Halloween Costume ideas 2015
November 2017

-एम.आय.शेख

जेव्हा बुद्धीजीवी माणसे या ब्रह्मांडाच्या रचनेवर विचार करतात तेव्हा त्यांच्या लक्षात येते की, ही रचना अतिशय चिकित्सीय पद्धतीने केलेली आहे आणि ही गोष्ट चिकित्सक बुद्धीला पटत नाही की, ज्या अल्लाहने मानवाला बुद्धी देऊन वैचारिक शक्ती दिली, त्या बुद्धीचा वापर करून चांगला किंवा वाईट मार्ग निवडण्याची शक्ती दिली, त्याला तमीज (शिष्टाचार) ने वागण्याची उर्मी दिली, त्याने त्या सगळ्या शक्तींचा वापर कसा केला? यासंबंधी त्याला विचारपूसही केली जाणार नाही.
त्याला पुण्य केल्यावर पुरस्कार व पाप केल्यावर शिक्षा दिली जाणार नाही, हे कसे शक्य आहे? ब्रह्मांडाच्या रचनेवर अशा प्रकारे जे विचार करतात त्यांचा आखिरतवर विश्वास बसतो व ते अल्लाहने तजवीज (प्रस्तावित) केलेल्या शिक्षेपासून स्वतःला वाचविण्याचा प्रयत्न करतात.” (अर्थात आपल्या जीवनात चांगुलपणा आणण्याचा प्रयत्न करतात.) (संदर्भ : सय्यद अबुल आला मौदुदी, तफहिमल कुरआन खंड-१, पान क्र. ३११).
        वरील विचार बुद्धीजीवी माणसांना पटल्याशिवाय राहत नाहीत. म्हणून या संबंधी विस्तृतपणे विचार करणे अप्रस्तुत होणार नाही. पृथ्वीवर माणसाचे आगमन झाल्यापासूनच तो निसर्गातील अनेक शक्तींचा वापर करत आलेला आहे. हा वापर त्याने अतिशय विचारपूर्वक केलेला आहे. त्यातूनच त्याला धर्माची गरज भासू लागली. पृथ्वीवर अवतरित झालेल्या पहिल्या जोडप्याच्या शुद्ध एकेश्वरवादाच्या धार्मिक संकल्पना या कालौघात मागे पडल्या व जसजसा मानववंश वाढत गेला तसतसे नवे धर्म उदयास आले.
    सहाव्या शतकात प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनी पृथ्वीवर अवतरित झालेल्या पहिल्या जोडप्याच्या मूळ धर्माची म्हणजेच इस्लामची पुर्नस्थापना केली. कालौघात विकृत झालेल्या धार्मिक विचारांची शुद्ध स्वरूपात पुनर्मांडणी केली. ही मांडणी कुरआन या ग्रंथावर आधारित होती. कुरआन हा ईश्वरी ग्रंथ आहे, म्हणूनच त्यात एका शब्दाचा तर सोडा, काना मात्राचाही बदल करता येत नाही, हा ईश्वरीय ग्रंथ असल्यामुळे सर्व प्रकारच्या त्रुटींपासून तो मुक्त आहे, असा मुस्लिमांचा ठाम विश्वास व दावा आहे. मात्र यासंबंधी चर्चा जास्त व समज कमी आहे, ही वस्तुस्थिती आहे. म्हणूनच या आठवड्यात आपण कुरआन हा खरोखरच ईश्वरीय ग्रंथ आहे का? याचा वैज्ञानिक पद्धतीने आढावा घेऊया. कारण ज्या क्षणी माणसाच्या बुद्धीला पटेल की हा खरोखरच ईश्वरीय 
 ग्रंथ आहे, त्या क्षणापासून या ग्रंथाकडे पाहण्याचा माणसाचा दृष्टीकोणच बदलून जाईल.
    आज जागतिक पातळीवर अनेक धर्म अस्तित्वात आहेत. प्रत्येक धर्मात जन्माला येणाऱ्या प्रत्येक माणसाला आपला धर्म प्रिय असतो. म्हणून तो वैज्ञानिक कसोटीवर आपल्या धर्माच्या पुस्तकांना कसू इच्छित नाही. अनेक अंधश्रद्धांचे पालन कुठल्याही पुराव्याशिवाय धर्मकार्य समजून केले जाते. धर्मचिकित्सा महाकठीण कार्य आहे. या बाबतीत लोक इतके संवेदनशील असतात की प्रसंगी सर्वोच्च न्यायालयाचे सुद्धा ऐकत नाहीत. मात्र इस्लामचे तसे नाही. हा धर्म इतर धर्मापेक्षा वेगळा आहे. तो तर्काच्याच नव्हे तर विज्ञानाच्या कसोटीवर सुद्धा खरा उतरतो. पुराव्याची भाषा बोलतो. हा धर्म ज्या कुरआनवर आधारित आहे तो ईश्वरीय ग्रंथ आहे. याचे ९ वैज्ञानिक दाखले मी आज वाचकांच्या प्रज्ञेच्या कोर्टापुढे मांडणार आहे.
पुरावा क्रमांक - १
    “काय ते लोक ज्यांनी (प्रेषिताचे म्हणणे ऐकण्यास) नकार दिला आहे, विचार करीत नाही की हे सर्व आकाश व पृथ्वी परस्पर एकसंघ होते, नंतर आम्ही त्यांना विभक्त केले, आणि पाण्यापासून प्रत्येक सजीव निर्माण केला? काय ते (आमच्या या निर्मितीस) मानत नाहीत?” (संदर्भ : कुरआन - सुरह अल्अंबिया- आयत क्रमांक ३०)
    या आयातीमध्ये दिले गेलेले जबरदस्त आव्हान पाहा! यात मानवजातीला विचार करण्यास प्रोत्साहित केलेले आहे. यात दोन वैज्ञानिक सत्य मांडलेली आहेत. जी सहाव्या शतकात जेव्हा कुरआन अवतरीत झाले तेव्हा सभ्य जगाला माहित नव्हती. एक - आकाश व पृथ्वी एकसंघ होते व नंतर ते विभक्त झाले. हीच गोष्ट अगदी अलिकडे बिग बँग थेअरीच्या स्वरूपात जगाला कळाली. शिवाय माकडापासून मनुष्याची उत्पत्ती झाली असे मानणाऱ्या जगाला सहाव्या शतकात कुरआनने असे सांगितले की, अल्लाहने प्रत्येक जीवाची निर्मिती पाण्यापासून केली. आपण सर्व जाणून आहात जीवनाचे मूळ पाण्यात आहे. पाण्यापासून सुरूवातीला पेशी तयार होतात व पेशीच्या समुच्चयातून जीव तयार होतात. पण १४३९ वर्षापूर्वी हे सत्य कोणालाच माहित नव्हते. कुरआन ईश्वरीय ग्रंथ असल्याचा हा पहिला पुरावा आहे. जगामध्ये विज्ञानाला जी गोष्ट अलिकडच्या शतकात कळाली ती कुरआनने सहाव्या शतकात वर नमूद आयातीमध्ये सांगितलेली आहे.
पुरावा क्रमांक - २
    “आम्ही आपल्या प्रेषितांना अगदी स्पष्ट संकेतचिन्हे व सूचनेसहीत पाठविले, आणि त्यांच्याबरोबर ग्रंथ आणि तुळा उतरविली जेणेकरून लोकांनी न्यायाधिष्ठित व्हावे, आणि लोखंड उतरविले ज्यात मोठे बळ आहे आणि लोकांसाठी फायदे आहेत, हे अशासाठी केले गेले आहे की अल्लाहला माहीत व्हावे की कोण न पाहता त्याला व त्याच्या पैगंबरांना मदत करतो. निश्‍चितच अल्लाह मोठा बलवान आणि जबरदस्त आहे.” (कुरआन : सुरे अल्हदीद आयत नं. २५)
    मागील सहा हजार वर्षांपासून मानव लोखंडाचा वापर करत आहे. बॅबीलोन, इजिप्त, चीन, भारत, युनान आणि रोमन संस्कृतीमध्ये लोखंडाचा वेगवेगळ्या स्वरूपात वापर केला जातो. मात्र प्रत्येकजण हे समजत होता की, लोखंड पृथ्वीच्या गर्भात तयार होते. आजही अनेक लोकांचा हाच गैरसमज आहे. मात्र १८ व्या शतकात जापानच्या वैज्ञानिकांनी सर्वप्रथम असा दावा केला की, लोखंड हे पृथ्वीच्या गर्भात निर्माण होत नसून ते आकाशातून उल्कापिंडाच्या स्वरूपात पृथ्वीवर पडतो आणि शेकडो वर्ष मातीत दबून राहिल्यानंतर त्याचे रूपांतर लोखंडात होते. या संदर्भात कोणाला शंका वाटत असेल तर लोखंडाच्या निर्मिती संबंधीच्या वैज्ञानिक पुस्तकांचे त्यांनी अवलोकन करावे. या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की, लोखंड हे आकाशातून आम्ही पृथ्वीवर उतरविले, असा दावा कुरआनने सहाव्या शतकात कसा काय केला? याचाच अर्थ हा ग्रंथ ईश्वरीय ग्रंथ आहे.
पुरावा क्रमांक - ३
    “काय ही वस्तूस्थिती नाही की आम्ही पृथ्वीला बिछाना बनविले, आणि पर्वतांना मेखांसमान रोवले” (कुरआन : सुरह अन्नबा - आयत नं. ६ आणि ७)
    आपण सर्व जाणून आहोत की पृथ्वी गोल आहे. परंतु प्रत्यक्ष डोळ्याने पाहत आहोत की ती आपल्यासाठी बिछान्या (अंथरूणा) सारखी सपाट आणि सरळ आहे. पृथ्वीवर उंच-उंच दिसणारे पर्वत वास्तविक पाहता मेख रोविल्यासारखे पृथ्वीच्या आत खोलवर रोवलेले आहेत. केवळ दगड-मातीचा ढिगारा पृथ्वीवर ठेवलेला आहे, अशी त्यांची रचना नाही. या संदर्भात फ्रँक प्रेस नावाच्या भूगर्भ वैज्ञानिकाने ‘अर्थ’ नावाच्या आपल्या पुस्तकात हा दावा केलेला आहे की, डोंगर हे पृथ्वीमध्ये खोल मेकीसारखे रोवलेले आहेत. संशोधनाअंती त्याने हिमालयाबद्दल म्हटलेले आहे की, हिमालयाची उंची पृथ्वीपासून वर जवळ-जवळ ९ किलोमीटर आहे. मात्र हिमालयाचा पाया जमीनीमध्ये १२५ किलोमीटर खोल आहे. हा सुद्धा आधुनिक वैज्ञानिक शोध आहे. मग ही बाब सहाव्या शतकात कुरआनमध्ये कशी आली? स्पष्ट आहे हा ईश्वरीय ग्रंथ आहे.
पुरावा क्रमांक - ४
    “आकाशाला आम्ही स्वबळाने बनविले आहे आणि आम्ही याचे सामर्थ्य बाळगतो.” (संदर्भ : कुरआन - सुरह अ़ज़्जरियात आयत नं.४७)
    प्रसिद्ध भौतिकशास्त्रज्ञ स्टीफन हॉकींग यांनी आपले पुस्तक ’ए ब्रिफ हिस्ट्री ऑफ टाईम’ मध्ये लिहिलेले आहे की, युनिव्हर्स (ब्रह्मांड) हे असिमीत आहे व त्याच्यामध्ये सातत्याने वाढ होत असते. हा ग्रंथ विसाव्या शतकात आलेला आहे. मात्र कुरआनमध्ये अल्लाहने ब्रह्मांड स्वसामर्थ्याने बनविण्याचा दावा सहाव्या शतकात केलेला आहे. अर्थात जी गोष्ट जगाला विसाव्या शतकात कळाली ती कुरआनमध्ये सहाव्या शतकात नमूद केलेली आहे. म्हणजेच कुरआन हा ईश्वरीय ग्रंथ आहे.
पुरावा क्रमांक - ५
“आणि तो अल्लाहच आहे ज्याने रात्र आणि दिवस बनविले आणि सूर्य व चंद्र निर्माण केले. सर्व आपापल्या नभोमंडळात मार्गरत आहेत.”(कुरआन: सुरह अल्अंबिया, आयात नं. ३३).
    १५१२ मध्ये ऍस्ट्रॉनॉमस निकोलस कोपर्निकस याने दावा केला होता की, सूर्य हा एका ठिकाणी स्थिर आहे आणि बाकीचे ग्रह तारे त्याच्या भोवती प्रदक्षिणा करीत आहेत. विसाव्या शतकापर्यंत कोपर्निकसचा हाच विचार सर्वमान्य वैज्ञानिक विचार होता. मात्र विसाव्या शतकामध्ये वैज्ञानिकांच्या हे सत्य लक्षात आले की, सूर्य हा एका ठिकाणी स्थिर नसून तो ही ब्रह्मांडात फिरत असतो. जी गोष्ट विसाव्या शतकात वैज्ञानिकांना कळाली त्याचा दावा कुरआनने सहाव्या शतकात केला. याचाच अर्थ कुरआन हा ईश्वरीय ग्रंथ आहे.
पुरावा क्रमांक - ६
“अथवा त्याचे उदाहरण असे आहे जसे एखाद्या खोल समुद्रातील अंधार की वर एक लाट आच्छदिली आहे, त्यावर आणखी एक लाट, आणि तिच्यावर ढग, अंध:कारावर अंध:कार आच्छादित आहे, माणसाने हात काढले तर तेही त्याला पाहता येऊ नये. ज्याला अल्लाहनेच प्रकाश प्रदान केला नाही त्याच्यासाठी मग कोणताही प्रकाश नाही. (कुरआन : सूरह नूर, आयत नं. ४०)
     गुन्हेगार माणसांचे वर्णन करताना वर प्रमाणे आयत अवतरित झालेली आहे. भारताचे वीसाव्या शतकाच्या साठाव्या दशकातील एक रोचक घटना आपल्याला सांगण्याचा मोह आवरत नाहीये. त्या काळात फ्रान्समध्ये भारताचे राजदूत महेमूद बे. मिस्त्री नेमणुकीस होते. त्यांनी एक तपशीलवार घटना अशी सांगितली की, डॉ. घारिनीया नावाचे पॅरिसमध्ये राहणारे एक सज्जन गृहस्थ होते. ते अतिशय सहृदयी आणि सेवाभावी वृत्तीने आपली वैद्यकीय सेवा बजावत. त्यांच्या लोकप्रियतेमुळे लोकांनी त्यांना फ्रान्सच्या संसदेमध्ये निवडूणसुद्धा दिले होते. निवडूण आल्यानंतर एकदा कुरआनच्या फ्रान्सीसी भाषेतील भाषांतरीत ग्रंथाचे विवेचनाच्या कार्यक्रमात ते गेले. त्या ठिकाणी त्यांना कुरआनची एक प्रत भेट म्हणून देण्यात आली. तेव्हा त्यांनी सहज कुरआन चाळली असता त्यांची नजर वरील आयातीवर पडली. ती आयात वाचून ते अतिशय अभिभूत झाले. त्यानंतर काही दिवसांनी त्यांच्या वाचनात आले की, प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनी कधीच समुद्री प्रवास केला नव्हता. तेव्हा मात्र ते बेचैन झाले. त्यांनी प्रेषित सल्ल. यांनी खरोखरच कधीच समुद्र प्रवास केला नव्हता काय, याची खात्री केली व त्यांना खात्री पटल्यावर त्यांनी सरळ इस्लामचा स्विकार केला. जेव्हा पत्रकारांनी त्यांना इस्लाम धर्म का स्विकारला म्हणून विचारणा केली तेव्हा त्यांनी सांगितले की, ” माझे वडील खलाशी होते. त्यांचा माझ्या आईबरोबर मतभेद झाल्याने ते विभक्त झाले व माझा सांभाळ माझ्या वडिलांनी केला. त्यांच्याबरोबर माझ्या बालपणाचा एक मोठा कालावधीत समुद्रात गेला. समुद्री वातावरणामध्ये येणाऱ्या प्रत्येक बदलाचा मी प्रत्यक्ष अनुभव घेतलेला आहे. सुरे नूरच्या आयात नं. ४० मध्ये अंधाऱ्या रात्री समुद्रात वादळ आल्यानंतर काय अवस्था असते? याचे अगदी तंतोतंत वर्णन केलेले आहे. जेव्हा मला ही वस्तुस्थिती कळाली की प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनी कधीच समुद्र प्रवास केला नाही तेव्हा माझ्या लक्षात आले की, हा ग्रंथ त्यांनी लिहिलेलाच नाही. कारण ज्या माणसाने कधी समुद्र प्रवास केलाच नाही तो समुद्रातील काळ रात्रीचे इतके नेमके वर्णन करूच शकत नाही. म्हणजेच हा ईश्वरीय ग्रंथ आहे. म्हणून मी इस्लाम स्विकारला आहे.
 पुरावा क्रमांक - ७
    “कदापि नाही, जर तो परावृत्त झाला नाही तर आम्ही त्याला, कपाळाचे केस धरून ओढू, त्या कपाळाचे जे खोटारडे व मोठे गुन्हेगार आहेत. (कुरआन : सुरह अल्अल़क- आयत नं. १५, १६).
    या आयातीमध्ये दोन महत्वाचे मुद्दे आहेत. कपाळाचे केस धरून ओढू. हे जे म्हटलेले आहे, यात आश्चर्यजनक गोष्ट अशी आहे की, माणसाच्या सर्व ऐच्छिक वैचारिक घडामोडी मेंदूच्या पुढच्या भागात घडतात. वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या ऍनॉटॉमी आणि फिजिओलॉजीच्या पुस्तकामध्ये मेंदूच्या या भागातील घडामोडीबद्दल म्हटलेले आहे की, माणसाच्या सर्व ऐच्छिक घडामोडी मेंदूच्या पुढच्या भागात घडतात. माणसाला जेव्हा खोटं बोलायचं असतं तेव्हासुद्धा मेंदूच्या याच भागात रासायनिक प्रक्रिया होत असते. पेन्सिलवानिया विद्यापिठामध्ये केलेल्या अभ्यासात खोटे बोलणाऱ्या व्यक्तीच्या इंट्रॉगेशन (विचारपूस) ची जेव्हा संगणकीय चिकित्सा केली गेली तेव्हा लक्षात आले की, खोटे बोलत असतांना खोटे बोलणाऱ्या माणसाच्या मेंदूच्या पुढच्या भागात प्रचंड उलथापालथ होत होती. ही आश्चर्यजनक बाब आहे की, सहाव्या शतकामध्ये कुरआनमध्ये हा दावा करण्यात आला आहे की, खोटारड्या माणसाच्या कपाळाचे केस ओढून त्याला परावृत्त करण्याचा प्रयत्न केला जाईल. याचाच अर्थ हा ग्रंथ ईश्वरीय ग्रंथ आहे.
पुरावा क्रमांक - ९
    “ज्या लोकांनी आमची संकेतवचने मानण्यास नकार दिला आहे त्यांना खचितच आम्ही अग्नीत झोकून देऊ आणि जेव्हा त्यांच्या शरीराची त्वचा गळून पडेल तेव्हा त्या जागी दूसरी त्वचा निर्माण करू जेणेकरून ते प्रकोपाचा खूपच आस्वाद घेतील, अल्लाह खूप समर्थ आहे आणि आपल्या निर्णयांना अंमलात आणण्याची हिकमत चांगल्या प्रकारे जाणतो.” (कुरआन : सुरह - अन्निसा, आयत नं. ५६)
    अगदी अलिकडच्या काळापर्यंत व आजही अनेक लोकांचा असा समज आहे की, भाजल्याच्या वेदना ह्या मेंदुमध्ये जाणवतात. मात्र जीवशास्त्राच्या वैज्ञानिकांनी हे मान्य केलेले आहे की, जळाल्या/भाजण्याच्या वेदना या मेंदूमध्ये जाणवत नसून त्वचेमध्ये जाणवतात. म्हणूनच कुरआनने गुन्हेगारांच्या जळालेल्या त्वचेवर पुन्हा नवीन त्वचा देऊन त्यांना पुन्हा जाळण्यात येईल, अशी तंबी दिलेली आहे. आधुनिक जीवशास्त्राला जी गोष्ट अलिकडे कळाली तिचा दावा कुरआनने सहाव्या शतकात कसा केला? याचाच अर्थ कुरआन हा ईश्वरीय ग्रंथ आहे.
पुरावा क्रमांक - ९
    “आणि आम्ही आकाशाला एक सुरक्षित आच्छादन बनविले. परंतु हे सृष्टीच्या संकेतांकडे लक्षच देत नाहीत.” (कुरआन : सुरह अल् अंबिया, आयत नं. ३२)
     सूर्यामध्ये प्रचंड उर्जा असते. सूर्य आणि पृथ्वीच्या दरम्यान अनेक अच्छादनाचे आकाश आहे. हे असे वैज्ञानिक सत्य आहे ज्याचा अलिकडे शोध लागलेला आहे. आकाशाची रचना अशी आहे की, ती जरासुद्धा विस्कळीत झाली तर पृथ्वीवरील जीवन छिन्न विछिन्न होऊन जाईल. आकाशाचे आवरण सैल झाले तर पृथ्वीपर्यंत सूर्याची तप्त किरणे इतक्या मोठ्या प्रमाणात येतील की पृथ्वीवरील सर्व जीवन जळून भस्म होऊन जाईल व हे आवरण जरासुद्धा घट्ट झाले तर पृथ्वीवरील जीवन बर्फाने थिजून नष्ट होऊन जाईल. आकाशाची रचना पृथ्वीवर एका ब्लँकेटसारखी केलेली आहे. ज्यातून तेवढीच उर्जा पृथ्वीला मिळते जेवढी तिला आवश्यक आहे. हा दावा सहाव्या शतकात कुरआनने केलेला आहे, जो की काल परवापर्यंत आधुनिक विज्ञानाला माहित नव्हता. म्हणजेच कुरआन हा ग्रंथ ईश्वरीय आहे.
    हे मान्य आहे की, कुरआन हा विज्ञानाचा ग्रंथ नाही. परंतु तो विज्ञानाशी सुसंगत असा ग्रंथ आहे. त्यात विज्ञानाच्या विरोधात कुठल्याच गोष्टीचा उल्लेख केलेला नाही. या तर झाल्या भौतिक विज्ञानाच्या गोष्टी. कुरआनमध्ये मनोविज्ञानाशी सुद्धा सुसंगत अशा अनेक आयाती आहेत, ज्या मानवाला एक नैतिक जीवन जगण्यासाठी मार्गदर्शन करतात. त्यांचा समावेश जागेअभावी या लेखात करणे शक्य नाही. भौतिक विज्ञान आणि मनोविज्ञान यातील मुलभूत तत्वे कुरआनमध्ये सहाव्या शतकात योगायोगाने आली असा दावा कुठलाही बुद्धीमान माणूस करू शकणार नाही. स्पष्ट आहे वरील सर्व वैज्ञानिक गोष्टी अल्लाहने प्रेषित मुहम्मद मुस्तफा सल्ललाहु अलैहि व सल्लम यांच्यापर्यंत जिब्राईल अलै सलाम या फरिश्त्या (ईशदूत) मार्फत पोहोचविलेल्या आहेत. कुरआन एक असा ग्रंथ आहे की, जो फक्त विज्ञानाशी सुसंगतच नाही तर आपल्या आत्म्याशी, आपल्या जीवनाच्या प्रत्येक पैलुशी निगडीत आहेत. कुरआनमध्ये दिलेल्या मार्गदर्शनाचे कोट्यावधी लोकांनी पालन केलेले नाही व आजही करीत नाहीत. मात्र हे श्रद्धाहीन लोक त्याचे मूल्य अनेक प्रकारची हानी सहन करून चुकवित आहेत. हा ग्रंथ सर्वांसाठी आहे, फक्त मुस्लिमांसाठी नाही. जो कोणी कुरआनचे मार्गदर्शन स्विकारेल तो स्वच्छ, नैतिक आणि यशस्वी जीवन जगेल. आणि जो कोणी याच्या मार्गदर्शनाचा अस्विकार करेल, त्याला नक्कीच त्याचे मूल्य चुकवावे लागेल. इतिसिद्धम !   

मुस्लिम मराठी साहित्य एकात्मतेसह बहुभाषिक व बहुसांस्कृतिक संवादाचा ध्येयवाद जपते, याची साक्ष म्हणजे या पूर्वीच्या संमेलनापासून आजपर्यंत चालत आलेली मुस्लिमेत्तर लेखकांच्या सहभागाची श्रेष्ठ परंपरा! सहजीवन व सहअस्तित्व अर्थपूर्ण करण्यासाठी सर्वधर्मीय संवाद आवश्यकच असतो. हे सांस्कृतिक सूत्र डॉ. शेख इक्बाल मिन्ने व त्यांच्या सर्व सहकारी मित्रांनी जाणीवपूर्वक जोपासले आहे.
मुस्लिम मराठी साहित्याची निर्मिती प्रक्रिया समजून घ्यायची असेल तर इस्लामची श्रद्धा जपणारी व पूजणारी मानसिकता समजून घ्यावी लागेल. आणि मुस्लिम मनाची स्पंदने जाणून घेताना इस्लाम धर्माचे केंद्र अल्लाह, मुहम्मद पैगंबर सल्ल. आणि कुरआनचा किमान अभ्यासही आवश्यक ठरतो. इस्लाम धर्माबाबतच्या अभ्यासात व आकलनात अनेक बाधा आहेत. त्यामुळे प्रचंड प्रमाणात गैरसमज रूजले. इस्लामचे शुद्ध स्वरूप मुस्लिमांसह इतर धर्मियांपर्यंत अद्याप पोहोचले नाही. परिणामतः मुस्लिमांना अनेक आरोपांना तोंड द्यावे लागते. इस्लामचा मानवतावाद खरे तर इतर धर्माप्रमाणेच सर्वांसाठी वंदनीय आहे. आणि तोच मुस्लिम लेखकांचा ध्येयवाद असला पाहिजे, असे संमेलनाचे उद्घाटक डॉ. श्रीपाल सबनीस म्हणाले.
    पनवेल येथे 3 ते 5 नोव्हेंबर दरम्यान बदीउज्जमा ‘खावर’ साहित्यनगरी, वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात मुस्लिम मराठी साहित्य सांस्कृतिक मंडळाच्या वतीने 11 वे अखिल भारतीय मुस्लीम मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले होते. यावेळी डॉ. सबनीस उद्घाटनपर भाषणात बोलत होते. मंचावर संमेलनाध्यक्ष बीबी फातेमा बालेखाँ मुजावर, कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष रामशेठ ठाकूर, पनवेलच्या महापौर कविता चौतमल, आमदार इम्तियाज जलील यांच्यासह संमेलनाचे सर्व माजी अध्यक्ष उपस्थित होते. डॉ. सबनीस यांनी मुस्लिम समाजातील अनेक ज्वलंत प्रश्‍नांकडे लक्ष वेधले. दहशतवाद, सामाजिक सुरक्षा व आयसिस यावर सबनीस यांनी चिंता व्यक्त केली. 
यावेळी संमेलनाध्यक्ष बीबी फातेमा यांनी मुख्य प्रवाहात होत असलेली मुस्लीम मराठी साहित्यिकांची फरफट आधोरेखित केली. मराठी मुस्लीम साहित्य परिषद मान्य करण्यास अनेक वर्षाचा कालावधी लावला याबद्दल यांनी खंत व्यक्त केली. तसेच त्यांनी इस्लामच्या वारंवार चर्चिला जाणाऱ्या विषयांवर परखड मते व्यक्त केली. विनाकारण बुरख्याचा विषय ताणून धरणाऱ्यांना तर त्यांनी आपल्या भाषणात एक प्रकारची चपराकच लगावली. त्या म्हणतात, महिलांच्या प्रगतीत बुरखा कधीच अडथळा बनत नाही. बुरख्याचा पहिला उद्देश असा की, पुरूष व स्त्रियांच्या चारित्र्यांचे रक्षण करण्यात यावे व अशा दुवर्तनांपासून त्यांना अलिप्त ठेवावे जे स्त्री-पुरूषांच्या स्वैर सहजीवनामुळे निर्माण होतात. दूसरा उद्देश असा की स्त्री पुरूषांचे कार्यक्षेत्र निश्ति करण्यात यावे. नैसर्गिकरित्या जी कर्तव्ये स्त्रीयांनी पार पाडावयाची आहेत ती त्यांनी निश्‍चितपणे पार पाडावीत व ज्या जबाबदाऱ्या पुरूषांच्या वाट्यास येतात त्या त्यांनी व्यवस्थितपणे पूर्ण कराव्यात. तीसरा उद्देश कुटूंब व्यवस्था मजबूत व सुरक्षित करावी हा आहे. कुटुंबव्यवस्था जीवनाच्या इतर व्यवस्थांपेक्षा अधिक महत्वाची बाब आहे. इस्लाम स्त्रियांना सर्व अधिकार देतो, त्याच बरोबर घरातील व्यवस्थाही सुरक्षित ठेवू इच्छितो. हे केवळ बुरखा पद्धतीचा अवलंब केल्यानेच शक्य होवू शकते, असेही अध्यक्षा मुजावर म्हणाल्या. मुस्लीम मराठी साहित्य संमेलनात पहिल्यांदा उद्घाटनाचं भाषण प्रकाशित करून वितरीत करण्यात आले.
    तीन दिवस चाललेल्या या संमेलनात अनेक विषयावर चर्चा झाली. ’महाराष्ट्रील समतेच्या चळवळी आणि मुस्लीम’ या परिसंवादात राज्यातील सामाजिक चळवळीतील मुस्लीम समुदायाचं योगदान यावर समतोल चर्चा झाली. यात हभप शामसुंदर सोन्नर, मराठा सेवा संघाचे गंगाधर बनवरे व नागपूरचे प्रा. जावेद पाशा कुरेशी यांनी सहभाग घेतला होता. महाराष्ट्रातील सांस्कृतिक व प्रबोधनाच्या चळवळीत मुस्लीम समुदायाच्या योगदानावर चर्चा झाली. इतिहासाचं विकृतीकरण, संत-साहित्यात मुस्लीम संतांचं स्थान याची उजळणी परिसंवादात करण्यात आली. भारतात मुस्लीम मूलनिवासी असून त्यांनी इथल्या स्थानिक परंपरा व संस्कृतीचा स्वीकार केला. लाखो मुस्लिमांनी भारताच्या स्वातंत्र्य संग्रामात सक्रिय सहभाग घेतला होता. 1857 सालच्या उठावात एकट्या दिल्लीत 25 हजारांपेक्षा जास्त मुस्लिमांना फासावर चढवण्यात आलं होतं. आज सत्ताधारी पक्ष मुस्लिमांना परके ठरवतोय, यापेक्षा वेदनादायी गोष्ट दुसरी कुठली नाहीये, अशी खंत जावेद पाशा कुरेशी यांनी व्यक्त केली. स्वातंत्र्यासाठी प्राणाची आहुती दिलेल्या समूहाकडून देशभक्तीचं प्रमाणपत्र मागणं, लोकशाही राष्ट्राचं दु:ख आहे, असा सूर एकूण परिसंवादात उमटला.
    मुस्लीम समाजाबाबत समज व गैरसमज हा दुसरा महत्त्वाचा परिसंवाद या संमेलनात झाला. यात माजी आयजी एसएफ मुश्रीफ, ’द वीक’चे प्रिन्सिपल करसपाँडंट निरंजन टकले, इतिहास संशोधक सरफराज शेख, डॉ. सय्यद रफीक पारनेरकर, धनराज वंजारी, मेहबूब काझी व मोहसीन खान यांनी मुस्लिमांच्या दानवीकरणाच्या सादरीकणावर भाष्य केलं. ’मोहम्मद अली जिना यांनी द्वी-राष्ट्राचा सिद्धान्त सावरकरांकडून घेतला होता. त्यामुळे फाळणीचे ते पहिले गुन्हेगार आहेत’ अशी भूमिका निरंजन टकले यांनी मांडली. गौमांस बंदीवरील त्यांच्या एका स्पेशल स्टोरीचा उल्लेख करत ते म्हणाले की, ’बीफ बॅनच्या आड बजरंग दल खंडणीचा व्यवसाय करत आहे, यांचे व्हिडिओ पुरावे माझ्याकडे आहेत. एका कार्यकर्त्याचा उल्लेख करत ते म्हणाले की, ’माझ्याकडे असलेल्या व्हिडिओ फुटेजमध्ये एक गोरक्षक म्हणतोय की ’डर फैलाने में इतना समय लगा, अब बिझनेस का टाईम हैं’. मुस्लीम विरोधात सुरू असलेल्या षडयंत्राबाबत टकले यांनी अनेक खुलासे केले.
    इतिहासाचे अभ्यासक सरफराज शेख यांनी टिपू सुलतानच्या सुरू असलेल्या कथित दानवीकरण करण्याच्या प्रयत्नांवर भाष्य केलं. तब्बल सात वर्षं त्यांनी टिपूवर केलेल्या संशोधनाचा लेखाजोखा आपल्या व्याख्यानात मांडला. टिपू सुलतानच्या नैतिकतेचे पुरावे देत, ते कसे ब्राह्मण्यावाद्यांच्या डोळ्यांना खुपत आहेत, याबद्दल त्यांनी विचार मांडले. तर माजी पोलीस अधिकारी वंजारी यांनी भारतात आयबी म्हणजे गुप्तचर यंत्रणा सत्ता चालवत असल्याचा धक्कादायक खुलासा केला. तर सय्यद रफीक यांनी दहशहवादाच्या आरोपाच्या षडयंत्रावर भाष्य केलं. भारतीय मुस्लीम हा शांतीप्रिय असून तो दहशतवादी कारवाया करु शकत नाही हे निर्दोष सुटत असलेल्या तरुणांवरून सिद्ध होतं, असं मत मांडलं. सर्व बॉम्बस्फोट प्रकरणाचा तपास नव्यानं करावा व खऱ्या आरोपींना शोधावं अशी मागणी डॉ. रफीक सय्यद यांनी केली. तर अध्यक्षीय समारोप करताना एसएम मुश्रीफ म्हणाले की, दलित व बहुजन शिक्षित होण्यानं ब्राह्मण्यावाद्यांचं धाबं दणाणलं होतं. त्यामुळे त्यांना मुस्लिमांच्या पाठीमागे लावलं, असा आरोप केला. ’जेव्हापासून स्फोटाच्या तपासात ब्राह्मण्यवादी संघटनांचा हस्तक्षेप आढळला, तेव्हापासून स्फोटाच्या घटना कमी झाल्या’ असा आरोपही मुश्रीफ यांनी केला.
    शनिवारी मुस्लीम महिलांनी आपल्या भावविश्‍व व साहित्यातील अवकाशावर भाष्य केलं. मस्जिदमध्ये नमाजला न जाता येणं ही आम्हाला सूट असल्याचं मत नागपूरच्या जुल्फी शेख यांनी मांडलं. घरातली मुलंबाळं, स्वंयपाक-पाणी सोडून दर तासा-दोन तासाला मस्जिदमध्ये नमाजला जाणं महिलांना प्रॅक्टिकली शक्य नाही, पण पुरुषांना व्यवसायाच्या ठिकाणी ते शक्य असतं असंही मत जुल्फी शेख यांनी मांडलं. तलाक, मस्जिद व दर्गा प्रवेश यापेक्षाही गंभीर विषय मुस्लीम महिलांचे आहेत, याकडे सामाजिक संघटना कधी लक्ष देणार असा प्रश्‍नही त्यांनी विचारला. विद्युत भागवत यांनी महिला सुरक्षेवर सरकारला घेरलं. तर ऐनुल अतार यांनी मुस्लीम महिलांच्या बदलत्या प्रश्‍नांकडे लक्ष वेधलं. हसिना मुल्ला यांनी ग्रामीण भागातील महिलांची होत असलेली फरफट मांडली. मुस्लीम महिलांचं संघर्ष करणारे चित्रण साहित्यात येत नसल्याची खंत त्यांनी मांडली.    शनिवारच्या दुसऱ्या परिसंवादात मुस्लीमेत्तर लेखकांच्या नजरेतून मुस्लीम साहित्य या विषयावर चर्चा झाली. यात हिंदू आणि मुस्लिमांमधली गंगा-जमनी संस्कृती साहित्यात प्रकर्षानं मांडावी असा ठराव मान्यवरांनी मांडला. पांडुरंग कंद व फारुख तांबोळी यांनी मुस्लीम विषयातील साहित्यिक संशोधनात येत असलेल्या अडचणींवर भाष्य केलं. संशोधनासाठी मराठी मुस्लीम साहित्याचं संग्रह करावा अशी मागणी या दोघांनी केली. अनिलकुमार साळवे यांनी सिनेमातील प्रातिनिधिक मुस्लीम चित्रणावर भाष्य केलं. मुस्लीम साहित्य संशोधक मेळावा व 25 वर्षांतील मराठी मुस्लीम साहित्याचा लेखाजोखा हे दोन प्रमुख परिसंवाद शनिवारचं मुख्य आकर्षण ठरली. डॉ. बशारत अहमद यांनी 25 वर्षांतील मुस्लीम मराठी साहित्याच्या होत असलेल्या प्रगतीबद्दल समाधान व्यक्त केलं. 1990 पासून मराठी मुस्लीम संघटनेच्या स्थापनेपासून आज मुस्लीम मराठी साहित्याची काय स्थिती आहे, यावर संमेलनाच्या सर्व अध्यक्षांनी विवेचन केलं. फ.म. शाहजिंदे यांनी मराठी मुस्लीम साहित्यिकांच्या लेखन प्रसारासाठी त्रैमासिक पत्रिकेची गरज व्यक्त केली, तर जावेद पाशा कुरेशी यांनी मुस्लीम प्रश्‍नांवर दर्जेदार साहित्य निर्मितीवर भर द्यावा असा प्रस्ताव मांडला. डॉ. इकबाल मिन्ने यांनी मुस्लीम मराठी साहित्य चळवळ पुढे नेण्यासाठी सहकार्य करण्याचं आव्हान केलं. शनिवार एकांकिका व नवोदित कवी संमेलनामुळेही चांगलाच गाजला. मुख्य परिसंवादानंतर दोन कवी संमेलनं झाली. पहिल्या कवी संमेलनात महिला कवींनी दर्जेदार कविता सादर केल्या. महिला प्रश्‍न, कुटुंब, नातेसंबंध, सामाजिक मान्यता, आदर अशा विविध आशयांना घेऊन कविता सादर झाल्या. यात फरजाना डांगे, जुल्फी शेख, मोहसिना शेख, शमा बरडे, समीना शेख, सायराबानू चौगुले इत्यादी कवयित्रींनी आपल्या रचना सादर केल्या. यानंतर डॉ. इक्बाल मिन्ने लिखित व आरेफ अन्सारी दिग्दर्शित ‘एक रात्र वादळी’ या एकांकिकेचं अभिजित भातलवंडे व विदुला बाविस्कर यांनी सादरीकण केलं.
    मिलाजुला मुशायऱ्यात 30 कवींनी सहभाग घेतला होता. कलीम खान, ए.के. शेख, मुबारक शेख, मसूद पटेल, खलील मोमीन, बशारत अहमद, बदीउज्मा बिराजदार, सय्यद आसीफ, आबीद शेख, राज पठाण, कैलास गायकवाड, आबीद मुन्शी, छाया गोवारी यांच्यासह सुमारे 30 कवींनी संमेलनात रचना सादर केल्या. रविवारी पहिल्या सत्रात नवोदित कवींचा मुशायरा झाला. यात शफी बोल्डेकर, सुनिती साठे, मोहसीन सय्यद, समाधान दहिवाल, परवेज शेख, जावेद अली यांच्यासह सुमारे 20 पेक्षा जास्त कवींनी सहभाग घेतला. यानंतर सोशल मीडिया व आजचा तरुण यात नौशाद उस्मान, खालीद मुल्ला, शशी सोनवणे व साजिद पठाण यांनी सोशल मीडियातील लेखनशैली, ट्रोलिंग व बिझनेस मॉडेलवर चर्चामंथन केलं. बेगुनाह कैदी पुस्तकाचे लेखक अब्दुल वाहिद शेख यांनी मुंबईतील 2006 पश्‍चिम रेल्वे ब्लास्टमधील निर्दोष आरोपींच्या शिक्षेत सूट मिळावी, यासाठी सोशल मीडिया कॅम्पेन चालवण्याचं आवाहन केलं.
    मंडळाच्या सर्वसाधारण सभेत मंडळाची आगामी भूमिका ठरविण्यात आली. यात त्रैमासिक पत्रिका व वेबसाईट सुरू करणं, मंडळाच्या विभागीय शाखा सुरू करणं, निधी व जागेसाठी प्रयत्न करणे आदी विषयाचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले. संमेलनाच्या समारोपाआधी कोकणी मुस्लिमांच्या साहित्य व सांस्कृतिक योगदानावर मंथन झालं.
    प्रसिद्ध साहित्यिक लक्ष्मीकांत देशमुख यांच्या प्रमुख उपस्थित समारापोचा सोहळा पार पडला. समारोपात एकूण 16 ठराव मांडण्यात आले. यात मराठी भाषेचं विद्यापीठ अमरावती जिल्ह्यातील रिद्धपूरला व्हावं, मुस्लीम मराठी साहित्य व सांस्कृतिक मंडळासाठी विभागीय साहित्य मंडळाप्रमाणे अनुदान मिळावं, जेलमधील दलित-आदिवासी व मुस्लीम विचाराधिन कैद्यांची सुटका करावी इत्यादी विषय मांडण्यात आले. या संमेलनाला राज्यभरातून अनेक मराठी मुस्लीम व मुस्लीमेत्तर लेखकांनी हजेरी लावली होती. आयोजकांनी बाहेरगावाहून आलेले सर्व साहित्यीक, श्रोत्यांसाठी राहणे, जेवणाचीही उत्तम व्यवस्था केली होती. संमेलन यशस्वी करण्यासाठी संमेलनाध्यक्ष प्राचार्या बीबी आतिमा बालेखाँ मुजावर, संमेलन प्रमुख  डॉ. शेख इक्बाल व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले. साहित्य संमेलना दरम्यान पुस्तकांचे स्टॉलही लावले होते.

- मुहम्मद फारूक खान
जीवनाचा स्त्रोत कोठे आहे? हे समस्त विश्व आणि यात असणाऱ्या प्राणि आणि वनस्पतीसारख्या सजीवसृष्टीस ना-ना प्रकारे सुसज्ज करणारी शक्ती आणि संकल्पना कोणती आहे? अर्थातच मनुष्यासाठी हा प्रश्न अत्यंत गंभीर आणि अतिशय महत्वपूर्ण आहे.     
   
आज आपण जर अशा प्रकारे जरी विचार केला की, समजा वर्तमान जीवनाव्यतिरिक्त मानवाचे कोणतेही भवितव्यच नाही तरीसुद्धा हा प्रश्न आहेच की आपण ’आज ते कोणात्या स्थानावर आहे’ त्याचे शाश्वत आणि चिरस्थायी भविष्य नसले तरीसुद्धा आणि भविष्य नसल्याने त्याची व्याख्या करण्याची गरज नसली तरी ’वर्तमान’ हीच एक वास्तविकता आहे आणि ही वास्तविकतासुद्धा पिच्छा सोडायला तयार नाही. वर्तमानाची व्याख्या केल्याशिवाय त्याला समाधान लाभणार नाही. म्हणूनच जेव्हा डार्विनने उत्क्रांतीचा सिद्धांत सादर केला. तेव्हा त्यास खूप महत्व प्राप्त झाले. याचे कारण असे होते की, त्याने जीवनाचे रहस्य उलगडण्याचा दावा करीत जीवनाची व्याख्या केली होती. म्हणून डार्विनने केलेल्या या कार्याविषयी लोकांचा कळत-नकळत भावनात्मक संबंध दिसून येतो. डार्विनच्या सिद्धांतामध्ये बऱ्याच त्रुट्या असूनदेखील सुरूवातीस या त्रुट्यांकडे सहसा जास्त लक्ष दिले गेले नाही. कारण हा मनुष्य स्वभावच आहे की त्याला नाही वाटत की सोने समजून त्याने उचललेल्या एखाद्या धातूचा तुकडा पितळाचा निघावा. हेच कारण आहे की डार्विनचा सिद्धांत जरी त्यांच्या परिकल्पनेची पुष्टी करण्याचा भरपूर खटाटोप करण्यात आला आणि एवढेच नव्हे तर कित्येक वैज्ञानिक आणि संशोधकांनी यासाठी आपल्या बहुमूल्य वेळ आणि शक्तीची आहुती दिली आणि आजही यासाठी भरपूर प्रयत्न व अनुसंधानाचे कार्यक्रम चालूच आहेत.
परलोकाची कल्पना
    सृष्टी आणि जीवनाशी संबंधित निर्माण होणाऱ्या या मौलिक प्रश्नांचे एकप्रकारे सुस्पष्ट उत्तर म्हणजे इस्लाम होय. उपरोल्लेखित जीवनाविषयक प्रश्नांचे आशादायी उत्तर हेच इस्लामचे स्वरूप होय. म्हणून आपण याची उपेक्षा नव्हे तर यावर चांगल्या रितीने व गंभीरपणे चिंतन व मनन करावयास हवे. इस्लामी शिकवणीनुसार हे विश्व आणि जीवनसृष्टी एका चिरंजीवी सत्तेची रचना आहे. अर्थातच या विश्वाची आणि यातील समस्त जीवनसृष्टीची रचना एका चिरंजीवी सत्तेने केली आहे. शिवाय, यामागे एक महान उद्देश आहे. याचे एक निश्चित लक्ष्य आहे. याच लक्ष्यपूर्तीसाठी विश्व कार्य करीत आहे. हे जीवन आणि ही सृष्टी अतिशय तीव्र गतीने आपले लक्ष्य गाठण्यासाठी धावत आहे. यास रोखण्याची कोणातही शक्ती नाही आणि ते शक्यदेखील नाही. या सृष्टीचा कल आणि स्वभाव तसेच त्यातील निहित मूळ प्रयोजन बदलणे हे माणसाच्या अधिकारकक्षेच्या बाहेर आहे.
    या जगाची रचना झाली आणि ज्याची रचना होते त्याचा आरंभसुद्धा निश्चितपणे असून उद्देशयुक्त असल्यामुळे या जगात एक महान परिवर्तनसुद्धा घडणार आहे. या परिवर्तनास आपण चरमविकासाचे नाव द्यावे अथवा त्यास निर्माणात्मक सृजनाच्या उपाधीने विभूषित करावे. मात्र ज्याप्रमाणे प्रत्येक निर्माण कार्यापूर्वी विध्वंस होणे आवश्यक असते. त्याचप्रमाणे या विकसित आणि परिपूर्ण जगाची निर्मिती होण्यापूर्वी या वर्तमान सृष्टीचे पतन आणि विनाश अनिवार्य होय. एक प्रलयकारी घटना निश्चितच घडल्याशिवाय राहणार नाही आणि परिणामी वर्तमान विश्वाची ही व्यवस्था नाश पावेल. त्यानंतर वनसृजनतेची वेळ येऊन ठेपेल. त्यावेळी मात्र एक असे जग आपल्यासमोर असेल की, जे वर्तमान जगापेक्षा खूपच भिन्न स्वरूपाचे असेल. वर्तमान जीवनात आढळणाऱ्या त्रुट्या आणि कमतरता तेथे मुळीच नसतील. तेथे कोणत्याही गोष्टीची कमतरता भासणार नाही. त्या ठिकाणी विकास आणि सृजनतेची चरम आणि परमस्थिती असेल, तिला पाहिल्यावर प्रत्येकाच्या लक्षात येईल की, हे ते जग आहे जे आजपर्यंत आपल्याला दिसलेले नव्हते मात्र जे जग याच जगनिर्मितीचे लक्ष्य गाठण्याकडे भावत होते आणि त्यातील प्रत्येक संकेत याकडेच अंगुलिनिर्देश करीत होते.
    ज्याप्रमाणे समुद्रास पाहिल्यावर नद्या, तलाव, वृक्ष-वल्ली आणि मानव व पशु-पक्ष्यांच्या शरीरात प्रवाहित असलेल्या पाणी व आर्द्रतेचे रहस्य उलगडते, त्याचप्रमाणे मरणोत्तर जीवनास अर्थात पारलौकिक जीवनास पाहिल्यावर एकीकडे आपल्याला वर्तमान जीवनाचे उगमस्थान आणि मूळ आधाराचा थांग लागेल तर दुसरीकडे आपल्याला जगाच्या मूळ उद्देश आणि अभिप्रायाचे तात्विक ज्ञानसुद्धा प्रतिक्रियात्मक स्वरूपात लागेल. मनातील समस्त शंका-कुशंकाचे मळ धुतले जाऊन ते स्वच्छ आरशाप्रमाणे होईल. आपली आजची असमर्थता समर्थतेत परिवर्तित होईल, ज्या बाबी आज डोळ्यांनी दिसत नाहीत त्या प्रत्यक्ष समोर दिसतात. तेथे फक्त योग्य तेच होईल आणि अयोग्य व अनिष्ट बाबींचे अस्तित्वसुद्धा नसेल. उदाहरणार्थ, आज साधारणतः भौतिक वस्तुंचेच आपल्याला आकर्षण वाटते तर याउलट अत्यंत सूक्ष्म आणि अभौतिक वा आत्मिक वस्तूंची अवहेलना केली जाते. शरीराचे मूल्य आणि महत्व आपल्याला समजते मात्र आत्मा आणि प्रेम दिसत नाही.
सतर्कतेची आवश्यकता
  वरील मजकुरावरून हे स्पष्ट होते की, कुरआनने वर्तमान जगत आणि मानव जीवनाविषयी जी सूचना दिली, विश्व आणि मानवसृष्टी हे मुळात शुन्य आणि सर्वथा लोप पावणार नसून त्या एका विकसित आणि परिपूर्ण जीवनाकडे अग्रेसर आहे.
    मानवाची स्थिती अत्यंत नाजूक आणि गंभीर आहे. कारण त्याचे पारलौकिक जीवन हे पूर्णतः त्याच्या कर्मावर अवलंबून आहे. वर्तमान जीवन आपल्या वास्तविकतेच्या दृष्टीकोणानुसार एक प्रयत्न असून याच आधारावर मानवाचे भावी आणि सार्वकालीन जीवन सुसंघठित व सृजनशील असेल. या वर्तमान अगर लौकिक जीवनात मिळणारे सर्वच सुख किंवा फायदे आणि साधने व सुविधा मुळात गौण व नगण्य आहेत. म्हणूनच वास्तविकता जाणून घेण्यात थोडासा विलंबदेखील परवडणारा नाही. अगदी किंचितही हलगर्जीपणा व असावधानी खूप महाग पडणार आहे. म्हणून आजच सतर्क आणि सजग राहण्यात तसेच जीवनाच्या संभाव्य भवितव्यावर विचार करून ईश्वराकडून प्राप्त होणाऱ्या चेतावनीकडे लक्ष देण्यातच शहाणपण ठरेल. आणि ही चेतावनी ईश्वराने प्रेषित मुहम्मद सल्ल. यांच्या माध्यमाने अंतिम ग्रंथातून मिळत आहे.
    या ठिकाणी हे विसरता कामा नये की, हा अंतिम ईश्वरी ग्रंथ म्हणजे कुरआन मानवाकरिता चेतावनी आहे आणि मंगल सूचनासुद्धा आहे. कुरआनच्या शिकवणी आत्मसात करून त्यानुसार जबाबदाऱ्या योग्यरित्या निभावणाऱ्यांसाठी कुरआन ही मंगलसूचना आणि खूशखबर आहे. मात्र कुरआनच्या हाकेस प्रतिसाद न देणाऱ्या आणि जीवनाची अवहेलना करणाऱ्या व आपल्या जबाबदारीस पाठ दाखविणाऱ्यांसाठी हा ग्रंथ चेतावनीच होय. परलोकांसबंधी कुरआनने जी धारणा सादर केली आहे ती केवळ दर्शनीय व पाहण्यापुरती नसून तिचा आपल्या वर्तमान आणि भावी जीवनाशी गाढ संबंध आहे. परलोकावर विश्वास अगर श्रद्धा ठेवल्यावर माणसाच्या जीवनाची दिशा व आत्मविश्वास अगर श्रद्धा न ठेवणाऱ्याच्या अगदी भिन्न असते. याबाबतीत आपल्याला एखादा दरम्यानचा मार्ग सापडतही नाही. अर्थातच परलोकी जीवनावर श्रद्धा ठेवली असो की नसो, जीवन व्यतीत करण्यासाठी होणारी धावपळ सारखीच असेल. तिच्यात मात्र कसलाच फरक होणार नाही. जर परलोकी जीवनाप्रती आपली धारणाच नसेल तर परलोकी यशाकरिता निश्चितच आपल्याकडून कोणतेही प्रयत्न होणार नाहीत. शिवाय, पारलौकिक जीवन सत्य असल्यास आपण परलोकी जीवनातील वाईट परिणामांपासून स्वःचे रक्षण कसे करणार? म्हणूनच या विषयावर आपण विचार करणे आवश्यक आहे. 
(क्रमशः) (उर्दूतून मराठी भाषांतर सय्यद जाकीर अली)

-कलीम अजीम, अंबाजोगाई
 भाजपने सुरु केलेल्या इतिहासाच्या राक्षसीकरणाच्या मोहिमेला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी चांगलंच उत्तर दिलंय. २५ ऑक्टोबरला कर्नाटक विधानसभेत झालेल्या एका कार्यक्रमात राष्ट्रपतींनी टिपू सुलतानबद्दल गौरवोद्गार काढले. ‘टिपू सुलतान हा स्वातंत्र्य सेनानी होता, इंग्रजांशी लढताना त्याला वीरमरण आलं.
टिपू सुलतानने रॉकेटच्या विकासात सर्वांत मोठे योगदान दिलं आहे’ राष्ट्रपतींच्या या भूमिकेमुळे भाजपची कोंडी झाली आहे. कारण काही दिवसांपूर्वीच टिपू सुलतानच्या जयंतीला केंद्रीय मंत्री अनंत कुमार हेगडे यांनी विरोध केला होता. त्यानंतर भाजपचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनीही टिपू सुलतानबद्दल अपशब्द काढले होते. भाजपच्या या राजकीय खेळीमुळे भारतात पुन्हा एकदा स्वातंत्र्य व स्वातंत्र्यपूर्व काळातील मुस्लिम प्रतीकं पुसून टाकण्याच्या षङ्यंत्रावर चर्चा सुरु आहे.
ताजमहाल संबधी इतिहाच्या विकृतीकरणाचा थांबत नाही, तोवर टिपू सुलतानच्या स्वातंत्र्य संग्रामातील भूमिकेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आले. केंद्रीय मंत्री अनंत कुमार हेगडे यांनी टिपू सुलतानबद्दल अपशब्द काढले. हेगडे यांनी केलेली टीका काही नवीन नाही. याआधीही भाजप नेते व हिंदुत्ववादी संघटनांनी टिपू सुलतानच्या स्वातंत्र्य लढ्याबद्दल शंका उत्पन्न केली होती. त्यामुळे हेगडे यांच्या वक्तव्याला फारसं महत्त्व देण्यची गरज नाही. मुळात भाजप सरकारचा हा अजेंडा राहिला आहे. किंबहुना भाजपच काय तर अन्य पक्षातील सरकारचाही हाच अजेंडा आहे की, आर्थिक व राजकीय क्षेत्रात पक्षाची पिछेहाट सुरु झाली की लोकांना भावनिक मुद्द्यावरुन भडकवायचे व त्यातच त्यांना गुंतवून ठेवायचे. भारतीय राजकारण्यांची ही जुनीच भूमिका राहिली आहे. त्यामुळे ऐतिहासिक वादात वेळ व शक्ती वाया घालवण्यापेक्षा सरकारला ‘जेब की बात’वर जाब विचारायची गरज आहे. त्यामुळे इतिहासाचं विकृतीकरण हा चर्चेचा मुद्दा न होता देशाची आर्थिक घसरण का होतीय याबद्दल चर्चासत्र घेण्याची गरज आहे.
येत्या १० नोव्हेंबरला कर्नाटक सरकार टिपू सुलतानची जयंती साजरी करत आहे. यानिमित्तानं राज्य सरकारने प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय मंत्री अनंतकुमार हेगडे यांना निमंत्रण पाठवलं होतं. हेगडे यांनी कार्यक्रमाला येण्यस नकार देत सरकारच्या पत्रासह टिपू सुलतानबद्दल अपशब्द ट्विटरवर पोस्ट केले. यामुळे देशभरातील राजकारण पुन्हा एकदा मुस्लिम-हिंदू असं झालं आहे. या प्रकरणावर सुरु असलेल्या वादामुळे पुन्हा एकदा भाजपची हिंदू-मुस्लिम दूहीचं राजकारण काहीअंशी यशस्वी झाल्याचं दिसतंय. वरील राजकारण पाहता मला पुन्हा एकदा ‘दी इकॉनॉमिस्ट’ची जूनमधील कव्हर स्टोरी आठवतेय. या स्टोरीत पत्रिकेनं भाजप सरकारच्या आर्थिक धोरणावर टीका केली होती. यातून जनतेचे लक्ष वळवण्यासाठी भाजप धार्मिक ध्रूवीकरणाचं राजकारण खेळू शकतं, असा दावा ‘दी इकॉनॉमिस्ट’नं केला होता. हा अंदाज तंतोतंत खरा ठरतोय. टिपू जयंती वादाला भाजपनं हिंदू-मुस्लिम रंग दिलाय. टिपूचं ऐतिहासिक पात्र २०० वर्षानंतर पुन्हा भाजपकृपेनं जीवंत झालंय.
२०१५ साली कर्नाटकमधील काँग्रेस सरकारनं शासकीय खर्चातून ‘टिपू सुलतान जन्मोत्सव’ सोहळा साजरा करण्याची घोषणा केली. याला भाजपनं विरोध केला. या वर्षीपासून दरवर्षी केवळ विरोध करायचा म्हणून टिपू सुलतानबद्दल वाद उकरुन काढला जातोय. अठराव्या शतकातील पराक्रमी म्हैसूर शासक टिपू सुलतान यांच्याविरोधात अपशब्द काढल्याने केंद्रीय मंत्री हेगडे यांच्याविरोधात पहिली तक्रार नोंदवण्यात आली आहे. बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यात ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. यानंतर हैदराबाद, नागपूर इत्यादी ठिकाणी तक्रार नोंदवण्याची प्रक्रिया सुरु आहे. यासह माननीय राष्ट्रपतींना हेगडेविरोधात कारवाईसाठी हजारो पत्र पाठवण्यात आली आहे. याव्यतिरिक्त देशभरातील इतिहासप्रेमींना जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं आहे. टिपू सुलतानहबद्दल आक्षेपार्ह शब्द वापरल्याबद्दल हेगडे यांनी माफी मागावी अशी मागणी देशभरातून इतिहासप्रेमी नागरिक करत आहेत. 
गेल्या काही दिवसांपासून भारतात इतिहासाचं मोडतोड करण्याची स्पर्धा सुरु झाली आहे. अर्थातच सत्ताबदलाचं हे प्रयोजन आहे. त्यामुळे मागील सरकारने ही आपल्या सोयीप्रमाणे इतिहास वळविला होता. या सरकारने मुस्लिम शासक किंवा स्वातंत्र्य सैनिकांच्या प्रतिमेला धक्का लावला नव्हता. पण सध्याच्या भाजप सरकारने सत्तेवर येताच दिल्लीतील औरंगजेब रोडचं नामकरण केलं. हा मुस्लिम प्रतीकांचा इतिहास पुसून टाकण्याची पहिली पायरी होती. यानंतर राष्ट्रीय पातळीवर मुघलांचा इतिहास पाठ्यपुस्तकातून वगळण्यची चर्चा सुरु झाली. यासाठी नियोजितपणे मुस्लिम प्रतीकांना हिंदूविरोधी, राष्ट्रविरोधी सिद्ध करण्याचा आटापिटा सुरु करण्यात आला. कोणीतरी सुमार नेता उठून मुस्लिम प्रतिकांबद्दल अपशब्द वापरतो. पक्षातील वरीष्ठ मंडली काही न बोलता फक्त वाद कसा वाढेल याबद्दल काळी घेतात. अखेर वाद विकोपाला गेला तर काहीतरी सौम्य भूमिका घेऊन वादावर पडदा टाकायचा ही पद्धत सत्ताधारी पक्षाने सुरु केली आहे. मागे मुघलांसंदर्भात वाद सुरु असताना पीएम अचानक म्यानमारमधील अखेरचा मुघल बादशहा व स्वातंत्र्य सेनानी बहादूरशहा जफर यांच्या मजारीवर गेले. त्यामुळे हा वाद शमला. काही दिवसापूर्वी ताजमहल वादावर यूपीचे सीएमने ताज परिसरात झाडू मारुन वाद शमवला.  
भाजप हा मुस्लिमद्वेशी पक्ष असल्याचं आता लपून राहिलेलं नाहीये. त्यामुळे तेही आता उघडपणे भूमिका घेत आहेत. किंबहूना ते मुस्लिमांना एका प्रकारे आव्हान देत आहेत. स्वातंत्र्य आंदोलनात काडीचाही सहभाग नसलेला वर्ग आज मुस्लिम स्वातंत्र्यसेनानींना विलन ठरवण्यात अग्रेसर आहे. यातून कधी टिपू सुलतान तर कधी मुघलांना हिंदूविरोधी सिद्ध करण्याचा आटापिटा करत असतात. सत्तेत आल्यानंतर इतिहासाचं भगवेकरण करण्याचा सुनियोजित डाव भाजपनं सुरु केलाय. या कटशाहीवर आतापर्यंत बरंच लिखाण झालंय. तरीही मुस्लिम विरोधकांचे कुत्सित मनसुबे सुरुच आहेत. याचाच एक भाग म्हणून 'ताजमहल' वादाकडे बघण्याची गरज आहे. ताजमहल संदर्भात सुरु असलेल्या वादावर अनेकांनी सोशल मीडियावर चिंता व्यक्त केली आहे. 'ताजमहलचं बाबरी होता कामा नये' असा सूर एकंदरीत सोशल मीडियावर पाहायला मिळतोय. ताजमहलचे ऐतिहासिक दस्ताऐवज चुकीच्या पद्धतीनं सादर केले जात आहेत. याला पूर्वग्रहदूषित इतिहासाचे संदर्भ दिले जात आहेत.
भारतात इतिहास लेखनाची परंपरा मुळातच द्वेशधारी राहिलेली आहे. इतिहास लिहणाऱ्या वर्गाने सबंध इतिहास द्वेश व कमी लेखण्यातून रचला आहे. यातून इस्लाम व मुस्लिमद्वेशी राजकारण जन्माला आलं आहे. यावर अभ्यासक राम पुनियानी म्हणतात, 'भारतात गेली काही दशके मुस्लिम शासकांचे दानवीकरण करुन हिंदुत्ववादी इतिहासकार प्रस्थ माजवताना दिसत आहेत, जमातवादी शक्ती नेहमी इतिहासातील घटनांचा वापर त्यांच्या राजकारणासाठी करुन घेताना दिसतात. त्याच सूत्रांद्वारे भूतकाळातील मुस्लिम शासकांचेच प्रतिनिधी आजच्या मुस्लिम समाजाला ठरवून, आजचे हिंदू हे त्या मुस्लिम शासकांच्या अत्याचाराला बळी पडलेल्या हिंदूंचे वंशज आहेत असे मांडून मुस्लिमांचे दानवीकरण करण्यात येत आहे'
भारतात टिपू सुलतानला एक महान योद्धा म्हणून ओळखलं जातं. पण अलीकडे हा इतिहास पुसून टाकण्याचा प्रयत्न सुरु आहे. इतिहास संसोधक सरफराज शेख याला स्वातंत्र्य आंदोलनाची प्रतीकं मोडून टाकण्याचं षङ्यंत्र म्हणतात, ‘स्वातंत्र्य आंदोलनात मुस्लिमांचा सहभाग मोठा होता, याउलट संघानं स्वातंत्र्य विरोधी धोरणं आखली होती, हे पुराव्यातून सिद्ध झालंय, अशा वेळी शत्रूपक्ष आमच्यापेक्षा वरचढ ठरता कामा नये यातून मुस्लिमांची ऐतिहासिक प्रतीकं नष्ट करण्याचा कट राष्ट्रीय स्वंयसेवक संघ आखत आहे.’
सरफराज शेख यांच्या वक्तव्याला राम पुनियानीदेखील दुजोरा देतात, साहित्यिक राजन खान यावर एकदा म्हणाले होते, ‘सुधारणावादी इतिहास लेखकाची आज समाजाला गरज आहे. त्यामुळे तरुण अभ्यासकांनी समतोल इतिहास लेखनाची जबाबदारी स्वीकारावी.’
टिपू सुलतानच्या राक्षसीकरण सुरु असल्याने ही जाहीर चर्चा सुरु झाली आहे. पण अंतर्गत पातळीवर ऐतिहासिक प्रतीकं बदलण्याचं षङ्यंत्र हाणून पाडावं लागेल. इतिहासाच्या भगवीकरणामुळे आगामी काळात अनेक समस्या निर्माण होऊ शकतात, मुस्लिम शासकाचं दानवीकरणारचं षडयंत्र भारतात विवेकशील समाजनिर्मितीला बाधा पोहचवणारं आहे. त्यामुळे याची वेळीच दखल घेतलेली बरी, अन्यथा ताजमहलचंही बाबरी व्हायला वेळ लागणार नाही.  

- शकील बागवान
शाळा प्रवेशासाठी २५ टक्के आरक्षण
संपूर्ण महाराष्ट्रात समता निर्माण करण्यासाठी संताबरोबरच सामाज्सुधाराकांनी आयुष्यभर कार्य केले. सामाजिक व आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या समाजाच्या उन्नतीसाठी शिक्षण हे अत्यंत व प्रभावी साधन आहे याची जाणीव राज्यातील समाजसुधारकांना त्याकाळात झाली होती. त्यामुळे समाजाचा पराकोटीचा विरोध पत्करून क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांनी फातिमा शेख यांच्या मदतीने सावित्रीबाई फुले यांना शिकविले व त्यांना पुण्यात मुलींसाठी काढलेल्या पहिल्या वहिल्या शाळेची शिक्षिका म्हणून नियुक्त केले.
राजर्षी शाहू महाराजांनी मागासवर्गीय मुलांच्या शैक्षणिक गरजा ओळखून त्यांच्यासाठी वसतिगृह, शिक्षण संस्था स्थापन केल्या. शिक्षणच्या प्रसारासाठी प्रेरणादायी शिष्यवृत्त्या सुरु केल्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्वांत मोठे कार्य करताना शिक्षणातील राखीव जागाबाबत घटनात्मक तरतुदी केल्या. त्यातील तरतुदीनुसारच भारतातील सामाजिक व आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या समाजातील मुलांनी मोठ्या प्रमाणात शिक्षण घेतले. दरम्यान शिक्षणतज्ज्ञ लॉर्ड मेकॉले (इ.सन १८३५) प्रणीत शिक्षण पद्धतीमुळे मुलांचे शिक्षण  आणि शिक्षणानुसार त्यांच्यामध्ये अपेक्षित असलेली कौशल्ये व गुण यामध्ये फार मोठ्या प्रमाणात तफावत दिसते. परिणामी सुशिक्षित बेकारांचे प्रमाण वाढतच आहे. सामाजिक व आर्थिकदृष्ट्या वंचित समाजातील पालक आपल्या मुलांना मोठ्या कष्टाने तसेच हालअपेष्ट सहन करून शिकविण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतात. अशा शिक्षणातून विद्याथ्र्याच्या व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास व्हावा, तसेच प्राप्त होणारे शिक्षण व्यवसायभिमुख व जीवनाभिमुख असावे अशी मुख्य उद्दिष्ट्ये मात्र साध्य होताना दिसत नाही.कारण सर्वच विद्याथ्र्यांना दर्जेदार शाळांमधून शिक्षण मिळत नाही.
त्यामुळे शिक्षणाची कास धरून उज्ज्वल भविष्याची स्वप्ने पाहणाNया बहुजन पालक व विद्याथ्र्यांचा भ्रमनिरास होतो. त्यामुळे शिक्षणाबाबत समाज पालक आणि विध्याथ्र्यामध्ये अनास्था निर्माण होण्याच्या प्रमाणात सातत्याने वाढ होत आहे. परिणामी बहुजन समाज आणखी मागे ढकलला जात आहे.कठीण किंवा प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेऊन पुढे जाणारे बोटांवर मोजता येणारे विद्यार्थी याला अपवाद आहेत.यासाठी एकमेव उपचार आहे ते म्हणजे शिक्षण. मात्र शिक्षण म्हणजे केवळ नावापुरते दिले जाणारे शिक्षण नव्हे तर गुणवत्तापूर्ण शिक्षण होय.
आजच्या काळातील गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या व्याख्या करताना शिक्षणच्या माध्यमावर आधिक जोर देताना दिले जाणारे शिक्षण हे इंग्रजी माध्यमातून दिले पहिजे, तसेच ते रोजगारभिमुख व जीवनभिमुख असावे, कौशल्यावर आधरित असावे, मुलाचा सर्वागीण विकास करणारे शिक्षण असावे. या व अशा अनेक मुद्द्यांचा त्यात अंतर्भाव होतो. आपल्याला अशा प्रकारच्या अनेक शाला पहायला मिळतात, मात्र त्यातील बहुतांश शाळा या फक्त भौतिक सुविधांनी युक्त नि गुणवत्तेच्या बाबतीत सर्वात मागे. अशा शाळाची शैक्षणिक फीदेखील भरमसाठ असते. शासकीय बालवाडीपेक्षा इतर कोणत्याही बालवाडीत आपला पाल्य जाऊ द्यायाचा असेल तर फी मोजल्यशिवाय प्रवेशासाठीचे एक पानदेखील मिळत नाही. असे होत असल्याने सामजिक तसेच आर्थिकदृष्ट्या मागास जातीतील पालकांना त्यांचे पाल्य गुणवत्तापूर्ण शिक्षण देणाNया शाळामध्ये प्रवेशित कसे करता येतील?
शैक्षणिक क्षेत्रातील या सर्व मागासळेपणाचा सारासार विचार करता भारतीय राज्यघटनेतील अनुच्छेद २१ (क) मधील मुलभूत हक्कामध्ये मोफत व सक्तीच्या प्राथमिक शिक्षणांचा समावेश करण्यात आला आहे. त्याच अनुषंगाने भारतातील प्रत्येक राज्याने केद्र शासनाच्या धर्तीवर मोफत व सक्तीच्या प्राथमिक शिक्षणासंबंधी कायदे करुन त्याची अमलबजावणी करणे बंधनकारक आहे. करिता भारत सरकारने २६ ऑगस्ट २००९ रोजी राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीने बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क आधिनियम २००९ परित केला. प्राथमिक शिक्षणविषयक अधिसूचीद्वारे पारित केले. सदर अधिनियमास मार्गदर्शक मानून देशातील प्रत्येक राज्याने राज्यपातळीवर शिक्षण हक्क आधिनियम करणे आवश्यक ठरते. बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम २००९ हा संपूर्ण देशभर (जम्मू आणि काश्मीर वगळून) १ एप्रिलपासून २०१० पासून लागू झाला आहे. ८६ व्या घटना दुरुस्तीनुसार राज्य घटनेमध्ये २१ (क) या शिक्षणाच्या हक्कविषयक कलमाचा समावेश करण्यात आला. त्यानुसार महाराष्ट्र  शासनाने राज्याकरिता महाराष्ट्र बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क आधिनियम २०११ तयार केला. शिक्षण अधिकार अधिनियमामध्ये प्राथमिक शिक्षणविषयक शाळाची व शिक्षकांची गुणवत्ता वाढवणे, शाळेय सोयी सुविधा, शैक्षणिक साधने, शिक्षक विद्यार्थी प्रमाण, शालाबाह्य विद्याथ्र्याचे प्रवेश, या व यासरख्या इतरही बाबतीत तरतुदी करताना वंचित व आर्थिर्कदृष्ट्या दूर्बल गटातील बालकांच्या शिक्षणासाठी प्रत्येक शाळेच्या प्रवेशप्रक्रियेत प्रवेशक्षमतेच्या शेकडा २५ प्रवेश जागा राखीव ठेवण्याचे महत्त्वाचे धोरण या अधिनियमामध्ये आहे. या प्रवर्गातील विद्याथ्र्याच्या शैक्षणिक विकासाला चालना देणारे हे धोरण आहे. त्यामुळेच विद्याथ्र्यानाही मोठया शाळामधून शिक्षण घेणे शक्य होताना दिसत आहे.
शिक्षण अधिकार कायद्यानुसार शेकडा २५ राखीव जागेवर प्रवेश घेण्यास पात्र कोण कोण असतील?
वंचित गटातील बालके : १. अनुसूचित जातीतील बालके २. अनुसूचित जमातीतील बालके.
आवश्यक कागदपत्रे : बालकाचा जन्मदाखला,जातीचा दाखला (उपजिल्हाधिकारी, प्रांताधिकारी यांनी दिलेला बालक किंवा पालकांचा जातीचा दाखला), निवासाचा पुरावा : आधारकार्ड, रेशनकार्ड, लाईटबील, दूरध्वनी बील, निवडणुकीचे ओलखपत्र, यापैकी कोणतेही एका पुराव्याची साक्षांकित प्रत.
या गटातील बालकांना उत्पन्नाची अट नाही.पालकाचे उत्पन्न्न कितीही असले तरीही किंवा पालक शासकीय कर्मचारी असेल तरीही त्यांच्या पाल्याना २५ टक्के राखीव जागांमध्ये प्रवेश घेता येतो.
दूर्बल घटकातील बालके : ज्या बालकांच्य मातापित्यांचे वर्षिक उत्पन्न एक लक्ष रुपयांपेक्षा कमी आहे, असे भटके व विमुक्त जमाती, इतर मागासवर्गीय, विशेष मागासवर्गीय आणि राज्य शासनाने निर्धारित केलेले धर्मिक अलपसंख्यांक मुस्लिम, ख्रिश्चन, बौद्ध, जैन इ.समाजातील बालक तसेच ४० टक्के किंवा त्यापेक्षा जास्त अपंगत्व असलेले बालक.
आवश्यक कागदपत्रे : वंचित घटकातील बालकांसाठीची सर्व कागदपत्रे तसेच पालकांचा मागील वर्षाचा एक लाखांपेक्षा कमी उत्पन्न असलेला उत्पन्नाचा दाखला.
कोणत्या शाळेत २५ टक्के  जागा राखीव असतील?
ज्या शाळाना शासनाकडून अत्यल्प दरात जमीन, शिक्षक, कर्मचाNयांचे वेतन व अन्य सवलती मिळतात अशा सर्व खाजगी, विनाअनुदानीत, अनुदनित, अलपसंख्याक प्रकारच्या महाराष्ट्र राज्य, सीबीएसई, आंतरराष्ट्रीय बोर्डाच्या सर्व शाळा, अशा शाळाची यादी जिल्हा शिक्षणधिकारी यांचेकडे उपलब्ध आहेत.
शिक्षण आधिकार कायदा २००९ मधील २५ टक्के राखीव जागांबाबत तरतुदी :
१. प्रवेश पायरी : शाळेतील पहिला वर्ग हा त्या शाळेतील प्रवेशाचा एन्ट्री पॉइंट असेल. जर संबंधित शाळेतील पहिला वर्ग नर्सरीचा असेल तर त्या शाळेने नर्सरीमध्येच प्रवेश क्षमतेच्या एकूण शेकडा २५ जागा वंचित व दूर्बल घटकातील बालकांसाठी ठेवणे कायदेशीर बंधनकारक आहे.
२. फी : प्रवेश देण्यात येणाNया शेकडा २५ जागामधील लाभार्थीकडून कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जाऊ  नये, असा शासनादेश आहे. प्रवेश प्रक्रियेसाठीच्या छापील अर्जाची रक्कमही वसूलण्यात येऊ नये असे अपेक्षित आहे. उदा. शाळेचा गणवेश, बुट, दप्तर, पुस्तके या सर्व बाबी मोफत देण्यात याव्यात कारण या सर्व बाबीचे शुल्क  तसेच अशा प्रवेश प्रक्रियेतून भरलेल्या विद्याथ्र्यावर होणारा संपूर्ण वर्षभराचा एकूण खर्च परताव्याच्या रुपात शासन संबंधित शाळाना वर्षअखेरीस देत असते.
३. प्रवेशपूर्व प्रक्रिया : राखीव जागांवर दिल्या जाणाNया प्रवेशातील बालकांची कोणत्याही स्वरुपाची प्रवेशपूर्व परीक्षा तसेच मुलाखत घेणे आभिप्रेत नाही. कायद्याने असे करणे चुकीचे ठरविले जाते. कोणत्याही प्रकारे शाळेतील नियमानुसार प्रवेशाचे वय वगलता बालकाचा प्रवेश रोखता येणार नाही अथवा प्रवेशापासून वंचित ठेवता येणार नाही.
४. निवड : शाळेतील प्रवेशक्षमतेपेक्षा जास्त वंचित व दूर्बल घटकातील बालकांच्या प्रवेशासाठी पालकांनी प्रवेशासाठी हक्क सांगितल्यास अशावेळी प्रवेशात पारदर्शकता आणताना संगणकीय पदधतीचा वापर करावा. बाह्य बाबींचा हस्तक्षेप टाळावा.
शिक्षण आधिकार कायद्याने प्रवेश प्राप्त झाल्यानंतर :
१. प्रवेशित विद्याथ्र्यास आठव्या इयत्तेपर्यत नापास करता येणार नाही.
२. बालकांमध्ये भेदभाव करता येणार नाही : शिक्षण पदधती किंवा इतर कोणत्याही बाबतीत प्रवेशीत बालकाच्या बाबतीत भेदभाव झाल्याच्या तक्रारीनंतर त्याच्या तक्रारीमधील तथ्यांश संबधितांवर कायदेशीर  कारवाईस पात्र ठरेल.
३. तक्रार : प्रवेशप्रक्रियेच्या बाबतीत तक्रार असल्यास ती लेखी स्वरुपात शिक्षणधिकारी किंवा त्यानी आधिकार प्रदान केलेल्या तालुका गटशिक्षणधिकारी यांचेकडे सादर करावे तसेच प्राप्त दिनांकाच्या आठ दिवसाच्या आत त्यावर संबंधितांनी निणNय द्यावा.
४. अर्ज फेटाळताना : प्रवेशासाठी प्राप्त झाळेला अर्ज नियमानुसार नसेल आणि तो नाकारला गेला असेल तर असे नाकारण्याचे कारण शाळाप्रमुखांनी नमूद करणे आवश्यक आहे.तसे शाळाप्रमुख अर्ज नाकारलेबाबत अर्जदारांना तीन दिवसाच्या आत संबंधितांना कळवतील त्याची एक प्रत जिल्हा  शिक्षणधिकारी यांना सादर करतील.
५. अंतर : राखीव जागांवर प्रवेश मागणाNया बालकाचे राहण्याचे ठिकाण शाळेपासून तीन किमीच्या आत असेल तर त्यास प्रवेशासाठी प्राधान्यक्रम द्यावा. यामध्ये आवश्यक तेवढे प्रवेश न झाल्यास, प्रवेश देणे बाकी असल्यास तीन किमी अंतराची मर्यादा धरु नये व बालकास प्रवेश नाकारु नये.
प्रवेश प्रक्रियेतील अडथळे : शिक्षण आधिकार कायदा आस्तित्वात आल्यापासून शेकडा २५ शाळा प्रवेशाला घेऊन सातत्याने त्यात अडथळे निर्माण झाल्याचे दिसून आले. त्यातील कारणांचा उहापोह केला असता असे दिसून आले की, बहुतांश शाळा प्रमुखांकडून अपेक्षीत महिती पालकांपर्यत पोहचत नाही.परिणामी आवश्यकता असलेल्या गरजू बालकांना प्रवेशापासून वंचितच रहावे लागते. त्यातील काही मुददे येथे चर्चेला घेतले आहेत.
१. शाळाप्रमुख पालकांना सांगतात, हा कायदा आमच्या शाळेला लागू नाही.
२. शाळेला कायद्याची संपूर्ण महिती नसते.
३. प्रवेश अर्ज देण्यास टाळाटाळ करतात, प्रसंगी पाहोच देत नाहीत.
४. पालकांकडून प्रवेशानंतर वेगवेगल्या प्रकारची फी मागणी करणे.
५. शासनाकडून पुरविल्या जाणाNया सहित्याची पालकांकडून रक्कम मागणे.
६. इतर बालकांप्रमाणे काही सहित्य शाळेकडून न पुरवता परस्पर बाहेरुन खरेदी करण्यास भाग पाडणे.
७. हा कायदा नर्सरी तसेच बालवर्गासाठी नाही हे सांगणे व प्रवेश नाकारणे.
८. राखीव प्रवर्गातून प्रवेश मिलाळेल्या बालकांशी सापत्न वागणूक ठेवणे असे करणे हा गुन्हा आहे, याबाबत तक्रार प्राप्त झाल्यास संबंधितांविरोधात कायदेशीर कारवाई होऊ शकते.
९. शाळेचे प्रवेश वर्ग (एन्ट्री पोईट) सांगत नाहीत.
या सर्व अडथळ्यांवर मात करत सर्व शाळाप्रमुखांनी अत्यंत पारदर्शीपणे बालकाच्या प्रवेशासंबधी पालकांशी व्यवहार करणे अपेक्षित आहे. तसेच पालकवर्गानेही सर्व बाबी समजून घेणे आवश्यक आहेत.त्यातून न्याय्य प्रवेश प्रक्रिया पार पडेल.
सामजिक संस्था व पालकांची भूमिका :
वंचित तसेच दूर्बल घटकातील बालकांच्या शैक्षणिक प्रवेशाची राखीव प्रवर्गातील प्रक्रिया यशस्वीपणे पार पाडणे यासाठी सामजिक संस्थेसोबतच पालकांनीही काही बाबी करणे उचित ठरते. त्यामध्ये पुढील काही बाबीचा समावेश होतो.
१. शिक्षण अधिकार कायदा व्यवस्थित समजून घेणे व तो इतरांनाही समजावून सांगणे.
२. संपूर्ण महिती घेऊन वेळप्रसंगी शाळाप्रमुखांनाही समजवावी.
३. पालकांनी प्रवेश प्रक्रिया समजून घेऊन पाल्याच्या प्रवेशासाठी स्वत: जागरुक राहून प्रयत्न करावे.
४. पालकांनी व सामजिक संस्थांनी आपल्या परिसरातील शेकडा २५ राखीव जागांबाबत तालुकास्तरावरील गटशिक्षणधिकारी यांचेशी संपर्कात रहावे.प्रसंगी वरिष्ठ आधिकाNयांचाही संपर्क ठेवावा.
५. साक्षांकित प्रमाणपत्रे प्रवेशापूर्वी तयार ठेवावी.
६. भरलेल्या अर्जाची पोहोच शाळाप्रमुखांकडून अवश्य घ्यावी.
७. प्रवेशप्रक्रियेत आनियमितता आढळल्यास व तक्रार करावयाची असल्यास ती लेखी स्वरुपातच द्यावी.
८. सामजिक संस्थानीदेखील­ प्रवेशप्रक्रियेत सहभागी व्हावे. जनजागृती करावी. पालकांना सहकार्य करावे.
दर वर्षी जानेवारी – फेब्रुवारीमध्ये संपूर्ण महाराष्ट्रात  प्रवेश प्रक्रिया सुरु होत असून त्यासाठी शिक्षणधिकारी यांचेकडून स्वतंत्रपणे त्याचे सूक्ष्म नियोजन केले आहे. या संपूर्ण प्रक्रियेत पालकांनी व सामजिक सामजिक संस्थानी प्रवेश प्रक्रिया समजून घेऊन कार्य केल्यास गरजू बालकाला सहकार्य लाभेल. एकूणच शिक्षण अधिकार कायद्याची प्रभावी अंमलबजावणी झाली तर दूर्बल व वंचित समाजामधील बालके शिक्षण घेतील त्यामुळे या समाजामध्ये सामजिक व आर्थिक समता निर्माण होईल असा आशावाद आहे.


चहाडी करणे

    माननीय इब्ने उमर (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी चहाडी करणे, चुगलखोरी करणे आणि चुगलखोरी ऐकण्याची मनाई केली आहे. (हदीस : रियाजुस्सालिहीन)
ईर्ष्या
    पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘स्वत:ला ईर्ष्येपासून वाचवा. कारण आज जशी लाकडाला भस्म करते तशी ईर्ष्या पुण्यकर्मांना भस्म करते.’’ (हदीस : अबू दाऊद)

वाईट दृष्टी

    माननीय जरीर बिन अब्दुल्लाह (रजि.) यांच्या कथनानुसार, मी पैगंबर मुहम्मद (स.) यांना अनोळखी स्त्रीवर अचानक दृष्टी पडण्याच्या बाबतीत विचारले असता पैगंबर म्हणाले, ‘‘तुम्ही आपली दृष्टी दुसरीकडे वळवा.’’ (हदीस : मुस्लिम)
    माननीय बुरीदा (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी माननीय अली (रजि.) यांना सांगितले, ‘‘हे अली! एखाद्या अनोळखी स्त्रीवर अचानक दृष्टी पडल्यास दृष्टी दुसरीकडे वळवा. दुसऱ्यांदा तिच्याकडे पाहू नका. पहिली दृष्टी तुमची आहे आणि दुसरी दृष्टी तुमची नाही (शैतानची आहे).’’ (हदीस)
चांगल्या नीतीमत्तेचे महत्त्व
    पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘नीतीमत्तेचा चांगुलपणा सर्वांपर्यंत पोहचविण्यासाठी मला अल्लाहकडून पाठविण्यात आले आहे.’’ (हदीस : मुअत्ता इमाम मालिक)
स्पष्टीकरण : पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या पैगंबरीचा उद्देश असा आहे की लोकांची नीतीमत्ता व परिस्थिती सुधारावी. त्यांच्यातील वाईट सवयी मुळापासून नष्ट कराव्यात आणि त्यांच्या जागी चांगल्या सवयी निर्माण कराव्यात, हे शुद्धीकरण करणे हा पैगंबरांना पाठविण्यामागील उद्देश आहे. पैगंबर मुहम्मद (स.) यांनी आपल्या उक्ती व कृतीद्वारे अनेक चांगल्या शिष्टाचारांची सूची तयार केली आणि संपूर्ण जीवनामध्ये, जीवनातील अनेक क्षेत्रांमध्ये लागू केले आणि प्रत्येक प्रकारच्या स्थितीमध्ये त्यांचा अवलंब करण्याचा उपदेश दिला.
    ‘चांगली नीतीमत्ता’ (हुस्ने अ़खलाक) म्हणजे काय? याचे स्पष्टीकरण अब्दुल्लाह बिन मुबारक यांनी पुढील शब्दांत केले आहे- ‘‘हुवा तला़कतुल वज्हि व ब़जलुल मअरू़फि व क़फ़्फुल अ़जा.’’ म्हणजे चांगली नीतीमत्ता म्हणजे उत्साही चेहरा, (सद्कारणी) धनसंपत्ती खर्च करणे आणि कोणाला त्रास न देणे.
    पाहा चांगल्या नीतीमत्तेचा परीघ किती मोठा आहे.
    माननीय अब्दुल्लाह बिन अमर बिन अल-आस (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) कधी निर्लज्जपणाचे वक्तव्य करीत नव्हते, निर्लज्जपणाचे काम कधी करीत नव्हते आणि दुसऱ्यांना वाईट बोलत नव्हते. पैगंबर मुहम्मद (स.) म्हणत होते, ‘‘तुमच्यापैकी ज्यांची नीतीमत्ता चांगली आहे तेच लोक उत्तम आहेत.’’ (हदीस : बुखारी, मुस्लिम)
    माननीय मुआ़ज (रजि.) यांनी सांगितले, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी मला यमनला पाठविताना ‘रकाब’ (घोड्यावर किंवा उंटावर स्वार होताना पाय ठेवण्यासाठी बनविलेली लोखंडी कडी) वर पाय ठेवताना शेवटचे मार्गदर्शन केले ते असे, ‘‘लोकांशी सदाचाराने वागा.’’ (हदीस : मुअत्ता इमाम मालिक)

शिष्टता व सहिष्णुता

    माननीय इब्ने अब्बास (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी अब्दुल कैस कबिल्याच्या शिष्टमंडळाच्या प्रतिनीधीला (अशज या पदावर असलेला) म्हटले, ‘‘तुमच्यामध्ये दोन अशी गुणवैशिष्ट्ये आढळतात जी अल्लाहला पसंत आहेत, ती म्हणजे गंभीरता, शिष्टता व सहिष्णुता. (हदीस : मुस्लिम)
स्पष्टीकरण : अब्दुल कैस यांचे जे शिष्टमंडळ पैगंबर मुहम्मद (स.) यांच्याकडे आले होते त्यातील आणखी काही माणसे मदीनेला पोहोचताच पैगंबरांना भेटण्यासाठी घाईघाईत आले. त्यांनी न आंघोळ केली, न हात-तोंड धुतले आणि न आपले सामान कुठे व्यवस्थित ठेवले. ते दूरून आले होते, शरीरावर धूळ माखली होती. त्यांच्या विपरीत त्यांच्या प्रतिनिधीने कसलीही घाई-गडबड केली नाही. आरामात उतरले, सामान व्यवस्थित ठेवले, स्वारीच्या जनावरांना चारा-पाणी दिले, मग आंघोळ वगैरे करून शिस्तबद्धपणे पैगंबर मुहम्मद (स.) यांना भेटण्यासाठी आले.

(२४३) तुम्ही२६५ त्या लोकांच्या दशेचा विचार केला जे मृत्यूच्या भीतीने आपले घरदार सोडून निघाले होते आणि हजारोंच्या संख्येत ते होते? अल्लाहने त्यांना फर्माविले, मरा! नंतर त्याने त्यांना पुन्हा जिवंत केले.२६६ वस्तुस्थिती अशी आहे की अल्लाह मानवावर मोठी कृपा करणारा आहे, परंतु बहुसंख्य लोक कृतज्ञता व्यक्त करीत नाहीत.
(२४४)
मुस्लिमांनो! अल्लाहच्या मार्गात युद्ध करा आणि चांगलेच समजून असा की अल्लाह ऐकणारा व जाणणारा आहे.
(२४५) तुमच्यात असा कोण आहे की जो अल्लाहला चांगले कर्ज२६७ देईल की अल्लाह त्याला कित्येक पटीने वाढवून परत करील? घट करणेसुद्धा अल्लाहच्या अखत्यारीत आहे आणि वाढविणेदेखील, आणि त्याच्याकडेच तुम्हाला परत जावयाचे आहे.
(२४६) मग तुम्ही त्या घटनेवर विचार केला जी मूसा (अ.) च्या नंतर बनीइस्राईलच्या सरदारांच्या बाबतीत घडली होती? त्यांनी आपल्या नबीला सांगितले, ‘‘आमच्यासाठी राजा नेमून टाका की ज्यामुळे आम्ही अल्लाहच्या मार्गात युद्ध करावे.’’२६८ नबीने विचारले, ‘‘असे तर होणार नाही ना की तुम्हाला युद्धाचा आदेश देण्यात यावा आणि मग तुम्ही लढू नये?’’ ते सांगू लागले, ‘‘बरे हे कसे होऊ शकते की आम्ही अल्लाहच्या मार्गात लढू नये जेव्हा आम्हाला आमच्या घरातून काढण्यात आले आहे आणि आमची मुले-बाळे आम्हापासून वेगळी केली गेली आहेत.’’ परंतु जेव्हा त्यांना युद्धाचा आदेश दिला गेला तेव्हा एक अल्पशा संख्येशिवाय इतर सर्वजणांनी पाठ फिरविली आणि अल्लाह त्यांच्यापैकी प्रत्येक अत्याचाNयाला चांगलेच ओळखतो.

२६५)     येथून व्याख्यानाचा दुसरा क्रम सुरू होतो. यामध्ये मुस्लिमांना अल्लाहच्‌या मार्गात जिहाद आणि आर्थिक त्याग करण्यासाठी प्रवृत्त केले गेले आहे आणि त्यांना त्या कमजोरींपासून सुरक्षित राहण्याचे मार्गदर्शन दिले की ज्‌यांच्‌यामुळे बनीइस्त्राईल लोक विनाशाच्‌या खाईत कडेलोट झाले होते. या प्रसगांला समजून घेण्यासाठी ही गोï ध्यानात ठेवली पाहिजे की मुस्लिम या वेळी मक्काहुन बाहेर काढले गेले होते. दीड वर्षापासून मदीना येथे शरणार्थ म्हणून राहात होते. विरोधकांच्‌या अत्याचाराला कंटाळून पुन्हा पुन्हा विनंती करीत होते की आम्हास युद्ध करण्याची परवानगी मिळावी. परंतु जेव्‌हा त्यांना लढाईचा आदेश देण्यात आला तर त्यांच्‌यातील काहीजण पळ काढू पाहात होते. जसे की आयत नं. २१६ मध्ये स्पï केले आहे. म्हणून येथे बनीइस्त्राईली इतिहासातील दोन महÎवाच्‌या घटनांद्वारा त्यांना धडा घेण्यास सांगितले गेले आहे.
२६६)     हा संकेत बनीइस्त्राईल निघून जाण्याच्‌या घटनेकडे आहे. अध्याय माइदाच्‌या आयत नं.20 मध्ये अल्लाहने या घटनेला सविस्तर वर्णन केले आहे. हे मोठ्या संख्येने इजिप्तहुन निघाले होते. जंगलात आणि सपाटीवर बेघर सैरावैरा फिरत होते. एक सुरक्षित ठिकाण मिळण्यासाठी ते बेचैन होते. परंतु जेव्‌हा अल्लाहच्‌या परवानगीने आदरणीय पैगंबर मूसा (अ.) यांनी त्यांना आदेश दिला की अत्याचारी कनायीनांना पॅलेस्टाईनमधून हुसकून लावा आणि त्या क्षेत्रावर विजय प्राप्त करा. तेव्‌हा त्यांनी कच खाल्ली आणि पुढे जाण्यास नकार दिला. शेवटी अल्लाहने त्यांना चाळीस वर्षांपर्यंत जमिनीवर परागंदा फिरण्यासाठी सोडून दिले. त्यांची  एक  पिढी  नï  झाली  आणि  दुसरी  पिढी  वाळवंटात  जन्माला  येऊन  मोठी  झाली.  तेव्हा अल्लाहने त्यांना कनायीन लोकांवर वर्चस्व बहाल करून दिले. माहीत  होते  की  याच  घटनेला  मृत्यू  आणि  मृत्यूनंतर  पुन्हा  जीवन  देणे  या  शब्दांनी  व्यक्त  केले  आहे.
२६७)     अरबीमध्ये ""कर्जे हसन'' प्रयोग झाला आहे, मराठीत त्यास ""उत्तम कर्ज'' म्हणतात. याने अभिप्रेत निव्‌वळ चांगल्‌या हेतुने पुण्यप्राप्तीसाठी आणि निस्वार्थभावाने अल्लाहच्‌या मार्गात संपत्ती खर्च करणे आहे. यास अल्लाह आपल्‌यावरचे कर्ज समजतो आणि वचन देतो की मी फक्त मुद्दलच फेडणार नाही तर त्याहुन कित्येक पटीने जास्त देणार आहे.
२६८)     ही सुमारे एक हजार वर्ष इ. स. पूर्वीची घटना आहे. त्या वेळी बनीइस्त्राईल वर अमालिका प्रबळ झाले होते आणि त्यांनी इस्त्राईलींपासून पॅलेस्टाईन मोठ्या भागाला हिसकावून घेतले होते. समोएल नबी त्या काळी बनीइस्त्राईलींवर शासन करीत होते. परंतु ते फार म्हातारे झाले होते, म्हणून बनीइस्त्राईलच्‌या सरदारांनी दुसऱ्याला शासक म्हणून निवडून त्याच्‌या नेतृत्वात युद्ध करण्याचे ठरविले. परंतु त्या काळी बनीइस्त्राईलींमध्ये  अज्ञानता शिगेला पोहचली होती आणि ते मुस्लिमेतर चालीरीतींनी इतके प्रभावित झाले होते की खिलाफत आणि  बादशाहीमधील  अंतर  त्यांच्‌या  मनातून  केव्‌हाच  निघून  गेले  होते.  म्हणून  त्यांनी  जे  निवेदन केले ते  खलीफा नियुक्तीचे नव्‌हते तर एक बादशाह नियुक्तीचे होते. या संदर्भात बायबल ग्रंथ सॅम्युल भाग १ मध्ये विस्तृत तपशील आलेला आहे. ""सॅम्युएल जीवनभर इस्त्राईलींवर शासन करीत होता. तेव्‌हा सर्व इस्त्राईल बुजुर्ग मंडळी गोळा होऊन सॅम्युएल जवळ आले आणि त्याला विचारु लागले, ""पाहा, तू म्हातारा झाला आहेस, आणि तुझे पुत्र तुझ्या मार्गावर चालत नाहीत. तेव्‌हा तू आमच्‌यापैकी कोणालाही बादशाह म्हणून नियुक्त कर ज्‌याने इतरांप्रमाणे आमच्‌या वर शासन करावे.''

- मुहम्मद फारूक खान
मानवास जीवन मिळाले. त्यास या जीवनाचा अनुभव देखील होतो, मात्र असे लोक बोटावर मोजण्याइतकेच आढळतील ज्यांनी या जीवनाविषयी गांभीर्याने विचार केलेला असेल. साधारणतः मानव हा समतल आणि नाकासमोर पाहून जगण्याचा प्रयत्न करीत असतो. जीवनातील सखोल पैलूंवर विचार करण्यावर तो सहसा गांभीर्याने आपली विवेक शक्ती खर्ची करीत नसतो. याची काही स्पष्ट – अस्पष्ट कारणे आहेत.
   
मनुष्य ज्या वातावरण व परिवेशात जगतो आणि त्यातील प्रचलित क्रिया कलाप व भावना वगैरेत इतका मग्न होत जातो की, त्याची पावले आपोआपच त्या दिशेत उचलली जातात आणि मग जीवनाविषयी गंभीर आणि मौलिक प्रश्नांवर विचार करण्याची त्याला सवडच मिळत नाही. परिणामी, मानव हा प्राप्त जीवनाच्या आणि जीवनाविषयीच्या मौलिक प्रश्नांना सहसा गांभीर्याने घेत नाही.
जीवन म्हणजे काय?
    जीवनाचा अर्थ काय आहे? आपण आलो कोठून आणि कोठे जाणार? जन्मापासून मृत्यूपर्यंत मिळालेल्या या अल्पशा अवधीमध्ये आपल्याला काय करावयाचे आहे? काय व्हायचे आहे? जीवन हे अभिशाप आहे की वरदान आहे? योगायोग आहे की यांच्याशी एखाद्या दायित्व अगर कर्तव्याचा संबंध आहे? आपोआप प्राप्त होणारे आहे की शोधून सापडणारे आहे? परिपूर्ण आहे की अपूर्ण आहे? सुरवात आहे की आदि ते अंतापर्यंत सर्व काही आहे? या जीवनाचा कोणी दातासुद्धा आहे की नाही? या प्रश्नांचे उत्तर कोठे सापडेल? कोण देईल? जर एखादा जीवनदाता असेलच तर त्याने या प्रश्नाचे उत्तर सुद्धा दिले की केवळ जीवन प्रदान करून समाधान मानले?
    वस्तुतः या प्रश्नांचा मानव जीवनाशी अत्यंत दृढ संबंध आहे. जगात कोणीही या प्रश्नांना जीवनाशी पृथक समजू शकत नाही. एवढेच नव्हे तर जीवनाचा आरंभच मुळात या प्रश्नांवर आधारित आहे. म्हणून या प्रश्नांवर मानव पूर्वीपासूनच विचार करीत आला आहे.   
    जीवनासंबंधी असलेल्या या प्रश्नांवर विचार करणे म्हजणे हा केवळ दार्शनिक अभिरूची आणि कल्पना विलास नसून मानवाच्या जीवंत इच्छा, आकांक्षा, कामना आणि गरजांशी याचा दृढ संबंध आहे. कारण मानव प्रत्येक गोष्टीची उपेक्षा करू शकतो. परंतु, आपल्या मनाला तो कुठे घेऊन जाईल?
मानवी मनाची प्रबळ इच्छा
    मानवी मनाची एक अत्यंत प्रबळ इच्छा अशी आहे की त्याच्या जीवनाचा कधीही अंत होता कामा नये. त्याला आपण मरावे असे मुळीच वाटत नाही. हे कधीही न संपणाऱ्या वसंत ऋतूचे स्वप्न उराशी बाळगून असतो. एकदाचा जन्म घेऊन मातीत सदासर्वदा लुप्त होण्याची त्याची मूळीच इच्छा नसते. त्याला हे आवडतच नाही की त्याच्या जीवनाचा मृत्यूच्या रूपात अंत व्हावा. म्हणूनच तो मृत्यूच्याही पलीकडे पाहण्याचा प्रयत्न करतो, मृत्यूपलीकडील रहस्याविषयी चित्र, विचित्र, विलक्षण आणि नाना-प्रकारच्या कल्पना करीत असतो.
इस पार प्रिये मधु है तुम हो, उस पार न जाने क्या होगा
    जीवनाच्या सुख, चैन, आनंदात तो इतका मग्न झालेला असतो आणि आनंदाच्या मोहपाशात तो इतका गुरफटून जातो की, त्याला या गोष्टीचा विचार करण्याची कधी सवडच मिळत नाही की, हे आनंद, हा प्रमोद आणि हा विलास कोठून प्राप्त झाला आणि किती काळ टिकणार आहे? मात्र दुःख आणि कष्ट असेल तर मात्र परिस्थिती अगदीच भिन्न असते. दुःख आणि कष्ट असल्यास माणूस मात्र या गोष्टीवर विचार करण्यासाठी विवश होतो की हे काय झाले? जो आनंद, सुख आणि प्रमोद आपल्या जीवनात होता तो का निघून गेला, कोणी व का हिरावून घेतला, हे सुख आपल्याकडे कायमस्वरूपी होते की क्षणभंगूर होते आणि शेवटी गेले तर नेहमी करिता गेले की परत आपल्याला मिळेल? मानवाचे हेच दौर्बल्य आहे आणि याच्याच परिणाम स्वरूपी तो स्वतः विषयी आणि या सृष्टीविषयी विचार करण्याची सहसा तसदी घेत नसतो. आपल्या अस्तित्व-स्त्रोताविषयी विचार करण्याच्या भानगडीत पडत नसतो. तो अशाही भानगडीत पडत नसतो की आपल्याला हे जीवन कसे आणि कोठून मिळाले, मात्र जेव्हा तो आपल्या प्रियजनांना मृत्यूशय्येवर तडफडत मरताना पाहतो तेव्हा मात्र त्याला जाग येते. अशा दुःखद परिस्थितीत त्याची हरवलेली शुद्धी परत येते. मन मस्तिष्कावरील सुख आणि मौज मस्तीची झिंग क्षणार्धात लुप्त होते. अगदी कठोर व पाषाण र्‍हृदयी व्यक्ती सुद्धा मृत्यूशी झूंज देणाऱ्या आणि मृत्यूच्या कू्र जबड्यात जगण्याचा आक्रोष करणाऱ्याची केविलवाणी अवस्था पाहून तात्काळ भानावर येते. मानसिक समाधाना करिता तिला भौतिक सुखसाधने व्यर्थ आणि निरर्थक व अस्तित्वशुन्य वाटू लागतात. मग तिच्यासमोर एक वस्तुस्थिती प्रकट होते की ”या ठिकाणी आत्मशांती व आत्मसमाधानासाठी जगातील कोणत्याही भौतिक सुखसामग्री व्यतिरिक्त कोणत्या तरी अन्य गोष्टीची आवश्यक आहे.”
    मृत्यू आणि दुःखाच्या या प्रसंगी आणखीन बऱ्याच गंभीर बाबींकडे आपले लक्ष जाते आणि हे स्वाभाविक आहे. साधारणतः आपली विवेक शक्ती जड होते आणि जीवनाच्या गहन समस्या गहन विषयाकडे आपले लक्ष जात नाही. मात्र दुःख, यातनाआणिसमस्यांच्याअनुभवामुळेविवेकशुन्यबुद्धीतचैतन्यसंचारते आणि म्हणूनच दुःख आणि यातनांच्या आरशातच माणसाला जीवनाच्या गंभीर स्वरूपाचे दर्शन घडते. सुख-शांती आणि आनंद व मौजमजेच्या वातावरणात जीवनाचा खरा अर्थ उलगडतच नाही. संवेदशनशील माणसाला मात्र निश्चितच या गोष्टीची जाणीव होते की जीवनातील सर्व प्रकारच्या सुखसुविधा उपलब्ध असून सुद्धा आणखीन असंख्य इच्छा-आकांक्षा अशा असतात ज्या पूर्ण होणे शक्य नसते. शिवाय अशा कित्येक कामना इतक्या उलट आणि आकर्षक असतात की मानवी स्वभावास त्याची उपेक्षा करणे शक्य नसते. त्या पूर्ण न होणे हे माणसाला अत्यंत दुःखद वाटतात.
    आपले प्रियजनांचे आपल्याला सोडून जाणे आणि नेहमी करिता त्यांचे दूर होणे, ही एक अशी हृदयद्रावक घटना आहे. जी सहन करणेदेखील अशक्य असते. अशा प्रसंगी माणूस पूर्णतः खचून जातो. तो नैराश्य आणि वैफल्याच्या भयानक सागरात बुडून जातो. त्याचेअंतर्मनहीगोष्टस्वीकारण्यासतयारचनसतेकीमरणारीव्यक्तीत्यालानेहमीसाठीसोडूनजातआहे. आपल्या डोळ्यांसमोर सर्वकाही घडत असताना पाहून सुद्धा नकळत त्याच्या मनात मरणाऱ्या व्यक्तीच्या पुनर्मिलनाची आशा निर्माण झालेली असते.
    बरेच जण सत्कार्यात व्यस्त असतात. त्यांचा त्याग आणि समर्पण महान असतो. मात्र त्यांच्या वाट्याला दुःख आणि अनादराशिवाय काहीही येत नाही. याउलट असंख्य दुष्कर्मी, दुष्ट व दुराचारी जीवनभर इतरांवर अन्याय व अत्याचार करीत असतात. त्यांनी लावलेल्या अन्याय व अत्याचाराच्या भयंकर आगीत मानवतेचे हवन होत असते. हे दुराचारी या आगीत असत्य आणि दुराचाराचे असे इंधन टाकीत असतात की, ही भयानक आग शतकानुशतके विझत नाही. त्यात जळणाऱ्या अन्यायग्रस्त आणि अत्याचार पीडितांचे काळीज फाडणारे अवार्त टाहो युगायुगांपर्यंत ऐकावयास मिळतो. मात्र असे दुष्ट आणि दुराचारी नेहमी मौजमजाच करीत असतात. त्यांना साधा काटाही रूतत नाही. त्यांना जीवनाचे सर्व भोगविलास भोगायला मिळतात. सर्वत्र आनंदी – आनंद आणि जीवाचे अवास्तव मागणी पुरविण्याची सामग्री उपलब्ध असते. या ठिकाणी एक संवेदनशील माणूस विचार करू लागतो की, हे काय चालले आहे? आपण काय पाहतोय? ही काय अवस्था आहे? चांगले कर्म करणाऱ्यांना आणि सदाचाऱ्यांना त्यांच्या सेवा,  पुण्य आणि सदाचाराचे काही फळ मिळेल काय?  या जगामध्ये सद्गुण आणि सदाचाराची भावना हा केवळ एक धोका तर नव्हे? पाप आणि पुण्य, सदाचार आणि दुराचार, न्याय आणि अन्याय व अत्याचारात मुळात तात्विक आणि प्रभावी फरक आहे की नाही?
    मग अशा संवेदनशील आणि विचारशील व्यक्तीच्या मनात हा प्रश्न सुद्धा निर्माण होतो की, हे जीवन आणि हे सृष्टीचक्र नेहमी व सदाकरिता चालू असेल काय? त्याला हे सुद्धा दिसते की, या जीवनसृष्टीत माणूस एकीकडे मरण पावतो तर दुसरीकडे मात्र माणसांच्या जन्माचा क्रम सुरू असतो. पशु-पक्षी आणि वनस्पतींची सुद्धा हीच अवस्था आहे. त्यांचा वंश सुद्धा चालू आहे. त्यामुळे सर्वत्र हिरवळ दिसू लागते. जीवन असण्याचा भास होतो.  पूर्ण सजीवसृष्टीने प्रस्थान केलेले असते आणि त्या ठिकाणी परत इतरांचा जन्म होतो, सर्वत्र जीवन फुललेले, बहरलेले दिसते. येथील जीवनक्रम सतत सुरू असते. मात्र हा क्रम असाच सुरू राहणार काय? लोक याप्रमाणे मरतील, त्यांच्या ठिकाणी दुसऱ्यांचा जन्म होत राहील, हा क्रम केव्हापर्यंत सुरू असेल की एकदाचा या क्रमाला कोठेतरी ब्रेक लागेल? वायु, जल, प्रकाश, ऊर्जा वगैरेंसारख्या भौतिक शक्ती अशाच प्रकारे नेहमी कार्यरत असतील का? की कधीतरी समाप्त होतील? ही विश्व व्यवस्था अशीच कार्यरत राहणार की एखाद्या निश्चित वेळेवर नष्ट होईल? मग यानंतर काय असेल? सर्वत्र फक्त पोकळीच असेल काय? की जगातील कार्यरत ऊर्जा शुन्यात विलीन होऊन नव्या जीवनाचा व नवीन विश्वाचा शुभारंभ होईल? अथवा या वर्तमान जीवनाचा मनोरम खेळ सदैवासाठी समाप्त होईल आणि मग कोणीही नसणार व काहीही नसणार? या करिता कोणीतरी बाकी राहणार काय, ज्याला या गोष्टीच्या आठवणी राहतील की या ठिकाणी एकदा कधीतरी जीवन नावाची बाब अस्तित्वात होती, येथे सजीवसृष्टी कार्यरत होती, जीवन बहरलेले आणि फुललेले होते, सुर्योदय होत होता, रात्र होताच चंद्र-ताऱ्यांची विलोभणीय चादर आकाशात मन आकर्षित करीत होती, पक्ष्यांचा कर्णमधूर चिवचिवाट होत होता, पाण्याचे खळखळणारे झरे वाहत होते. नयनरम्य दृष्य होते आणि जीवनाशी संबंधित मनोरम कथाराग-विराग व रूदन आणि हास्याची मैफल होती आणि हे सर्वकाही नेहमीसाठी नष्ट पावले.
    अथवा ही जीवनसृष्टी एकदाची अंत पावल्यावर परत एखादी प्रगतीशील व उच्चकोटीची जीवनसृष्टी अस्तित्वात येईल? जर अस्तित्वात आली तरी वर्तमान जगातील प्राणी यात दाखल होऊ शकतील काय की तेथे आपल्या व्यतिरिक्त इतर जनांचे वास्तव्य असेल? आणि जर या वर्तमान जगातील सजीवांना प्रवेश मिळालाच तर मग ते जीवन त्यांच्या वर्तमान जीवनाच्या एखाद्या पैलूचा ऋणी असेल काय? दुसऱ्या शब्दांत त्या जीवनामध्ये वर्तमान जीवनाच्या चांगल्या वाईट विचार, भाव, कर्म वगैरेंचाही आधार असेल किंवा नसेल?
    हे आणि अशाप्रकारची आणखीनही बरेच प्रश्न मानवीमन-मस्तिष्कात निर्माण होतात. मग या प्रश्नांचे समाधानकारक उत्तर सापडणे कठीण होते किंवा समाधान होऊन जाते अथवा न झाल्यास त्याच्या नशिबी नैराश्य येते. एखाद्या वैफल्यग्रस्त माणसाप्रमाणे त्याची मनोवृत्ती होत असते. या निराश मनोवृत्तीमुळे तो जीवनातील प्रत्येक चांगल्या वाईट बाबींशी समझोता करून जीवनाचा गाडा रेटत असतो. मिळेल ते स्वीकारीत असतो, न मिळाल्यास प्रयत्न करीत असतो आणि प्रयत्नानंतर ही मिळत नसेल तर मात्र समझोता आणि सबुरीने घेत असतो. म्हणूनच अशा मानसिक अवस्थेत अडकून तो याच वर्तमान जीवनावर आणि मिळेल त्याव समाधान मानून याच जीवनास प्रथम व अंतिम आणि सर्व काही समजून बसतो आणि याच विचार व समाधानाच्या आधारे जीवन जगत असतो, जीवनास आकार देण्याचा प्रयत्न करीत असतो. त्याला याच वर्तमान जीवनाचे सुख-दुःख वाटतात. याच जीवनातील प्राप्त होणाऱ्या यशास अंतिम यश आणि अपयशास अंतिम अपयश समजत असतो त्याच्या दृष्टीत याच जीवनातील यशापयश, सुखः दुख आणि जीवनातील चढउतारा शिवाय आणखीन कोठेही कशाचेच अस्तित्व नसते.    
    भविष्याकडून निराश झाल्यावर सुद्धा माणसाच्या समस्यांचा अंत होत नसतो. हे जरी मान्य केलेकी, हेच जीवन अंतिम जीवन आहे आणि यानंतर काहीही नाही. तरी सुद्धा हा प्रश्न बाकी राहतोच आणि उत्तराची मागणी करतो की सद्भावना, पुण्य आणि सदाचारासारख्या गोष्टी एखाद्या कविचा कल्पना विलास आहे? येथे संपत्ती आणि धनाला किंमत आहे मात्र माणसाला कवडी किंमत नाही. मग त्या जगाची अवस्थाही अशीच दयनीय आणि शोचनीय असेल काय की यापेक्षा भिन्न असेल? अथवा ही भिन्नता वर्तमान जीवनाचे विरोधात्मक रूप नसून विकासात्मक रूप असेल काय? (क्रमशः)
(उर्दूतून मराठी भाषांतर सय्यद जाकीर अली)

- रामपुनियानी 

भारत फक्त प्राकृतिक सौंदर्याने नटलेला देशच नाहीतर या ठिकाणी मानवनिर्मित चमत्कारांची संख्याही कमी नाही. जे सगळ्या जगातून पर्यटकांना आपल्याकडे आकर्षित करत असतात. अचंभित करून टाकणाऱ्या जागतिक इमारतींपैकी ताजमहाल एक अशी इमारत आहे ज्याची निर्मिती मुगल बादशाह शहाजहानने आपल्या प्रिय पत्नी मुमताजमहेल हिची आठवण म्हणून केली होती.
ताजमहल जगातल्या सात आश्चर्यांपैकी एक आश्चर्य आहे. युनेस्कोने याला विश्वधरोहरस्थळ म्हणून घोषित केलेले आहे. कवि रविंद्रनाथ टागोरबद्दल म्हटलेले आहे की, ’कालके कपोल पर रूकी हुई अश्रू की एक बूंद’. यात कुठलाही संशय नाही की ताजमहल भारतातील सर्वात मोठी पर्यटकांना आकर्षित करणारी इमारत आहे. परंतु, उत्तर प्रदेशच्या योगी सरकारला याच्याशी काय देणे घेणे नाही. नुकतेच सत्तेमध्ये सहा महिने पूर्ण केल्याच्या निमित्ताने योगी सरकारने राज्याच्या पर्यटनाला चालना देण्यासाठी एक पुस्तिका प्रकाशित केली. ज्याचे शिर्षक होते, ’उत्तर प्रदेश पर्यटन- अपार संभावनाएँ’ यात ज्या पर्यटनस्थळांचा परिचय करून देण्यात आलेला आहे. त्यात स्वतः मुख्यमंत्री ज्या पीठाचे प्रमुख आहेत त्या गोरखनाथ पीठासह अनेक पर्यटन स्थळांच्या नावाचा समावेश आहे. या पुस्तिकेमधून धार्मिक पर्यटन स्थळांवर जास्त लक्ष वेधण्यात आलेले आहे. सर्वात आश्चर्यजनक बाब म्हणजे उत्तर प्रदेशमधील सर्वात प्रसिद्ध पर्यटन स्थळ ताजमहलचे नाव या पुस्तिकेतून गायब आहे. 
मुख्यमंत्री बनताच योगी आदित्यनाथयांनी म्हटले होते की, ताजमहल भारतीय संस्कृतीचा भाग नाही आणि विदेशी पाहुण्यांना ताजमहलची प्रतिकृती भेट देण्याची परंपरा समाप्त व्हायला हवी. त्या जागी गीता आणि रामायणांच्या प्रती भेट स्वरूप दिल्या गेल्या पाहिजेत. त्यांच्या अनुसार ही दोन्ही पुस्तके भारतीय संस्कृती ची प्रतिके आहेत. ताजमहल विषयी योगीच्या या भुमिकेने त्यांचा जातीयवादी चेहरा उघडा केलेला आहे. जेव्हा या मुद्यावरून मीडियामध्ये सरकारवर टिका केली गेली तेव्हा एका मंत्र्याने म्हटले की, ताजमहाल भारतीय विरासतीचा हिस्सा आहे. परंतु, पुस्तिकेमध्ये याचा उल्लेख केला नाही गेला की त्याच्यात फक्त अशा पर्यटन स्थळांचा उल्लेख केला आहे ज्यांचा प्रचार करणे आवश्यक होते. त्यांनी हेही म्हंटले की ताजमहलच्या देखरेखीसाठी सरकारने वेगळा निधी मंजूर केलेला आहे. एवढेच नव्हे तर आग्रामध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाच्या विमानतळाचाही प्रस्ताव विचाराधीन आहे. याबाबतीत भाजपाच्या गोटातून वेगवेगळ्या प्रकारचे सूर ऐकायला मिळत आहेत. कोणी म्हणतंय ताजमहाल एक हिंदू मंदिर आहे, कोणी म्हणतंय ते काय विशेष महत्वाचे स्मारक नाही. तर कोणाचे म्हणणे आहे की हे तर भारताच्या गुलामगिरीचे प्रतिक आहे. भाजपा नेता संगीत सोमनी याबद्दल म्हंटलेले आहे की, ”कई लोगों ने इस बात पर दुःख व्यक्त किया के राज्य सरकार की पर्यटन पुस्तिका मे ताजमहल का नाम हटा दिया गया. हम किस इतिहास की बात कर रहे हैं. क्या उस इतिहास की जिसमें ताजमहल के निर्माताने अपने पिता को जेल में डाल दिया था. क्या हम उस इतिहास की बात कर रहे हैं जिसमें इस स्मारक के निर्माताने उत्तर प्रदेश और भारतसे हिंदूओंका सफाया कर दिया था. ये दुःखद और दुर्भाग्यपूर्ण है के इस तरहके अततायीशासक अबभी हमारे इतिहास का हिस्सा हैं”. सोमयांचे हे वाक्य भाजपाच्या विचारधारेला स्पष्ट करण्यास पुरेसे आहे. खरे पाहता ताजमहलला भेट देणाऱ्यांची संख्या गेल्या काही वर्षांपासून कमी होत आहे. म्हणून ताजमहलची जाहिरात करणे गरजेचे आहे. 
प्रश्‍न हा आहे की ताजमहलचे नाव पुस्तिके मधून का हटविले गेले. योगी ताजबद्दल जे वक्तव्य करत होते त्यावरून स्पष्ट आहे की ते ताजमहलला पसंत करत नाहीत. ताज एका अशा व्यक्तीने निर्माण करवून घेतला आहे ज्याला हिंदुत्ववादी विचारधारा आक्रमणकारी मानते. भारतीय संस्कृतीसंंबंधी गांधीसारख्या नेत्यांची परिभाषा ही योगी आणि हिंदुत्वयांच्या विचारधारेपेक्षा एकदम वेगळी आहे. भाजपा आणि हिंदुतत्ववाद्यांसाठी हिंदू संस्कृती ही भारतीय संस्कृती आहे. यापेक्षाही पुढे जावून काही संघवादी असेही म्हणत आहेत की, ताजमहाल एक हिंदू मंदिर आहे ज्याचे नाव तेजोमहालय होते. हा दावा इतिहासाच्या कसोटीवर टिकत नाही. शहाजहानवर लिहिलेल्या बादशाहानामा या पुस्तकात स्पष्ट म्हटलेले आहे की, ताजमहालची निर्मिती शहाजहाननेच करवून घेतली होती. त्याकाळात भारतात आलेला एक युरोपीय पर्यटक पीटर मुंढीने लिहिलेले आहे की, ’शाहजहान आपल्या प्रिय पत्नीच्या मृत्यु मुळे दुःखाच्या सागरात बुडालेला आहे आणि तिची आठवण म्हणून एक शानदार मकबरा तयार करवून घेत आहे. ’एक प्रसिद्ध फ्रांसीसी सोनार टेवरनियर जो त्या काळात भारतात होता ने सुद्धा हेच म्हटलेले आहे, जे की पीटर मुंढीने म्हटलेले आहे. शाहजहान यांच्या वही खात्यामध्ये ताजमहलच्या निर्मितीचा जमाखर्च लिहिलेला आहे. ज्यात संगमरवरी दगड खरेदी आणि मजुरांना दिलेली मजुरी यांचा तपशील नमूद आहे. ताजमहालला शिवमंदीर म्हणणाऱ्यांचे म्हणणे हे आहे की, ज्या जमिनीवर ताजमहाल तयार करण्यात आला ती जमीन शाहजहानने राजा जयसिंग यांच्याकडून खरेदी केली होती. इथे एक गोष्ट लक्षात ठेवण्याजोगी आहे की, जयसिंह एक वैष्णव होते. आणि एका वैष्णव राजाकडून शिवमंदिर निर्माण करण्याची अपेक्षा केली जाऊ शकत नाही. 
खरे पाहता ताजमहलचे महत्व कमी करण्याचे हे प्रयत्न भारतीय इतिहासाचे पुर्नलेखन करू पाहणाऱ्या हिंदुत्ववादी योजनेचा एक भाग आहे. या योजने अंतर्गत इतिहासाची व्याख्या जातीयवादी आधारावर केली जात आहे. सत्य घटनांचा विपर्यास केला जात आहे. दावा तर इथपर्यंत केला जात आहे की, राणा प्रताप आणि अकबर यांच्यामध्ये हलदीघाटी येथे जे युद्ध झाले होते त्यात राणा प्रताप विजयी झाले होते. वास्तविक पाहता हलदी घाटीचे युद्ध सत्तेसाठी लढले गेले होते धर्मासाठी नव्हे. आपण सर्व जाणून आहोत अकबर आणि राणा प्रताप या दोघांच्याही साह्यकांमध्ये हिंदू आणि मुसलमान दोन्ही धर्माचे लोक सामिल होते. ना अकबर इस्लामचा रक्षक होता ना राणा प्रताप यांनी हिंदू धर्माची ध्वजा उचलली होती. ते दोघेही आपापल्या साम्राज्याचा विस्तार करू इच्छित होते. 
असं वाटतंय की ताजमहल आणि मुस्लिमराजांद्वारे निर्माण केलेल्या अनेक दुसऱ्या इमारती जातीयवादी शक्तींच्या डोळ्यांमध्ये खटकत आहेत. आता जेव्हा हिंदुतत्वादी सत्तेत आलेले आहेत तेव्हा त्यांनी ताजमहालला भारतीय इतिहासातून संपविण्याचा प्रयत्न चालविलेला आहे. फक्त ताजमहलच नव्हे तर ते कदाचित मुस्लिमांनासुद्धा वेगळे पाडू इच्छितात. या लोकांचे पुढील टार्गेट लाल किल्ला आहे काय? जेथून देशाचे पंतप्रधान स्वातंत्र्यदिनी देशाला संबोधित करतात. ताजमहल आणि अशाच प्रकारच्या दुसऱ्या ऐतिहासिक इमारती भारतीय संस्कृतीचा अविभाज्य घटक आहेत. त्यांचे संरक्षण आणि संवर्धन आवश्यक आहे. जेणेकरून भारताच्या गंगा-जमनी संस्कृतीला चालना देता येईल.
 (इंग्रजीतून हिंदीत अमरिश हरदेनिया तर हिंदीतून मराठीत एम.आय.शेख, बशीर शेख यांनी भाषांतर केले.)

एम.आर.शेख

हरसाज में होती नहीं ये धुन पैदा, होता है बडे जतनसे ये गुण पैदा
मिजान-ए-निशातो-गममें सदियों पलकर होता है हयातमें तवाजुन पैदा
आजकाल विकास वेडा झालाय हे वाक्य खूपच लोकप्रिय झालेले आहे. विकासाचे तर माहित नाही मात्र देशातील अनेक लोकांचा विवेक वेडा झालाय हे मात्र निश्चित. ते कसे? हे आपण पाहूया.

सर्वप्रथम आपल्या देशाच्या प्रगतीचा आढावा घेऊ या. असा आढावा घेतांना फक्त भौतिक प्रगतीच नव्हे तर सामाजिक प्रगतिचा सुद्धा या ठिकाणी विचार करावा लागेल. सामाजिक प्रगती मोजताना त्या समाजाची नैतिक परिस्थिती कशी आहे? हे पहावे लागेल. ती पाहण्यासाठी समाजातील लोकांच्या सवई कशा आहेत हे तपासावे लागेल. समाजात अधिक संख्या कशा लोकांची आहे? ते प्रामाणिक आहेत काय? त्यांच्यात जबाबदारीची जाणीव आहे काय? कर्तव्यकठोर कितपत आहेत? त्यांना सामाजिक बांधिलकीची जाण आहे काय? श्रीमंत लोकांना गरिबांचा कळवला आहे काय? लोकांचे जीवन पवित्र आहे काय? पुरूषांना स्त्रीयांविषयी आदर आहे काय? आपल्याचसारख्या इतरमाणसांच्या जीवाची त्यांना कितपत पर्वा आहे? वेगवेगळ्या जातीसमुहांमध्ये एकात्मता आहे का? देश आर्थिकदृष्ट्या प्रगतीपथावर आहे की नाही? संपत्ती निर्मिती मुठभर लोकांकडूनच होते की त्यात मोठ्या प्रमाणात देशातील लोक सामिल आहेत? संसाधने किती लोकांच्या हाती आहेत? आर्थिक विषमता किती आहे? कारण कितीही उत्पादन झाले तरी त्यांचे समान वितरण होत नसेल तर त्यात काहीच अर्थ राहत नाही. अनुत्पादक क्षेत्रात प्रगती होत आहे की उत्पादक क्षेत्रात प्रगती होत आहे? सिनेमा व इतर मनोरंजन क्षेत्रात कोटी-कोटींची उलाढाल होऊन हजारो सिनेमा तयार होत असतील तरी त्यांचा काहीच उपयोग नाही. कृषी व अन्य जीवनावश्यक वस्तूंच्या क्षेत्रात किती उत्पादन होत आहे? त्याचे वितरण कसे होत आहे? यावर सर्वसामान्यांचे जीवनमान अवलंबून असते. 
या सर्व प्रश्नांचा एकत्रित विचार केला तर आपल्या देशात निर्मिती कमी नुकसान जास्त होत असल्याचे चित्रदिसेल. मनोरंजन, आय.टी. इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात देशामध्ये प्रचंड उत्पादन होत आहे मात्र कृषी क्षेत्रात प्रगती कमी आहे. अनेक पॅकेजेस देऊन सुद्धा शेतकरी आत्महत्या करीत आहेत. पुणे, मुंबई सारख्या शहरांवर भार वाढत आहे. खेडी भकास आणि शहरे बकाल अशी स्थिती आहे. २०१४ साली सत्तांतर होऊन सुद्धा काहीही फरक पडलेला नाही. दाम दिल्याशिवाय सरकारी काम होत नाही, हा प्रत्येकाचा अनुभव आहे. 
या सगळ्या गोष्टी समाजाचे सामुहिक अधःपतन झाल्याने झालेल्या आहेत. यावर उपाय एकच आहे तो म्हणजे प्रत्येक माणसाची अख्लाकी (नैतिक) पातळी कशी ऊंचावेल? यासाठी प्रयत्न करणे. ही प्रत्येकाची वैयक्तिक जबाबदारी आहे की त्याने विवेकशील वागावे. चांगल्या सवई जोपासाव्यात. विवेकाला विकासासारखा वेडा होऊ देऊ नये. तसे पाहता हे काम सहज शक्य नाही मात्र यासाठी इस्लामने एक परिपूर्ण व्यवस्था दिलेली आहे. देशाची एकंदरीत परिस्थिती पाहता या संबंधी चर्चा करणे अप्रस्तुत ठरणार नाही. 

इस्लामीअख्लाक
६ व्या शतकात इस्लामची घोषणा होण्यापूर्वी अरबस्थानातील जंगली टोळ्यांची नैतिक स्थिती अशीच होती जशी आजच्या सुसंस्कृत (?) समाजाची आहे. तेव्हाही लोक कन्याभ्रुणहत्या करीत होते, आजही करीत आहेत. तेव्हा सुद्धा एक टोळी दुसऱ्याला लुटत होती आजही समाजातील एक गट दुसऱ्याला लुटत आहे. तेव्हाही भ्रष्टाचार होता आजही आहे. किंबहुना वाढलेला आहे. ही लांबलचक यादी देण्यापेक्षा फक्त हजरत जाफर तय्यार रजि. यांचे ते चार वाक्य आपण पाहू जे त्यांनी हिजरत (स्थलांतर) केल्यानंतर हबशचा राजा नज्जाशीसमोर उच्चारले होते. ते म्हणाले होते, ”हेराजा! नज्जाशी! आम्ही अडाणी होतो, मूर्ती पूजा करायचो, मुर्दाड खायचो, अश्लिलतेमध्ये जगायचो, स्वार्थासाठी रक्ताच्या नातेसंबंधांना तिलांजली द्यायचो, शेजाऱ्यांबरोबर अत्यंत वाईट वागायचो. थोडक्यात आमच्यापैकी जो बलवान होता तो कमकुवत लोकांना पिळायचा”
याशिवाय त्याकाळी आंतरराष्ट्रीय पातळीवर गाजलेला योद्धा रूस्तुमया जंगली अरबांविषयी काय सांगतो ते पहा, ”अनुशासन सामुहिक नैतिकतेचे दूसरे नाव आहे. ज्यांची अध्यात्मिक शक्ती जेवढी कमकुवत असते त्यांची सामुहिक नैतिकता तेवढीच कमकुवत असते.  जर मुस्लिमांनी उच्चनैतिकतेचा उत्कृष्ट नमुना जगासमोर ठेवला नाही तर दूसरा कोणता समाज आहे जो असा नमुना ठेऊ शकेल? कोणीही नाही! इस्लामच्या शिकवणीचा अरबांसारख्या जंगली आणि उज्जड समाजावर किती चांगला परिणाम झाला हे त्याकाळातील जगात सभ्य समजल्या जाणाऱ्या संस्कृतीचा सेनापती रुस्तूमने जेव्हा पाहिले की युद्धाच्या मैदानात सुद्धा हजरत उमर रजि. अरबी मुस्लिमांना सरळ रांगेमध्ये उभे करून शिस्तीत नमाज अदा करायला लावत आहेत तर तो उद्गारला उमरनी तर माझे काळीज खावून टाकले, त्याने तर कुत्र्यासारख्या लोकांना शिस्त लावली” ( संदर्भः रूदाद भाग नं. ४, पान क्र. १२). वाईट प्रवृत्ती सहाव्या शतकात लोकांच्या अंगात इतकी भिनली होती की इस्लामचा स्विकार केल्यानंतर सुद्धा बराच काळ अनेक बद्दू (अशिक्षित अरब) लोकांना हे समजाऊन सांगून सुद्धा कळत नव्हते की दुसऱ्या टोळीतील लोकांना लुटण्यामध्ये वाईट ते काय? ते दुसऱ्यांना लुटणे आपला हक्क समजत. पण सदके जावां इस्लामवर की इस्लामचा स्विकार केल्यावर अरबस्थानातील हे अडाणी लोकच जगाचे मार्गदर्शक बनले. बॅडमॅनचे जन्टलमॅन बनले. लुटारूचे रूपांतरण मार्गदर्शकात झाले. हे केवळ त्यांच्या अंगामध्ये इस्लामी अख्लाक (सवई) भिनल्यानंतरच शक्य झाले. ईश्वरीय मार्गदर्शन किती महत्वपूर्ण आहे हे समजण्यासाठी खालील वाक्य लक्षात घेणे आवश्यक आहे. “तुमच्या प्रवृत्तीला अल्लाह जेवढा जाणतो तेवढा दूसरा कोणी जाणू शकत नाही. तुम्ही स्वतः ही नाही. म्हणून त्याच्या मार्गदर्शनावर विश्वास ठेवल्याशिवाय तुम्हाला गत्यांतर नाही. दूसरी महत्वाची गोष्ट ही की, ज्याने तुम्हाला इस्तकरार-ए-हमल (आईच्या उदरात गर्भ) बनल्यापासून ते तुमच्या मृत्यूपर्यंत तुमच्या सर्व छोट्या-मोठ्या गरजा पूर्ण करण्याची व्यवस्था केली. तर हे मग कसे शक्य आहे की, तुम्ही कसे जगावे? या संबंधीचे तो मार्गदर्शन करणार नाही. तुम्ही जर सर्वात जास्त कुठल्या गोष्टीचे मोहताज (गरजू) आहात तर ते ईश्वरीय मार्गदर्शनाचे”  (संदर्भः तफहिमुल कुरआन खंड १ पान क्र . २३२)
आज मोठ्या प्रमाणावर लोक इस्लाम धर्मात का दाखल होत नाहीत
मक्क्यामध्ये राहणारे अरबी लोक जरी अडाणी होते तरी ते मूर्ख खचितच नव्हते. त्यांनी प्रेषित मुहम्मद मुस्तफा सल्ललाहु अलैही वसल्लम यांचे जीवन अगदी जवळून पाहिले होते. ४० वर्ष त्यांच्यासोबत राहून त्यांना ”सादिक (खरा) आणि अमीन (विश्वासपात्र)” सारखी विशेषणे दिली होती. अशा सच्च्या वक्तीने (प्रेषितसल्ल.) जेव्हा इस्लामची घोषणा केली तेव्हा ज्यांचा स्वार्थ आडवा आला होता त्यांना खेरीज करून बाकी लोकांनी त्यांच्यावर विश्वास ठेवून मोठ्या प्रमाणात इस्लामचा स्विकार केला होता. 
अनेक संस्थांच्या वेळोवेळी केलेल्या सर्वेक्षणातून ही माहिती पुढे आलेली आहे की जगात सर्वात वेगाने वाढणारा धर्म इस्लाम आहे. आज ही जगभरात रोज अंदाजे २५००  लोक इस्लामचा स्विकार करतात. इतर धर्मांच्या तुलनेत ही गति अधिक आहे. पण इस्लामच्या सुरूवातीच्या काळाच्या तुलनेत ही गती मंद आहे. त्याचे कारण काय? या प्रश्नाचे उत्तर आहे मुस्लिमांची कमी झालेली विश्वासर्हता. जागतिक पातळीवर तसेच भारतातसुद्धा मुस्लिमांनी प्रेषित सल्ल.व त्यांच्या सहाबी रजि. च्या तोडीची तर सोडा त्यांच्या जवळपास पोहचेल इतपत सुद्धा विश्वासर्हता कमावलेली नाही. उलट आपल्या वर्तनाने कल्याणकारी इस्लामच्या प्रतिमेचे प्रचंड नुकसान केलेले आहे. म्हणून आज मोठ्या प्रमाणात लोक इस्लाममध्ये दाखल होत नाहीत. मिळेल त्या मार्गाने व पद्धतीने आपण पैसा कमावण्याच्या नादात नैतिकतेला तिलांजली दिलेली आहे. या स्थितीचे समर्पक वर्णन करताना डॉ.इक्बाल म्हणतात, 
अहेद-ए-हाजीर मलेकुल मौत है तेरा जिसने
कब़्ज की रूह तेरी देके तुझे़ फिक्र-ए-मुआश
कोणतीही व्यक्ती एकदम भ्रष्ट होत नाही. अगोदर तिची श्रद्धा भ्रष्ट होते. मग विचार भ्रष्ट होतात. शेवटी व्यक्ती अन्मग समाज भ्रष्ट होतो. हे टाळायचे असेल तर आपल्याला आपली श्रद्धा भ्रष्ट होणार नाही यची अगोदर काळजी घ्यायला हवी. या साठी मुस्लिमांकडे एक परिपूर्ण व्यवस्था आहे. ज्याला शरियत म्हणतात. त्यात हलाल काय आणि हराम काय? याविषयी स्पष्ट मार्गदर्शन केलेले आहेत. त्यास अनुसरून आपण जगलो तर समाजाच्या आदरास पात्र ठरू.
यात एक अडचण अशी आहे की पाश्च्यात्यांनी जीवनमान उंचावण्याचे जे उद्देश्य जगाला ठरवून दिलेले आहे ते मुस्लिम समाजाचे सुद्धा जगण्याचे उद्देश्य बनलेले आहे. वास्तविक पाहता उच्च जीवनमान मुस्लिमांचे नस्बुल ऐन (उद्देश्य) असूच शकत नाही. आदर्श नैतिक समाजाची रचना हा मुस्लिमांचा नस्बुलऐन आहे. ते हस्तगत करतांना भ्रष्ट लोकांसारखे वाहवत न जाता सोशिकपणे जीवन जगणे गरजेचे आहे. चार पैसे कमी मिळाले, राहनीमान जरा खालच्या स्तरचे राहिले तरी चालेल पण नैतिकतेचा स्तर खाली येता कामा नये. हा उद्देश्य ठेवला तर आपण देशासमोर आदर्श समाजाचे उदाहरण ठेवू शकू. 
आज जागतिक पातळीवर समाजात नैतिकता उत्पन्न करण्याऱ्या सर्व संस्था अपयशी ठरल्या आहेत, कायदे, पोलीस, न्यायालये, शासन, प्रशासन सर्वच अपयशी ठरलेले आहेत. आता आशा आहे ती केवळ फक्त इस्लामी व्यवस्थेकडूनच. याच आशेने आंतरराष्ट्रीय स्तरावर लोक मंदगतीने का होईना इस्लाममध्ये दाखल होत आहेत. तर मित्रांनो ! नैतिकतेची कास मुस्लिम नाही धरणार तर कोण धरणार ? माणसांच्या व्यक्तिमत्वाचा संतुलित विकास इस्लाममध्येच होऊ शकतो. कारण याव्यवस्थेमध्ये शरीर व आत्मा या दोघांच्याही विकासाला समसमान संधी आहे. नैतिकता जोपासने सोपे काम नाही. चारीही बाजूंनी जेव्हा अनैतिकतेची, स्वार्थ्याची, गुन्हेगारीची, अश्लिलतेची मांदियाळी असेल तर खरंच चांगल्या सवई जोपासणे कठिण काम आहे. कठिण आहे म्हणूनच करण्यालायक आहे. कोणतेही महान काम सहज साध्य होत नसते. चांगल्या सवईचा जो फॉर्म्युला इस्लामने सांगितलेला आहे तो अगदी सोपा आहे. सर्वप्रथम स्वतःशी निश्‍चय करा की स्वतःला चांगल्या सवई लावून घ्यायच्या आहेत. त्यानंतर सर्वात अगोदर तुम्हाला जी भाषा चांगल्या प्रकारे येते त्या भाषेत कुरान समजून वाचण्यास सुरूवात करा, पाच वेळची नमाज न चुकता अदा करा. यातून जी सकारात्मक ऊर्जा तुमच्या मध्ये निर्माण होईल त्यातून तुमचा सहजविकास होईल. ईबादतीमुळे तुमच्या सवई चांगल्या होतील व तुम्ही चांगले व्हाल. 
काय करावे त्याबद्दल विवेचन झाले आहे. आता काय करून ये याकडे पाहू या. सर्वप्रथम घरातून टी.व्ही. बाहेर काढा किंवा त्याला चाईल्ड लॉ गलावा व पासवर्ड कुणाला सांगू नका. त्याऐवजी चांगली पुस्तके, वर्तमान पत्रे घ्या व घरच्यांना वाचायला द्या. शक्य तितक्यावेळी सर्वांना बसवून घरात सामुहिक तालीमची व्यवस्था करा. येन केन प्रकारेण घराचे वातावरण पवित्र राहील याची व्यवस्था करा. मग तुमच्या घरच्या सदस्यांनाही चांगुलपणाची गोडी वाटायला लागेल. लक्षात ठेवा चकाचक चमकणाऱ्या घाणी पेक्षा साधी सिदी तहारत (स्वच्छ) वाली तनाव मुक्त जीवनशैली केव्हा ही चांगली. अल्लाह मला, तुम्हाला आणि आपल्या सर्वांना नैतिक जीवन जगण्याची शक्ती व युक्ती प्रदान करो. (आमीन.)

- बशीरशेख -
वाचकांना आठवत असेल की २२ जून २०१७ रोजी मथुरेला जाणाऱ्या ट्रेनमध्ये १५ वर्षाचा कोवळा जुनैद ईदचे साहित्य घेऊन घरी जात असतांना रोजाच्या अवस्थेत रेल्वेमध्ये केवळ दाढी-टोपी मुळे हल्लेखोरांच्या हल्ल्यामध्ये ठार झाला. यासंदर्भात दाखल झालेल्या गुन्ह्यात ६ आरोपींना पोलिसांनी स्वतःच क्लिन चिट दिली.
ज्यांच्यावर आरोपपत्र ठेवले त्यापैकी नरेश कुमार याला वाचविण्याचे पुण्यकर्म ऍडिशनल ऍडव्होकेट जनरल नवीन कौशिक करत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आलेले आहे. २५ आक्टोबर ला एक अंतरिम आदेश काढून फरिदाबादचे अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायाधिश वाय.एस. राठौर यांनी ऍडिशनल ऍडव्होकेट जनरल नवीन कौशिक हे आरोपीला मदद करण्याची भूमिका कोर्टात घेत असल्याने त्यांच्या विरूद्ध कारवाई करावी, असे म्हटलेले आहे. नवीन कौशिक हे आरोपीच्या वकीलाला सरकारी साक्षीदाराला कोणते प्रश्न विचारावेत, याची माहिती देत होते. ही अतिशय धक्कादायक आणि गंभीर बाब आहे. इंडियन एक्सप्रेसने यासंदर्भात एक विस्तृत अहवाल प्रकाशित केलेला आहे. 
या पूर्वीही मालेगावच्या बॉम्बस्फोटामध्ये संलिप्त हिंदुत्ववादी आरोपींविषयी सौम्य भूमिका घ्यावी, असा दबाव सरकारी वकील रोहिनी सॅलियन यांच्यावरही एन आय ए च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून टाकण्यात आला होता. त्या दबावाला न जुमानल्यामुळे त्या केसमधून पैरवी करण्यापासून रोखण्यात आले. नंतर आलेल्या वकीलाची चोख भूमिका पार पाडली आणि साध्वी प्रज्ञा पासून कर्नल पुरोहितपर्यंत सर्व आरोपी विनासायास जामीनावर मुक्त झाले. यांच्याशिवाय, स्वामी आसीमानंद ज्यांनी दस्तुरखुद्द न्यायाधिशांसमोर बॉम्बस्फोटाची कबुली दिली. त्यांचीही जामीनवर मुक्तता झालेली आहे.
१०० गुन्हेगार सुटले तरी चालतील परंतु, एका निरपराध माणसास शिक्षा झालेली चालणार नाही. या न्यायतत्वाची खुली पायमल्ली आपल्या देशात सुरू असल्याचे दिसून येत आहे. इतर आरोपी पुराव्याच्या आधारे अटक केले जातात तर मुस्लिमांना मात्र संशयावरून अटक केले जाते व लगेच माध्यमांमध्ये त्यांना आतंकवादी घोषित केले जाते. मागच्या वर्षी बैंगलोरच्या प्रसिद्ध आलीमेदीन अंझर शाह कास्मी यांना केवळ संशयावरून अटक झाली होती. तेव्हा देशभराच्या माध्यमांनी आतंकवाद्याला अटक! म्हणून एकच रान उठविले होते. मात्र आक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात त्यांची कोर्टाने निर्दोष मुक्तता केली. त्याची दोन ओळीची बातमीही कोणत्याही वर्तमान पत्रात छापून आली नाही. किंवा इलेक्ट्रॉनिक मीडियाने त्यांच्या सुटकेची दखल घेतलेली नाही. यावरून स्पष्ट दिसून येत आहे की, मुस्लिमांच्या बाबतीत पोलीस आणि माध्यमे हे पूर्वग्रहदुषित आहेत. आजही शेकडो मुस्लिम तरूण देशाच्या वेगवेगळ्या जेलमध्ये युएपीए कायद्यांतर्गत डांबून ठेवण्यात आलेले आहेत. त्यांच्या सुनावण्या सुद्धा वेळेवर होत नाहीत. कारण कोर्टांची संख्या अतिशय तोकडी आहे. अनेक तरूणांना कोर्टाने निर्दोष सोडल्यानंतरही त्यांना नुकसानभरपाई मिळालेली नाही. तसेच त्यांना जाणून बुजून अटक करून खोट्या आतंकवादासारख्या गंभीर गुन्ह्यामध्ये गोवण्यास जबाबदार असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांच्याविरूद्ध कुठलीही कारवाई करण्यात आलेली नाही. जुनैदच्या बाबतीतही न्यायाधिश राठौर यांनी जरी तक्रार केली असली तरी सरकार, सरकारी वकीलांच्याविरूद्ध काही कारवाई करेल याची शक्यता नाही.

-शाहजहान मगदुम

खरा इतिहास कोणता हा सदासर्वकाळ वादाचा विषय असतो. जसा राज्यकर्ता तसा इतिहास हा जगाचा अनुभव असताना भारत किंवा महाराष्ट्र राज्य त्याला अपवाद असणार नाही हे नक्कीच. सध्या देशात इतिहासाच्या विकृतीकरणाची सत्ताधाऱ्यांनी जणू मोहीमच उघडल्याची विविध घटना, चर्चित मुद्दे, प्रसारमाध्यमांतील मथळे आणि राजकीय वाचाळविरांची मुक्ताफळे पाहून प्रचिती येते. सध्या गाजत असलेले मुद्दे म्हणजे ताजमहलचे ऐतिहासिक महत्त्व आणि टिपू सुलतानच्या राष्ट्रीयत्वावर प्रश्नचिन्ह हे होत. कधी शिक्षणाचे भगवीकरण, कधी रस्त्यांचे, शहरांचे नामांतर, कधी ऐतिहासिक इमारतींचे नामांतर तर कधी ऐतिहासिक वास्तूंचा विध्वंस अशा अनेक प्रकारच्या क्ऌप्त्या जनतेचे लक्ष वळविण्यासाठी वापरल्या जात आहेत.
कारण जनतेला सत्ताधारी मंडळींनी केलेल्या कुकृत्यांचे अंदाज येऊ नये किंवा त्याकडे भारतीय नागरिकांचे लक्ष जाऊ नये हा प्रमुख हेतू असू शकतो. त्याचबरोबर तथाकथित हिंदुत्ववाद्यांचे सरकार केंद्रात स्थापन झाल्यापासून अशा घटनांना जणू पेवच फुटले आहे. केंद्र सरकारने वाय. सुदर्शन राव यांची इंडियन कौन्सिल ऑफ हिस्टॉरिकल रिसर्च (आयसीएचआर)च्या  अध्यक्षपदी निवड केल्यापासून इतिहासाच्या विकृतीकरणाची सुरूवात झाल्याची चाहूल लागली होती. खरे पाहता भारतीय मुस्लिमद्वेषाच्या अनुषंगाने येथील इतिहासाच्या विकृतीकरणाची सुरूवात यापूर्वीच्या सत्ताधाऱ्यांच्या काळातही झालेली आहे, यात वाद नाही. मात्र भारतीय इतिहास आता अधिकृतपणे मांडण्याचा व बदलण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे वाटते. कारण सुदर्शन राव यांनी इ. सन २००७ मध्ये आपल्या ब्लॉगवर ‘इंडियन कास्ट सिस्टम : अ रीअप्रेजल’ या शीर्षकाखाली लिहिलेल्या लेखात जातीव्यवस्थेच्या सर्व कुकृत्यांना उत्तर भारतातील तथाकथित सातशे वर्षांचा मुस्लिम कालखंड जबाबदार असल्याचे ते सांगतात. जेव्हा जेव्हा भाजपची सत्ता येते, तेव्हा इतिहासावर सरकारी हल्ला सुरू होतो, यालादेखील इतिहास साक्ष आहे. जेव्हा सत्तेत नसतो तेव्हा रा. स्व. संघाच्या अनेक संघटनांद्वारा हे काम एकसारखे केले जाते. इ. सन १९७० च्या दशकाच्या शेवटी संघाने इतिहास संकलन समिती स्थापन केली होती. भारतीय दृष्टिकोनातून इतिहास लेखन करण्यास प्रोत्साहन देणे हा या समितीचा उद्देश होता. नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर एकापाठोपाठ एक अशी अनेक प्रकरणे उघडकीस आली आहेत. प्रसिद्ध इतिहासकार रोमिला थापर यास ‘अंधकारमय दिवसां’चा संकेत ठरवितात. त्यांच्या मते हिंदू आस्थाद्वारा इतिहासाच्या अधिकारक्षेत्रावर करण्यात आलेले हे अतिक्रमण आहे. ही विचारधारा देशातील विविधतेला नाकारत स्वातंत्र्यानंतर भारतात अत्यंत दृढतेने स्थापित करण्यात आलेल्या संवैधानिक मूल्यांना नाकारते. त्यामुळे लोकशाही समाज असलेल्या भारताच्या विकासयात्रेला बाधा पोहचू शकते. कट्टरवाद, संकुचित मानसिकता आणि यथास्थितीवादाचा उदय आधुनिक व प्रगतीशील भारतासाठी आगामी काळात मोठे आव्हान ठरणार आहे. एरिक हॉब्सबॉमने सांगितले आहे की राष्ट्रवाद हा इतिहासाकरिता ‘अपूâ’सारखा आहे. याचीच प्रचिती आपल्याला आता येताना दिसत आहे. रा.लो.आ.च्या शासनकाळात (इ. सन १९९९-२००४) इतिहासाच्या क्रमिक पुस्तकांमध्ये सांप्रदायिकता ठासून भरण्यात आली होती. सध्या शैक्षणिक क्षेत्रात करण्यात येत असलेले परिवर्तन पूर्वीपेक्षाही अधिक भयानक आहे. आता पौराणिक कथा व गाथांना प्रमाणित मानण्यात येऊ लागले आहे. त्याचबरोबर ‘कलेक्टिव्ह मेमरी’च्या नावाखाली खऱ्या इतिहासाला दफन करण्याचा प्रयत्न सुरू आहेत. ‘महाभारत प्रोजेक्ट’द्वारा धर्मावर आधारित ‘भारतीय गुलामी’ला परिभाषित करून येथील मुस्लिम व खिश्चनांना परकीय सिद्ध केले जाईल. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी संसदेत ९ जून २०१४ रोजी दिलेल्या भाषणात म्हटले होते, ‘‘काही गोष्टींत बाराशे वर्षांची गुलामी आम्हाला त्रासदायक ठरते.’’ ही १२०० वर्षींची गुलामी म्हणजे इ. सन ७११ मध्ये सिंधुवर अरबांचे आक्रमण आणि त्यानंतर तुर्की शासनाची स्थापना भारताकरिता तथाकथित गुलामी होती. आता इतिहासाच्या पुनर्लेखनाच्या नावाने पुन्हा राष्ट्रनायक आणि खलनायकांना परिभाषित करण्यात येऊ लागले आहे. केंद्रात भाजपने सत्ता स्थापन केल्यानंतर अकादमी क्षेत्रात सर्वप्रथम आणि केंद्रित हल्ला इतिहासावर झाला आहे. कारण शासक व विजेता इतिहासाला तलवार-बंदुकीपेक्षा अधिक प्रभावी शस्त्र मानतात. कोणत्याही समाजाची मानसिकता बदलून टाकण्यात इतिहासाने फार मोठी भूमिका पार पाडली आहे. म्हणून प्रत्येक शासक आपल्याला हवा तसा इतिहास लिहून घेण्याचा प्रयत्न करीत असतो. मोदी सरकारने याच रणनीतीनुसार तशी सुरूवात केली आहे. ही आगामी काळातील अंधकारमय दिवसांची चाहूलच म्हणावी लागेल. विकासाचे, अर्थकारणाचे राजकारण करण्याऐवजी देशात नको त्या मुद्यांवरून राजकारण पेटवले जात आहे. विकासाच्या मुद्यावरून लक्ष विचलित करण्यासाठी अशा घटनांचे राजकारण होत आहे. हिंदू-मुस्लिम समाजात परस्पर अविश्वासाचे वातावरण निर्माण करणे सध्याच्या असहिष्णुतेच्या काळात एकात्मतेला तडा देणारे आहे.
-शाहजहान मगदुम
(मो.:८९७६५३३४०४ , Email: magdumshah@gmail.com)

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget