर डावीकडे एक मजली लहान इमारत होती. तिच्या तळ मजल्यावर दर बुधवार आणि शनीवारी डाक्टर्सची टीम आल्यावर पेशंटची चाचणी  व औषधपाणी देण्याची जागा होती. तिच्या जवळच पुढे दुसरी एक इमारत होती ज्यामध्ये ऑफीस आणि ग्रंथालय होते. समोर जेवणाचे हॉल होते आणि त्याच्यासमोर उजवीकडे एक छोटे से कौलारू घर होते जे सर्व धर्माच्या प्रार्थनेसाठी निश्चित केलेले आहे. त्याच्या भिंतीवर बायबल मधील काही विशिष्ट श्लोक लिहिलेले होते. झाडांनी झाकलेल्या परिसरात अनेक लोक वेगवेगळी कामे करीत होते. आम्हाला बघताच दोन नन पुढे आल्या आणि स्वागत करुन मग एक भिंत नसलेल्या हॉलमध्ये घेऊन गेल्या. त्यामध्ये दोन्हीकडे जेवणाचे टेबल आणि खुर्च्या लावलेल्या होत्या आणि समोर किचन होते. किचनमधून जेवण बाहेर देण्यासाठी एक खिडकी होती. वरच्या बाजूला लिहले होते की ’जो काम करना नहीं चाहता उसे भोजन नहीं दिया जाये.’ जो काम करने के बिना भोजन खाता है, वह चोर है.’ जो शारीरिक काम कभी नहीं करता वह परजीवी है ’ या विधानांसाठी बायबलचा हवाला दिला गेला होता. शेजारी एका कोपर्यात जाड लोखंडी छोटासा दरवाजा होता ज्यामध्ये टी.वी.लावलेला होता. संध्याकाळी 6 नंतर याच हॉलचा वापर टी.व्ही.पाहण्यासाठी पण केला जातो. आम्हाला घेऊन आलेल्या नन हॉलमध्ये आमच्या जवळच गप्पा मारत बसल्या. मुळात आंध्रप्रदेशमधील राहणार्या त्या दोन्ही नन मागील आठ वर्षांपासून त्या आश्रमात सेवा देत आहेत.विचारल्यावर त्यांनी सांगितले की दोन वर्षानंतर दहा बारा दिवस गावी जाऊन भेटून येतात. बाकी पूर्ण जीवन येशूच्या प्रेमासाठी लोकांच्या सेवेत लावले आहे. थोड्या वेळानं आश्रमातील मुख्य फादर आले. रफिक भाईंनी आम्हा दोघांची एकमेकांशी ओळख करुन दिली. त्यांच्याशी गप्पा मारुन झाल्यावर आम्ही त्यांच्या सोबत त्या सर्वधर्म प्रार्थना घराकडे गेलो. खाली वाकून डोके सांभाळत आखूड दरवाजाने त्या सर्वधर्म प्रार्थना गृहात शिरल्यावर मधील कॉलमवर नजर गेली.तेथे वेगवेगळ्या धर्माचे चिन्ह दिसले.एकीकडे  काही धर्मग्रंथ ठेवलेले आणि भिंतीवर वेगवेगळ्या धर्माची प्रार्थना ज्या दिवशी केली जाते त्याचे वेळापत्रक तर दुसरीकडे ज्याने त्या आश्रमची स्थापना केली त्या इटालियन भारतीयाचा व त्याच्या सोबत अनेक वर्ष सहकार्य करणार्या एका वृद्ध ननचा फोटो लावलेला होता. परत फिरतांना दरवाजाच्या शेजारच्या भिंतीवर 14 नावे आणि पुढे ईसवी सन लिहिलेले दिसले. विचारले ही कोणाची नावे आहेत? फादर यांनी सांगितले की जे लोक इथे मरण पावले ही त्यांची नावे आहेत. त्यांच्या दैनंदिन शेड्यूल्डमध्ये त्यांनी आमच्यासाठी अॅडजेस्ट केलेली कार्यक्रमाची वेळ होताच घंटा वाजवायला एकाने सुरूवात केली. सर्वजण आपआपले काम सोडून हॉलमध्ये जमा झाले. आम्ही पण त्या मल्टीपर्पज जेवणाच्या हालमध्ये पोहचलो. आमच्या पाठोपाठ काहीजण जे लहान निराधार मुलांसोबत गप्पा मारत परिसरातील म्हशी, गाय, बकरे, कोंबडी पालन पाहण्यासाठी गेले होते तेही पोहोचले.
         यावेळी आश्रमातील हॉलमध्ये उपस्थित 53 पुरूष आणि मुलांच्या जमावांना संबोधून रफीक भाईंनी हातात माईक घेऊन कार्यक्रमाविषयी बोलायला सुरूवात केली आणि फादर व मला आपआपल्या खुर्चीवर येवून बसण्याचे आमंत्रण दिले. ईद -उल-अजहाच्या निमीत्ताने आयोजित केल्या जाणार्या आजच्या कार्यक्रमात खरेतर प्रोफेसर जावेद शेख यांना ’कुर्बानी’ या विषयावर आपले विचार मांडायचे होते.पण काही कारणात्व ते हजर राहू शकले नाही आणि ही जबाबदारी माझ्यावर (सैफ आसरे) आली.
    मुसलमान ’कुर्बानी’ का करतात आणि धार्मिक दृष्टिकोनातून आजारपण काय आहे? आणि आजारी झाले तर काय केले पाहिजे? या विषयावर आपले विचार मांडले.
    हा कार्यक्रम संपल्यावर त्यांची जेवणाची वेळ होण्यास 40 मिनिटे उरली होती. या वेळेत मग एकमेकांचा परिचय आणि विचारपूस करून घेण्याचा कार्यक्रम सुरू झाला. एका मुलाला विचारले तुझे कोणी आहेत का? त्याने सांगितले माझे कोणीच नाहिये. मला रस्त्यावरून यांनी येथे आणले आणि आता मी येथेच राहात आहे. हेच माझे आई-वडील आणि हेच माझे नातेवाईक.दुसर्याने सांगितले मला माझी आई येथे सोडून गेली त्यानंतर तीचा मृत्यू झाला म्हणतात. तिसरा म्हणाला माझे आई-वडील तर नाहीत पण नातेवाईक आहेत.मी कधी कधी त्यांना भेटायला जातो. ते आनंदाने आपले खेळायची जागा दाखवत होते. जवळच शाळा आहे तेथे ते शिकण्यासाठी जातात.फादरने सांगितले की आमच्या येथील मुलांना कोणीच आपल्या शाळेत घेत नव्हते. ज्या शाळेत ही मुले जातात ती बनवण्यासाठी आमच्या आश्रमाच्या मुख्य फाऊंडरने 70 % खर्च दिला आणि ही कंडीशन लावली की आमच्या मुलांना मोफत शिकवले जाईल.
    यानंतर काही पुरूषांशी गप्पा मारायला सुरू केली.एका पुरूषाचे हात कुष्ठरोगामुळे वाकडे झालेले होते. त्याने सांगितले की तो तिथे गेली अठरा वर्षे राहात आहे. कोळी होता आणि समुद्रात मच्छी पकडण्यासाठी खूप आतपर्यंत जात असे, त्याने आपल्या मासेमारी शौर्याच्या काही गाथा ऐकवल्या.त्यानंतर म्हणाला की एक दिवस माझ्या पायात जखम झाली आणि मग ती पुढे वाढतच गेली आणि मी आज या परिस्थितीत आहे. येथे माझा ईलाज होत आहे. दुसर्याने सांगितले की तो बरा होऊन घरी गेला होता. त्याला पुन्हा हा आजार सुरू झाला म्हणून परत आला आहे. म्हणतात ना की,’जिंदगी है तो कहानी भी होगी’.
    प्रत्येकाच्या जीवनाची कथा तर असतेच पण त्यामध्ये काहीतरी वेगळेपणा असतो. इथे राहणार्यांच्या कथेची सुरूवात वेगवेगळी असली तरी शेवटी मध्यांतरानंतरची कथा सारखीच होती. आश्रमात आल्यावर शेड्यूल्ड प्रमाणे उठणे,बसणे,जेवणे आणि काहीतरी कष्ट करणे. त्यांच्या कष्टाचा मोबदला पण त्यांना दिला जातो, असे सांगितले. जीवंत लोकांच्या आत्मकथा ऐकतच होतो आणि जेवणाची घंटा वाजली. सर्व मिळून जेवणासाठी पुन्हा हॉलमध्ये एकत्र झालो. यावेळी नन म्हणाल्या की बसण्यापूर्वी प्रथम प्रार्थना होणार. आम्ही सर्व उभेच होतो.शांतता होताच एकजण प्रार्थनाचे शब्द बोलू लागला आणि त्याच्या सर्व तेच शब्द जोरात उच्चारु लागले. खुदा तेरा शुक्रिया, खुदा तेरा शुक्रिया, खुदा तेरा शुक्रिया
    मनात आलं जेवायच्या पूर्वीच शुक्रिया कसे काय? कारण अंतिम पैगंबर सल्ल. यांनी मुस्लिमांना शिकवलेली पद्धत ही आहे की, जेवायला सुरू करण्यापूर्वी, अल्लाहच्या नावाने सुरू करीत आहे जो अत्यंत दयाळू आणि कृपाळू आहे ही प्रार्थना करून  जेवण सुरू करायचे आणि जेवण झाल्यावर,अल्लाहच प्रशंसनीय आहे, ज्याने जेवण आणि प्यायला पाणी दिले,आणि आम्हांला मुसलमान (आपला आज्ञाधारक) बनवलेही  प्रार्थना म्हणून आभार मागायला शिकवले आहे. असो.... अल्लाहचे आभार खायच्या पूर्वी की नंतर, पण मानायचे ही कॉमन गोष्ट सगळीकडेच दिसून येते.  मुंब्रा शहरातच काल आम्ही जेवणाची 100 पाकिटे आणि गुलाब जामुन आर्डर करून 11:00 ला आश्रमात पोहचवण्याची सप्लायरला सूचना दिली होती. त्याने वेळेवर पोहचल्यावर स्त्रीयांसाठी त्यांच्या आश्रमात 35 पाकिटे पाठविली गेली आणि आम्ही उरलेल्या पाकिटांमध्ये आम्ही सर्वांनी जमजम पुलावचा स्वाद घेतला. जेवण आटोपून थोड्या वेळाने आम्ही निघू लागलो तेव्हा आश्रमातील मुख्य फादरने आम्हाला आनंदीत होऊन गळभेट दिली आणि म्हणाले येत जा. तुम्ही आलात त्यामुळे खरच आम्हाला फार छान वाटले. नन आणि सर्व हजर पुरूष व मुलांनी पण -(उर्वरित आतील पान 7 वर)
पुन्हा यायची विनंती केली. रफीक भाईंनी स्त्रीयांच्या आश्रमातील  आमच्या संस्थेच्या स्त्रीयांशी संपर्क करून सांगितले की गाडी पाठवीत आहे. त्यामध्ये बसून बाहेर मेन रोडवर या. त्यांनी सांगितले की तुम्हा सर्वांना येथील स्त्रियांच्या आश्रमातील फादर आणि नन इत्यादींनी भेटायला बोलाविले आहे. आम्ही पुरूषांच्या आश्रमाच्या गेटमधून बाहेर पडून थोड्याच वेळात पाठीमागे त्यांच्या गेटवर पोहचलो. फादर आणि नन बाहेरच वाट पाहात होते. गाडी गेटवर पोहचल्यावर एक ननने गेट उघडले आणि पार्क झाल्यावर गाडीतून उतरून आम्ही त्या आश्रमातील फादर आणि दोन्ही नन यांना भेटलो. त्यांच्याशी थोडावेळ चर्चा केली. त्यांनाही आमच्या मशीदीला भेट देण्याचे आमंत्रण देऊन घराकडे यायला निघालो. रस्त्यातच दुपारच्या जोहर या नमाजची वेळ झाली होती. एक मशीदीजवळ गाडी उभी करून नमाज अदा केली. आणि अल्लाहचे आभार मानले.
    कानामध्ये सतत त्या फादरचे शब्द ऐकू येत होते. तुम्ही कुर्बानी विषयी जे सांगितले ते मला प्रथमच माहीत झाले. मी तर समजत होतो की मुसलमान मांस खाण्यासाठी कुर्बानी करतात. कुर्बानी ही पैगंबर अब्राहमच्या महान जीवानातील अनेक टप्प्यावर केलेल्या त्याग आणि बलिदानासाठी केली जाते हे माझ्यासाठी आश्चर्यकारक आहे. यासाठी तर मग ख्रिस्ती आणि ज्यू लोकांनी काय जगातील सर्वांनी मुसलमानांसोबत त्यादिवशी कुर्बानी केली पाहिजे. अब्राहम तर सर्वांसाठी आदर्श आहेत. ईश्वराशी प्रेम कसे असावे हे तर मानवाने अब्राहमकडून शिकावे. मनाने स्वतःलाच प्रश्न केला, किती गरज आहे लोकांपर्यत सत्यधर्माची शिकवण पोहचविण्याची?
    अल्लाह आणि त्याचा पैगंबर येशूला मानणारा एक ख्रिस्ती फादर, त्यांच्या प्रेमापोटी जन्मभर लग्न ,संसार सर्वकाही आनंद सोडून लोकांच्या सेवेत आपले जीवन खर्च करणारे लोक पण इस्लाम विषयी इतके अज्ञानी असू शकतात? मशिदीत बसल्या बसल्याच पुन्हा स्वतःच नकळत कपाळ जमीनीवर पोहचले. त्या अल्लाहशी  स्वतःसाठी,आपल्या सोबतींसाठी आणि आश्रमातील सर्वांसाठी प्रार्थना केली.अल्लाह तूच फक्त महान आहेस. आम्हा सर्वांना तुझ्याकडे येण्याचा सत्यमार्ग दाखव, त्यावर चालायची शक्ती दे, सर्वांना चांगले स्वास्थ दे. जे आजारी आहेत त्यांना त्या आजारपणाच्या परीक्षेतून बाहेर काढ. त्यांचे हे जीवन पण सुखरूप कर आणि अनंत जीवन पण... तुझ्याशिवाय कोणात हे सामर्थ्य नाही...( आमीन.)
 

- सैफ आसरे, मुंब्रा
70451087045
Labels:

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget