Halloween Costume ideas 2015

अल्बकरा : ईशवाणी(सुबोध कुरआन)

(२६०) आणि तो प्रसंगदेखील नजरेसमोर असू द्या जेव्हा इब्राहीम (अ.) यांनी सांगितले होते, ‘‘माझ्या पालनकत्र्या! मला दाखव की तू मृतांना कशाप्रकारे जिवंत करतोस.’’ फर्माविले, ‘‘काय तुझी यावर श्रद्धा नाही?’’ त्याने सांगितले, ‘‘श्रद्धा तर आहेच परंतु मनाचे समाधान इच्छितो.’’२९६ फर्माविले, ‘‘बरे तर चार पक्षी घे आणि त्यांना आपल्याशी माणसाळून टाक. नंतर त्यांचा एकएक तुकडा तू एकाएका पर्वतावर ठेवून दे. नंतर त्यांना हांक दे. ते तुझ्याकडे धावत येतील. चांगले समजून घे की अल्लाह अत्यंत सामथ्र्यवान आणि बुद्धिमान आहे.’’२९७
(२६१) जे लोक२९८ आपला माल अल्लाहच्या मार्गात खर्च करतात,२९९

२९६) म्हणजे तो आत्मविश्वास व आत्मसमाधान जो डोळयाने पाहिल्यानंतर प्राप्त होतो.
२९७) ही घटना आणि वरील घटनांचे काही लोकांनी विचित्र अर्थ काढले आहेत. परंतु पैगंबरांच्या सोबत अल्लाहचा जो मामला आहे, त्याला जर चांगल्या प्रकारे ग्रहण केले तर ओढातान करून अर्थ काढण्याची वेळ येणार नाही. मुस्लिमांना या जीवनात जी सेवा करावयाची आहे; त्याच्यासाठी केवळ परोक्षवर ईमान (श्रद्धा) ठेवणे आणि न पाहता मानणे पुरेशे आहे. परंतु पैगंबरांद्वारा जी सेवा अल्लाह घेऊ इच्छित होता, त्यासाठी हे आवश्यक होते की सत्याला त्यांनी आपल्या डोळयांनी पाहावे. म्हणजे जगाला या सत्याकडे येण्याचे आमंत्रण व आवाहन त्यांनी जोमाने करावे. त्यांना जगाला पूर्ण आवेशाने आणि आत्मविश्वासपूर्ण सांगावयाचे होते की तुम्ही लोक तर कल्पनाविलासात राहाता. परंतु आम्ही प्रत्यक्ष डोळयांनी पाहिलेले सत्य तुमच्यापुढे ठेवत आहोत. तुमच्याकडे गुमान (कल्पना) आहे तर आमच्याकडे प्रत्यक्ष ज्ञान आहे. तुम्ही आंधळे आहात तर आम्ही डोळे (दृषी) राखणारे आहोत, याचमुळे पैगंबरांच्या समोर ईशदूत आपल्या असली स्वरुपात प्रकट होत असत. त्यांना आकाश व जमिनीच्या शासन व्‌यवस्थेंचे अवलोकन करविण्यात आले. पैगंबरांना स्वर्ग (जन्नत)आणि नरक (जहन्नम) त्यांच्या डोळयांसमोर दाखविण्यात आले आणि मेल्यानंतर पुनर्जवित करण्याचे दृष्‌य त्यांना प्रत्यक्ष दाखविण्यात आले. परोक्षावर ईमान आणण्याच्या या टप्प्याचे हे सद्‌गृहस्थ पैगंबर नियुक्ती अगोदरच अनुभव घेत होते. पैगंबर नियुक्तीनंतर त्यांना प्रत्यक्ष डोळयांनी पाहिलेल्या साक्षीवर ईमानची देणगी दिली जात आणि ही देणगी त्यांच्याचसाठी विशेष होती. (तपशीलासाठी पाहा, अध्याय 11, तळ टीप क्र. 17, 18, 19 व 34)
२९८) वार्ताक्रम आता त्याच विषयाकडे वळला आहे जो आयत क्रं. 244 मध्ये सुरु झाला होता. या व्याख्यानाच्या प्रारंभी ईमानधारकांना आवाहन केले होते की ज्‌या महान ध्येय पूर्तसाठी तुम्ही ईमान राखले आहे, त्याच्यासाठी तन मन धन अर्पण करा. परंतु एखादा जनसमुदाय जोपर्यंत त्याचा आर्थिक दृषिकोन पूर्णबदलत नाही तोपर्यंत स्वत:चा स्वार्थ आणि राष्ट्रीय स्वार्थापासून वर उठून एका महान नैतिक उद्देशासाठी तन मन धन अर्पण करण्यास तयार होऊ शकत नाही. भौतिकवादी जे एक पैशासाठी जीव देतात व पैसे कमविण्यासाठीच जगतात, अशांची नजर नेहमी नफा आणि तोट्याच्या तराजूकडे लागलेली असते. अशी मंडळी कधीही महान नैतिक उद्देशप्राप्तीसाठी पैसे खर्च करणार नाहीत. प्रत्यक्षात काही नैतिक उद्देशांसाठी त्यांनी खर्च केला तरी प्रथम आपल्या स्वत:च्या फायद्याचा, आपल्या कुटुंबाच्या किंवा समाजाच्या फायद्याचा हिशेब लावतात. या मनोवृत्तीसह मनुष्‌य इस्लामी जीवनमार्गावर एक पाऊलसुद्धा पुढे टाकू शकत नाही. या जीवनव्‌यवस्थेची (दीन) मागणीच मुळात ही आहे, की भौतिक लाभ आणि हानिपलीकडे विचार करून केवळ अल्लाहचे वचन प्रभुत्वशाली बनविण्यासाठी आपले सामथ्र्य, आपला वेळ आणि आपली संपत्ती खर्च करा. या मार्गावर चालण्यासाठी तर विशेष नैतिक गुणांची आवश्यकता आहे. यासाठी दृषिकोनाची व्यापकता, धैर्यशीलता, हृदयाची विशालता आणि सर्वात महत्वाचे म्हणजे ईशप्रसन्नतेची ज्वाला मनात धगधगणे आवश्यक आहे. सामुदायिक जीवनातील व्‌यवस्थेत असे परिवर्तन आवश्यक आहे, की लोकांच्या मनात भौतिकवादी नैतिकतेऐवजी हे नैतिक गुण वृद्धिंगंत व्‌हावेत. म्हणून येथून सतत तीन (रूकूअ) प्रभागापर्यंत (आयत क्र. 261 ते 281 पर्यंत) याच मानसिकतेला घडविण्यासाठी निर्देश आलेले आहेत.
२९९) संपत्ती खर्च करणे आपल्या स्वत:च्या गरजा भागविण्यासाठी असेनात की आपल्या मुलांबाळांसाठी, नातेवाईकांसाठी किंवा दीनदुबळयांसाठी खर्च करणे असेल. तसेच जनहित कार्यात किंवा धर्म प्रचार प्रसार कार्यात संपत्ती खर्च करणे असेल. अथक परिश्रमाद्वारा उद्देश प्राप्ती ईशमार्गदर्शनानुसार आणि अल्लाहची प्रसन्नता प्राप्तीसाठी असेल तरच हे सर्व प्रयत्न व खर्च अल्लाहच्या मार्गातील असेल.

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget