Halloween Costume ideas 2015

घमेंड : प्रेषितवाणी (हदीस)

माननीय इब्ने उमर (रजि.) यांच्या कथनानुसार,
    पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘जो आपली वस्त्रे (विजार, लुंगी वगैरे) घमेंडीत जमिनीवर फरफटत नेईल, त्याच्याकडे अल्लाह अंतिम निवाड्याच्या दिवशी पाहणार नाही. (कृपादृष्टी टाकणार नाही.)’’
    अबू बक्र सिद्दीक (रजि.) म्हणाले, ‘‘माझी विजार ढिली होऊन घोट्याच्या खाली जाते. जर मी सावरली नाही (तर मीदेखील आपल्या पालनकत्र्याच्या कृपादृष्टीपासून वंचित राहीन काय?)’’
    पैगंबर म्हणाले, ‘‘नाही. तुम्ही घमेंडीत विजार फरफटणाऱ्यांपैकी नाही. (मग तुम्ही अल्लाहच्या कृपादृष्टीपासून का बरे वंचित राहाल!)’’ (हदीस : बुखारी)
स्पष्टीकरण : माननीय अबू बक्र (रजि.) यांची विजार ढिली असण्याचे कारण त्यांचे पोट आले होते असे नव्हे तर त्यांची शरीरयष्टी तशी होती. अबू बक्र (रजि.) खूपच दुबळे होते.     पैगंबर मुहम्मद (स.) असेही सांगितले, ‘‘घमेंडी आणि फुशारकीने टाचेपर्यंत वस्त्र परिधान करणारा अल्लाहच्या कृपादृष्टीपासून वंचित राहील.’’ अबू बक्र (रजि.) यांनी हे संपूर्ण वक्तव्य ऐकले होते आणि त्यांना माहीत होते की ते जाणूनबुजून घमेंडीने तसे करीत नव्हते. परंतु जेव्हा मनुष्याला परलोकाची काळजी वाटू लागते तेव्हा पापाच्या सावलीपासूनही दूर धावू जातो. माननीय अब्दुल्लाह बिन अब्बास (रजि.) सांगतात, ‘‘हवे ते खा आणि हवे ते परिधान करा मात्र अट अशी की तुम्हाला घमेंडी व वायफळ खर्च करण्याची सवय नसावी.''
अत्याचार
    माननीय इब्ने उमर (रजि.) यांच्या कथनानुसार,
    पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘अत्याचार अंतिन निवाड्याच्या दिवशी अत्याचारीकरिता गडद काळोख बनेल.’’
    माननीय औस बिन शुरहबील (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘एखादा अत्याचारी आहे हे माहीत असूनदेखील त्याची साथ देऊन त्याची शक्ती वाढविणारा मनुष्य इस्लाममधून बाहेर पडला. अर्थात, जाणूनबुजून एखाद्या अत्याचाऱ्याची प्रशंसा करणे आणि त्याची साथ देणे ईमान व इस्लामच्या विरूद्ध आहे. (हदीस : मिश्कात)
    माननीय अबू हुरैरा (रजि.) यांच्या कथनानुसार,
    पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘तुम्हाला माहीत आहे की दिवाळखोर व दरिद्री कोण आहे?’’ लोकांनी उत्तर दिले, ‘‘दरिद्री आमच्याकडे त्या व्यक्तीला म्हणतात ज्याच्याकडे दिरहम नसेल आणि सामानही नसेल.’’ पैगंबर म्हणाले, ‘‘माझ्या जनसमुदायातील दरिद्री व दिवाळखोर तो आहे जो अंतिम निवाड्याच्या दिवशी आपली नमाज, रोजा आणि जकातसह अल्लाहपाशी हजर होील आणि त्याचबरोबर त्याने जगात कोणाला शिवीगाळ केली आणि एखाद्यावर आळ घेतला असेल, कोणाची संपत्ती हडप केली असेल, कोणाची त्याने हत्या केली असेल आणि कोणाला त्याने विनाकारण मारले असेल तर त्या सर्व अत्याचारपीडितांमध्ये त्याचे पुण्य वाटले जाईल, मग जर त्याचे पुण्य समाप्त झाले आणि अत्याचारपीडितांचे अधिकार अजूनही उरले असतील तर त्यांच्या चुका त्याच्या खात्यात टाकण्यात येतील आणि मग त्याला नरकात फेकून दिले जाईल.’’ (हदीस : मुस्लिम)
स्पष्टीकरण : या हदीसद्वारे पैगंबर मुहम्मद (स.) अल्लाहच्या दासांच्या अधिकारांचे महत्त्व सांगू इच्छितात. म्हणून अल्लाहचे अधिकार अदा करणाऱ्यांनी दासांच्या अधिकारांचे हनन करू नये अन्यथा ही नमाज, रोजा आणि दुसरे पुण्यकर्म सर्वकाही धोक्यात येतील.
    माननीय अली (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘अत्याचारपीडिताच्या हांकेपासून स्वत:चा बचाव करा, कारण तो अल्लाहपाशी आपला अधिकार मागत आहे आणि अल्लाह कोणा अधिकार असणाऱ्याला त्याच्या अधिकारापासून वंचित करत नाही.’’ (हदीस : मिश्कात)
स्पष्टीकरण : या हदीसमध्ये अत्याचारपीडिताची पुकार ऐकण्यापासून रोखण्यात आले आहे. तो अल्लाहसमोर तुमच्या अत्याचाराची हकीकत सांगेल आणि अल्लाह न्यायप्रिय आहे, तो हक्कदाराला त्याच्या अधिकारापासून वंचित करीत नाही आणि याच कारणामुळे तो अत्याचाराला अनेक प्रकारच्या बेचैनी व संकटांमध्ये टाकतो.

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget