Halloween Costume ideas 2015

मुस्लिम बंधुत्वाची नाळ जगातील मानवतेशी

    देशातील सामाजिक वीण उसविण्यासाठी भाजपने अनेक वाचाळविरांना मोकळे रान करून दिले आहे की काय अशी शंका येऊ लागली आहे. धार्मिक अस्थैर्य माजवून मते गोळा करण्याचा डाव यातून स्पष्ट होतो. दलबदलू नेते खासदार सुब्रम्हण्यम स्वामी त्या वाचाळविरांपैकी एक आहेत. नुकतेच एका कार्यक्रमात त्यांनी अशीच मुक्ताफळे उधळली. ते म्हणाले, ‘‘देशातील हिंदू-मुस्लिम यांचा जी एन ए एकच आहे. याचा अर्थ त्यांचे पूर्वजही एकच आहेत. त्यावरून येथील हिंदू लोकच बळजबरीने विंâवा स्वखुशीने मुस्लिम झाले. हिंदुस्थानातील मातीशी मुस्लिमांचा थेट संबंध आहे. आपण हिंदू विंâवा हिंदूंचे वंशज असल्याचे मान्य केल्यास मुस्लिमांना कुटुंबात स्थान देऊ.’’ स्वामींना वाटते की येथील मुस्लिमांना स्वत:ला धार्मिक नव्हे भौगोलिकदृष्ट्या हिंदू म्हणावे. ही अडचण व चिंता संघ व संघाशी संबंधित सर्व हिंदुत्ववादी संघटनांना आहे. हळूहळू हा मार्ग हिंदू राष्ट्राच्या व राष्ट्रवादाच्या दिशेला जातो. त्याला सर्वांत मोठा खोळंबा मुस्लिमांचा आहे. संविधानानुसार देशातील सर्व मुस्लिम भारतीय आहेत व भारतीयत्वाचे सर्व हक्काधिकार त्यांना आहेत. इथल्या मुस्लिमांनी स्वत:ला हिंदू म्हणवून घेण्याऐवजी मुघलांचे, तुर्कीचे, अरबांचे वा अफगाणी लोकांचे वंशज म्हटले तरीही त्यात काही फरक पडत नाही. त्यांची भारतीयता संविधानानुसार नष्ट होत नाही, तर मग स्वामींची ही पोटदुखी कशाला? मुस्लिमांना कुणाच्या वंशाची व जातीची चिंता नाही तर चिंता आहे केवळ त्यांच्या धर्माची व धर्मबांधवांची. भारतातील सर्व लोक समाधानाने गुण्यागोविंदाने कसे नांदतील याची. पवित्र कुरआनच्या वचनानुसार मुस्लिमांचा संघर्ष त्यांच्या शत्रूंशी व इस्लामदुष्मनांशी कयामतपर्यंत चालू राहील. मुस्लिमांनी तर साडेचौदाशे वर्षांपासूनच त्यासाठी वंâबर कसून ठेवली आहे. देशात मुस्लिमांचे कुटुंब १५-२० कोटींचे आहे, ज्यात स्वामींच्या कुटुंबाची गरज कशाला? आणि ते कुटुंब ज्यात मूर्तिपूजा, बहुदेववाद, कुप्रâ आणि शिर्वâ आहे, हलाल व हरामचे पथ्य नाही. स्वामींच्या कुटुंबात जाणे म्हणजे अकिदा भस्म करून नरकात जाण्यासारखेच नाही काय?
‘‘उम्मतच्या उद्यानात जन्माला यायलासुद्धा नशीब लागते
अन्यथा आपणही वन्यजीवाची संपदा झालो असतो,
म्हणूनच स्वत:ला सत्यापुढे संपूर्णत: समर्पित करून टाकले
अन्यथा जालीम बेईमानाच्या हाती केव्हाच मलीदा झालो असतो.’’ (कौम)
- निसार मोमीन, पुणे.
Labels:

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget